Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव पिंपरी चिंचवडच्या अध्यक्षपदी नितीन घोलप यांची निवड करण्यात आली आहे. जयंती महोत्सवनिमित्त सन २०२४-२५ अध्यक्ष पदाची निवडणूक रविवार दि.२३ रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवन यमुनानगर निगडी येथे पार पडली. मातंग समाजाचे जेष्ठ नेते भाऊसाहेब अडागळे यांनी निवडणुक अधिकारी (पीठासीन अधिकारी) म्हणुन कामकाज पाहिले. जयंती महोत्सव अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी एकुण १६ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. यात खरी लढत महोत्सव समितीचे माजी सचिव नितीन घोलप व माजी उपाध्यक्ष अनिल गायकवाड यांच्यात झाली. या अटीतटीच्या लढतीमध्ये नितीन घोलप यांनी एकतर्फी विजय खेचून आणला. नितीन घोलप हे बहुमताने साहित्यरत्न…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आकुर्डी परिसरात काल झालेल्या पावसामुळे बहुतांशी भाग पाण्याखाली गेला. प्रभाग क्रमांक १४ व प्रभाग क्रमांक १५ या दोन्ही प्रभागांमध्ये पावसाळ्यापूर्वी (स्ट्रॉंम वॉटर लाईन) पावसाळी पाईपलाईन स्वच्छता व साफसफाई करावी व दुरुस्त करावी अशी मागणी वारंवार करुनही महापालिका प्रशासन हतबल झाले . पावसाळी पाईपलाईन साफसफाई करणे व दुरुस्त करण्यात यावे अशी मागणी   युवासेनेचे उपशहर प्रमुख निखिल दळवी यांनी आयुक्तांकडे केली आहे. आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काल दिनांक २३ जून रोजी सांयकाळी झालेल्या धुवाधार पावसामुळे आकुर्डी, गंगानगर ,दत्तवाडी ,विठ्ठलवाडी, क्रांतीनगर, साईदर्शन नगर, तूळजाई वस्ती, भंगारवाडी ,पंचतारा नगर, गुरुदेव नगर या सर्व परिसरात बहुतांशी भाग…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – तब्बल २४ वर्षांनी एकत्र येत कंदर (ता. करमाळा, जि. सोलापूर) येथील कण्वमुनी विद्यालयाच्या दहावीच्या १९९९-२००० च्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा दिला. हा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात पार पाडला. हे सर्व शक्य झाले ते सोशल मीडियामुळे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व विद्यार्थी व शिक्षकांना एकत्र करून या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. सर्व विद्यार्थ्यांना एकत्र करण्यासाठी मनोज रोकडे, पांडुरंग भगत, अमर कदम, भारत साळुंखे, रेवन माने, दत्तात्रय केदार यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. सर्व सन्मानिय गुरुवर्य यांना पुष्पगुच्छ, आंब्याचे रोप देऊन गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे कायमची…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ऑल सेट्स हाय स्कूल तर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी योगा दिन साजरा केला जातो यावेळी 1 ते 10 च्या विद्यार्थ्यांकडून क्रीडा शिक्षक अभिजीत परदेशी यांनी अतिशय सुंदर रित्या योगा चे प्रात्यक्षिक करून घेतली व हे करत असताना पालकवर्गांकडून कौतुकाची थाप मिळवली. व याप्रसंगी पूर्ण स्कूल योगामय वातावरणात तल्लीन झाली होती आजच्या धकाधकीच्या काळात जीवनात योगाच्या माध्यमातून आपण आपले शरीर तंदुरुस्त ठेवू शकता शिवाय मनावर हे चांगले संस्कार आपण करू शकता हा उद्देश याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी दिला तसेच स्कूलमध्ये योगाचे महत्व न राहता दहावीच्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत योगाचे महत्त्व…

Read More

पिंपळे गुरव, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –     पिंपळे गुरव येथील “ओंकार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल” चाप्रसार हॉस्पिटल मधील कर्मचारी प्रवीण मोतीराम कांबळे यांनी लातूरमध्ये सुद्धा डायलिसिस विषयी जनजागृती केली. लातूर मधील बरेच नागरिक पुणे -पिंपरी चिंचवड येथे स्थायिक आहेत.पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी मोफत डायलिसिस साठी त्यांनी प्रोत्साहित केले. हॉस्पिटलचे सर्वेसर्वा  विजय खर्चे डॉ.अमोल शेंडे डॉ.देवयानी लोंढे यांच्या प्रतिनिधित्वाखाली हा उपचार घेत असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी त्यांना  शंकर जगताप युवा मंच, पिंपळे गुरव व भाजपा सांगवी- रहाटणी मंडल उपाध्यक्ष ललितभाऊ म्हसेकर यांचे विशेष सहकार्य लाभले.

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “शिक्षणातून माणूस घडला पाहिजे!” असे प्रतिपादन ज्येष्ठ प्रवचनकार ह. भ. प. किसनमहाराज चौधरी यांनी न्यू इंग्लिश स्कूल माण येथे व्यक्त केले. दिलासा संस्था आणि न्यू इंग्लिश स्कूल, माण यांच्या संयुक्त विद्यमाने वै. मुरलीधर कंक (मास्तर) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एस. एस. सी. शालान्त परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यात किसनमहाराज चौधरी बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक ह. भ. प. अशोकमहाराज गोरे अध्यक्षस्थानी होते; तसेच ज्येष्ठ कवयित्री राधाबाई वाघमारे, साहित्यिक प्रदीप गांधलीकर, सुभाष चव्हाण, शामराव सरकाळे, मुरलीधर दळवी, न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक अंबादास रोडे, दिलासाचे अध्यक्ष सुरेश कंक यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी दिलासा समूहातील गुणवंत…

Read More

वरुणराजाचे आगमन; ढोलताशांच्या दणदणाटात फटाक्यांची आतषबाजी आळंदी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  येथील संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्यातील श्रींचा वैभवी पालखी रथ ओढणा-या बैलजोडीची सेवा देण्याचा मान वस्ताद सहादु कुऱ्हाडे यांना मिळाला आहे. रथ ओढण्यास हौश्या – बाजी आणि माऊली – वजीर या दोन्ही बैलजोडीची आळंदीत श्री स्वामी महाराज मठ येथून नगरप्रदक्षिणा मार्गे महाद्वार चौक अशी भव्य मिरवणूक हरिनाम जयघोषात वाजतगाजत झाली. यावेळी शहरात ठीक ठिकाणी ढोलताशांच्या दणदणाटात, फटाक्यांची आतषबाजी करून आळंदी ग्रामस्थांनी जोरदार स्वागत केले. बैलजोडीचे आळंदी देवस्थानने देखील स्वागत आणि पूजा परंपरेने माऊली मंदिरा समोरील महाद्वार ऐवजी महाद्वार रस्त्यावरील हॉटेल समोर केले. पहिल्यांदाच माऊली मंदिरा समोर श्रींचा वैभवी रथ…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पावसाळा सुरू झाला तरी चिंचवड विधानसभा मतदारसंघात सर्वच भागात वीज यंत्रणेच्या अनेक समस्यांसासाठी अद्याप उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे आज चिंचवड विधानसभा मतदारसंघातील सर्व माजी नगरसेवक, भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह महावितरणच्या पिंपरी विभाग कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महावितरणकड़ून चिंचवड विधानसभा मतदारसंघात काय-काय खबरदारी घेण्यात आली आहे, यावर सर्वांनी चर्चा करून महावितरणच्या अधिकाऱ्यांना काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या. मतदारसंघात जागोजागी असलेल्या ट्रान्सफॉर्मरमधील ऑईल बदलणे, गंज चढलेले डीपी बॉक्स बदलणे, सातत्याने वीज पुरवठा खंडीत होत असून, तो पूर्ववत कधी होणार याचा एसएमएस अलर्ट वीज ग्राहकांना पाठविणे, प्रभाग क्रमांक १७ मधील ३५०…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पूर्वी, जम्मू काश्मीरमध्ये जाण्यासाठी परवाना लागत असे. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी ‘एक देश, एक विधान आणि एक निशान (ध्वज) साठी लढा देत काश्मीरला भारताचा अविभाज्य घटक बनवण्यासाठी प्राणांची आहुती दिली. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा लढा आणि बलिदानाचे आपण सगळे कायम ऋणी आहोत, असे प्रतिपादन भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केले. पिंपरी-चिंचवड शहर भारतीय जनता पक्षातर्फे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. मोरवाडी येथील भाजपा मध्यवर्ती कार्यालयात हा अभिवादन कार्यक्रम पार पडला. यावेळी प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, प्रदेश सदस्य महेश कुलकर्णी,…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आंतरराष्ट्रीय  योग दिनानिमित मोहननगर येथे क्रांती फाउंडेशन व योग विद्या धाम यांच्या संयुक्त विद्यामानाने योग शिबीराचे आयोज़न करण्यात आले होते. योग हा समृद्ध व सकारात्मक जीवनाचा मूलमंत्र आहे. सद्यस्थितीमध्ये योगसाधनेला आपल्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य भाग बनवणे गरजेचे झाले आहे. याच उद्देशाने आम्ही २३ जून रोजी विशेष योग शिबिर आयोजित करण्यात आले.या शिबिरात योगाचार्य प्रमोद निफाड़कर व योगप्रशिक्षक श्री.वेताळे व  महादेव येसके यांनी योगाभ्यासाबद्दल मार्गदर्शन केले. परिसरातील नागरीकांनी चांगला प्रतिसाद दिला.

Read More