Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आंतरराष्ट्रीय योग दिननिनिमित्त नाना काटे सोशल फौंडेशन व आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळे सौदागर येथील बाळासाहेब कुंजीर क्रीडांगण येथे योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षक  हसन तफ्ती यांनी उपस्थिती लावत सर्वांना योगाबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, चंद्रकांत तापकीर, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी खुळे, प्रशांत सपकाळ, सतिश डोंगरे, काळुराम कवितके, उमेश काटे, सुमित डोळस, जॉन डिसुझा, विशाल बोत्रे, विशाल काळे, सचिन देसाई, गौरव शितोळे,  शशांक खांडेकर, श्रीमती निशा शुक्ला, श्रीमंती उमा कुलकर्णी, रहाटणी पिंपळे सौदागर मधील आर्ट ऑफ लिव्हिंग चे सदस्य उपस्थित होते.  आयोजित कार्यक्रमानिमित्त परिसरातील जेष्ठ नागरिक, माता भगिनी, तरुण-तरुणी, सोसायटी…

Read More

पिंपरी,  ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – आपले शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राखण्यासाठी योग हा उत्तम पर्याय असल्याचे नोव्हेल इन्स्टिट्यूट चे अध्यक्ष  अमित गोरखे यांनी सांगितले. योग दिनाच्या निमित्ताने संभाजीनगर शाहूनगर परिसरातील तसेच नोव्हेल इंटरनॅशनल स्कूलच्या महिला व पालकांसाठी जागतिक योग दिनानिमित्ताने योग शिबिर आयोजित करण्यात आले होते. या योग शिबिराला प्राधिकरणातील मीनल जैन यांनी अत्यंत सुंदर रित्या मार्गदर्शन केले योग शिबिराला 300 पेक्षा जास्त महिलांचा व विद्यार्थ्यांचा सहभाग होता ,योग आणि मानसिक स्वास्थ यावर मीनल जैन यांनी योग साधना करून महिला मंडळींना योगाचे वेगवेगळे प्रकार समजून सांगत असताना योग करून दाखविला,व्यासपीठावर प्रत्यक्ष नोव्हेल संस्थेचे अध्यक्ष श्री अमित गोरखे यांनीही…

Read More

पिंपळे गुरव, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपळे गूरव येथे मानवी हक्क संरक्षण आणि  जाग्रतीच्या वतीने 2016 पासून वटसावित्री  पौर्णिमा सातत्याने साजरी केली जाते.महाराष्ट्रात पूरूषांनी वटसावित्री साजरी करण्याचा पहिला उपक्रम राबणारी हि संस्था आहे.प्रत्येक महिला वटवृक्षाप्रमाणे  आपल्या पतीला दीर्घ  आयुष्य लाभावे व सात जन्मी हाच पती परमेश्वर म्हणून मिळावा म्हणून  दीर्घ आयुष्य आसणाऱ्या वटवृक्षाची पुजा करण्याची प्रथा आहे म्हणून आम्ही सात जन्म हिच पत्नी मिळावी म्हणून सात फेरे मारले.  मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्यावतीने पूरूषांनी वाजत गाजत  सात फेरे मारून केली वटपौर्णिमा साजरी  करण्यात आली. विकास कुचेकर म्हणाले की महीलांनी वटवृक्षाची फाद्यी न तोडता प्रतिकात्मक किंवा त्या वटवृक्षाच्या जवळ जाऊन…

Read More

– केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत मार्ग काढण्याचे रिक्षा चालक मालकांना आश्वासन पिंपरी ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वाहन योग्यता प्रमाणपत्र घेण्यास उशीर झालेल्या (लेट पासिंग) रिक्षा, टॅक्सीसह वाहतूक, मालवाहतूक, प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना आरटीओच्या दंडापासून मुक्तता मिळणार आहे. यासाठी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे शिष्टाई करणार आहेत. केंद्रीय रस्ते दळणवळण वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत लवकरच बैठक घेऊन याबाबत तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले. पुणे शहरातील ऑटो, रिक्षा, टॅक्सी चालक मालक संघटनेच्या वतीने बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतली. यावेळी आरटीओच्या मनमानी कारभार विरोधात निवेदन…

Read More

भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – संत निरंकारी मिशनच्या वतीने दिनांक २१ जून, २०२४ रोजी ‘आंतरराष्ट्रीय योग दिनी’ मिशनच्या विविध शाखांमध्ये सकाळी ६:३० ते ८:०० पर्यंत स्थानिक योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली खुल्या जागांमध्ये तसेच संत निरंकारी सत्संग भवन मध्ये साजरा करण्यात आला. पुणे जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या संत निरंकारी सत्संग भवन, गंगाधाम आणि भोसरी सहित पुण्यातील मिशनच्या विविध सत्संग भवनांमध्ये २९ ठिकाणी योग दिवसाचे आयोजन करण्यात आले होते मिशनच्या भोसरी येथील सत्संग भवनमध्ये २५० हुन अधिक साधकांनी या शिबिराचा लाभ घेतला. या मध्ये भोसरी परिसरातील जिजामाता शाळेतील १५० हुन अधिक विद्यार्थ्यांनी या मध्ये सहभाग घेतला होता. योग प्रशिक्षक श अनंत सकपाळ यांनी योगांची…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रयत शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालय पिंपरी वाघेरे या शाळेत आज  आंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न झाला. “योग: कर्मसु कौशलम्” या उक्तीनुसार विद्यार्थीनींचे शारीरिक व मानसिक आरोग्य जपण्यासाठी योग शास्त्रातील आसने व प्राणायाम आवश्यक आहे. यासाठी भारतीय योग संस्था पिंपरी शाखा यांच्या वतीने संजीवनी देशमुख , प्रमिला रासकर, मंगला शेगांवकर, व इतर सदस्य मार्गदर्शक म्हणून विद्यालयात उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यालयाच्या आदरणीय प्रभारी मुख्याध्यापिका  उर्मिला पाटील व भारतीय योग संस्था पिंपरी शाखेच्या प्रमुख  संजीवनी देशमुख व इतर अतिथीगण यांचे  हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन संपन्न झाले .यानंतर विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापिका मा. सौ उर्मिला पाटील यांनी जीवनात…

Read More

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मातंग साहित्य परिषद पुणे यांच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर व छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त ‘ स्वातंत्र्यवीर सावरकर : समज व गैरसमज ‘ या विषयावर पुण्यात विवेकवादी विचारवंत डॉ.श्रीपाल सबनीस यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवादाचे आयोजन मंगळवार दि.२५/०६/२०२४ रोजी सायं ५.००वा. भारतीय विचार साधनेचे सभागृह, भावे शाळेच्या पाटी मागे,पेरुगेट,टिळक रोड, पुणे येथे करण्यात आले आहे. या परिसंवादात कन्नड येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व विचारवंत डॉ.अंबादास सगट व पुणे येथील साहित्यिक व लेखक संदीप तापकीर हे वरील विषयावर भूमिक स्पष्ट करणार आहेत.तर प्रमुख पाहुणे म्हणून हे मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते अॅड.विक्रमजी गायकवाड यांची उपस्थितीती लाभणार आहे. .याच कार्यक्रमात…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयामध्ये उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना योग प्रशिक्षण मार्गदर्शन करण्यात आले तसेच विविध प्रकारची योगा प्रात्यक्षिके व योगाची आसणे विद्यार्थ्यांना दाखवण्यात आली योगा आसनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना योगाचे प्रशिक्षण व मार्गदर्शन योग प्रशिक्षक  अक्षता कान्हूरकर यांनी दिले. याप्रसंगी संस्थेचे संचालक श्री विजय जाधव विद्यालयाचे मुख्याध्यापक  बाळाराम पाटील पर्यवेक्षक दत्तात्रय भालेराव, उपमुख्याध्यापिका  सुषमा संधान, छाया ओव्हाळ,  मनीषा जाधव क्रीडा शिक्षक  शब्बीर मोमीन व सर्व वर्गांचे वर्ग शिक्षक उपस्थित होते.

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राजपूत समाज संस्थेच्या वतीने देण्यात येणारा ‘हिंदू कुलसुर्य वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह राज्यस्तरीय पर्यावरण समाभूषण पुरस्कार’ मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष वृक्षमित्र अरुण पवार यांना नुकताच प्रदान करण्यात आला. संघर्षातून मिळवलेल्या यशाबद्दल विविध क्षेत्रातील व्यक्तींना या पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी ह.भ.प. एकनाथ महाराज नरवडे, माजी सरपंच धोंडूसाहेब मोरे, पौर्णिमा परदेशी, विशाल धनवडे, मेजर ईश्वर इंगळे, छाया बैस चंदेल, अतुल परदेशी, शिशुपालसिंह तोमर, देवानंद गहिले, शैलेंद्रसिंह राजपूत, हेमंत चौधरी, श्यामसिंह राजपूत, सुरजसिंह चव्हाण, प्रिया परदेशी, जीवनसिंह राजपूत, राजू भुजबळ, ऍड. अंबिका परदेशी, संदीप शिंदे, वैशाली जाधव, विजय वसवे यांनाही पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे सौदागर स्थित उन्नती सोशल फाऊंडेशन यांच्या पुढाकाराने आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. उन्नती सोशल फाऊंडेशन , आनंद हास्य क्लब , परफॉर्मिंग आर्टस् अँड वेलनेस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन रोज आयकॉन कमर्शियल कॉम्प्लेक्स , कुणाल आयकॉन रोड , पिंपळे सौदागर येथे करण्यात आले होते. जेष्ठ नागरिकांच्या सह तरुणांची संख्या देखील या उपक्रमाला अधिक होती. परफॉर्मिंग आर्टस् अँड वेलनेस अकॅडमीच्या योग शिक्षकांमार्फत योगासनांची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. कार्यक्रमाला संबोधित करताना उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ.कुंदाताई संजय भिसे म्हणाल्या , “प्राचीन भारतीय परंपरेत योग साधनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सक्षम आणि सशक्त भारताच्या…

Read More