Author: maharashtrabreakingnews.com

​पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – दिल्ली येथे आयोजित प्रतिष्ठित ‘ग्लोबल AI समिट’मध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी घुसखोरी करून गोंधळ घातल्याच्या निषेधार्थ, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने राहुल गांधी आणि काँग्रेसच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले. ​दिल्लीमध्ये भारत अभिमानाने प्रतिष्ठित ‘ग्लोबल AI समिट’चे आयोजन करत आहे. जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठे नेते आणि इनोव्हेटर्स भारतात आले असताना काँग्रेस कार्यकर्त्यांनी समिटच्या ठिकाणी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार भारत सरकारची बदनामी करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची प्रतिमा खराब करण्यासाठीच केल्याचा आरोप भाजपा युवा मोर्चाने केला आहे. ​या प्रसंगी बोलताना पदाधिकारी म्हणाले की,…

Read More

फेरीवाल्यांच्या विविध प्रश्नांबाबत महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ व समिती सदस्यांची आयुक्तांशी चर्चा पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहरातील पथारी, हातगाडी, स्टॉल धारकांचे नियोजन करावे यासाठी महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ व समिती सदस्यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली, यावर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून आचारसंहिता कालावधीमध्ये काही कालावधी काम थांबलेले होते, मात्र आता बैठकीचे आयोजन करून लवकरच फेरीवाला कायद्याची अंमलबजावणी करू असे आश्वासन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज पथविक्रेता समिती सदस्य व महासंघाचे पदाधिकारी यांना दिले. पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामध्ये सन २०२२ मध्ये फेरीवाल्यांचे सर्वेक्षण झालेले असून यामध्ये अनेक विक्रेत्यांनी प्रमाणपत्र शुल्क चौदाशे रुपये भरलेले आहेत. त्यांना…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकाच्या दुसऱ्या सर्वसाधारण सभेत प्रशासकीय काळातील निर्णय आणि कामांवरून जोरदार चर्चा रंगली. शिवसेनेच्या नगरसेविका सुलभा उबाळे यांनी या कालावधीतील कामांची श्वेतपत्रिका काढण्याची ठाम मागणी करत प्रशासनाला धारेवर धरले. सभागृहात बोलताना उबाळे यांनी प्रशासकीय राजवटीत मंजूर व पूर्ण झालेल्या सर्व कामांचा तपशील सार्वजनिक करावा, असे सांगितले. “त्या काळात अनेक कामे घाईगडबडीत आणि संशयास्पद पद्धतीने करण्यात आली. कोणत्या कामासाठी किती निधी मंजूर झाला, प्रत्यक्षात किती खर्च झाला आणि त्यातून नेमका काय लाभ झाला, याची सविस्तर माहिती सभागृहासमोर ठेवावी,” अशी त्यांची मागणी होती. यावेळी त्यांनी तत्कालीन आयुक्त शेखर सिंह यांनी घेतलेल्या निर्णयांचीही चौकशी व्हावी, असा मुद्दा…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकाच्या आज (दि. २०) झालेल्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत भटक्या कुत्र्यांचा मुद्दा केंद्रस्थानी राहिला. शहरातील वाढत्या कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या पार्श्वभूमीवर नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक राजू मिसाळ यांनी हा विषय ठळकपणे मांडला. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी प्रतीकात्मक कुत्र्याचे मॉडेल आयुक्त व महापौरांसमोर ठेवत अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. निवडणूक प्रचारादरम्यान नागरिकांकडून भटक्या कुत्र्यांबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्याचे त्यांनी सांगितले. अलीकडेच शाळेच्या बसमधून उतरत असलेल्या मुलांवर कुत्र्याने हल्ला केल्याची घटना घडल्याचा उल्लेख करत, “नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. सभागृहात सादर करण्यात आलेल्या…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत राजकीय चुरस उफाळून आली. विविध मुद्द्यांवर चर्चा रंगत असताना नगरसेवकांमध्ये टोलेबाजी, कोपरखळ्या आणि उपरोधिक टिप्पणींचा वर्षाव झाला. त्यामुळे सभागृहात काही काळ हास्यकल्लोळ उसळला. काही नगरसेवक महापौरांना औपचारिक अभिवादन न करताच ये-जा करत असल्याचेही चित्र दिसून आले. माजी महापौर राहुल जाधव यांनी बोलताना भाजपला २०१७ आणि २०२६ मध्येही ‘घड्याळा’च्या मदतीची गरज भासली नसल्याचा उल्लेख केला. तसेच सभागृहात जास्त बोलणाऱ्यांचे राजकीय भविष्य धोक्यात येते, असा टोला लगावत काही नेत्यांना अप्रत्यक्ष इशारा दिला. त्यांच्या या वक्तव्याला विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी तात्काळ प्रत्युत्तर दिले. जाधव हे मूळचे भाजपचे नसून महाराष्ट्र नवनिर्माण सेना…

Read More

नवनियुक्त सदस्यांना महापौर रवि लांडगे यांनी दिल्या शुभेच्छा पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत स्थायी समितीसह विधी, शहर सुधारणा, शिक्षण, महिला व बालकल्याण तसेच क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीवर सदस्यांची निवड करण्यात आली. या सर्व सदस्यांना महापौर रवि लांडगे यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले. महापौर रवि लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा आज संपन्न झाली. यामध्ये स्थायी समितीसह एकूण ५ विषय समित्यांच्या सदस्यपदावर निवड करण्याचा विषय सभापटलावर होता. पक्षीय बलाबलानुसार या समित्यांवर सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची तहकूब विशेष सभा आज शुक्रवारी शांततेत पार पडली. या सभेत महापालिकेच्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्थायी समितीच्या १६ सदस्यांची निवड जाहीर करण्यात आली. कोणताही वाद न होता आणि सर्व प्रक्रिया नियमानुसार पूर्ण झाल्याने सभागृहात सौहार्दाचे वातावरण पाहायला मिळाले. सभेच्या प्रारंभी विविध पक्षांच्या गटनेत्यांनी आपापल्या पक्षातील नगरसेवकांची नावे बंद लिफाफ्यातून महापौरांकडे सादर केली. त्यानंतर संबंधित नावांची अधिकृत घोषणा करण्यात आली. स्थायी समिती ही महापालिकेच्या आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण ठेवणारी आणि महत्त्वाच्या धोरणात्मक निर्णयांना मंजुरी देणारी प्रमुख समिती मानली जाते. त्यामुळे या निवडींकडे शहरातील राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले होते. स्थायी समितीत भारतीय जनता पक्षाचे…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील ‘तिजोरीच्या चाव्या’ म्हणून ओळख असलेल्या स्थायी समितीसह विविध विषय समित्यांच्या सदस्यांची निवड शुक्रवारी (ता. २०) होणाऱ्या सर्वसाधारण सभेत केली जाणार आहे. विशेषतः स्थायी समितीवर कोणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महापौर, उपमहापौर आणि पक्षनेतेपदाच्या निवडीनंतर आता स्थायी समिती व विधी, महिला व बालकल्याण, शहर सुधारणा, क्रीडा-कला-साहित्य व सांस्कृतिक या विषय समित्यांवर कोणाला संधी मिळते, याबाबत उत्सुकता आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर तहकूब करण्यात आलेली सभा दुपारी एक वाजता होणार असून त्यात सदस्यांची निवड जाहीर केली जाणार आहे. अशी होईल निवड प्रक्रिया स्थायी व विषय समिती सदस्यांची…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) -+पिंपरी-चिंचवड महानगरपालिका येथील स्वीकृत सदस्य निवडीच्या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक कैलास (बाबा) बारणे यांना सभागृहात स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत नगरसेविका योगिता महेश बारणे यांनी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांना निवेदन सादर केले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, प्रभाग क्रमांक २३ थेरगाव गावठाण येथून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलमधून उमेदवारी देताना कैलास बारणे यांनी पक्ष संघटना बळकट करण्यासाठी पुढाकार घेतला. निवडणूक काळात त्यांनी संपूर्ण पॅनेलचे नेतृत्व करत संघटनात्मक कामात सक्रिय भूमिका पार पाडली. कैलास बारणे यांना समाजकारणाचा दीर्घ अनुभव असून शहरातील सर्वसामान्य नागरिकांशी त्यांचा सातत्याने संपर्क…

Read More

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस पूर्णवेळ आयुक्त नेमावा – रविराज काळे आप शहराध्यक्ष        पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 पार पडून नविन महापौरांची निवड झाली आहे. प्रशासनाच्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाचे असलेले आयुक्तपद चार महिने झाले तरी प्रभारी आहे. त्यामुळे शहरातील विकासकामे आणि दैनंदिन नागरी सेवा यावर परिणाम होत आहे. महापालिका आयुक्तपदावरून शेखर सिंह यांची बदली केली. त्यांच्याकडे नाशिक कुंभमेळ्याची जबाबदारी सोपविल्यानंतर ‘महामेट्रो’चे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्याकडे आयुक्तपदाचा तात्पुरता पदभार देण्यात आला होता; परंतु नवीन पूर्णवेळ आयुक्त देण्याचा निर्णय सरकारकडून का लांबणीवर पडला आहे हा संशोधनाचा विषय आहे . त्याचा महापालिकेतील विकासकामांवर विपरीत परिणाम…

Read More