- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूल, रहाटणी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात शाळेपासून रहाटणी गावातील अश्वरूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत भव्य रॅलीने करण्यात आली. विद्यार्थ्यांनी हातात भगवे झेंडे घेऊन “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून टाकला. पुतळ्याजवळ छत्रपती शिवाजी महाराजांना संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार ह्यांचा हस्ते पुष्पहार अर्पण करून विधिवत पूजन करण्यात आले. कार्यक्रमाला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका सविता खुले यांचीही उपस्थिती लाभली. अखिल रहाटणी गाव चे कमिटीचे अनेक मेंबर्स उपस्थित होते. यावेळी इयत्ता सहावीचा विद्यार्थी सार्थक ननावरे याने सादर केलेल्या शिवगर्जनेमुळे उपस्थित सर्वांमध्ये नवचैतन्य संचारले व परिसर ऊर्जेने भारावून गेला. यानंतर सर्व विद्यार्थी व…
इंद्रायणी साहित्य परिषदेच्या वतीने मोशी येथे सत्कार पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – ‘साहित्यिक हा लोककलेचा आत्मा आहे. आम्ही कलावंत साहित्यिकांच्या शब्दांना कलेच्या माध्यमातून जिवंतपणा आणण्याचा प्रयत्न करत असतो. त्यांच्या लेखणीतून समाजाचे प्रतिबिंब उमटत असते, ते समाजाला दिशादर्शक असते. म्हणूनच साहित्यिकांनी केलेला हा लोककलेचा सन्मान माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे!’ असे उद्गार ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांनी बुधवार, (दिनांक १८ फेब्रुवारी) मोशी येथे काढले. पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचा इंद्रायणी साहित्य परिषदेच्या वतीने परिषदेचे संस्थापक व ज्येष्ठ साहित्यिक अरुण बोऱ्हाडे आणि अध्यक्ष संदीप तापकीर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना खेडकर बोलत होते. मागील वीस वर्षांपासून मोशी…
शिवगर्जना, पालखी मिरवणूक, मर्दानी खेळाद्वारे विद्यार्थांचे शिवरायांना अभिवादन पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – सनई-चौघड्यांचे मंजुळ स्वर, तुतारीच्या गगनभेदी गर्जना, ढोल-ताशांचा निनाद, भगव्या पताका आणि मर्दानी खेळांसह ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय!’, ‘जय भवानी, जय शिवराय!’ आणि ‘नमो पार्वती पते, हर हर महादेव’ या घोषणांच्या जयघोषात एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठ येथे महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावरील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड यांच्या हस्ते हिंदवी स्वराज्याचे प्रतीक असलेला भगवा ध्वज फडकावून जयंती उत्सवाचा प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र लोकसेवा आयोगचे माजी अध्यक्ष डॉ. किशोर राजे निंबाळकर,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – छत्रपती शिवाजी महाराज यांना रयतेचे राजे संबोधले जाते. त्यांनी सर्व जाती, धर्म, पंथाच्या मावळ्यांची एकत्र मूठ बांधून सामान्य प्रजेच्या हिताचा राज्यकारभार केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची स्मृती ठेऊन आपण वाटचाल केली पाहिजे, असे ॲड. पी. एस. कांबळे यांनी सांगितले. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय व दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर ॲड. बार असोसिएशन पिंपरी चिंचवड या वकील संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. न्यायालय आवारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वकील बंधू आणि भगिनी यांनी अभिवादन केले. वीरांगना पाटील आणि युगंधरा पाटील या चिमुकल्या मुलींनी छत्रपती…
जयंती निमित्त शहरातील विविध ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक महान योद्धा नव्हते, तर स्वराज्य, लोककल्याण, न्याय आणि सुशासनाचे तेजस्वी प्रतीक होते,त्यांच्या दूरदृष्टीतून उभे राहिलेले स्वराज्य आजही आपल्याला आत्मसन्मान, धैर्य आणि राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा देते. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वधर्मसमभाव, स्त्रीसन्मान,शेतकरी आणि प्रजेच्या कल्याणाला सर्वोच्च स्थान दिले. त्यांच्या याच मूल्यांची जोपासना करणे हीच आपली जबाबदारी आहे, असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनातील त्यांच्या प्रतिमेस तसेच पी.एम.टी चौक भोसरी, लांडेवाडी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका ह आणि ड प्रभाग अंतर्गत पिंपळे गुरव व नवी सांगवी परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत व्यावसायिक बांधकामे सुरू असल्याचा आरोप करत माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी आयुक्तांकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे. दिलेल्या निवेदनात पिंपळे गुरव येथील मोरया पार्क, जाभूळकर पार्क ५ व ६ लेन परिसर तसेच नवी सांगवीतील प्रभाग क्रमांक ३१ मधील चैत्रबन सोसायटी परिसरात परवानगीशिवाय मजल्यांवर मजले चढवणे, निवासी इमारतींचे व्यावसायिक रूपांतर करणे आणि बेकायदेशीर गाळे उभारणे असे प्रकार सुरू असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या अनधिकृत बांधकामांना राजकीय वरदहस्त मिळत असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला असून संबंधित अधिकाऱ्यांच्या…
‘शिवगर्जना’ या भव्य महानाट्याचा दुसरा प्रयोग मोठ्या उत्साहात संपन्न पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – ‘शिवगर्जना’ महानाट्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य स्थापनेमागील उद्देश, लोकाभिमुख प्रशासन आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी केलेला संघर्ष प्रभावीपणे दाखविण्यात येत आहे. आजच्या काळात इतिहास केवळ लक्षात ठेवण्याचा विषय राहिलेला नाही, तर त्यातून प्रेरणा घेऊन सामाजिक बांधिलकी जपण्याची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य उभे करताना न्याय, समता आणि कष्टकऱ्यांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवले होते. हीच भूमिका आजच्या तरुणांनी स्वीकारली, तर समाजात सकारात्मक बदल घडू शकतो. युवकांमध्ये राष्ट्राभिमान जागवण्याबरोबरच समाजासाठी काहीतरी करण्याची जाणीव निर्माण करण्याची ताकद या महानाट्याच्या सादरीकरणात आहे, असे प्रतिपादन थोर सामाजिक कार्यकर्ते…
पिंपरी-चिंचवडमध्ये बंद अवस्थेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर नगरसेवक विनोद नढे यांचे आयुक्तांना पत्र;निविदा, खर्च व देखभालीची सविस्तर माहिती मागवली पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी-चिंचवड शहरातील सुरक्षेच्या दृष्टीने बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपैकी अनेक कॅमेरे सध्या बंद अवस्थेत असल्याचा गंभीर मुद्दा समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक विनोद जयवंत नढे यांनी आयुक्तांकडे लेखी निवेदन देत या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती मागवली आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच गुन्हेगारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी महानगरपालिका आणि स्मार्ट सिटी अंतर्गत विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र, प्रत्यक्षात अनेक कॅमेरे बंद असल्यामुळे पोलिस तपासात अडथळे येत असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) आकुर्डी येथील मुख्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शिवरायांच्या प्रशासकीय कौशल्याचा वारसा जपत जनहिताची कामे करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या तहसीलदार आशा होळकर यांच्याहस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी बोलताना होळकर यांनी महाराजांच्या देदीप्यमान आणि प्रेरणादायी जीवनकार्याचा आढावा घेतला. त्या म्हणाल्या, “शिवरायांचे प्रशासकीय कौशल्य आणि लोककल्याणाचे धोरण आजही तितकेच मार्गदर्शक आहे. तोच वारसा पुढे नेत ‘पीएमआरडीए’च्या माध्यमातून पुणे महानगर अधिक विकसित करण्याचा आमचा निरंतर प्रयत्न आहे.” या कार्यक्रमाला कार्यकारी अभियंता शिवकुमार कुपल, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे कक्ष अधिकारी…
निगडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, संस्कृती संवर्धन व विकास महासंघ विभाग आणि सिटीप्राईड ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित१६ वा वर्धापनदिन सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. मंगळवार, दिनांक १७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० वाजता सिटीप्राईड ज्युनिअर कॉलेज, निगडी प्राधिकरण येथील ऑडिटोरियममध्ये हा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. या वर्षीच्या कार्यक्रमाचा विषय होता – “भारतीय संस्कृती व जीवन मूल्ये”. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत, दीपप्रज्वलन व प्रास्ताविकाने झाली. प्रारंभीच सभागृहात भारतीय संस्कृतीचा गौरव आणि मूल्यांची जाणीव यांचे वातावरण निर्माण झाले होते. प्रमुख पाहुणे म्हणून मा. डॉ. अभयजी कुलकर्णी (संचालक – IICMR) यांची उपस्थिती लाभली.…
