- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र शासनाच्या वतीने इयत्ता आठवी व इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन करण्यात येते. या परीक्षेचा अभ्यास भविष्यातील स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असल्याचे दिसून येते. पिंपरी चिंचवड महानगरपालिका शाळा रावेत क्र. ९७ शाळेतील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा, आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणारी शिष्यवृत्ती परीक्षा, शासकीय चित्रकला परीक्षा, मंथन स्पर्धा परीक्षा अशा अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होत असतात. अशा स्पर्धा परीक्षांसाठी दर्जेदार साहित्य देखील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उपलब्ध असणे आवश्यक असते. ही गरज ओळखून रावेत शाळेतील आठवीच्या व पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी सहगामी फाउंडेशनच्या वतीने अध्यक्षा प्राजक्ता रुद्रवार यांनी तसेच त्यांच्या सहकारी रेणूका दिक्षीत,भारती गामी व मधूरा…
आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील चऱ्होली बुद्रुक आणि चऱ्होली खुर्द यांना जोडणारा रस्ता तीर्थक्षेत्र आळंदी विकास आराखड्यातून विकसित करण्यात आला. मात्र रस्त्याचे रुंदी प्रमाणे रुंदीकरण न झाल्याने रस्त्यावरून बाह्यवळण मार्गावरून रहदारी करणे धोक्याचे झाले आहे. या रस्त्यावरील इंद्रायणी नदीवरील पुलावर शालेय मुलांची वाहतूक करणारी शालेय बसला अपघात झाला.यात सुमारे ७० मुले वाचली. या बाह्यवळण मार्गाचे दुतर्फा मोठ्या प्रमाणात कचरा टाकल्या ने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. वाहन चालक, नागरिक यांना रहादारित नक मुठीत धरून पादचाऱ्यांना चालावे लागते. या मुळे नागरिकांत नाराजी आहे. तीर्थक्षेत्र आळंदी विकास आराखड्या अंतर्गत करण्यात आलेल्या बाह्यवळण मार्ग पुला जवळ धोकादायक…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नुकतेच इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये विशेष यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व कौतुक सोहळा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या थेरगाव वाकड ताथवडे विभागाच्या वतीने शिव मंदीर सभागृह, शिवकॅालनी,गणेशनगर,थेरगाव,आयोजित करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन मनसे प्रदेश सरचिटणीस रणजित दादा शिरोळे,मनसे शहराध्यक्ष सचिन भाऊ चिखले,मनविसे प्रदेश उपाध्यक्ष हेमंत भाऊ डांगे,मनसे जनहित कक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राजु भालेराव,उपशहर अध्यक्ष विशाल मानकरी,उपविभाग अध्यक्ष नितीन चव्हाण तसेच प्रभागातील खिंवसरा पाटील शाळेचे मुख्यधापक नटराज जगताप सर,प्रज्ञा विद्यामंदीर संचालक गवळी मॅडम,जगताप सर मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ताथवडे श्री.होले सर मुख्याध्यापक नरसिंह माध्यमिक विद्यालय ताथवडे,परशुराम…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विविध भारती म्युझिकल इव्हेंट प्रस्तुत ‘ये शाम मस्तानी’ या दृकश्राव्य हिंदी चित्रपटगीतांच्या नि:शुल्क मैफलीत रसिकांनी एक अविस्मरणीय सुरेल संध्याकाळ अनुभवली. निगडी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृह (छोटे सभागृह) येथे शनिवार, दिनांक १३ जुलै २०२४ रोजी सुमारे साडेतीन तास अभिजात हिंदी चित्रपटातील अजूनही ओठांवर खेळणारी आणि काही विस्मरणात गेलेली अवीट गोडीची गीते ऐकताना श्रोते मंत्रमुग्ध झाले. विनायक कदम, नंदकुमार कांबळे, सुजाता माळवे, राजेंद्र कांबळे,मालन गायकवाड, विकास जगताप, शुभांगी पवार, विलास खरे, संगीता पाटील, अनिल जंगम, सुहासिनी कंझरकर, मल्लिकार्जुन बनसोडे, स्वरदा शेट्ये, अरुण सरमाने, शैलेश घावटे या गायक कलाकारांनी आपल्या एकल आणि युगुलस्वरातील गीतांच्या सादरीकरणातून रसिकांना चित्रपटसृष्टीतील…
पक्षाने न्याय द्यावा असे आवाहन करीत आमदारकी” साठी शत्रुघ्न काटे यांची दावेदारी पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. यासाठी इच्छुकांनी आपापली तयारी सुरू केली आहे आणि यामध्ये सध्या सर्वात जास्त चर्चेत असलेलं नाव म्हणजे शत्रुघ्न काटे. भारतीय जनता पक्षाचे दोन टर्म नगरसेवक तसेच दिवंगत आमदार स्व.लक्ष्मणभाऊ जगताप यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख.शत्रुघ्न काटे यांनीही “आता माघार नाही” असा विश्वास देत रणशिंग फुंकले आहे. पिंपळे सौदागर येथील बासुरी बँकवेट हॉल याठिकाणी शत्रुघ्न काटे यांची आपल्या कार्यकर्त्यासोबत बैठक संपन्न झाली.यावेळी साधारण २५०० पेक्षा जास्त कार्यकर्ते उपस्थित होते. चिंचवड विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. यासाठी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च मधील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने जुन्नर तालुक्यातील किल्ले जीवधन, घाटघर येथे वृक्षारोपण कार्यक्रमांमध्ये ५० जंगली झाडांच्या रोपांची लागवड करण्यात आणि १२०० सीड बॉलचे रोपण करण्यात आले. तसेच दुर्ग भेट व परिसर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. पीसीसीओईआर चे प्राचार्य डॉ. हरीश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या या शिबिरात इतिहास संशोधक अमर गायकवाड यांनी जीवधन किल्ल्याचा इतिहास सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. महेंद्र साळुंके, टीम महाराष्ट्र रेंजर्सचे प्रा. प्रदीप गायकवाड, प्रा. अश्विनी भावसार, जुन्नर वन विभागाचे…
पिंपरी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांचा दणदणीत विजय झाल्याबद्दल पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या वतीने शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या नेतृत्वाखाली पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. नागरिकांना लाडू वाटप करत विजयी जल्लोष करण्यात केला. पिंपरी-चिंचवड शहराला अमित गोरखे यांच्या रुपाने भाजपने आणखी एक आमदार दिल्याबद्दल सर्वांनी पक्षाचे व वरिष्ठ नेत्यांचे आभार मानत आनंद व्यक्त केला. विधान परिषद निवडणुकीत भाजपच्या पंकजा मुंडे, अमित गोरखे, योगेश टिळेकर, परिणय फुके, शेतकरी नेते सदाभाऊ खोत तसेच शिवसेनेचे कृपाल तुमाने, श्रीमती भावना गवळी, राष्ट्रवादीचे राजेश विटेकर, शिवाजीराव गर्जे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला. निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवार निवडून आल्याबद्दल…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सुनील गव्हाणे यांचा वाढदिवस अनाथ विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू तसेच फळ वाटप करून चिखली येथील विकास अनाथ आश्रम या ठिकाणी करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष श्री राहुल आहेर यांनी केले होते . यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराचे कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे,महिला अध्यक्ष ज्योतीताई निंबाळकर,मुख्य सरचिटणीस विनोद भांगे छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पडवळ उद्योजक आकाश मांडगे,सामाजिक न्याय अध्यक्ष मयूर जाधव,भोसरी विधानसभा अध्यक्ष ज्ञानेश आल्हाट,राजेश हरगुडे अनिल भोसले ,संतोष माळी,ज्ञानेश्वर पुदाले,ऋषभ बदाले वैष्णवी पवार,जगदीश गपाट,अभिषेक कांबळे,अरबाज खान,आदित्य सोनवणे,आर्यन धोत्रे,स्वप्नील खंडागळे आदी उपस्थित होते.
ओम प्रतिष्ठान संस्थेची गरजू मुलींसाठी योजना पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘ती’ च्या शैक्षणिक शुल्काची जबाबदारी घेणायस विद्यादान योजना सज्ज झाली आहे, अशी माहिती संस्थापक अध्यक्षा वनिता सावंत यांनी दिली. समाजातल्या प्रत्येक घटकाला शिक्षण घेत आयुष्य घडवायचा हक्क आहे मग तो मुलगा असो किंवा मुलगी! त्यात आर्थिक दृष्ट्या दुर्बल पण गुणवंत अश्या हुशार मुलीं आहेत. ज्यांना १० वी नंतर च्या शिक्षणाची फी भरणात अडचण येत आहे. अश्या मुलींना मदत करण्यासाठी ओम प्रतिष्ठान ने विद्यादान योजनेचा संकल्प केला आहे आणि संस्था हे कार्य मागील ४ वर्षांपासून करत आहे. नेमकी काय आहे ही विद्यादान योजना ? – गरजू मुलींना शिष्यवृत्ती – शैक्षणिक…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रेरणा शिक्षण संस्थेचे संस्थापक तुकाराम गुजर आणि मानद सचिव कांतीलाल गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रेरणा विद्यालयामध्ये दिंडी सोहळा संपन्न झाला. ज्ञानोबा तुकोबांच्या गजरात, श्रीविठ्ठल नाम जयघोष करत, भक्तिमय वातावरणात पालखी सोहळा पार पडला. यावेळी विठ्ठल रुक्मिणी आणि वारकरी संतांच्या वेशभूषेत मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. सर्वप्रथम विठ्ठल रुक्मिणी,टाळ, मृदंग आणि पवित्र तुळशी यांच्या प्रतिमांचे मुख्याध्यापक महेंद्र पवार, मुख्याध्यापक कृष्णराव नाईकरे, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती नाना शिवले, पर्यवेक्षक अर्जुन शेटे व प्रवीण कुऱ्हाडे यांच्या शुभहस्ते पार पडले. यावेळी परिसरामध्ये टाळ-मृदंगाचा गजर करत पालखी सोहळा लक्ष्मणनगर येथील विठ्ठल मंदिरात दाखल झाला. तेथे विठ्ठलाची आरती घेतली. त्यानंतर परिसरातून…
