- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्यात कारखानदारी वाढविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. हे काम केल्यास उद्योगात महाराष्ट्र देशाला नवी दिशा देणारा ठरेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भव्य विजयी संकल्प मेळाव्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पिंपरी चिंचवड शहर जिल्हाच्या वतीने शनिवारी (दि.२०) पिंपरी येथे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, खासदार बजरंग सोनावणे, खासदार अमोल कोल्हे, माजी गृह राज्यमंत्री किन्हाळकर, माजी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार रोहित पवार, युवक अध्यक्ष मेहबूब शेख, विद्यार्थी आघाडीचे…
पिंपरी, ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रविवारी साजऱ्या होणाऱ्या गुरू पौर्णिमा निमित्त आळंदी रोड, वडमुख वाडी येथील श्री साई मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्री साईबाबा मंदिराचे अध्यक्ष व निमंत्रक सुभाष नेलगे यांनी प्रसिद्धीस दिली आहे. गुरू पौर्णिमा निमित्त शनिवारी पहाटेपासून सुरू झालेल्या महोत्सवाची सांगता सोमवारी होणार आहे. यामध्ये रविवारी (दि. २१) पहाटे पाच वाजता श्रीं ची काकड आरती, सनई वादन, मंगल स्नान, श्री साई चरित्र पारायण प्रारंभ, सकाळी ७ वाजता श्रींची आरती, ८ ते ९ रुद्राभिषेक, यानंतर दुपारी १२ वाजता प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत माध्यान्ह आरती होणार आहे. सायंकाळी पाच ते दहा भजन संध्या,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजाखेडकर यांच्याबद्दल विविध प्रकारचे खुलासे झाले आहेत. चुकीच्या कागदपत्राच्या आधारे त्यांनी बोगस दाखले, अपंग प्रमाणपत्र घेतल्याचा आरोप झालेला आहे. त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि संपूर्ण प्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक संदीप चिंचवडे यांनी केली आहे. संदीप चिंचवडे यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, पुजा खेडकर यांना मसुरी ट्रेनीसेंटर येथून माघारी बोलावण्यात आले आहे. महानगरपालिका व इतर ठिकाणांहून त्यांनी अपंग असल्याचे सर्टिफिकेट घेतले. त्यांना प्रमाणपत्र देणा-या अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची गरज आहे. मर्जीतले अधिकारी फार पूर्वी पासून भरती होत असतील, तर भारतीय लोकशाही आणि व्यवस्था…
भोसरीला दादागिरी, गुंडगिरी आणि भयमुक्त करण्याचा केला संकल्प भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -महाविकास आघाडी विधानसभेच्या जागा वाटपाचे धोरण ठरण्यापूर्वीच भोसरीमध्ये पक्षांतर सुरू झाले. त्यामुळे आक्रमक झालेल्या भोसरी विधानसभेतील शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकाऱ्यांनी मुंबईत जाऊन पक्षश्रेष्ठींची भेट घेतली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन घेत भोसरीला दादागिरी गुंडगिरी आणि जंगल राजपासून भुईमुक्त करण्याचा संकल्प केला. भोसरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी जेजुरीतील खंडेरायाचे दर्शन घेऊन विजयी संकल्पाचा भंडारा उधळला. जिल्हा संघटिका सौ. सुलभाताई उबाळे, धनंजय आल्हाट, तुषार सहाणे संतोष वाळके, सचिन सानप, युवराज कोकाटे, नेताजी काशीद, अनिल सोमवंशी, रावसाहेब थोरात, शैलेश मोरे , दादा नरळे , ऋषिकेश जाधव, राहुल…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- पिंपरी चिंचवड महानगरपालिका बी.एम.सी सॉफ्टवेअर कंपनीच्या मदतीने सीएसआर अंतर्गत अत्याधुनिक सुविधा असलेले ‘शिवण कक्ष’ भोसरी येथे उभारणार आहे. महिलांमध्ये कौशल्य विकसित करून त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याच्या हेतूने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सी.एस.आर विभाग व बी.एम.सी सॉफ्टवेअर कंपनी यांच्यातील सामंजस्य करार आयुक्त शेखर सिंह यांच्या उपस्थितीत करण्यात आला, यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, विजयकुमार खोराटे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी तथा सी.एस.आर विभाग प्रमुख निळकंठ पोमण, सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे, श्रीनिवास दांगट,सी.एस.आर सल्लागार श्रुतिका मुंगी उपस्थित होते. तसेच बी.एम.सी सॉफ्टवेअर कंपनीचे क्षेत्र उपाध्यक्ष आणि संचालक विकास छाब्रा, सी.एस.आर मुख्य चौला दिवानजी व वरिष्ठ वित्त व्यवस्थापक गिरीश क्यादिगुप्पी उपस्थित होते. त्याच…
सर्वेक्षणामुळे अचूक माहिती अन् करयाेग्य मूल्य निश्चित केले जाणार पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने अत्याधुनिक ड्राेनच्या माध्यमातून शहरातील नवीन, वाढीव आणि वापरात बदल झालेल्या अशा मालमत्तांचे सर्वेक्षण सुरू आहे. या सर्वेक्षणामुळे मालमत्तांची अचूक माहिती आणि करयाेग्य मूल्य निश्चित केले जाणार आहे. नव्याने आढळणा-या मालमत्तांसाठी पालिकेच्या वतीने कर आकारणीची कार्यपध्दती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये गेल्या सहा वर्षांपासून मालमत्ताधारकांना कराची आकारणी केली जाणार आहे. मात्र, मालमत्ता कधी उभारली, याची याेग्य कागदपत्रे सादर केल्यास तेव्हापासूनच कराची आकारणी केली जाणार असल्याचे महापालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत इमारत व जमिनीवर मालमत्ता कराची आकारणी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रिक्त असलेल्या अतिरिक्त आयुक्त (३) या पदाचा पदभार सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्याकडे सोपविण्यात आला असून याबाबत सामान्य प्रशासन विभागाने स्वतंत्र आदेश निर्गमित केले आहेत. अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी २० सप्टेंबर १९८८ रोजी वायरलेस ऑपरेटर या पदापासून महापालिका सेवेची सुरूवात केली, त्यानंतर त्यांनी २० जुलै २०११ रोजी कामगार कल्याण अधिकारी, १६ जुलै २०१६ रोजी सहाय्यक आयुक्त, १४ ऑक्टोबर २०२० रोजी उप आयुक्त तसेच १९ मे २०२३ रोजी सह आयुक्त पदाचा कार्यभार स्विकारला होता तर आयुक्त शेखर सिंह यांच्या आदेशानुसार ८ जुलै २०२४ रोजी त्यांचेकडे नगरसचिव पदाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आलेला…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह त्यांच्या समर्थक १५ माजी नगरसेवकांनी व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे सर्किट हाऊस येथे बैठक दोन दिवसांपूर्वी बैठक घेतली. मेळाव्यात नवीन शहराध्यक्ष जाहीर करणार असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले. काळेवाडीतील रागा पॅलेस हॉल येथे रविवारी (ता. २१) मेळावा घेऊन नवीन शहराध्यक्ष जाहीर करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात झालेल्या बैठकीत सांगितले.पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदासाठी आमदार अण्णा बनसोडे, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष जगदीश शेट्टी, आदींच्या नावाची चर्चा आहे.
वानवडी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वानवडीत हॉटेल तसेच दुकानांवर पालिकेच्या मुख्य खात्याच्या बांधकाम विकास विभागामार्फत अनधिकृत बांधकामावर बुलडोझर चालवत कडक कारवाई करण्यात आली.यावेळी जेसीबीच्या साहाय्याने पत्र्याचे शेड, बांधकाम असे एकूण७५०० चौ. फूट बांधकामपाडण्यात आले. जगताप चौक येथून राज्य राखीव पोलिस दलाकडे जाणाऱ्यारस्त्याच्या बाजूला असलेल्या खासगी जागेत अनधिकृतपणे अतिक्रमण करून सुरू केलेल्या दडॉक हॉटेल, पुणेरी कट्टा, अलवान केटरर्स, स्टार चिकन आणि लोबोस ऑटोमोबाईल या दुकानांवर कारवाई करण्यात आली. कारवाई करण्यात आलेली जागा खासगी असून ती न्यायप्रविष्ट आहे. आलेल्या तक्रारी अर्जानुसार संबंधित हॉटेल व दुकानदारांना तीस दिवसांची नोटीस देण्यात आली होती. पालिकेच्यावतीने असे पाडले हॉटेल.स्टे ऑर्डर येईपर्यंत ७५०० फुट पाडकाम कारवाई…
मेघराज लोखंडे नागरिकांचे प्रश्न घेऊन ॲक्शन मोड वर…! पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नवी सांगवी साई चौक येथे ५ ते ६ वर्षापासून तुंबलेले ड्रेनेज व ड्रेनेज लाईन साफ होत नसल्याने व हॉटेल व्यापाऱ्यांचा कचरा ड्रेनेज लाइन मध्ये जाऊन लाईन तुंबल्याने नागरिकांना ५ वर्षा पासुन तीव्र मनस्ताप सहन करावा लागत होता या संदर्भात नागरिकांनी वारंवार महानगरपालिका अधिकारी यांना निवेदन देऊन सुद्धा या ठिकाणी कामाची दखल घेत नसल्यामुळे या मेघराज लोखंडे हे ॲक्शन मोड वर येऊन नागरिकांचे प्रश्न सोडवत आहे. दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, सिद्धी पार्क नवी सांगवी येथील नागरिकांनी मेघराज लोखंडे यांची भेट घेऊन तक्रारी केली दुसऱ्या दिवशी मेघराज लोखंडे…
