भ्रष्टाचाराचा नारा तुरुंगापेक्षा भाजप बरा – जयंत पाटील


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्यात हजारो कोटींचे घोटाळे करून राज्यात बजबजपुरी करून ठेवली आहे. 17 कंपन्या राज्याबाहेर गेल्या. राज्य नेतृत्वाला त्या थांबविता आल्या नाहीत. नीट परीक्षेचे पेपर फुटले. बेरोजगारी 11 टक्क्यांवर पोहचली असून, तब्बल 40 लाख युवा बेरोजगार आहेत. नमो महारोजगार मेळाव्यावर लाखोंचा खर्च करून सरासरी 60 जणांना नोकरी देऊन सरकारने बेरोजगारांची थट्टा केली आहे. विरोधातील 25 जणांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यातील 23 जणांना भाजपने सोबत घेतले आहे.


पक्षाचा विजय संकल्प मेळावा पिंपरीगाव येथे शनिवारी (दि.20) झाला. त्यात ते बोलत होते. या वेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, खासदार सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे, बजरंग सोनवणेंसह मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्रात पण गुंतवणूक येत नाही. उलट गुंतवणूक बाहेर चालली आहे. आम्ही हे बोललो की आम्ही
महाराष्ट्राची बदनामी करतो असे भाजपावाले म्हणतात. विरोधी पक्ष म्हणून आम्हाला
वास्तव मांडावे लागत आहे. महाराष्ट्रातील स्पर्धा परिक्षेत बसलेल्या मुलांना पेपर फुटला असे कळते तेव्हा त्यांच्या पदरी नैराश्य येते. भ्रष्टाचाऱ्यांना बरोबर घेउन भाजप काम करत आहे. भ्रष्टाचाराचा नारा तुरुंगापेक्षा भाजप बरा अशी टिका त्यांनी केली.
सभेत सर्वच नेत्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत पिंपरी-चिंचवडमधील तीनही जागा महाविकास आघाडी जिंकणार असा विश्वास व्यक्त केला. तसेच, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचारावर तोंडसुख घेतले.










