Author: maharashtrabreakingnews.com

– राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाची मिळाली मान्यता पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय उभारण्यासाठी जागा निश्चितीचा बहुप्रतिक्षीत निर्णय अखेर झाला. जाधववाडी-चिखली येथील गट. नं. ५३९ मधील ३ हे. ३९ आर. शासकीय जमीन पोलीस आयुक्तालय कार्यालय, निवासस्थान आणि परेड ग्राऊंड प्रयोजनाकरिता प्रदान करण्यासाठी राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने मान्यता दिली. मुंबई येथे सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने भाजपा आमदार महेश लांडगे यांनी पोलीस आयुक्तालय, चिखली पोलीस स्टेशनसाठी जागा व दापोडी पोलीस स्टेशनची निर्मिती याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि संबंधित विषय मार्गी लावण्याबाबत आग्रही मागणी केली होती. आमदार महेश लांडगे…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दरवर्षीप्रमाणे यंदाही (०७/०७/२०२४ रोजी) इस्कॉन रावेत संस्थेच्या वतीने श्री जगन्नाथ यात्रा पिंपरी चिंचवड शहरात संपन्न झाली. चिंतामणी चौक वाल्हेकरवाडी ते इस्कॉन मंदिर रावेत असा प्रवास करत यंदाची रथयात्रा “जय जगन्नाथ – हरे कृष्ण” नामाचा जयघोष करीत संपन्न झाली.शहरातील हजारो श्री जगन्नाथ भक्त भाविक या यात्रेमध्ये सहभागी झाले होते.भाविकांची संख्या मोठी असल्याने प्रमुख चौकात वाहतूक नियमन करण्यासाठी तसेच सुरक्षित यात्रा पार पाडण्यासाठी प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या ६० स्वयंसेवकांनी मोलाची भूमिका पार पाडली.     प्रथमतः भगवान श्री जगन्नाथाची आरती प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाली. मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून यात्रेची सुरुवात झाली. या प्रसंगी मावळचे खासदार…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पिंपरी-चिंचवडमध्ये प्रभावीपणे राबविण्यासाठी आणि शहरातील एकही महिला या योजनेपासून वंचित राहू नये यासाठी या योजनेचे अर्ज भरून घेण्याचे काम महिला बचत गटांना देण्यात यावे, अशी मागणी पिंपरी-चिंचवड शहर भाजप अध्यक्ष शंकर जगताप यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “राज्यातील महायुती सरकारने नुकत्याच मांडलेल्या अर्थसंकल्पात माता-भगिनींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना दरमहा १५०० रुपये त्यांच्या बँक खात्यात सरकारकडून जमा करण्यात येणार आहेत. या योजनेमुळे राज्यातील माता-भगिनींना मोठा आर्थिक आधार मिळणार…

Read More

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  येथील एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नाॅलाॅजी विद्यापीठाच्या स्कुल ऑफ फिल्म थिएटरच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या वतीने येथील राज कपूर सभागृहात प्रसिद्ध नाटककार मोहन राकेश लिखित दोन अंकी ‘आषाढ़ का एक दिन’ या अतिशय मनमोहक नाटकाची प्रस्तृती करण्यात आली. या नाटकाचे दिग्दर्शन राष्ट्रीय नाट्यविद्यालयाचे स्नातक तसेच अभिनेता, दिग्दर्शक व प्राध्यापक मिलिंद इनामदार यांनी केले आहे. १९५८ मोहन राकेश लिखित ‘आषाढ़ का एक दिन’ हे नाटक आधुनिक भारतीय रंगभूमि वरील पहिले नाटक मानले जाते. हे नाटक इ. पु.४ थ्या शतकातील कवि व नाटककार कालिदास व मल्लिका यांची एक प्रेम- विरह कथा आहे. नाटकाचे कथानक हे मल्लिकाच्या जीवना भोवती फिरणारे…

Read More

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी येथील हिंदुस्थान अँटिबायोटिक्स स्कूलच्या प्रीत पाटील (इंग्रजी माध्यम, इयत्ता पाचवी) राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत २९४ पैकी २७२ गुण प्राप्त करून राज्यस्तरीय शहरी गुणवत्ता यादीत दहावे स्थान, पुणे जिल्हा शहरी गुणवत्ता यादीत तिसरा क्रमांक आणि इंग्रजी माध्यमातून पुणे विभागातून प्रथम क्रमांक त्याने पटकावत उल्लेखनीय यश प्राप्त केले.    मिसबा शेख (इयत्ता पाचवी) हिने २२४ गुण प्राप्त करून शहरी विभाग गुणवत्ता यादीत ३१३ वा क्रमांक मिळवला आहे. हिंदुस्थान अँटिबायोटिक्स स्कूल माध्यमिक विभाग पिंपरी प्रशालेतील पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत एकूण ३३ विद्यार्थी पात्र ठरले. इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल ५३.४५ टक्के लागला. इयत्ता आठवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती…

Read More

– टपरी, पथारी, हातगाडी पंचायत पूर्ण ताकदीने सोबत असल्याचा व्यासायिकांना विश्वास पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आळंदी नगरपरिषदेच्या वतीने झाडे बाजार येथे देखभाल दुरुस्तीची कामे सुरु आहेत. ही कामे करताना तिथे असणाऱ्या छोट्या व्यावसायिकांचे ओटे न तोडता काम करावे. त्यांचे नुकसान होऊ नये याची खबरदारी घेण्याची मागणी टपरी, पथारी, हातगाडी पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केली.  फळभाजी, विक्रेते, टपरीधारकांच्या प्रश्नांसाठी बाबा कांबळे यांनी आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे, शहर अभियंता सचिन गायकवाड,अतिक्रमण अधिकारी अरूण घुंडरे, पाटिल,यांची भेट घेतली. सविस्तर बैठक घेऊन चर्चा केली. या वेळी अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तरे दिल्याल्यामुळे प्रशासनाला  सहकार्याची भूमिका घेत आंदोलन स्थगित केले. या वेळी टपरी, पथारी,…

Read More

शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेच्या वतीने काळे यांचा गुणगौरव पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य व ग्लोबल ऍग्रो फाउंडेशन महाराष्ट्र राज्य ट्रस्ट यांच्यावतीने सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. या वर्षी २०२३ – २४ चा पुरस्कार सामाजिक क्षेत्रात तसेच समाजातील वेगवेगळ्या मुद्द्यावर व शेतकऱ्यांच्या दुधाला अनुदान मिळावे यासाठी अनेक वेळा मुंडन आंदोलने रास्ता रोको आंदोलने करत शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी वारंवार रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी त्यांना न्याय देण्यासाठी विविध आंदोलनाच्या माध्यमातून सतत कार्यरत असणारा शेतकरी योध्दा तसेच महापुरुषांच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांच्या आत्मसन्मानासाठी न्याय हक्काची लढाई लढणारा प्रसंगी स्वतःला अटक झाली…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी महासंघाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी इयत्ता दहावी आणि बारावी या परीक्षेमध्ये शेकडा 80 टक्के व 75 टक्के व त्यापेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार सन्मान समारंभ आणि शान समारंभात पार पडला. प्रमुख अतिथी म्हणून यूपीएससी परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीतील आय डी एस अधिकारी डॉ सुदर्शन लोढा, उद्योजक राहुल मुनोत , महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ अशोककुमार पगारिया, विद्यमान अध्यक्ष उमेश पाटील, कार्याध्यक्ष श्रेयस पगारिया आणि इतर मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ लोढा म्हणाले ” युपीएससी सारख्या उच्च आणि कठीणतम परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी जिद्द ,परिश्रम ,सखोल अभ्यास करण्याची तयारी,आणि चिकाटी या गोष्टींची…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड येथील योगदान प्रतिष्ठान व नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर यांच्यावतीने दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ झाला. कार्यक्रमाचे यंदाचे 19 वे वर्ष असून गेले 19 वर्षे सुरेश शिवाजी भोईर मार्फत विद्यार्थ्यांना सन्मानीत करून कौतुक करण्यात येते. यंदाच्या 275 विद्यार्थी यांना गौरवण्यात आले व त्यांना विवेक वेलणकर यांचे दहावीनंतर शाखा निवड हे पुस्तक व गिफ्ट देऊन सन्मानीत करण्यात आले. ह्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ह. भ.प. किसन महाराज चौधरी ,भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष शंकरशेठ जगताप, नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर उपस्थित होते. विद्यार्थी यांना बहुमोल मार्गदर्शन व पुढील वाटचालीस शुभेच्छा भाजपचे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष शंकर  जगताप यांनी…

Read More

– सुमारे ८०० कुटुंबांना अवघ्या २४ तासांत दिलासा पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – डुडूळगाव येथील सोसायटीधारकांना ड्रेनेज व्यवस्थेअभावी आर्थिक भुर्दंड आणि मन:स्ताप सहन करावा लागत होता. याबाबत भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने कार्यन्वीत असलेल्या ‘परिवर्तन हेल्पलाईन’ तक्रार दाखल झाली होती. अवघ्या २४ तासांत सदर ड्रेनेज लाईनचे काम सुरू करण्यात आले. त्यामुळे सुमारे ८०० कुटुंबांना दिलासा मिळाला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीमध्ये १९९७ मध्ये तळवडे, चिखली, मोशी, डुडुळगाव, चोविसावाडी, वडमुखवाडी, चऱ्होली, दिघी या गावांचा समावेश झाला. झपाट्याने नागरीकरण झाले. मात्र, त्या तुलनेमध्ये पायाभूत सोयी-सुविधा निर्माण झाल्या नाहीत. दरम्यान, २०१४ पासून आमदार महेश लांडगे यांनी ‘समाविष्ट गावांचा विकास’ हा अजेंडा घेतला. महापालिकेत…

Read More