- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘पीएमआरडीए’ आयुक्तांना आदेश – भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जगातील सर्वात मोठी लोकशाही व्यवस्था असलेल्या भारतीय संविधानासह अन्य देशाच्या संविधानांचा अभ्यास सर्वसामान्य नागरिकांना करता यावा. या करिता पिंपरी-चिंचवडमध्ये पुणे प्रदेश महानगर विकास प्राधिकरण (PMRDA) ‘‘संविधान भवन’’ प्रस्तावित केले आहे. संविधान साक्षरता या हेतुने हाती घेतलेल्या या कामाला गती द्यावी, असे आदेश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. मुंबई येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री शिंदे यांची मंत्रालयात भाजपा आमदार महेश लांडगे यांनी भेट घेतली. यावेळी पिंपरी-चिंचवड शहरातील प्रस्तावित ‘‘संविधान भवन’’बाबत सकारात्मक चर्चा केली. तत्कालीन…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्यात विधान परिषदेसाठी भाजपने आपल्या पाच उमेदवारांची यादी जाहीर केली. यात पिंपरी चिंचवड मधून अमित गोरखे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी यासंदर्भात उमेदवारी जाहीर केली आहे. अमित गोरखे यांच्यासह माजी मंत्री पंकजा मुंडे, परिणय फुके, योगेश टिळेकर, सदाभाऊ खोत यांचीही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. जुलै महिन्यात विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. २ जुलै उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. लोकसभा निवडणुकांचे निकाल लागताच राज्यात विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली. जुलै महिन्यात विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. 2 जुलै उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख…
अजितदादांना सांगून ते नगरसेवक शरद पवारांच्या भेटीला पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. पिंपरी चिंचवड हा अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र आता याच बालेकिल्ल्याला शरद पवार सुरुंग लावण्याच्या तयारीत आहेत शरद पवारांना भेटण्यापूर्वी पिंपरी चिंचवड मधील माजी नगरसेवक आणि पदाधिकारी अजित पवारांना भेटले होते. महायुतीत एक बेसिक फॉर्म्युला ठरलाय, ज्यांचे विद्यमान आमदार असतील ती विधानसभा त्याच पक्षाच्या वाट्याला येणार. त्यानुसार भोसरी विधानसभा ही भाजपला सुटणार आहे, हे उघड आहे. अजित पवारांच्या गटाकडून शहराध्यक्ष अजित गव्हाणे हे स्वतः इच्छूक आहेत. अजित गव्हाणेंनी लढण्यास असमर्थता दर्शवल्यास माजी आमदार…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आज कुंदननगर फुगेवाडी येथे संदिप श्रीपाद बेलसरे मित्र परिवाराच्या वतीने जगदगुरू संत तुकाराम महाराज पालखीचे स्वागत करण्यात आले व वारकऱ्यांना प्रसाद वाटप करण्यात आला.
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मोहन नगर येथे ई १० वी व १२ वी नंतर काय ? करिअर मार्गदर्शन शिबीर व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास प्रा.विजय नवले , अनुराधा गोरखे ,निवृत्त पोलिस इंस्पेक्टर भगवान काळे ,बाल संस्कार वर्गाचे रवींद्र टोळे ,ज्येष्ठ नागरीक रमेश कोठारी ,व्यापारी सदाशिव गोरड. बबनराव देव्काते (माज़ी सैनिक) संभाजी घाडगे (माज़ी सैनिक) इत्यादि उपस्थित होते.प्रा.विजय नवले यांनी विद्यार्थी यांना करिअर बाबत मार्गदर्शन केले. याच बरोबर आर्टिफीसियल इंटेलिजेंस बाबत मार्गदर्शन केले तसेच विविध क्षेत्त्रातिल संधी बाबत माहिती दिली.कार्यक्रमाचे प्रस्ताविकात गणेश लंगोटे यांनी सांगितले “गेल्या १० वर्षापासुन हा उपक्रम साततत्याने राबवित आहोत ,चांगले विद्यार्थी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विठू नामाच्या गजरात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे काल सायंकाळी पंढरपूरकडे प्रस्थान झाले. संत तुकाराम महाराजांच्या 339 वां पालखी सोहळ्यास प्रथमच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निगडी येथे सोहळ्यास उपस्थित राहून पालखीचे दर्शन घेतले. यावेळी, भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी पिंपरी चिंचवड शहरवासीयांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राम मंदिराची प्रतिकृती भेट देवून त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी, आमदार अश्विनी जगताप, उमा खापरे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, सरचिटणीस नामदेव ढाके, पिंपरी विधानसभा निवडणुक प्रमुख अमित गोरखे, माजी नगरसेवक अभिषेक बारणे, माजी नगरसेविका शर्मिला बाबर, कमल घोलप, तेजस्विनी कदम, राजेंद्र बाबर, बापू बाबर, सचिन काळभोर यांच्यासह भाजपाचे…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “उज्ज्वल व्यक्तिमत्त्वासाठी योग्य शिक्षणाची नितांत गरज असते. क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या माध्यमातून क्रांतिवीर चापेकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयासह संस्थेच्या अन्य शाळांमधून समाजातील वंचित घटकांचे पुनरुत्थान करण्याचे अभिमानास्पद कार्य केले जात आहे!” असे गौरवोद्गार पिंपरी – चिंचवड बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. सुहास पडवळ यांनी चिंचवडगाव येथे व्यक्त केले. क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचलित क्रांतिवीर चापेकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील दहावी आणि बारावीच्या परीक्षेत १००% निकालाप्रीत्यर्थ विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात ॲड. सुहास पडवळ बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महिला समन्वयक निवेदिता कछवा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या; तसेच क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती कार्यवाह ॲड. सतिश गोरडे, उपाध्यक्ष…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनच्या वतीने जगदगुरू संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे स्वागत कै.मधुकर पवळे उड्डाणपूल, निगडी येथे करण्यात आले. दरवर्षी कमिटी व सभासदांतर्फे पालखीचे पिंपरी – चिंचवड शहरात स्वागत करण्यात येते. यावेळी स्वागत केल्यानंतर सर्व दिंडी प्रमुख, विणेकरी, चोपदार आणि वारकऱ्यांना विद्यमान बार असोसिएशन तर्फे अल्पपोहाराचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. सुदाम साने, माजी सचिव ॲड. भूषण चिंचवडे, विद्यमान सचिव ॲड. धनंजय कोकणे, सहसचिव ॲड. उमेश खंदारे, सदस्य ॲड. फारूख शेख,ॲड. दशरथ बावकर, ॲड. आयाज शेख, ॲड. अतुल नढे, ॲड. विकास शर्मा आदी…
आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आळंदी – पुणे रस्त्यावरील वडमुखवाडी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात माऊलींच्या पादुका पालखी सोहळा मालक राजेंद्र आरफळकर यांनी मंदिरात प्रथा परंपरांचे पालन करीत आणल्या. यावेळी माऊलींचे पादुकांची महापुजा दही, दूधाचा व मधाचा अभिषेक,आरती, पुरणपोळीचा महानैवेद्य व पेढे प्रसाद वाढविण्यात आला. श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष अँड. विष्णू तापकीर, सुनीता तापकीर यांच्या हस्ते श्रींची पूजा करण्यात आली. यावेळी भाविकांची दर्शनास मोठी गर्दी झाली होती. माऊलींच्या वैभवी चलपादुका आषाढी पायी वारी पालखी सोहळ्या निमित्त पंढरपूरला मार्गस्थ होत असताना संत श्री ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात विसावा…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रयत शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालय पिंपरी वाघेरे या शाळेत आज शनिवार दिनांक 29/07/2024 रोजी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सहशालेय उपक्रमा साठी इयत्ता 5 वी च्या विद्यार्थीनीनी वारकरी वेशभूषा धारण केली होती , 6 वी च्या विद्यार्थिनींनी वृक्षदिंडी, 7 वी च्या विद्यार्थिनींनी ग्रंथदिंडी , व 8 वी च्या विद्यार्थिनींनी वारकऱ्यांची वेशभूषा धारण केली होती . यानंतर विद्यालयाच्या आदरणीय प्रभारी मुख्याध्यापिका सौ ऊर्मिला पाटील यांचे शुभहस्ते वृक्षदिंडी, ग्रंथदिंडी व वारकरी दिंडीचे पूजन संपन्न झाले. या कार्यक्रमाचे वेळी विद्यार्थिनींनी पर्यावरण संरक्षण विषयक संदेश व वाचनाचे महत्त्व पटवून देणारे फलक व घोषवाक्य तयार केले होते.…
