Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) “कार्यकर्ता संकल्प मेळावा” रविवार दिनांक २१ जुलैला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री  अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. तसेच पिंपरी चिंचवड शहरातील सर्व आजी माजी आमदार, महापौर, नगरसेवक, नगरसेविका, सेल अध्यक्ष व पदाधिकारी, कार्यकर्ते यांची वैयक्तिक भेट घेण्यासाठी  अजित पवार सकाळी ०८:०० ते ११:०० यावेळेत रागा पॅलेस, काळेवाडी येथे उपस्थित असणार आहेत. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा “कार्यकर्ता संकल्प मेळावा” रागा पॅलेस, बी.आर.टी. रोड, काळेवाडी येथे सकाळी ११:०० वाजता आयोजित करण्यात आला आहे.

Read More

कर संकलन व कर आकारणी विभागाची धडक कारवाई पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  तळवडे येथील खेडकर कुटुंबाशी संबंधित असलेली आणि पालिकेचा कर थकविल्याबद्दल वादग्रस्त कंपनी थर्मोव्हेरिटा प्रायव्हटे लिमिटेडला महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने शु्क्रवारी (दि.19) सील ठाेकले आहे. या कंपनी संचालकाकडे महापालिकेचा दोन लाख 77 हजार रूपयांची कराची थकबाकी आहे. तळवडे गावठाण, ज्याेतिबानगर येथे थर्मोव्हेरिटा प्रायव्हटे लिमिटेड ही कंपनी आहे. भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांच्या कुटुंबाशी निगडीत आहे. त्यामुळे कंपनी वादाच्या भोव-यात अडकली आहे. कंपनी म. दि. खेडकर यांच्या नावे आहे. महापालिकेने यासंदर्भातची सर्व कागदपत्रे तपासली आहेत. कंपनीमार्फत 2009 पासून व्यावसायिक कर भरला…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – काशी विश्वेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल पिंपळे गुरव येथे विद्यार्थी व पालक यांची आरोग्य तपासणी केली. या शिबिरास लहान मुलांनी व पालकांनी चांगला प्रतिसाद दिला. शाळेतील शिक्षक व इतर कर्मचारी यांचे सुद्धा चांगले सहकार्य लाभले.ओंकार मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मधील डॉक्टर, नर्सेस व इतर कर्मचारी यांनी सुद्धा या शिबिरासाठी भरपूर मेहनत घेतली. या सर्वांचे आभार हॉस्पिटलचे सर्वेसर्वा विजय खर्चे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष  शंकर जगताप मित्र परिवार, भाजपा उपाध्यक्ष सांगवी रहाटणी मंडल  ललित म्हसेकर व प्रवीण मोतीराम कांबळे यांचे विशेष सहकार्य लाभले.

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – धम्मराज साळवे यांनी एमआयएम पक्षाच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष पदासह पश्चिम महाराष्ट्र प्रवक्ता पदाचा व प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. धम्मराज साळवे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, दि.३१ मार्च २०१६ रोजी AIMIM पक्षाचे नेते अकील मुजावर यांच्या नेतृत्वात दमराज साळवे यांची पिंपरी चिंचवड शहर प्रवक्ते पदी नियुक्ती  झाली होती. तेंव्हापासून आजपर्यंत गेली ०८ वर्षांपेक्षा अधिक काळ त्यांनी पक्षाच्या ध्येय धोरणाशी एकनिष्ठ राहून पक्षासाठी काम केले आहे. पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रवक्ता व पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष या पदांवर ते कार्यरत होते. २०१६ पासून AIMIM पक्षाच्या माध्यमातून जनहिताचे मुद्दे घेऊन अनेक आंदोलन मोर्चे केले. तसेच शैक्षणिक, रोजगार,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – आषाढी एकदशीनिमित्त रावेत येथील पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचालित एस. बी. पाटील महाविद्यालयात ग्रंथ दिंडी सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी रावेत गावचे भजनी मंडळ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विठ्ठल रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे व ज्ञानेश्वरीचे पुजन प्राचार्य संदीप पाटील, हभप दत्तात्रय भोंडवे, हभप प्रदीप गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्यात विठ्ठल, रुक्मिणी आणि वारकरी संतांच्या वेशभूषेत मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. ज्ञानोबा, तकोबांच्या गजरात, श्री विठ्ठल नाम जयघोष करत भक्तिमय वातावरणात पालखी रावेतगाव येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दाखल झाली. समारोप प्रसंगी सांस्कृतिक व पसायदानाने सांगता केली. क्रीडा शिक्षक प्रदिप कासार यांनी नियोजनात…

Read More

चिंचवड ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड येथील कमला शिक्षण संकुलाचे संस्थापक सचिव डॉ.दीपक शहा यांच्या प्रेरणेने, प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या सविता ट्रॅव्हीस यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त विद्यार्थ्यांनी पालखी मिरवणूक काढली. इयत्ता १ ली ते ९ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी निमित्त शालेय व नागरी परिसरात दिंडीची वाजत-गाजत मिरवणूक काढली. शालेय विद्यार्थ्यांनी विठू नामाचा गजर करत माऊली, माऊली नामाचा जयघोष केला. विद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थी-विद्यार्थिनींनी “हरी पांडुरंग हरी” या गीतावर नृत्य सादर केले. विद्यार्थ्यांना नृत्य शिक्षक सागर पवार व भारती सोनार व संगीत शिक्षक अथर्व शिंदे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमास प्राचार्या…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात (पीएमआरडीए) महानगर नियोजनकार पदावर असताना विवेक खरवडकर यांनी अतिशय चुकीची, बेकायदेशीर कामे केली आहेत. खरवडकर यांना पाठीशी घालण्यासाठी पीएमआरडीएकडून माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. प्रशासन त्यांना कशासाठी, कोणासाठी, कोणाच्या दबावातून वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचा सवाल करत खरवडकर यांच्या पीएमआरडीतील कारभाराची उच्चस्तरीय चौकशीची मागणी महाराष्ट्र राज्य माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे सचिव प्रदीप नाईक यांनी आज (गुरुवारी) पत्रकार परिषदेत केली.  नाईक म्हणाले, विवेक खरवडकर हे पुणे महापालिकेत नियुक्तीस होते. तिथून प्रतिनियुक्तीवर ते पीएमआरडीए येथे आले. पीएमआरडीए येथे कार्यरत असताना त्यांच्याकडे शहर नियोजन विभागाची जबाबदारी देण्यात आली. तिथे कार्यरत असताना त्यांनी अनेक…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – येत्या रविवारी (दिनांक 21) रोजी गुरुपौर्णिमा आहे.गुरुपौर्णिमा ही एक परंपरा आहे जी आपण सर्व आध्यात्मिक आणि शैक्षणिक गुरूंना मनोभावाने समर्पित होत असतो.मुळात गुरू उत्क्रांत किंवा प्रबुद्ध मानव समजून गुरु ज्ञान हे शिष्यांना देतात. गुरुपौर्णिमा ही पारंपारिकपणे एखाद्याच्या निवडलेल्या आध्यात्मिक शैक्षणिक गुरूंचा सन्मान करण्यासाठी साजरी केली जाते.तसा हा दिवस म्हणजे महाभारताचे लेखक आणि वेद संकलित करणारे ऋषी वेद व्यास यांचा जन्मदिवस आहे.ह्या दिवसाला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. म्हणून या दिवशी व्यास यांची पूजा करण्याची प्रथा आहे.गुरुपौर्णिमा म्हणजे एक प्राचीन काळापासून चालत असलेली परंपरा आहे. गुरूंबद्दल पुढील श्लोकात वर्णन केले आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः, गुरुर्देवो महेश्वरः। गुरुर्साक्षात…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना राजकीय घडामोडीना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. त्यामुळे महाविकास आघाडी भोसरीची जागा पवार गटाला जाणार, याबाबतची चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गट अस्वस्थ झाला आहे. शिवसैनिकांनी मुंबईत नेत्यांची भेट घेतली. त्यावर ”जागा वाटपाची चर्चाच नाही काळजी करू नका, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसनिकांना समजावले आहे. मुंबईत झालेल्या बैठकीस शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत, संपर्क प्रमुख सचिन अहीर, नेते रवींद्र मिर्लेकर, विनायक राऊत, शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या सुलभा उबाळे आदी उपस्थित होते. यावेळी महाविकास आघाडीतील…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सांगवी दापोडी येथील दोन्ही भागांना जोडणाऱ्या मुळा नदीवरील नवीन पुलाचे काम अंतिम टप्यात असून ते लवकरात लवकर पूर्ण करून हा पूल नागरिकांसाठी खुला करण्यात यावा, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी  निवेदनाद्वारे आयुक्तांकडे केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सांगवी व बोपोडी या दोन्ही भागांना जोडणाऱ्या मूळा नदीवरील नवीन पुलाचे बांधकाम हे पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचे संयुक्त विद्यमाने करण्यात आले असून या पुलाचे काम ९५% पूर्ण झाले असून बाकीचे काम अंतिम टप्प्यात आले असून ते लवकरात लवकर पूर्ण करून हा पूल लवकरच वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा, हा पूल खुला…

Read More