- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
विधानसभेच्या पंचवीस जागांची संभाजी ब्रिगेडची मागणी – ॲड. मनोज आखरे मुख्यमंत्री, उद्योगमंत्री व पालकमंत्र्यांनी तात्काळ राजीनामे द्यावेत – संभाजी ब्रिगेडची मागणी संभाजी ब्रिगेड तीन जून पासून राज्यात आंदोलन करणार पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – लोकसभेची निवडणूक ही लोकशाही विरुद्ध हुकमशाही अशी होती. या निवडणुकित संभाजी ब्रिगेडने अपेक्षेशिवाय काम केले. परंतु महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीत किमान पंचवीस जागा संभाजी ब्रिगेड मागणार आहे अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲड. मनोज आखरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन संभाजी ब्रिगेडने राज्यात सर्व जागांवर महाविकास आघाडी बरोबर प्रचार व प्रसार केला त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीला किमान ३५ जागांवर…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – हिंजवडी आयटी पार्क येथील ३७ कंपन्या परराज्यात गेल्याच्या निषेधार्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मुंबई प्रदेश कार्यालय येथे राज्य सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार मुंबई येथिल पक्ष कार्यालय येथे युवक प्रदेशअध्यक्ष मेहबूब शेख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन घेण्यात आले.”महाराष्ट्रातील युवकांना बेरोजगार करण्याऱ्या सरकारचा धिक्कार असो””रोजगार आमच्या हक्काचा, नाही कोणाच्या बापाचा”या प्रकारच्या जोरदार घोषणा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने देण्यात आल्या. यावेळी बोलताना मेहबूब शेख म्हणाले “युवकांना दरवर्षी २ कोटी रोजगार देण्याच्या पोकळ बाता करणाऱ्या सरकारच्या अनागोंदी कारभारामुळे नवीन नोकऱ्या तर सोडा पण,आज आहेत त्या नोकऱ्या गमावण्याची वेळ महाराष्ट्रमधील…
मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सद्यःस्थिती लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व टप्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. तरी आदर्श आचारसंहिता अद्यापपर्यंत सुरु असून त्यात कोणत्याही प्रकारची शिथिलता देण्यात आलेली नाही. निवडणूकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर नवीन लोकसभा स्थापित झाल्याची अधिसूचना आयोगाकडून प्रसिद्ध होईपर्यंत आचारसंहिता कायम राहणार असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे. आचार संहिता कालावधीत एखाद्या अत्यंत तातडीच्या प्रकरणी आचार संहितेतून सूट देऊन कार्यवाही करणे आवश्यक आहे, अशी प्रकरणे निवडणूक आयोगास शिफारस करण्यासाठी या कार्यालयाच्या दि.२८.२.२०२४ च्या परिपत्रकान्वये मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली छाननी समिती गठीत करण्यात आली आहे. सदर समितीने शिफारस केलेले प्रस्ताव या कार्यालयामार्फत भारत…
आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – कालभैरवनाथ महाराज व खंडोबा महाराज यात्रेची बैलगाडा शर्यतीची मेगाफायनल होऊन कुरुळी हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश रखमाजी धुमाळ व प्रदीप आप्पा टिंगरे यांच्या बैलजोडीने पटकावला. कालभैरवनाथ महाराज व खंडोबा महाराज यात्रे निमित्त भव्यदिव्य २०-२० कुरुळी केसरी २०२४ बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सेमीफायनलसाठी जवळ पास ५८ बैलगाडे सहभागी झाले होते. यापैकी मेगाफायनलसाठी वीस बैलगाडे सहभागी झाले. या शर्यती रात्री उशीरा पर्यंत चालु राहिल्या. यामुळे बक्षीस वितरण देखील उशिरा झाले. यातील ब्रिजेश रखमाजी धुमाळ व प्रदीप आप्पा टिंगरे यांच्या बैलजोडीने ११.०७ मिली पॅाइट सेकंद यावेळेत पूर्ण केल्याने कुरुळी हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे…
आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिव संत लक्ष्मण महाराज समाधी मंदिर आष्टी येथे सुरु असलेल्या बाल सुसंस्कार शिबिरास मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सद्दिच्छा भेट देऊन मार्गदर्शन केले. यावेळी जरांगे पाटील यांचा सत्कार संयोजक गौतम तौर, प्रताप तौर, वैभव सोळंके, समर्थ तौर, अथर्व देशमुख यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थिती सीताराम महाराज रोडगे यांची यावेळी कीर्तन सेवा झाली. या शिबिरात गीता श्लोक, हरिपाठ, योगासने, मृदंग वंदन, गायन, भजन, वारकरी चाली, संत चरित्र मार्गदर्शन करण्यात आले. व्यक्तिमत्व विकास आणि दैनंदिन शिक्षणाचे मार्गदर्शन करण्यात आला. शिबिराचे आयोजन गौतम तौर, योगेश तौर यांनी केले. १९ दिवस या शिबिरास…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर फाडल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात पिंपरी चिंचवड शहरात मनसे आक्रमक झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पिंपरी चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन करण्यात आले. याबाबत सविस्तर वृत्त असे की, राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काल (बुधवार, २९ मे) महाड येथील ऐतिहासिक चवदार तळ्याच्या परिसरात मनूस्मृती दहन करत आंदोलन केलं होते. यावेळी, जितेंद्र आव्हाड यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडली. यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधकांकडून…
आव्हाडांकडून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम सूरू भाजपातर्फे जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधार्थ जोडे मारो आंदोलन पिंपरी ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड या विकृताने महामानव, भारतरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला आहे, महामानवांचा अवमान खपवून घेणार नसून, आव्हाड यांसारख्या वृत्तींना वेळीच ठेचून त्यांच्या पक्षाने आव्हाडांवर कारवाई करावी. तसेच, त्यांच्यावर ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर फाडल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात पिंपरी चिंचवड शहर भाजपा आक्रमक झाला आहे. भाजपा शहराध्यक्ष…
महावितरणच्या यमरूपी डीपीपासून बचावार्थ तळवडेत शुक्रवारी ‘सत्यनारायण महापूजा व महामृत्युंजय अनुष्ठान’
व्हायरल पोस्टमुळे पुन्हा एकदा भोसरी महावितरण विभाग टिकेचा धनी.. दोनशेच्या डीपीवर पाचशेचा लोड; नागरिकांची सुरक्षा रामभरोसे.. पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरात भोसरी महावितरण विभाग टिकेचे धनी होताना दिसत आहे. नुकतेच तळवडे शाखा अभियंता निलंबन प्रकरण, त्यानंतर अधिकाऱ्यांचे कार्यकारी अभियंत्यांना घेराव घालुन कारवाई टाळण्यासाठी निर्माण केलेला दबाव आणि आता काय तर चक्क डीपीवर दिलेल्या वाढीव लोडमुळे नागरिकांचा जिवच टांगणीला लावला आहे. विशेष म्हणजे या धोकादायक डीपीपासून शाळा ही काही अंतरावर आहे. तरीही या डीपीवर अर्थकारणासाठी अनावश्यक लोड देण्याचा गैरप्रकार चव्हाट्यावर आला आहे. याबाबत आग्रहाच्या निमंत्रणाची मजेशीर आशयाची पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यातील उपरोधिक मजकुर…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शहराची संस्कृती आणि परंपरा जपण्यासाठी या गोष्टींवर आपण पोलिसाना सांगून विशेष लक्ष द्यावे.सर्व पबस् ची माहिती गोळा करावी. अंमली पदार्थ विकणाऱ्यांवर वर आळा घालावा. त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ॲड संदीप चिंचवडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुणे शहरामध्ये अनेक पब्झअव्याहतपणे रात्रभर चालू आहेत.त्या बरोबरीने दारू अंमली पदार्थ हुक्का हे देखील आलेच.पोलिस खाते याला मदत करीत आहे.मोठे मोठे राजकारणी आणि गुंड आणि पोलिस अधिकारी अशी भागीदारी काही ठिकाणी असल्याची माहिती बाहेर आम्ही ऐकतो आहे. खरे खोटे पोलिसाना माहीत आहे.परंतु…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेत जुनी सांगवी येथील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कुल आणि भारतीय विद्यानिकेतन प्रशालेने आपली शंभर टक्के निकालाची परंपरा यंदाही कायम राखली असून, निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियमच्या श्रेया खाडे हिने ९३.६० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावत यश संपादन केले. अनुष्का भोसले हिने ९२.६० टक्के गुण मिळवत द्वितीय, ८९.४० टक्के गुण मिळवत श्रेयस माळी याने तिसरा क्रमांक संपादन केला. तर सायली जोगी हिने ८८.२० टक्के गुण मिळवत चौथा, ओम भिटे व सिद्धी चौगुले यांनी संयुक्तपणे ८७.२० टक्के गुण मिळवत पाचवा आणि जैनिक सोनीने ८७…
