- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
श्री नामदेवमहाराज संजीवन समाधी सोहळ्याची तयारी पूर्ण पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी – चिंचवड नामदेव शिंपी समाज संस्थेच्या वतीने शुक्रवार, दिनांक ०२ ऑगस्ट २०२४ अर्थात आषाढ कृष्ण त्रयोदशी रोजी संत शिरोमणी नामदेवमहाराज यांच्या ६७४ व्या संजीवन समाधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पिंपरी – चिंचवड नामदेव शिंपी समाज संस्थेचे अध्यक्ष एकनाथ सदावर्ते यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, ‘एक दिवस समाजासाठी’ या भावनेतून पिंपरी – चिंचवड विभागातील सर्वात भव्य आणि मुख्य श्री संत नामदेव महाराज मंदिर व सांस्कृतिक सभागृह, साठे मळा, वाल्हेकरवाडी रस्ता, चिंचवड येथे सकाळी आठ वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी आणि नामदेवमहाराज यांच्या मूर्तींना अभिषेक, सत्यनारायण महापूजा…
चिंचवड ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड येथील कमला शिक्षण संकुलाचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहायांच्या प्रेरणेने क्विकहिल फौंडेशन तसेच प्रतिभा महाविद्यालय यांच्यामध्ये सायबर जनजागृती विषयक प्रकल्पाचा करार करण्यात आला. सायबर सुरक्षा हे आजच्या काळातील एक अत्यंत महत्त्वाचे क्षेत्र आहे. इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे सायबर गुन्ह्यांची संख्या देखील वाढत आहे. त्यामुळे सायबर सुरक्षा हा प्रत्येक नागरिकासाठी अत्यावश्यक विषय बनला आहे. या प्रकल्पाद्वारे नागरिकांना सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहण्याचे उपाय शिकवले जातील. या प्रकल्पाचा उद्देश नागरिकांना सायबर धोके ओळखण्याचे, त्यापासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, हे शिकविणे आहे. याअंतर्गत विविध कार्यशाळा, सेमिनार आणि चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. महाविद्यालयातील प्रथम तसेच द्वितीय वर्षाचे विद्यार्थी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त दिनांक ०१ ऑगस्ट ते ०५ ऑगस्ट या कालावधीत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधनपर्वात व्याख्याने, पोवाडे, लोककला, परिसंवाद, ऑर्केस्ट्रा, वृक्षारोपण, रोजगार मार्गदर्शन, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण, ग्रंथदिंडी, असे विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहे. हा कार्यक्रम ५ दिवस निगडी येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक परिसरात घेण्यात येणार आहे. १ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रशासकीय भवनात तसेच भक्ती शक्ती, निगडी येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महापालिका सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्ती वेतन आणि मृत्यू उपदान देणे तसेच रुग्णता सेवानिवृत्त (वैद्यकीय कारणास्तव निवृत्त) झालेल्या कर्मचा-याला रुग्णता निवृत्ती वेतन व सेवानिवृत्ती उपदान देणे आणि शासन सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवा उपदान देण्याबाबतच्या विषयास प्रशासक शेखर सिंह यांनी आज मान्यता दिली आहे. शासन निर्णयानुसार परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना किंवा राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली योजने अंतर्गत शासन सेवेतून निवृत्त होणा-या कर्मचाऱ्याला सेवा उपदान देण्याबाबतच्या विषयाला आज झालेल्या स्थायी समिती व महापालिका सभा बैठकीत प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली आहे. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पंढरपूर येथून विठूरायाचे दर्शन घेऊन परतीच्या प्रवास करुन देहू नगरीच्या दिशेने निघालेल्या जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज आषाढीवारी पालखी सोहळ्याचे तसेच दिघी नगरीच्या दिशेने निघालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आज पिंपरी चिंचवड शहरात आगमन झाले. या पालखी सोहळ्याचे तसेच वारकऱ्यांचे स्वागत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले. नवमहाराष्ट्र विद्यालय पिंपरी येथे जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज आषाढीवारी पालखी सोहळ्याचे स्वागत अतिरीक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील आणि चंद्रकांत इंदलकर यांनी केले. यावेळी पिंपरीगाव येथील काळभैरवनाथ मंदिर येथे विसाव्याच्या ठिकाणी आरती देखील करण्यात आली. या प्रसंगी माजी महापौर संजोग वाघेरे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, मुख्य आपत्ती…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – लाडकी बहीण योजना काढण्यापेक्षा बहीण माझी सुरक्षित हे अभियान काढल्यास महाराष्ट्रातील अनेक महिला विद्यार्थिनी तरुणी यांच्यावर होणारे अन्याय थांबतील, अशी मागणी दुर्गा ब्रिगेड संघटनेच्या अध्यक्षा दुर्गा भोर यांनी महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या कडे केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आज महाराष्ट्रात अनेक महाविद्यालय शाळा तसेच अनेक आस्थापने शासकीय कार्यालय आयटी विभाग घरगुती हिंसा अशा अनेक प्रकारच्या ठिकाणी महिला तरुणी या त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारामुळे त्रस्त आहेत. शाळा कॉलेज इत्यादी परिसरात फक्त पोलीस शाळेमध्ये आल्याचे फोटो काढून निघून जातात. प्रत्यक्ष शाळेमध्ये फेरफटका मारणे आवश्यक असून त्यामुळे विद्यार्थिनींना आत्मविश्वास निर्माण होऊन अनेक समस्या मार्गी लागू…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहरातील खेळाडूंनी आपल्या उत्तम कामगिरीमुळे शहराच्या नावलौकिकात भर पाडण्याची कामगिरी केली आहे. त्यामुळे शहर औद्योगिकनगरी बरोबरच क्रीडानगरी म्हणून देखील नावारूपास आली आहे. असे सांगून जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंनी अजून चांगल्या स्तरावर पोहोचून पारितोषिके मिळवावी, अशा शुभेच्छा अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी दिल्या. पिंपरी चिंचवड महापालिका आणि जिल्हास्तरीय कॅरम असोसिएशन ऑफ पुणे यांच्या मान्यतेने तसेच नव प्रगती मित्रमंडळ यांच्या सहकार्याने कै.सो. मनीषा भोईर विरंगुळा केंद्र, प्रेमलोक पार्क, चिंचवड या ठिकाणी जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेचे उद्घाटन आज अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. यावेळी क्रीडा विभागाचे सहाय्यक आयुक्त पंकज…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भक्ती-शक्ती चौक ते किवळे, मुकाई चौक-वाकड ते पिंपळेसौदागरपासून चाकण या मार्गावर मेट्रो सुरु करावी. त्याबाबतचा सविस्तर आराखडा बनविण्याची मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केली आहे. याबाबत केंद्रीय शहरी कार्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांची खासदार बारणे यांनी भेट घेतली. हा भाग झपाट्याने विकसित होत असल्याने या मार्गावर मेट्रोची आवश्यकता असल्याचे सांगितले. त्याला खट्टर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड ही शहरे सर्वाधिक वेगाने नागरिकरण होणारी आहेत.औद्योगिक, कामगारनगरी, एमआयडीसी असल्याने शहराची लोकसंख्या 30 लाखाच्या घरात गेली आहे. त्यामुळे वाहनांची संख्याही वाढत आहे. परिणामी, वाहतुकीची समस्या निर्माण होते. त्यासाठी मेट्रोचे जाळे विस्तारणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने…
पिंपरी, ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रवाही पाण्यात वाहून चाललेल्या दोघांचा जीव वाचवणाऱ्या योगेश भोसले या चऱ्होलीतील धाडसी तरूणाचा दिशा सोशल फाऊंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्या दोघांना सुखरूप पाण्याबाहेर काढले, तेव्हा खूपच समाधान लाभले, अशी भावना योगेशने यावेळी बोलताना व्यक्त केली. दिशा सोशल फाऊंडेशनचे उपाध्यक्ष संतोष बाबर, संचालक गणेश लंगोटे, नंदकुमार कांबळे, अविनाश ववले, बाजीराव लोखंडे यांनी भोसले यांच्या चऱ्होलीतील निवासस्थानी त्यांची भेट घेतली. सन्मानचिन्ह देऊन दिशाच्या वतीने सत्कार करण्यात आला. पिंपरी चिंचवड शहरात २५ जुलै रोजी जोरदार पाऊस झाला होता. गावोगावी रस्त्यांवर सगळीकडे पाणी साचले होते. जागोजागी खड्डे तयार झाले होते. समोरचे…
पिंपरी ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –पिंपरी चिंचवड शहरात संविधान भवन व विपश्यना केंद्र उभारण्यासाठीच्या विषयास प्रशासक शेखर सिंह यांनी आज मान्यता दिली आहे. या भवनाच्या उभारणीसाठी आवश्यक २०० कोटी रुपये रक्कमेच्या तरतुदीसह विविध विषयांना त्यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे. महापालिका सभा आणि स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेले विविध विषय आज प्रशासक शेखर सिंह यांच्या मान्यतेसाठी विशेष बैठकीमध्ये ठेवण्यात आले होते. पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये पार पडलेल्या बैठकीमध्ये प्रशासक सिंह यांनी या विषयांना मंजुरी दिली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त तथा नगरसचिव चंद्रकांत इंदलकर तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते. अनेक दिवसांपासून संविधान भवन व विपश्यना केंद्र उभारण्याची मागणी शहरातील नागरिकांच्या वतीने महापालिकेकडे…
