- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) : येवला येथील शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानचा “राज्यस्तरीय साहित्य कलाकृती पुरस्कार” वितरण समारंभ नुकताच कोपरगाव येथे संपन्न झाला. पिंपरी चिंचवड मधील लेखक राजेंद्र घावटे यांना प्रथम पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. पाठ्यपुस्तकातील कवी प्रा. शशिकांत शिंदे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्राचार्य भाऊसाहेब गमे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्राचार्य भरत बिडवे, प्रा. रविंद्र मालुंजकर, कारागृह अधीक्षक रेवणनाथ कानडे, लेखिका डॉ. पल्लवी परुळेकर, आय ए एस अधिकारी प्रियांका मोहिते, कवयित्री वंदना इंनानी यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्ष संजय वाघ यांनी प्रास्ताविक केले. प्रशांत वाघ आणि राजेश वाघ यांनी स्वागत केले. राज्यभरातून आलेल्या साहित्यकृतींवर पुष्पवृष्टी करून आणि कु. ओवी…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्राताई अजितदादा पवार यांची राज्यसभेत खासदार पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल चिंचवड विधानसभेचे नेते माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या नेतृत्वात चिंचवड विधानसभेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी व पदाधिकाऱ्यांनी भेटून सत्कार केला. पुणे जिल्ह्याला सुनेत्रा पवार यांच्या रूपाने तिसरी महिला खासदार मिळाली आहे. गेली २० वर्ष सुनेत्राताई पवार या सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. काटेवाडी निर्मलग्राम करण्यापासून त्यांनी त्याच्या कार्यास सुरवात केली. एन्वहायमेंटल फोरमच्या माध्यमातून ओढा खोलीकरण, मोतीबिंदू, शस्त्रक्रिया शिबीर, वृक्षारोपण, कर्करोग जागृती, त्याच्यां ओढा खोलीकरण या उपक्रमामुळे अनेक गावे टँकरमुक्त केली. मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीरामुळे अनेकांना दृष्टी मिळाली. त्यांच्या याच जनतेशी संवाद आणि…
– डॉ. अनमोल सोनावणेंच्या सहकार्यातून वॉल्व क्लिनिक पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – डीपीयु सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पिंपरी पुणे येथे नुकतेच TAVI आणि वॉल्व क्लिनिक सुरु करण्यात आले आहे . अद्ययावत वैद्यकीय तंत्रज्ञानानात अग्रेसर ट्रान्सकॅथेटर ॲओर्टिक वॉल्व इम्पांटेशन (टावी) ही प्रक्रिया अत्याधुनिक आहे. या प्रक्रियेद्वारे हृदयाला कुठलाही चिरा न देता, ओपन हार्ट सर्जरी न करता हृदयातून अन्य अवयवांना रक्तपुरवठा करणारी शुद्ध रक्तवाहिनी (ॲओर्टा) मधील वॉल्व (झडप) बदलविण्याची प्रक्रिया नुकतीच पिंपरी येथील डीपीयु सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे ८३ वर्षीय रुग्णावर करण्यात आली. ही या हॉस्पिटलमधील पहिलीच प्रक्रिया होती. मुख्य म्हणजे पूर्वी ही प्रक्रिया करण्यास ओपन हार्ट सर्जरी शिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे वयस्क…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जनावरांची वाहतूक करण्यापूर्वी वाहतूकदारांनी आपल्या वाहनांच्या बांधणीमध्ये सुयोग्य बदल करुन वाहनाच्या नोंदणी प्राधिकरणाकडे अर्ज करुन विशेष परवाना प्राप्त करुन घेणे बंधनकारक असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी पिंपरी चिंचवड कार्यालयाने स्पष्ट केले आहे. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जनावरांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होते त्याअनुषंगाने परिवहन विभागाकडून वाहतूकदारांना दक्षता घेण्याबाबत कळविण्यात आले आहे. जनावरांची वाहतूक करण्यापूर्वी वाहतूकदारांनी केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ नुसार वाहनाच्या बांधणीमध्ये सुयोग्य बदल करुन नोंदणी प्राधिकरणाकडे अर्ज करुन विशेष परवाना प्राप्त करुन घेणे बंधनकारक आहे. प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत (प्राण्यांची पायी वाहतूक) नियम २००१ च्या नियम ९६ मधील तरतुदीनुसार वाहनातून जनावरांची वाहतूक करताना वाहतूकदाराने…
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)न- एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ, विश्वराजबाग पुणेच्या स्कुल ऑफ बायोइंजिनिअरिंगची विद्यार्थीनी प्रांजली विनोद सुरदुसे हिने जेजेटीयू विद्यापीठ झुंझनू, राजस्थान येथे नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ मिनी गोल्फ अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक पटकावित दैदिप्यमान कामगिरीची नोंद केली आहे. प्रांजलीने महिला एकेरी स्पर्धेत स्ट्रोक प्रकाराच्या अंतिम फेरीत ४८ गुणांसह प्रथम क्रमांक पटकाविताना सोनेरी कामगिरी केली तर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीच्या खेळाडूने ५५ गुणांसह दुसरा क्रमांक पटाकाविला. या स्पर्धेत प्रांजलीला सुवर्णपदकासह सर्वोत्कृत महिला खेळाडू पुरस्काराने देखील गौरविण्यात आले. प्रांजली ही एमआयटी एडीटी विद्यापीठाची अत्यंत हुरहुन्नरी खेळाडू असून तिने काही महिन्यांपूर्वीच ३७ व्या राष्ट्रीय मिनीगोल्फ स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधीत्व करताना…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आषाढीवारी पालखी सोहळ्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने देण्यात येणा-या सेवा सुविधांमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही यासाठी समन्वयाने सूक्ष्म नियोजन करून सर्वांनी आपली जबाबदारी चोख बजावून हा पालखीसोहळा आनंदीमय वातावरणात पार पाडण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी महापालिका प्रशासकीय यंत्रणेला दिले. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगदगुरु संत तुकाराम महाराज आषाढीवारी पालखी सोहळ्याचे आगमन येत्या काही दिवसांत पिंपरी चिंचवड शहरात होणार आहे. जगदगुरु संत तुकाराम महाराज आषाढीवारी पालखी सोहळा स्वागत कक्ष आणि मुक्कामाच्या स्थळाची तसेच पालखी मार्गाची पाहणी करून आवश्यक सूचना संबधित अधिकाऱ्यांना अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी यावेळी दिल्या. या पाहणी दौऱ्यावेळी अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, शहर अभियंता मकरंद…
सदनिकाधारक ६०० कुटुबियांना मिळाला दिलासा पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – तळवडे येथील सुमारे ६०० सदनिकाधारकांना रस्त्यासाठी गेल्या चार वर्षांपासून असलेली प्रतीक्षा अखेर संपली आहे. स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार, या रस्त्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली आणि एका दिवसात हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याची तयारी करण्यात आली आहे. भोसरी विधानसभा मतदार संघातील भाजपाचे आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित असलेला त्रिवेणीनगर- तळवडे रोडजवळील नवीन सहयोगनगर, शिवशंकर सोसायटी, तळवडे- त्रिवेणीनगर या रस्त्याचे काम रखडले होते. परिणामी, या भागातील ६०० कुटुंबांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागता होता. शिवशंकर कॉलनी येथील विश्वास खांडवे म्हणाले की, रस्त्याअभावी स्थानिक नागरिकांना वाहतुकीसाठी त्रास सहन करावा लागत होता.…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी दिली आहे. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून सदैव महाराष्ट्राच्या विकासासाठी आग्रही असणाऱ्या महाराष्ट्राच्या लाडक्या नेत्याचा म्हणजेच हिंदू जननायक श्री राज साहेब ठाकरे यांचा जन्मदिवस मोठा उत्साहाने पार पाडला जात आहे. याच धरतीवर पिंपरी चिंचवड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संपूर्ण शहरभर विविध कार्यक्रमांचे, विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. १) मनसेचे चिंचवड विधानसभेचे विभाग अध्यक्ष मयूर चिंचवडे व मनसे उपशराध्यक्ष बाळा दानवले…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष सामाजिक न्याय विभाग प्रदेशाध्यक्ष पंडीतराव कांबळे यांच्या उपस्थितीत पिंपरीच्या पक्ष कार्यालयामध्ये बैठक पार पडली. यावेळी सामाजिक न्याय विभागाच्या संघटनात्मक बांधणी संदर्भात आणि लोकसभा आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते. शहरात आल्याबरोबर सामाजिक न्याय विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक चौक, पिंपरी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. या बैठकीत कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी पिंपरी विधानसभा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावा आणि पक्षामार्फत देवेंद्र तायडे किंवा मयूर जाधव यांना उमेदवारी द्यावी अशी कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्षांसमोर मागणी केली. पिंपरी चिंचवड शहरात पक्ष संघटनेत काम करणाऱ्या…
मुख्यवित्त व लेखा अधिकारी यांची मुंबईत भेट घेउन चर्चा पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगाराचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. लोकसभेच्या आचारसंहितेपासून सर्व अर्ज प्रलंबित असल्याने त्यांना वेगवेगळ्या योजनांचे लाभ मिळत नाहीत आणि बांधकाम कामगारांचे महामंडळ सूस्त झाले आहे त्यास जलदगती देऊन तातडीने प्रश्न सोडवा अशी मागणी मुख्यलेखा व वित्त अधिकारी धनाजीराव शिंदे यांच्याकडे केली अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादीचे कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी आज दिला. मुंबई येथील महामंडळाच्या मुख्यालयात कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र व महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समिती यांचे शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन देण्यात आले, यामध्ये राजेश माने, कॉ.शंकर पुजारी,…
