- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अधिकाधिक लाभार्थींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ देण्यासाठी महापालिकेच्या वतीने सुरु असलेली अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिक वेगवान करत योजना प्रभावीपणे राबवावी, अशा सूचना अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी प्रशासनाला दिल्या. महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी तसेच या योजनेचा लाभ महिलांना थेट लाभ हस्तांतरण पद्दतीने देण्यासाठी राज्यशासनाच्या वतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत पात्र महिला लाभार्थींचे अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्दतीने भरण्याची प्रक्रिया महापालिकेच्या वतीने विविध ठिकाणी सुरु आहे. त्याबाबतची आढावा बैठक अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या कक्षात पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आरोग्य…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी यांनी जबाबदारीने, प्रामाणिकपणे सेवा करून आपल्या उत्कृष्ठ कामकाजाचा परिचय दिला आहे. असे सांगून अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी सेवानिवृत्तांना उत्तम आरोग्य व आनंदी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माहे जुलै २०२४ अखेर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या २८ आणि स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या २ अशा एकूण ३० कर्मचा-यांचा अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते दिवंगत मधुकरराव पवळे सभागृह येथे सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी आनंद गायकवाड, उपआयुक्त संदीप खोत, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, लेखाधिकारी चारुशीला जोशी, कर्मचारी महासंघाचे अभिमान भोसले, नथा मातेरे, बालाजी अय्यंगार, रमेश…
सामाजिक कार्यकर्ते ॲड. उत्तम घुगे यांचा विश्वास – आमदार महेश लांडगे यांचा २४ तासांत ‘रिझल्ट’ पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अत्यंत वर्दळीचा दिघी रोडलगत पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू होते. त्यामुळे रस्त्याची खोदाई करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर महानगरपालिका प्रशासनाकडून रस्त्याच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष झाले होते. परिणामी, हजारो नागरिक- वाहनचालकांना मन:स्ताप सहन करावा लागत होतो. याबाबत ‘सोशल मीडिया’वर टाकलेली एक पोस्ट आणि अवघ्या २४ तासांत आमदार महेश लांडगे यांनी घेतलेली दखल ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे, अशा भावना सामाजिक कार्यकर्ते ॲड. उत्तम घुगे यांनी व्यक्त केल्या आहेत. भोसरी-दिघी शिवरस्ता रुंदीकरणाचे काम झाले आहे. ड्रेनेज लाईन, स्ट्रॉम वॉटर लाईन अशा विविध कारणांनी…
पद्मश्री नारायण सुर्वे काव्यजागर संमेलन मंगळवारी पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, भोसरी शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दिनांक ०६ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी ठीक ४:०० वाजता पद्मश्री नारायण सुर्वे काव्यजागर संमेलनाचे आयोजन ऑटोक्लस्टर सभागृह, सायन्स पार्कसमोर, जुना मुंबई – पुणे हमरस्ता, चिंचवड येथे करण्यात आले आहे. ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या शुभहस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार असून नारायण सुर्वे ट्रस्टचे उपाध्यक्ष मनोहर पारळकर अध्यक्षस्थान भूषवतील. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष…
शनिवारी पिंपरी मध्ये राज्यव्यापी कामगार परिषदेसाठी मविआचे नेत्यांना निमंत्रण – डॉ. कैलास कदम पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कंत्राटी कामगार प्रथेचे निर्मूलन करण्यासाठी आणि चार नव्या श्रमसंहिता रद्द कराव्यात या मागणीसाठी कामगार संघटना संयुक्त कृती समिती, महाराष्ट्र राज्यच्या वतीने शनिवारी (दि. ३ ऑगस्ट) कामगार संघटनांच्या प्रतिनिधींचा आक्रोश मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती जेष्ठ कामगार नेते अजित अभ्यंकर यांनी दिली. शनिवारी (दि.३ ऑगस्ट) सकाळी ११ वाजता पिंपरी, संत तुकाराम नगर येथील आचार्य अत्रे सभागृह येथे मेळाव्याचे उद्घाटन होणार असून समारोप दुपारी चार वाजता होणार आहे. या मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्र…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रुपीनगर-तळवडे भागात अवकाळी पावसामुळे श्रीराम कॉलनी मध्ये नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरल्यामुळे अतिशय दयनीय अवस्था निर्माण झाली होती. त्या परिसरातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले त्यामुळे त्या परिसराची पाहणी करण्यासाठी आमदार महेश लांडगे यांचे सूचनेनुसार त्यांचे बंधू कार्तिक लांडगे, माजी नगरसेवक शांताराम बापू भालेकर, पांडुरंग भालेकर, भाजपा पदाधिकारी किरण पाटील, सामाजिक कार्यकर्ते अनिल भालेकर, शरद भालेकर, रामदास कुटे, रविराज शेतसंधी, अजय रासकर, कुणाल पाटील, रवी एकसिंगे इत्यादींनी घटनास्थळाची पाहणी करून कार्तिक लांडगे व माजी नगरसेवक शांताराम बापू भालेकर यांनी स्थापत्य विभागाचे जूनियर इंजिनियर कुंभार व शिंदे साहेब यांना घटनास्थळावर बोलावून घेऊन ज्या अडचणीमुळे लोकांच्या घरात पाणी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – येत्या गुरुवारी १ ऑगस्टनंतर पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांनी विशेषतः नदीकाठच्या रहिवाश्यांनी सतर्क राहावे, असा इशारा महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिला आहे. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास ती हाताळण्यासाठी महापालिकेची आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवा, असे निर्देश आयुक्त सिंह यांनी महापालिका प्रशासनाला दिले. संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नियोजन करण्यासाठी आयुक्त शेखर सिंह यांनी विविध विभागांची आज आढावा बैठक घेतली. या बैठकीस या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य अभियंता श्रीकांत सवणे, रामदास तांबे, सहशहर अभियंता बाबासाहेब गलबले, डॉ. ज्ञानदेव झुंजारे, संजय कुलकर्णी, मनोज…
आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – येथील पुणे रस्त्यावरील वडमुखवाडी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात माऊलींच्या पादुका पालखी सोहळा मालक राजेंद्र आरफळकर यांनी मंदिरात प्रथा परंपरांचे पालन करीत हरिनाम गजरात आणला. यावेळी माऊलींचे पादुकांची पुजा, आरती ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष अँड. विष्णू तापकीर यांचे हस्ते झाली. यावेळी तुळशीहार, पुष्पहार, श्रीफळ, पेढे प्रसाद पादुकांना ठेवण्यात आला. यावेळी चोपदार बंधुंचे वतीने श्रींची आरती करण्यात आली. संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष अँड. विष्णू तापकीर यांच्या हस्ते श्रींची पूजा व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी पंचक्रोशीतून भाविकांची दर्शनास मोठी गर्दी झाली होती. माऊली माऊली नामजयघोषात…
आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) -आषाढी पायी वारी पालखी सोहळ्या अंतर्गत श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या वैभवी पादुका पालखी सोहळ्याचे परंपरेने माऊली मंदिरात हरिनाम गजरात आगमन झाले. हजारो वारकरी भाविकांचे उपस्थितीत सोहळा हरिनाम गजरात आळंदीत परतला. यावर्षी लाखो भाविकांचे उपस्थितीत पायी वारी सोहळा राज्यात साजरा करण्यात आला. पंढरीत श्रीविठ्ठल देव भेट , गोपाळपुर काला उरकून श्रींचे वैभवी पादुका पालखी सोहळ्याचे हजारो भाविक, वारकरी, नागरिकांच्या उपस्थितीत हरीनाम जयघोषात सोहळा मंगळवारी ( दि. ३० ) अलंकापुरीत गोरज मुहूर्तावर सव्वा सहाचे दरम्यान आळंदीत प्रवेशाला. परंपरेने बुधवारी ( दि. ३१ ) आळंदीत आषाढी एकादशी सोहळा हरिनाम गजरात साजरा होत आहे. यावेळी श्रींचे…
प्रकल्प सिद्धी उपक्रमामुळे उत्तम प्रतिसाद; आतापर्यंत १ लाख १८ हजाराहून अधिक महिलांनी केले अर्ज पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत पिंपरी चिंचवड महानगरपालिका आघाडीवर असून आतापर्यंत शहरातील १ लाख १८ हजाराहून अधिक महिलांचे अर्ज जमा झाले आहेत. यामध्ये ६२ हजार ८७८ अधिक ऑनलाईन अर्जांचा समावेश असून ५५ हजार ५०८ ऑफलाईन अर्जांचा समावेश आहे. घरोघरी जावून ऑफलाईन अर्ज भरण्यामध्ये प्रकल्प सिद्धी उपक्रमातील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या महिलांची महत्वाची भूमिका आहे. महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळाच्या मदतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ‘प्रकल्प सिद्धी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत ३०० महिला सदस्या…
