Author: maharashtrabreakingnews.com

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -वाल्हेकरवाडीतील पालिकेच्या मुलांच्या शाळेमध्ये रिक्त जागांवर शिक्षकांची नेमणूक करण्यात यावी , अशी  मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) ने   प्रशासकीय अधिकारी  संगीता बांगर   यांच्याकडे केली आहे. या वेळी महिला उपशहर संघटिका ज्योती संदीप भालके , शिवसेना शहर संघटक संतोष सौंदणकर, विभाग प्रमुख संदीप भालके उपशहर प्रमुख हरेश नखाते, उपशहर संघटिका रजनी वाघ, रहाटणी विभाग प्रमुख गोरख पाटील, चिंचवड विभाग प्रमुख किरण दळवी उपस्थित होते. वाल्हेकरवाडी शाळेमध्ये पहिली ते पाचवीची पटसंख्या ३५० आहे. तर सहावी ते सातवीचा पट १४० आहे. यानुसार शाळेमध्ये 14 शिक्षकांची आवश्यकता आहे. पटसंख्येनुसार शाळेला अजून 4 उपशिक्षक व 3 पदवीधर शिक्षकांची…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील शेवटच्या टप्प्यातील कामे सर्व संबंधित विभागांनी समन्वय साधून विहीत वेळेत पुर्ण करावीत.  पालखी मार्गावर तसेच मुक्कामाच्या ठिकाणी सोयी सुविधांची कमतरता राहणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी दिल्या.  जगदगुरु संत तुकाराम महाराज आषाढीवारी  पालखी सोहळ्याचे आगमन येत्या काही दिवसांत पिंपरी चिंचवड शहरात होणार आहे. त्या अनुषंगाने अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी आज पालखी मार्गाची पाहणी करून महापालिकेच्या वतीने सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला तसेच संबंधित अधिकाऱ्यांना विविध सूचना दिल्या. आज झालेल्या पाहणीमध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील निगडी येथील अण्णाभाऊ साठे स्मारक, कृष्णा…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने  आज आंतरराष्ट्रीय योगा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील विविध भागात क्षेत्रीय कार्यालयनिहाय आयोजित करण्यात आलेल्या योग दिन कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रमाचा आनंद घेतला. पिंपरी चिंचवड महापालिका, आर्ट ऑफ लिव्हींग आणि योग विद्या धाम संस्था पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने  ‘आंतरराष्ट्रीय योग दिन २०२४’ हा  कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आज सकाळी ६.३० वाजता शहरातील विविध बॅडमिंटन हॉलमध्ये पार पडलेल्या योग दिन कार्यक्रमास उपआयुक्त अण्णा बोदडे, सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे, पंकज पाटील, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, क्रिडा अधिकारी अनिता केदारी, सहाय्यक आरोग्य अधिकारी शांताराम माने, क्रीडा पर्यवेक्षक गोरक्ष…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कुल, भारतीय विद्यानिकेतन विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.            यावेळी संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, सचिव प्रणव राव, मुख्याध्यापिका आशा घोरपडे, मुख्याध्यापिका नीलम पवार, प्राचार्य शीतल मोरे, मुख्याध्यापिका पिंकी मनिकम, पर्यवेक्षिका स्मिता बर्गे, पर्यवेक्षिका प्रिती पाटील, क्रीडा शिक्षिका सुषमा पवार, क्रीडा शिक्षक अक्षय नाईक, भटू शिंदे, तसेच शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.           ध्यानधारणेने योगा दिन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांनी सामुदायिक सूर्यनमस्कार, तसेच योगाचे विविध प्रकार, ताडासन, शीर्षासन आदी आसने करून दाखविली. विद्यार्थ्यांबरोबरच…

Read More

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –   येथील एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठात दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने सामूहिक योगासनांच्या प्रात्यक्षिकांद्वारे गेल्या महिनाभरापासून चालू असणाऱ्या ‘महा’योग उत्सवाचा समारोप करण्यात आला. समग्र विश्वाला शांतीचा संदेश देणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज विश्वशांती घुमटाच्या साक्षीने झालेल्या या योगउत्सवात विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह लोणी-काळभोर व कदमवाक वस्ती ग्रामपंचायतीतील शेकडो नागरिकांनी उत्फुर्तपणे सहभाग नोंदवत आपले शरीर सदृढ ठेवण्यासाठी दररोज योग प्रात्यक्षिक करण्याचा निश्चय केला. भारत सरकारचे आयुष मंत्रालय, आंतरराष्ट्रीय नॅचरोपॅथी संघटना, मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थान, आर्ट ऑफ लिविंग, सुर्या फाउंडेशन, एमआयटी वर्ल्ड पीस विद्यापीठ आणि एमआयटी एडीटी विद्यापीठाचे स्कुल ऑफ हाॅलिस्टिक डेव्हलपमेंट यांच्या संयुक्त विद्यामान आयोजित या भव्य कार्यक्रमासाठी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा कुलगुरू…

Read More

हिंदू सनातन धर्मामध्ये आपले शरीर,मन,हे आयुष्यभर चांगले रहावे यासाठी*योग साधना* हि अत्यंत महत्त्वाची आहे असे सांगितले आहे आणि त्या साठी १९६७ साली स्थापन झालेल्या भारतीय योग संस्थेची स्थापना करण्यात आली या संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण जगभरात योग साधनेचा प्रचार आणि प्रसार करण्याचे प्रयत्न आजही तसेच सुरू आहेत या संस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण जगभरात जे योगाचे मार्गदर्शन केले जाते ते विनामूल्य केले जाते. ज्या वेळी भारताच्या पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर नरेंद्रजी मोदी संपूर्ण जगभरात भेटी देत असताना ते योग साधना संपूर्ण जगभरात अधिकाधिक जोपासली जावी या साठी प्रयत्न करीत होते आणि अखेर त्यांना २१ जुन हा दिवस आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय योग दिवस…

Read More

– ‘पीएमआरडीए’ सक्षम नसेल, तर महापालिकेला भूखंड हस्तांतर करा – आमदार महेश लांडगेंची मागणी आयुक्त राहुल महिवाल यांना मागणी पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय लोकशाही व्यवस्थेचा पाया असलेले भारतीय संविधान आणि जगभरातील लोकशाही देशांच्या घटनांचा अभ्यास करण्यासाठी तसेच संविधान जागृतीकरिता पिंपरी-चिंचवड महापालिका व पुणे प्रदेश महानगर विकास प्राधिकरण (PMRDA) यांच्या माध्यमातून उभारण्याचा प्रकल्प प्रस्तावित आहे. याबाबत वारंवार पाठपुरावा करुनही पीएमआरडीए संविधान भवन उभारण्यासाठी सक्षम नसेल, तर सदर भूखंड पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडे हस्तांतरित करा. महापालिकेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पहिल्या संविधान भवनाची पायाभरणी करु, अशी मागणी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. विषेश म्हणजे, संविधान भवनाच्या उभारणीसाठी राज्याचा नगरविकास विभाग…

Read More

महाभ्रष्ट सरकारचा तीव्र निषेध – डॉ. कैलास कदम पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  राज्यातील व केंद्रातील भाजप सरकार हे शेतकरी, कष्टकरी, दलित, अल्पसंख्याक, युवक, महिला, गरिब व सामान्य जनतेच्या विरोधातील आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समतेचा विचार आदर्श मानणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्रात भाजप सरकार समाजामध्ये द्वेष पसरवण्याचे काम करीत आहे. महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासण्याचे काम या सरकारने केले आहे. राज्यातील सर्वसामान्य नागरिक या सरकारवर चिखल फेक करून सरकारचा तीव्र निषेध करीत आहे असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केले. शुक्रवारी (दि.२१) शहर काँग्रेसचे अध्यक्ष…

Read More

– रस्त्याच्या जागेचा प्रश्न अखेर मार्गी, सोसायटी फेडरेशनच्या मागणीला यश पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रस्ता हस्तांतराच्या प्रक्रियेअभावी जागा उपलब्ध न झाल्यामुळे ऐश्वर्यम हमारा सोसायटी व परिसरातील सदनिकाधारकांना हक्काचा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने या रस्त्याचा ताबा संबंधित विकसक यांनी महापालिका प्रशासनाला दिला. त्यामुळे सुमारे १५ हजार नागरिकांना दिलासा मिळाला आहे. चिखली येथील गट नं. ९४ मध्ये ऐश्वर्यम हमारा सोसायटीच्या मागील बाजूस असलेला रिव्हर लिगसी सोसायटीकडे जाणारा रस्ता संबंधित विकसकाच्या ताब्यात असल्यामुळे महापालिका प्रशासनाकडून विकसित केला जात नव्हता. याबाबत सोसायटीधारकांनी चिखली-मोशी-चऱ्होली-पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशनकडे मागणी केली होती. त्याबाबत फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी ही…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आज  आंतरराष्ट्रीय योग दिन ” निमित्त शिवछत्रपती लिनियर अर्बन गार्डन,गोविंद-यशदा चौक,पिंपळे सौदागर येथे योग शिबिराचे आयोजन  शत्रुघ्न (बापू) काटे युथ फाउंडेशन, द आर्ट ऑफ लिविंग,ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय आणि मीडिया पार्टनर रेडिओ पुणेरी आवाज १०७.८ FM यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाले . यावेळी आर्ट ऑफ लिविंगचे सत्यजित भैया यांनी व्यासपीठावरून भजनाच्या ठेक्यावर योगाचे अनेक प्रकार नागरिकाकडून करून घेतले तसेच “योग करण्याची पद्धती व याचे महत्व” उपस्थितांना समजावून सांगितले . यावेळी ब्रह्माकुमारी संस्थेच्या बी.के.वर्षा दीदी यांनी सांगितले कि “भारत देशात प्राचीन काळी योगाचा जन्म झाला. भारतीय संस्कृतीत योगास खूप महत्त्वाचे स्थान आहे. योगामुळे आपले शरीर…

Read More