- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
लेट पासिंग दंड सह इतर प्रश्न सोडवा अन्यथा महाराष्ट्र भर तीव्र आंदोलन :- बाबा कांबळे पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ऑटो टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशन, ऑटो टॅक्सी चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्य, पुणे पिंपरी चिंचवड शहरातील, ऑटो टॅक्सी संघटनांची बैठक, मुंबई येथील परिवहन आयुक्त कार्यालयामध्ये दि,29-5-2024 रोजी दुपारी 12,30, वाजता.आयोजित करण्यात, आले होते, दुपारी तीन वाजेपर्यंत, दोन तासापेक्षा अधिक काळ हि बैठक चालली, यावेळी अनेक मुद्द्यावरती सविस्तरपणे चर्चा झाली असून अनेक प्रश्न या बैठकीमधून मार्गे लागणार आहेत. यावेळी महाराष्ट्र राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भिमनवार, सह परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील, अतिरिक्त सह परिवहन आयुक्त, श्री कळसकर व कैलास…
चऱ्होली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चऱ्होली येथील काळे कॉलनी मध्ये नुकत्याच झालेल्या शालांत परीक्षेत अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये मात करून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान ॲड. सचिन काळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सचिन काळे म्हणाले की, मुलांमध्ये शिक्षणाची जिद्द असली पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी आपल्या परिस्थिती जाणीव ठेवून आपल्या आई-वडिलांच्या कष्टाचे चीझ केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी मला आयुष्य काय करावयाचे आहे ? आणि हेच ध्येय डोळ्यासमोर अभ्यास केला पाहिजे ,त्यासाठी कष्टाची तयारी ठेवली पाहिजे ,सध्या स्पर्धेचे युग आहे आणि आपण स्पर्धेमध्ये टिकले पाहिजे असे परखड मत सचिन काळे यांनी व्यक्त केले . यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रज्ञा काळे यांनी सांगितले की कोणत्याही विद्यार्थ्यांना…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -अमरधाम स्मशानभूमी निगडी येथील विद्युत दाहिनी सुरू करण्यात यावी नेते मंडळी ह्यांच्या उपस्थितीत उद्घाटन कार्यक्रम न करता थेट पद्धतीने विद्युत दाहिनी सुरू करा?, अशी मागणी भाजपचे पिंपरी चिंचवड शहराचे चिटणीस यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, निगडी येथील अमरधाम स्मशानभूमी ह्या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांच्या कडून नवीन विद्युत दाहिनी काम संपुर्ण झाले असून फक्त राजकीय नेते मंडळी ह्यांच्या उपस्थितीत उद्घाटन कार्यक्रम पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांना घेण्यासाठी निगडी येथील अमरधाम स्मशानभूमी येथील विद्युत दाहिनी सुरू करण्यात आलेली नाही. निगडी भागातील मयत व्यक्ती ह्यांना अंत्यसंस्कार करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांनी…
चिंचवड ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – येथील कमला एज्युकेशन सोसायटिच्या प्रतिभा इन्स्टिट्यूशन्स आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल मॅनेजमेंट पुणे शाखा याच्या संयुक्त विद्यमाने संसाधन विभागातील समुहातील अधिकार्यासाठी महाविद्यालयात औद्योगिक कार्य वातावरणातील कर्मचार्यांमध्ये लवचिकता या विषयावर भारत फोर्ज कंपनीतील मानव संसाधन विभागाचे संचालक डॉ. संतोष भावे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते त्यावेळी उपस्थिताना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी विविध उद्योग समुहातील सुमारे 140 हून मानव संसाधन उपस्थित होते. प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सने नुकतेच सुरू केलेल्या प्रतिभा कौशल्य विकास केंद्र व प्लेसमेन्टची माहीती उद्योगजगतात व्हावी यासाठी ‘एच आर समिट’ या उपक्रमाचे उद्घाटन व्याख्याने डॉ. संतोष भावे व नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – फळबाग उत्पादक महिला शेतकरी डॉ. भाग्यश्री पाटील यांना मानाचा राज्यस्तरीय राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. फळबाग उत्पादक महिला शेतकरी व उद्यान कृषी क्रांतीच्या जनक डॉ. भाग्यश्री पाटील यांना मानाचा सन २०२४ चा राज्यस्तरीय राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार जाहीर झाला होता. त्या अनुषंगाने प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधावर येऊन ग्रामगीताचार्य सौ.पौर्णिमा ताई सवाई, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या गाडगेबाबा अध्यासनाचे प्रमुख डॉ. दिलीप काळे तसेच राजीव गांधी कृषि विज्ञान प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री प्रकाश दादा साबळे यांच्या शुभहस्ते मानपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले. शेतकरी सन्मानाचे हे १८ वे वर्ष होते. हा सन्मान सोहळा शेतीच्या बांधावर दौंड,…
चिंचवड (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – संभाजीनगर येथील सिद्धिविनायक मंदिरात सावरकर जयंतीनिमित्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना अभिवादन करण्यात आले. सिद्धिविनायक जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष परबती वाडकर यांच्या हस्ते सावरकर प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी सिद्धिविनायक जेष्ठ नागरिक संघ, स्वा. सावरकर प्रतिष्ठान व स्वा. सावरकर मित्र मंडळाचे पदाधिकारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते. विविध वक्त्यांनी सावरकरांचे जाज्वल्य देशप्रेम, ओजस्वी साहित्य, स्वातंत्र्यलढा, क्रांतीकारकांना मार्गदर्शन, सामाजिक संघटन आदी कार्याला उजाळा दिला.
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – निगडी ते विश्रांतवाडी बस सेवा त्वरित चालू करा, अशी मागणी अमित गोरखे यांनी आयुक्त तसेच पीएमपीएल व्यवस्थापकांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की ,पिंपरी चिंचवड क्षेत्रातील नागरिकांना सध्या निगडी ते विश्रांतवाडी दरम्यान बस सेवेसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या मार्गावरील बस सेवा बंद असल्यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर अमित गोरखे यांनी ही सेवा त्वरित सुरू करण्याची मागणी केली आहे. निगडी ते विश्रांतवाडी या मार्गावर मोठ्या प्रमाणावर प्रवासी संख्या आहे. या मार्गावरील बस सेवा बंद असल्यामुळे नागरिकांना प्रवासासाठी पर्यायी साधनांचा वापर करावा लागत आहे. ज्यामुळे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महापालिकेच्या विविध कर सवलतींचा लाभ घेण्यासाठी मालमत्ता धारकांची कर संकलन कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी गुरुवार (दि.30) आणि शुक्रवारी (दि.31) कर संकलन कार्यालयातील कॅश काऊंटर सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय कर आकारणी व कर संकलन विभागाच्या वतीने घेण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सिध्दी उपक्रमा अंतर्गत महिला बचत गटामार्फत मालमत्ता धारकांना बिलांचे वेळेत वाटप करण्यात आले आहे. त्यामुळेच कर संकलन विभागाने 2024-25 या आर्थिक वर्षातील पावणेदोन महिन्यातच अडीचशे कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल केला आहे. कर संकलन विभागाच्या वतीने मालमत्ता धारकांना विविध कर सवलती देण्यात येत आहेत. त्यामुळे आर्थिक वर्षाच्या…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शेतमजूर, असंघटित कामगार, मोलमजुरी करणार्या परिवारातील होतकरू विद्यार्थ्यांची शाळा असा लौकिक असलेल्या मुळशी तालुक्यातील माण येथील जय शिवराय प्रतिष्ठान संचलित न्यू इंग्लिश स्कूल, माण या विद्यालयाचा शैक्षणिक वर्ष २०२३ – २४ चा इयत्ता दहावीचा निकाल ९७.२२ टक्के लागला. इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी यावर्षी एकूण १०८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी सुमारे १०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामध्ये ९ विशेष श्रेणी, ५० प्रथम श्रेणी, ४३ द्वितीय श्रेणी, ३ उत्तीर्ण श्रेणी संपादन करून यशस्वी झालेत; तर ३ विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेत. अनुक्रमे यश मगर ८७.२०%, नेहा बिरारे ८६.८०%, रूपाली गोसावी ८२.८०%, प्राची खंडागळे ८१.००% आणि ओजस्विनी भोसले ७७.८०% या पाच…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) साते, वडगांव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठातील (पीसीयु) स्कूल ऑफ सायन्सेसने राष्ट्रीय स्तरावर आयएपीईएन इंडिया असोसिएशन फॉर पॅरेंटरल ॲण्ड पॅरेंटरल न्यूट्रिशन बरोबर नुकताच शैक्षणिक सामंजस्य करार केला. या करारामुळे आहारशास्त्र आणि क्लिनिकल सायकोलॉजी या क्षेत्रांमध्ये शिक्षण, संशोधन आणि व्यावहारिक उपयोगात प्रगती करण्यासाठी पीसीयुच्या विद्यार्थ्यांना लाभ होईल. यावेळी आयएपीईएनचे डॉ. मानसी पाटील, डॉ.शिल्पा वर्मा, दत्ता पटेल, डॉ. पी.सी. विजयकुमार, पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, प्रभारी कुलगुरू डॉ. मणिमाला पुरी, प्र-कुलगुरू डॉ. सुदीप थेपडे आदी उपस्थित होते. पीसीयुच्या स्कूल ऑफ सायन्सेसला पोषण, आहारशास्त्र, क्लिनिकल सायकॉलॉजी आणि संबंधित प्रकल्पांमधील अग्रगण्य…
