Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  जागतिक पातळीवर औद्योगिक क्षेत्रामध्ये मंदीची लाट असतानाही पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना मोठ्या पगाराच्या नोकरीच्या संधी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या वतीने मिळवून देण्यात आल्या आहेत.    पीसीईटी अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षातील १,५०० विध्यार्थ्यांपैकी आतापर्यंत सुमारे १,०५५ नोकऱ्या मिळाल्या आहेत. उर्वरित विद्यार्थ्यांसाठी पुढील सहा महिन्यात अनेक नोकरी मेळावे आयोजित करण्याचे नियोजन केले आहे अशी माहिती पीसीईटी सेंट्रल ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचे अधिष्ठाता डॉ. शितलकुमार रवंदळे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.   या वर्षी आतापर्यंत १०५५ विद्यार्थ्यांची निवड नामांकित अश्या आयटी व कोअर मॅन्युफॅक्चरींग कंपनीमध्ये झाली आहे. यामध्ये ॲक्सेंचर (१६८), कॅपजेमिनी (१०५), केपीआयटी (१०२) या कंपन्यांचा समावेश आहे.…

Read More

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित या संस्थेची ५३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी (दि.२८ मे) चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे अध्यक्ष शशिकांत उर्फ बबन झिंजुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. कामगार कल्याण विभाग अधिकारी प्रमोद जगताप, सह शहर अभियंता गलबले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी आर्थिक वर्ष २०२३-२४  चा सभासदांना १२ % दराप्रमाणे लाभांश मंजूर करण्यात आला.  सेवानिवृत्त व सलग २५ वर्ष सभासद असणाऱ्या सभासदांचा रोख पाच हजार रुपये व शाल, स्मृती चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.    तसेच सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा व राज्यस्तरीय खेळाडूंचा देखील स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कुदळवाडी भागातील यादवनगर, विठ्ठल मंदिर परिसर, मोरे पाटील चौक परिसरात ड्रेनेज लाईन दुरुस्तीविषयक व नव्याने ड्रेनेज लाईन टाकण्यासाठीची विकासकामे प्रलंबित आहेत. या कामांची पाहणी व आराखडा तयार करण्याकरिता आमदार महेश लांडगे यांच्या सुचनेनुसार महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी परिसराला भेटी दिल्या. यावेळी प्रभागातील नागरिकांनी त्यांना भेडसावणाऱ्या समस्या अधिकाऱ्यांसमोर उपस्थित केल्या. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी परिसराची पाहणी करुन सविस्तरपणे माहिती घेतली. उपाययोजनाबाबत आराखडा तयार केला. लवकरच कामांचा शुभारंभ होईल, असे आश्वासन दिले, अशी माहिती भाजपचे युवा नेते दिनेश यादव यांनी दिली.

Read More

जपानी सुविधा केंद्र, टोकियो फाउंडेशन आणि निप्पॉन फाउंडेशन यांच्या वतीने पुस्तकांची भेट पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जपानला आधुनिक तंत्रज्ञाना बरोबरच कला, संस्कृती, धार्मिक इतिहास आहे. ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी जपान मध्ये यायचे आहे त्यांना जपानी संस्कृती, भाषा अभ्यासाची संधी ‘रिड जपान प्रोजेक्ट’ या प्रकल्पामुळे मिळाली आहे.‌ या संधीचा विद्यार्थ्यांनी फायदा घेतला पाहिजे असे, मत मुंबईतील जपानचे महावाणिज्य दूत यागी कोजी यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) निगडी येथील पिंपरी चिंचवड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग (पीसीसीओई) येथे मंगळवारी (२८ मे) जपान सुविधा केंद्रांतर्गत टोकियो फाउंडेशन आणि धोरण संशोधन, निप्पॉन फाउंडेशन यांच्या वतीने दीडशे पुस्तकं भेट देण्यात आली. यावेळी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील निगडी याठिकाणी असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रातील पाणीपुरवठा विषयक नियमित देखभाल दुरुस्तीची कामे तसेच शहरातील वितरण व्यवस्थेमधील विविध ठिकाणी देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेणे आवश्यक असल्यामुळे गुरुवारी ३० मे रोजी पिंपरी चिंचवड शहराचा संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने निगडी, सेक्टर क्र.२३ येथील जलशुध्दीकरण केंद्रातील पाणीपुरवठा विषयक नियमित देखभाल दुरुस्तीची आवश्यक कामे यासह शहरातील वितरण व्यवस्थेमधील विविध ठिकाणी देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवारी ३० मे २०२४ रोजी संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येईल. तसेच सकाळचा पाणीपुरवठा नियमित वेळेनुसार सुरु राहणार आहे. शहरातील सर्व भागात दुस-या दिवशी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांना मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. चिंचवड येथील स्मशान भूमीकडे जाण्यासाठी असणारा ८ मीटरचा रस्ता तयार करण्यासाठी खोदकाम करुन ठेवला आहे. सहा महिने होऊन गेले तरी रस्त्याचे काम पूर्ण करण्यात स्थापत्य विभाग उदासीन असल्याचे दिसत आहे. मेल्यानंतर ही महापालिका प्रशासनाकडून मृतांचा छळ सुरु असल्याचा संताप शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) शहर संघटक संतोष सौंदणकर यांनी व्यक्त केला आहे. यासंदर्भात मा. संतोष सौंदणकर यांनी प्रसिध्दीपत्रक दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, शहराचा विकास करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका नागरिकांच्या खिशातून कराचे पैसे घेते. त्या बदल्यात वेगवेगळ्या सुविधा नागरिकांना दिल्या जातात. वेळेत कर…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्री सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थिनी कु. आरणे आरणे रोहिणी पोपट (रा. घरकुल चिखली पुणे )हिने इ. बारावी कला शाखेत 92. 67 टक्के गुण संपादन करून प्रथम क्रमांक पटविला आहे . तिचे वडील  आरणे पोपट नामदेव हे घरोघरी वृत्तपत्र टाकण्याचे काम करतात. घरची परिस्थिती नाजूक असून देखील घवघवीत यश मिळाविल्याबद्दल संस्थेचे संस्थापक  गोविंद दाभाडे , प्राचार्या.वाळुंज मॅडम ,उपप्राचार्य श्री. बच्चे यांनी तिला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. तिला मराठी, इतिहास विषयासाठी सौ. आणेकर मॅडम ,इंग्रजी विषयासाठी सौ .अभोणकर मॅडम, अर्थशास्त्र ,राज्यशास्त्र या विषयासाठी  शेख मॅडम तसेच भूगोल विषयासाठी  दौंडकर मॅडम यांनी प्रत्येक प्रत्येक…

Read More

न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलचा दहावीचा सलग पाच वर्ष शंभर टक्के निकाल पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलचा दहावीचा सलग पाच वर्ष  शंभर टक्के निकाल लागला आहे. यात धनश्री पाथरकर  – ८१.२० टक्के, सोनाली परमार  – ८०.४० टक्के, मित कुरले  – ७९.४० टक्के, प्राप्त केले आहेत. तर गुणवत्ता यादीमध्ये ०६ मुलांनी विशेष प्राविण्य मिळवले. विद्यार्थ्यांना यश मिळावे, यासाठी शाळेचे उपमुख्याध्यापक आणि वर्गशिक्षक सचिन कळसाईत सर इयत्ता दहावीचे सर्व शिक्षक यांनी मेहनत घेतली. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन प्राचार्य नाजनीन शेख यांनी केले. संस्थचे संस्थापक अरुण चाबुकस्वार यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ लोकसभा निवडणूकीची मतमोजणी पार पाडण्यासाठी आवश्यक तयारी अंतिम टप्प्यात आली असून भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे, अशी माहिती मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी दिली. मावळ लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी येत्या ४ जून २०२४ रोजी होणाऱ्या मतमोजणी प्रक्रियेच्या अनुषंगाने प्रशासनाने केलेल्या तयारीची माहिती प्रसारमाध्यमांना देण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नवीन प्रशासकीय इमारत, आकुर्डी येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी माहिती देताना दीपक सिंगला बोलत होते. यावेळी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त वसंत परदेशी,…

Read More

‘टेन्टेटिव्ह रेड झोन लाईन’ सुमारे १५७ मीटरने कमी होणार पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘रेड झोन’मुळे यमुनानगर आणि कृष्णानगरमधील ८० टक्के भाग प्रभावित आहे. २०१९ मध्ये टेन्टेटिव्ह लाईन घोषित केली होती. आता रितसर मोजणी आणि सर्व्हेक्षण झाल्यास या भागातील सुमारे ५ हजार घरे रेडझोनच्या हद्दीबाहेर होतील. तसेच, रेड झोनची हद्द तात्काळ प्रभावाने १५७ मीटर कमी होईल, असा विश्वास पिंपरी-चिंचवड महापालिका क्रीडा समितीचे माजी सभापती उत्तम केंदळे यांनी व्यक्त केला. पिंपरी-चिंचवडमधील बहुप्रतिक्षित ‘रेड झोन’ चा प्रश्न कायमस्वरुपी सोडवण्यासाठी २०१४ पासून भाजपा अमादार महेश लांडगे पाठपुरावा करीत आहेत. संरक्षण विभागाने नुकतीच रेड झोनच्या मोजणीसाठी ‘एनओसी’ दिली आहे. ही प्रक्रिया ‘रेड झोन मुक्त…

Read More