Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  चिंचवड अग्निशमन विभागात एजंटांचे पेव फुटले आहे. या एजंटांकडून लघुउद्योजकांना त्रास दिला जात असून विनाकारण वेळीस धरले जात असल्याचा आरोप माजी स्विकृत नगरसेवक दिनेश यादव यांनी केला आहे. लघुउद्योजकांच्या दिनेश यादव हे आक्रमक होत त्यांनी थेट अग्निशमक विभागाचे कार्यालय गाठले. त्यांच्यासमवेत अनेक लघुउद्योजक उपस्थित होते. अग्निशमक विभागाकडून सर्व लघुउद्योजक यांना का नोटीसा देण्यात येत आहेत. ह्या देत असताना अग्निशमन ऑफिसलाउद्योजक गेल्यानंतर एजंटला भेटा,असा सल्ला येथील अधिकारी देतअसल्याचे यावेळी उद्याजकांनी सांगितले. या कार्यालयात उद्योजकांना व्यवस्थित वागणूक दिली जात नव्हती. यावेळी सर्व चाललेल्या अनागोंदी कारभारबाबत जाब विचाराला एजंटला भेटा असे म्हणणाऱ्या कर्मचाऱ्याला समज सर्वांसमक्ष समज देण्यात…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड विद्यापीठातील (पीसीयु) स्कूल ऑफ सायन्सेसने शुक्रवारी युवाना वेलनेस कोहेसिव्ह केअर एलएलपी सोबत शैक्षणिक सामंजस्य करार करण्यात केला. युवाना वेलनेस ही संस्था संस्थापक, संचालक अदिती कुलकर्णी आणि सहसंस्थापक कुणाल खनाडे यांच्या नेतृत्वाखाली विविध रुग्णालये आणि कॉर्पोरेट्सना मानसोपचार आणि सायकोमेट्रिक सेवा प्रदान करते. यावेळी पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, प्रभारी कुलगुरू डॉ. मणीमाला पुरी, प्र-कुलगुरू डॉ. सुदीप थेपडे, स्कूल ऑफ सायन्सेसच्या विभाग प्रमुख प्रा. रुचू कुथियाला आदी उपस्थित होते. पीसीयु स्कूल ऑफ सायन्सेस मधील वेलनेस, क्लिनिकल सायकोलॉजी आणि संबंधित प्रकल्पांमधील अग्रगण्य प्रमाणपत्र अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी विकास आराखडा तयार करून अंमलबजावणीसाठी…

Read More

युवकशहरअध्यक्ष इम्रान शेख यांचा मास्टर स्ट्रोक पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भोसरीतील भाजपच्या नगरसेविका प्रियांका प्रविण बारसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते आज यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात अधिकृत प्रवेश केला.यावेळी खासदार सुप्रियाताई सुळे,माजी मंत्री आमदर जितेंद्र आव्हाड,युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख,युवक शहराध्यक्ष इम्रान शेख कार्याध्यक्ष सागर तापकीर यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश घेण्यात आला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महाराष्ट्रात बाजी मारली.या निवडणुकीत शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दहा पैकी आठ खासदार निवडून आणत महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता शरदचंद्र पवार यांच्या पाठीशी असल्याचे दाखवून दिले. तसेच शिरूर लोकसभेत डॉ अमोल कोल्हे…

Read More

भाजपा आमदार महेश लांडगे यांनी खडसावले – क-क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिला इशारा पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पावसाळा सुरू झाला असून, नालेसफाई आणि रस्ते दुरूस्तीची कामे अद्यापही बाकी आहेत. त्यामुळे पावसाळ्यात सर्वसामान्य नागरिकांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागेल. त्यामुळे तातडीने सर्व कामे मार्गी लावा, अन्यथा पाणी साचल्यामुळे निर्माण झालेला चिखल क्षेत्रीय कार्यालयाच्या दारात टाकणार, असा इशारा भाजपा आमदार महेश लांडगे यांनी दिला आहे. भोसरी विधानसभा मतदार संघातील क-क्षेत्रीय कार्यालयांतर्गत  पावसाळापूर्व कामांचा आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी माजी महापौर राहुल जाधव, महापालिका मुख्य अभियंता मकरंद निकम, पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता श्रीकांत सवणे, पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी, क्षेत्रीय अधिकारी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  भोसरी येथील सेक्टर १२ मधील १० एकर जागेवर संगणक प्रशिक्षण,संशोधन, विकास आणि शैक्षणिक सुविधांचा मोठा विस्तार करण्यासाठी अत्याधुनिक आणि सुसज्ज इमारत बांधण्यात येणार असल्याची माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सहसचिव संकेत भोंडवे यांनी दिली. सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग (सी-डॅक), पुणे यांचे वतीने भोसरी येथील पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या जागेवर अत्याधुनिक इमारत उभारण्यात येणार आहे, त्या जागेची पाहणी सहसचिव संकेत भोंडवे यांनी आज केली त्यावेळी ते बोलत होते. निवृत्त कर्नल तसेच कार्यकारी कॉर्पोरेट स्ट्रॅटेजीचे संचालक ए.के. नाथ आणि महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी शहर अभियंता…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे गुरव येथे साहित्यिक सुरेश कंक यांनी त्यांच्या राहत्या घरी 119 वर्ष परंपरा असलेल्या परराज्यात पण विस्तार असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपळे गुरव सांगवी शाखा व्हावी म्हणून साडेचार वर्ष संस्थेला पत्र व्यवहार करत आहेत. मसापची भोसरी, निगडी येथे शाखा आहे तिसरी शाखा पिंपळे गुरव सांगवी येथे व्हावी म्हणून ते आपल्या वाढदिवसाच्या दिवशी अन्नत्याग उपोषण करत आहेत. साहित्य जगले पाहिजे ,आणि तरुणाई साहित्येकडे आले पाहिजे यासाठी अधिकाधिक शाखा विस्तार करून प्रचार व प्रसार करण्यासाठी ते नेहमीच साहित्य संमेलने घेत असतात . राष्ट्रगीत म्हणून आणि दिवंगत साहित्यिकांना अभिवादन करून त्यांनी अन्नत्याग उपोषण चालू केले आहे. पिंपळे…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी नेहरूनगर न्यायालयातील नवनियुक्त न्यायाधीश व्ही.एन.गायकवाड,  ए.एम. बगे, श्रीमती.एम.ए.आवळे,  बी.डी. चोखट, श्रीमती.टी.एस.महाडिक,  एस.एन.गवळी, अल अमूदी ए.के. श्रीमती.एस.एस.चव्हाण यांचे स्वागत पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् असोशिएशनच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. यावेळी पिंपरी न्यायालयाचे न्यायाधीश एन.आर गजभिये (प्रमुख न्यायाधीश) व  एम.जी.मोरे उपस्थित होते. या वेळी असोसिएशनच्या अध्यक्षा ॲड.प्रमिला हरीश गाडे यांनी उपस्थित वकील बंधू – भगिनींच्या वतीने नवनियुक्त न्यायाधीश साहेबांचे स्वागत करून मनोगत व्यक्त करण्यात आले. स्वागत समारंभानंतर नवनियुक्त न्यायाधीश यांच्या वतीन न्यायालयाचे न्यायाधीश पिंपरी न्यायालयाचे प्रमुख न्न्यायाधीश एन.आर गजभिये व .एम.जी.मोरे साहेब यानी स्वागत समारंभाबद्दल उपस्थितांचे आभार मानून मनोगत व्यक्त केले. पुढे साहेब म्हणाले की, पिंपरी…

Read More

कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी पुणे येथे भेट घेतली. पिंपरी ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गेल्या पाच दशकांहून अधिक काळ राजकारण व समाजकारणात यशस्वी ठसा उमटवत समाजाच्या प्रत्येक घटकाकडे आस्थेने दृष्टी ठेवून प्रतिकूल परिस्थितीत पक्षाला पुन्हा नवसंजीवनी दिली आणि १० पैकी ८ खासदार जिंकून पक्षाला पुन्हा उभारी दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस असंघटित कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी आज पुणे येथे शरदचंद्र पवार यांना भेटून विशेष पत्राद्वारे वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देत आशिर्वाद घेतले. यावेळी राज्य उपाध्यक्ष राजेश माने, युवकचे सुरज देशमाने, शहर उपाध्यक्ष काशिनाथ जगताप उपस्थित होते. पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांनी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत यश खेचून आणल्याबद्दल आणि वर्धापन दिनानिमित्त…

Read More

 सर्व क्षेत्रिय कार्यालयांमध्ये आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत नागरिकांनी सहभाग घेऊन एकूण ६६ तक्रारवजा सूचना मांडल्या. यात अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयांमध्ये अनुक्रमे ८, १०, १, २,१२, ४, १६ आणि १३ तक्रारी वजा सूचना मांडल्या. पावसाळ्याच्या अनुषंगाने तुंबलेली गटारे तसेच ड्रेनेजसफाईसाठी आवश्यक ठिकाणी क्षेत्रीय स्तरावर पाहणी करून योग्य ती कार्यवाही करावी, अशा  सूचना समन्वयक तसेच क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी संबंधित विभागांतील अधिकारी- कर्मचाऱ्यांना दिल्या. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या आदेशानुसार सर्व क्षेत्रिय कार्यालयांत करण्यात येते. सभेचे अध्यक्ष तथा मुख्य समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांना नेमून दिलेल्या महापालिका क्षेत्रीय कार्यालयात उपस्थित राहून…

Read More

पीसीईटीच्या वतीने वेलणकर यांच्या ‘दहावीनंतरची शाखा निवड’ या पुस्तकाचे वाटप पिंपरी,   (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  मराठी माध्यम व सेमी इंग्लिश माध्यम मधून दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेविषयी न्यूनगंड न बाळगता मराठी भाषेतून अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन आपली प्रगती करावी असे मार्गदर्शन पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे कुलसचिव प्राध्यापक योगेश भावसार यांनी केले.  पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांमधून १० वी बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या २११० विद्यार्थ्यांना करीअर कसे व कोणते निवडावे याचे मार्गदर्शन करणारे ज्येष्ठ मार्गदर्शक विवेक वेलणकर यांनी लिहिलेले ‘दहावी नंतरची शाखा निवड’ हे पुस्तक पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) वतीने भेट म्हणून देण्यात आले. यामध्ये पारंपरिक कोर्सेस बरोबरच आयटीआय, डिप्लोमा इंजिनिअरींग…

Read More