लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कुल आणि भारतीय विद्यानिकेतन प्रशालेचा शंभर टक्के निकाल
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेत जुनी सांगवी येथील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कुल आणि भारतीय विद्यानिकेतन प्रशालेने आपली शंभर टक्के निकालाची परंपरा यंदाही कायम राखली असून, निकालात मुलींनीच बाजी मारली आहे.
लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियमच्या श्रेया खाडे हिने ९३.६० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावत यश संपादन केले. अनुष्का भोसले हिने ९२.६० टक्के गुण मिळवत द्वितीय, ८९.४० टक्के गुण मिळवत श्रेयस माळी याने तिसरा क्रमांक संपादन केला. तर सायली जोगी हिने ८८.२० टक्के गुण मिळवत चौथा, ओम भिटे व सिद्धी चौगुले यांनी संयुक्तपणे ८७.२० टक्के गुण मिळवत पाचवा आणि जैनिक सोनीने ८७ टक्के गुण मिळवत सहावा क्रमांक पटकावला.
भारतीय विद्यानिकेतन प्रशालेच्या वेदांती कोदे हिने ९२.८० टक्के गुण मिळवत प्रशालेत प्रथम क्रमांक मिळवीला. उज्मा मुजावर हिने ९०.६० टक्के गुण संपादन करीत द्वितीय, तर ८९.२० टक्के गुण मिळवत प्रवीण चौधरी याने तिसरा क्रमांक पटकावला. तसेच वैष्णवी तापडिया व श्रावणी राऊत यांनी ८७.८० टक्के मिळवत संयुक्तपणे चौथा, संजयकुमार कोटिवले व श्रेया शिंगारे यांनी ८६.०० टक्के गुण संपादन करीत पाचवा क्रमांक मिळवला.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा आरती राव, सचिव प्रणव राव, लिटल फ्लॉवर स्कुलच्या मुख्याध्यापिका नीलम पवार, भारतीय विद्यानिकेतनच्या मुख्याध्यापिका आशा घोरपडे, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षा आरती राव म्हणाल्या, की आमच्या संस्थेची 100 टक्के निकालाची परंपरा यंदाही कायम राखत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. या यशात विद्यार्थ्यांचे अभ्यासातील सातत्य, शिक्षक व पालकांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. विशेष म्हणजे संस्थेच्या वतीने वर्षभर राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांमध्येही विद्यार्थ्यांचा सहभाग असतो.