साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सवाच्या पिंपरी चिंचवडच्या अध्यक्षपदी नितीन घोलप यांची निवड


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव पिंपरी चिंचवडच्या अध्यक्षपदी नितीन घोलप यांची निवड करण्यात आली आहे. जयंती महोत्सवनिमित्त सन २०२४-२५ अध्यक्ष पदाची निवडणूक रविवार दि.२३ रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवन यमुनानगर निगडी येथे पार पडली. मातंग समाजाचे जेष्ठ नेते भाऊसाहेब अडागळे यांनी निवडणुक अधिकारी (पीठासीन अधिकारी) म्हणुन कामकाज पाहिले.



जयंती महोत्सव अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी एकुण १६ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. यात खरी लढत महोत्सव समितीचे माजी सचिव नितीन घोलप व माजी उपाध्यक्ष अनिल गायकवाड यांच्यात झाली. या अटीतटीच्या लढतीमध्ये नितीन घोलप यांनी एकतर्फी विजय खेचून आणला. नितीन घोलप हे बहुमताने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष (२०२४ -२०२५) म्हणुन बहुमताने निवडून आले. सदर निवडणूकीमध्ये नितीन घोलप यांना १९ मते तर अनिल गायकवाड यांना ८ मते पडली.

समाजातील माजी नगरसेवक किसनदादा नेटके, रविंद्र खिल्लारे, काळुराम पवार, राम पात्रे, माजी नगरसेविका कमलताई घोलप, मनिषाताई पवार, झुंबरताई शिंदे, सुमनताई नेटके, माजी अध्यक्ष ज्येष्ठनेते भाऊसाहेब अडागळे, अण्णा लोखंडे, सुरेश जोगदंड, भगवान शिंदे, मनोज तोडरमल, नाना कसबे, सुनील भिसे, सतीश भवाळ, मनोज पवार, दत्तू चव्हाण, अरुण जोगदंड, संजय ससाणे, केसरताई लांडगे, आशा शहाणे व संदिपान झोंबाडे, रामदास कांबळे, डी.पी. खंडागळे, युवराज दाखले, अण्णा कसबे व सर्व मातंग समाज बांधव उपस्थित होते.
निवड झाल्यावर नवनिर्वाचित अध्यक्ष नितीन घोलप यांनी महोत्सव समितीचे माजी अध्यक्ष तसेच समाजबांधव यांच्या समवेत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, आद्यक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे व क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले.








