- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – संस्कृती संवर्धन व विकास महासंघाअंतर्गत चिंचवड विभागतील भजनी मंडळांचे भजन सादरीकरण आषाढ मासानिमित्त श्रीराम मंदिर, चिंचवडगाव येथे करण्यात आले. एकूण अठरा भजनी मंडळातील जवळपास २०० माता-भगिनींनी यात सहभाग घेतला. सादरीकरणाअंतर्गत एक भजन व एक गवळण समाविष्ट होते. कार्यक्रमाची सुरूवात दिपप्रज्वलन, प्रार्थनेने झाली प्रमुख मार्गदर्शनामध्ये उर्मिला अघोर यांनी भजन सेवेतुन भक्तीरसाचा अनुभव घेत परमेश्वराशी संवाद साधता येतो असे प्रतिपादन करत हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहचविण्यासाठीही प्रयत्न करणे गरजेचे आहे असे अवाहन केले. भविष्यात शाळांमध्ये भजनी मंडळ तयार करण्याचा संकल्प घेवुया या विचारांसह डाॕ. अजित जगताप यांनी प्रस्तावना केली. सादरीकरणामध्ये छान विविधता निर्माण करत भजनी मंडळांनी पंचपदी,…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पिंपरी- चिंचवड शहर कार्याध्यक्षपदी विशाल बाळासाहेब काळभोर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कार्याध्यक्ष पदावर एका तरुण नेत्यांची प्रथमच निवड झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आता तरूणांकडे नेतृत्व दिल्याचे बोलले जात आहे. काळभोर यांना आमदार रोहित पवार, ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे,शहराध्यक्ष तुषार कामठे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष विशाल वाकडकर व पक्षाचे आजी-माजी नगरसेवक व प्रमुख पदधिकारी उपस्थित होते. विशाल काळभोर यांनी यापूर्वी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पिंपरी- चिंचवड शहर सरचिटणीस, प्रदेश कार्यकारिणीमध्ये प्रदेश संघटक, प्रदेश सरचिटणीस नाशिक, पुणे आणि कल्याण डोंबिवलीचे प्रभारी त्यानंतर युवकचे ऑल…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विशालभाऊ वाकडकर सोशल फाउंडेशन वाकड, यांच्या वतीने वाकड येथील वननेस को. ऑप. हाउसिंग सोसायटीस बाकडे सुपूर्द करण्यात आले. दिनांक 26 रोजी झालेल्या कार्यक्रमास विशाल वाकडकर यांनी उपस्थित राहत सोसायटीतील नागरिक, महिला भगिनी यांच्याशी संवाद साधला. मागील काही दिवसांपूर्वी वननेस सोसायटीतील महिलांनी विशाल वाकडकर यांच्या जनसंपर्क कार्यालयास भेट देऊन बाकडे मिळण्याबाबत विचारणा केली होती. परंतु लोकसभा निवडणुका आणि आचारसंहिता यामुळे त्यावेळी ते शक्य झाले नाही.परंतु आता सोसायटी बाकडे सुपूर्द करताना एक वेगळा आनंद झाल्याचे विशाल वाकडकर यांनी सांगितले. आगामी काळातही परिसरातील नागरिकांच्या हिताचे अनेक निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी करण्याबाबत आम्ही प्रयत्नशील राहू असेही त्यांनी सांगितले.कार्यक्रमास सोसायटी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र राज्य सरकारने रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन केले आहे. त्या अंतर्गत चालकांना विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. त्या योजनांच्या अंमलबजावणीबाबत राज्य शासनाने नियमावली देखील प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे या योजनेतून रिक्षा, टॅक्सी चालकांचे कल्याण होणार आहे, गोरगरीब कष्टकरी रिक्षा चालकांचे नेते बाबा कांबळे यांनी यासाठी पाठपुरवठा केला असून त्यांच्या पाठपुरवठ्याला यश आले आहे ,अशी माहिती महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे उपाध्यक्ष शुभम तांदळे यांनी दिली. राज्यात लाखोंच्या संख्येने ऑटो रिक्षाचालक आहेत. दिवसरात्र रिक्षा चालवून ते आपल्या कुटुंबीयााचा उदरनिर्वाह करतात. अशांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना करावी, अशी मागणी महाराष्ट्र रिक्षा पंचायतसह इतर रिक्षाचालक संघटनांची होती. यासाठी लातूरसह…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड न्यायालय व पुणे जिल्हा विधी प्रधिकरण व पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट बार असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रीय लोकअदालीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये पिंपरी नेहरूनगर न्यायालयात २६७ खटले निकाली काढण्यात आले,त्यामुळे २,०३.३४,८२५ रुपये किमतीचे दावे निकाली निघाले तर आकुर्डी पीसीएमसी न्यायालयात येथे ३२४ खटले निकाली काढण्यात आले .त्यामध्ये ९७,६२,८२१ रुपये महसूल जमा झाला व वाहतुक चलनच्या प्रकरणात १,०३,८०० दंड जमा झाला.यामध्ये पिंपरी नेहरूनगर न्यायालयाचे न्यायाधीश मे.एस.एस.चव्हाण,मे.एल ए.के.एमुदी,मे.बी.डी.चौखट व आकुर्डी न्यायालयात मे.वी.एस.डामरे यांनी कामकाज पाहिले. कार्यक्रमाची सुरवात दिपप्रज्वलन करून व पाहुण्याचे स्वागत करून झाली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिं.चि.ॲड.बार असोसिएशन चे मा.अध्यक्ष ॲड.सुशील मंचरकर तर प्रमुख उपस्थिती…
चिंचवड ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – टीक्यूएम हा एक व्यवस्थापन दृष्टिकोन आहे जो ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी किंवा त्यापेक्षा जास्त उत्पादने, सेवा आणि प्रक्रियांची गुणवत्ता सतत सुधारण्यावर केंद्रित आहे. यात प्रक्रिया, उत्पादने, सेवा आणि संस्थेची संस्कृती सुधारण्यासाठी संस्थेच्या सर्व सदस्यांचा सहभाग असतो. उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया, पुणे यांनी टीक्यूएम स्पर्धा 2024 सदर स्पर्धेचे आयोजन क्वालिटी सर्कल एक्सलन्स सेंटर, भोसरी येथे आयोजित करण्यात आले होते. त्यात 40 संस्थांचे 370 स्पर्धक सहभागी झाले होते. केस स्टडी, स्लोगन अँड पोस्टर या विभागात एकूण 154 नामांकने प्राप्त झाली. या कार्यक्रमाचे उद्घाटन कॅप्रिहान्स इंडियाचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर जितेंद्र उपाध्याय यांच्या हस्ते दीपप्रज्वलन…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नवी दिल्ली येथे दूरदर्शन आणि आयआयटी यांच्या वतीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय रोबोटिक “डीडी रोबोकॉन २०२४” या नामांकित स्पर्धेत पीसीसीओई च्या ‘टीम ऑटो मॅटन्स’ च्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण करून प्रथम उपविजेता पदाचे बक्षीस पटकावले. स्पर्धेत या वर्षी व्हिएतनामची ‘हार्वेस्ट डे’ ही थीम होती. पीसीसीओई च्या संघाने सलग बाराव्या वर्षी या स्पर्धेत सहभाग नोंदवला असुन या टीममध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन, कॉम्प्युटर, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंग (एआयएमएल) विभागातील ४० विद्यार्थ्यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी एक मॅन्युअली ऑपरेट केलेला आणि दुसरा पूर्णपणे स्वयंचलित अशा दोन रोबोट्सची रचना आणि निर्मिती सादर केली. मॅन्युअल रोबोट…
गरीब लोककलावंतासाठी विशेष योजना निर्माण करण्यासाठी पाठपुरावा करणार – आमदार अमित गोरखे — आमदार अमित गोरखे यांच्या अचानक भेटीने लोककलाकार नाना कांबळे झाले भावुक — निगडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज – सर्वसामान्य कुटुंबातून आलेले व नुकतेच आमदार झालेले अमित गोरखे यांनी निगडी ओटा स्किम झोपडपट्टीतील गरीब लोककलावंत हलगीवादक नाना कांबळे यांच्या घरी अचानक भेट दिली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या .तसेच राज्यसरकारच्या वतीने कलावंतासाठी विशेष योजना सुरु करण्यासाठी आग्रह धरणार असल्याचे आमदार अमित गोरखे यांनी यावेळी आस्वासन दिले . यावेळी नाना कांबळे म्हणाले की ,असाच आमदार आम्हाला हवा होता जो गरीब ,वंचित समाजात सहज पोहोचू…
पिंपरी चिंचवड महानगरपालिका व सिंबायोसिस कौशल्य विद्यापीठाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- १२ वी विज्ञान शाखेतून शिक्षण घेतल्यानंतर काय करावे हे कळत नव्हते. त्याचवेळी सिंबायोसिस कौशल्य विद्यापीठाचा डिप्लोमा इन मनुफॅक्चरिंग ऑटोमेशन संदर्भात मला माहिती मिळाली. यासाठी हा निवासी अभ्यासक्रम माझ्याकरिता एक सुवर्णसंधी आहे. अतिशय सुंदर कॅम्पस आणि सतत सहकार्य करणारे ट्रेनर्स, आम्हाला उद्योगांमध्ये प्रत्यक्ष कामावर शिकण्याची मिळणारी संधी यामुळे मला खात्री आहे हा डिप्लोमा पूर्ण करून मी माझ्या कुटुंबियांकरीता आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल. मला ही संधी दिल्याबद्दल पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची मी खूप आभारी आहे, असे मनोगत सिंबायोसिस कौशल्य विद्यापीठात डिप्लोमा इन मॅन्युफॅक्चरिंग ऑटोमेशन कोर्सचे शिक्षण घेणाऱ्या साक्षीने व्यक्त केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शहरातील विविध ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याच्या घटना घडल्या होत्या. त्या अनुषंगाने महापालिकेच्या वतीने सुमारे ४ हजार ५०० नागरिकांना तात्पुरत्या स्वरुपात निवारा केंद्रात स्थलांतरित करण्यात आले होते. या ठिकाणी त्यांची आरोग्य तपासणी करण्यात येत असून जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आवश्यक ती तपासणी देखील करण्यात येत आहे. त्यांच्यावर योग्य उपचार करण्यासाठी सर्व निवारा केंद्रांवर महापालिकेच्या वतीने वैद्यकीय पथक २४ तास कार्यान्वित ठेवण्यात आले आहे, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली. पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वैद्यकिय विभागामार्फत १६ पथके तयार केलेली असून यापथकांमार्फत या नागरिकांची आरोग्य तपासणी करुन औषधोपचार करण्यात येत आहेत.…
