- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे सौदागर येथील आज अक्षय क्लासिक आणि कुंदन इस्टेट या सोसायटीमध्ये नवीन सौर पॅनल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली.या नूतन सौर पॅनल यंत्रनेचे उदघाटन श्री शत्रुघ्न (बापु) काटे यांच्या हस्ते करण्यात आले. जळणारी इंधन संपणारी असून प्रदूषण वाढवतात, त्याऐवजी सौर ऊर्जा ही टिकाऊ आणि पर्यावरणस्नेही पर्याय आहे. त्यामुळेच भविष्यात सौर ऊर्जा महत्त्वाची भूमिका बजावेल. सौर ऊर्जा निर्माण करताना प्रदूषण होत नाही, धूर किंवा ग्रीन हाऊस गॅसेस निर्माण होत नाहीत, त्यामुळे हवामान बदल रोखण्यासाठी ती मदत करते. सौर ऊर्जा प्रणालीमुळे आपण वीज तयार करू शकतो आणि वीज वितरण कंपन्यांवर अवलंबून राहण्याची गरज नाही. यामुळे आर्थिक बचतही…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आज सोमवार दि. २२ जुलै रोजी सकाळी १० ते १२ यावेळेत जनसंवाद सभा होणार आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. नागरिकांशी सुसंवाद साधणे, तक्रारींचे निराकरण करणे आणि प्रशासकीय निर्णयांमध्ये तसेच होणा-या विकासकामांमध्ये नागरिकांच्या आशा आकांक्षांचे प्रतिबिंब उमटावे यासाठी क्षेत्रिय कार्यालयनिहाय महिन्यातील दुस-या आणि चौथ्या सोमवारी सकाळी १० ते १२ या वेळेत महापालिकेच्या वतीने जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येत असते. या सभेकरीता महानगरपालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांसाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय मुख्य समन्वय अधिका-यांच्या नियुक्त्या केल्या असून ते या जनसंवाद सभेचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत.
पिंपरी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- पिंपरी चिंचवड शहर डेंग्यूमुक्त करण्यासाठी आयुक्त शेखर सिंह यांनी स्वतःच्या राहत्या बंगल्याची स्वच्छता करत या मोहिमेत सहभाग घेतला. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनीही आपले आरोग्य ही आपलीच जबाबदारी समजून राहत्या घरांची साफसफाई केली असून नागरिकांनी आपले आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी “बीट डेंग्यू” सूत्राचा अवलंब करावा,असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे. शहराला डेंग्यू मुक्त करण्यासाठी महापालिकेच्या वतीने डेंग्यू मुक्त पिंपरी चिंचवड शहर ही मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार नागरिकांनी आठवड्यात एका दिवसातील एक तास आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी आपल्या राहत्या घरी स्वच्छता करायची आहे. या मोहिमेत आज महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवत घरातील कुलर, फ्रीज, पाणी साठवणुकीची भांडी, झाडांच्या…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -अमोल कोल्हे यांनी आपल्या भाषणातून लाडकी बहीण योजना आणि अजित पवारांचं गुलाबी जॅकेट यावरुन महायुती सरकारवर टीका केली. 1500 रुपयांमध्ये बहुमूल्य मत विकू नका. आता लाडका दादा योजना आणलीये. युवकांना स्टाय पेंड दिले जाणार आहेत. मात्र, ही योजना फक्त सहा महिन्यांसाठी लागू आहे. मग त्यापुढं काय? त्यामुळं स्टायफंड पेक्षा पर्मनंट नोकरी बद्दल युवकांनी विचार करायला हवा, असे कोल्हेंनी म्हटलं होतं. तसेच, काहींनी पिंक कलरला पसंती दिलीय, असे म्हणत जयपूरचा दाखलाही त्यांनी दिला होता. आता, या टीकेला राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी प्रत्त्यु्त्तर दिलंय. घराच्या समोरील रस्ता बनवू न शकणाऱ्यांनी अजित दादांवर बोलू नये. त्यामुळं गुलाबी…
– ‘चिखली-मोशी-चऱ्होली रेसिडेन्सिअल कॉरिडॉरला’ नवा आयाम पिंपरी ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत १९९७ मध्ये समाविष्ट झालेल्या गावांमध्ये राज्य सरकारच्या नवीन आयटी धोरणानुसार, नवीन आयटी पार्क विकसित होत आहे. चऱ्होली बुद्रुक येथील प्राईड वर्ल्ड सिटीच्या माध्यमातून तब्बल ३ दशलक्ष चौरस फूट आयटी पार्क विकसित होणार असून, सुमारे ५० हजार नोकरीच्या संधी या ठिकाणी निर्माण होतील, असे नियोजन करण्यात येत आहे. प्राईड वर्ल्ड सिटी, चऱ्होली बुद्रुक येथे ‘चिखली-मोशी-चऱ्होली रेसिडेन्सिअल कॉरिडॉर’मध्ये पहिला आयटी पार्क विकसित होत आहे. त्याचे भूमिपूजन भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व क्रेडाईचे प्रमुख पदाधिकारी अरविंद जैन व बांधकाम क्षेत्रातील…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गुरू पौर्णिमा निमित्त आळंदी रोड, वडमुख वाडी येथील श्री साई मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. रविवारी पहाटे पाच वाजता श्रीं ची काकड आरती नंतर सनई वादनात मंगल स्नान झाले. श्री साई चरित्र पारायण प्रारंभ, सकाळी ७ वाजता श्रींची आरती करण्यात आली. ८ वाजता रुद्राभिषेक झाला. श्री साईबाबा मंदिराचे अध्यक्ष व गुरू पौर्णिमा महोत्सवाचे निमंत्रक सुभाष नेलगे यांच्या हस्ते दुपारी १२ वाजता श्रींची माध्यान्ह आरती करण्यात आली. नंतर हजारो भाविकांनी श्री साईंचे दर्शन घेतले. सायंकाळी भजन संध्या, पालखी पूजा व मिरवणूक, सायंकाळी धुपारती आणि रात्री हरी जागर करण्यात आला. सोमवारी ( दि. २२) सकाळी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – काही घडामोडी घडल्या, ज्याचा उल्लेख विलास लांडे यांनी केला. अनेकांना पद दिली, ताकद दिली. काही जण बाहेर चे होते त्यांच्यात वाद होऊ दिला नाही. महाराष्ट्रात राजकीय स्थित्यंतरे घडली. उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे, शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा सोडलेली नाही. डीपीडीसी बैठकीमध्ये कोण किती वेळ बोलले आणि अजित पवार यांनी किती ऐकलं याचं रेकॉर्ड आहे. पण उगाच सहानुभूती घेण्यासाठी काहीजण म्हणतात की मी साहेबांना बोलू दिलं नाही. अरे मी कसा बोलू देणार नाही. काय घडलं, काय नाही याच्या खोलात जात नाही, आम्ही कोणाचाही अनादर करणारे लोक नाहीत, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज…
– मांसाहारी व शाकाहारी जेवनाची जय्यत मेजवाणी पिंपरी ,(महाराष्ट्र ब्रेकींग न्यूज) – श्रावण महिन्याची चाहुल लागली असून, आखाडात मटन आणि चिकनसह सामिष्ट भोजनाचा आस्वाद घेण्याची तयारी घरोघरी सुरू असतेच. तांबडा-पांढरा रस्सा… हा तर मांसाहार प्रेमींसाठी पर्वणीच असते. भोसरी विधानसभा मतदार संघातील चिखली-तळवडे या भागात ८ ठिकाणी ‘कम्युनिटी किचन’च्या धर्तीवर आयोजित केलेल्या आखाड महोत्सवात सुमारे २० हजार नागरिकांनी सामिष्ट भोजनाचा आस्वाद घेतला. भोसरी विधानसभा मतदार संघातील सर्वसामान्य नागरिकांनाही ‘आखाड पार्टी’ साजरी करता यावी. आपल्या मित्र परिवारासह कार्यकर्त्यांना वर्षातून एकवेळ सामिष्ट पाहुणचार द्यावा. याकरिता आमदार महेश लांडगे व मित्र परिवार यांच्या वतीने ‘‘आखाड महोत्सव-२०२४’’ चे आयोजन केले आहे. दि. १९ जुलै ते…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – डेंग्यू आजाराला आळा घालण्यासाठी महापालिकेच्या वतीने आयोजित डेंग्यू मुक्त पिंपरी चिंचवड शहर अभियानात नागरिकांनी सहभागी होऊन आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि प्रत्येक आठवड्यात एक दिवस एक तास आपले घर व परिसर स्वच्छ व कोरडे ठेवण्यासाठी प्रयत्न करावे,असे आवाहन अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी केले आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने डेंग्यू मुक्त पिंपरी चिंचवड शहर अभियान राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत ई क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत कै.अंकुशराव लांडगे सभागृहाच्या आवारात या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.अभय दादेवर, उप आयुक्त राजेश…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्यात हजारो कोटींचे घोटाळे करून राज्यात बजबजपुरी करून ठेवली आहे. 17 कंपन्या राज्याबाहेर गेल्या. राज्य नेतृत्वाला त्या थांबविता आल्या नाहीत. नीट परीक्षेचे पेपर फुटले. बेरोजगारी 11 टक्क्यांवर पोहचली असून, तब्बल 40 लाख युवा बेरोजगार आहेत. नमो महारोजगार मेळाव्यावर लाखोंचा खर्च करून सरासरी 60 जणांना नोकरी देऊन सरकारने बेरोजगारांची थट्टा केली आहे. विरोधातील 25 जणांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यातील 23 जणांना भाजपने सोबत घेतले आहे. पक्षाचा विजय संकल्प मेळावा पिंपरीगाव येथे शनिवारी (दि.20) झाला. त्यात ते बोलत होते. या वेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, खासदार सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे, बजरंग…
