Author: maharashtrabreakingnews.com

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – विश्रांतवाडी येथे कार्यरत समाज कल्याण आयुक्तालय सेल्फी पॉइंट आहे का? कि सामाजिक प्रश्न, समस्या व इत्यादी तक्रार निवारण करण्याकरिता स्थापन झालेले आयुक्तालय? आहे का अशी तक्रार जिल्हा दक्षता समितीचे सदस्य ॲड.सागर चरण यांनी मुख्यमंत्री व समाज कल्याण आयुक्त यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,अनेक गरजू, गरीब वर्ग आपल्या समस्या, योजना, शिष्यवृत्ती व इत्यादी समस्या निवारण करण्याकरिता समाज कल्याण आयुक्तालय विश्रांतवाडी पुणे येथे येतात. तथापि, विश्रांतवाडी येथे कार्यरत समाज कल्याण आयुक्तालय सध्या (आय लव समाज कल्यान) सेल्फी पॉइंट करण्यात आल्यामुळे सदर कार्यालय शासकीय कार्यालय आहे की सेल्फी पॉईंट? शासनाने समाजाच्या विकासासाठी…

Read More

प्रदेश सचिव चंद्रशेखर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली २५ ते ३१ जुलैदरम्यान राबविले अभियान पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- पिंपरी चिंचवड शहरातील वाढत्या डेंग्यू आजाराला आळा घालण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर युवक काँग्रेसच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘डेंग्यू मुक्त पिंपरी चिंचवड’ अभियानांतर्गत शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील महापालिकेच्या शाळांमध्ये नाटकांद्वारे जनजागृती करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव चंद्रशेखर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसच्या वतीने २५ जुलै ते ३१ जुलै दरम्यान ‘डेंग्यू मुक्त पिंपरी चिंचवड’ जनजागृती सप्ताह अभियान राबविण्यात आले. या अभियानात विद्यार्थ्यांसाठी डेंग्यू जनजागृती चित्रकला स्पर्धा, जनजागृती करणारे पत्रक वाटप, शहरभर पथनाट्य तसेच महापालिका शाळांमध्ये नाटकांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात…

Read More

मंगळवारी भाऊसाहेब भोईर यांची प्रकट मुलाखत पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषेदेच्या मध्यवर्ती शाखेचे उपाध्यक्ष व माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार (३ ऑगस्ट) पासून मंगळवार (दि.६ ऑगस्ट) पर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. उद्योगनगरी म्हणून ओळख असणाऱ्या पिंपरी चिंचवड शहराला सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख निर्माण करून देण्यात भाऊसाहेब भोईर यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त ३ ऑगस्ट ते ६ ऑगस्ट या कालावधीत शहराच्या वेगवेगळ्या भागात भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती भाऊसाहेब भोईर मित्र परिवाराच्या वतीने गुरूवारी पिंपरी येथे पत्रकार परिषदेत देण्यात आली. या…

Read More

– आमदार महेश लांडगे यांची यंत्रणा लागली कामाला – ड्रेनेज, स्ट्रॉमवॉटर लाईनसह रस्त्याचे काम करणार पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे, पिंपरी-चिंचवडसह मावळ परिसरात अतिमुसळधार पाऊस झाला. त्यामुळे भोसरी विधानसभा मतदार संघातील तळवडे-रुपीनगर भागातील सखल भागामध्ये पाणी साचले. या पार्श्वभूमीवर भाजपाचे आमदार महेश लांडगे यांचे सहकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी परिसराची पाहणी केली आणि आवश्यक उपाययोजना करण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तळवडे येथे संत तुकाराम हौसिंग सोसायटी व श्रीराम काॅलनी क्र. १ परिसरात अतिमुसळधार पावसामुळे सखल भागांतील घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागला आहे. याची तात्काळ दखल घेत आमदार महेश लांडगे…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिखली येथे हिंद स्वराज मित्र मंडळाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून स्थानिक नागरिकांच्या उपस्थीतित हा कार्यक्रम पार पडला.आण्णा भाऊच्या आठवणीना उजाळा देण्यात आला, आकाशात सूर्य चंद्र असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही असे स. का. पाटील वैगरे मंडळी तेव्हा म्हणत होते. मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे आणि त्यात बेळगाव कारवार असला पाहिजे अशी मागणी संयुक्त महाराष्ट्र चळवळीने लावून धरली. कामगार चळवळ हिरहिरीने यात सहभागी झाली. जेव्हा मराठी माणसांचा महाराष्ट्र निर्माण झाला पण बेळगाव कारावार मात्र त्यात नव्हता तेव्हा अण्णा अण्णा भाऊंना दुःख झालं “माझी…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जगतगुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा नुकताच पंढरपूर कडून परत देहूकडे आला.वारकऱ्यांना पालखी परतीच्या वेळी आरोग्याच्या अनेक समस्या जानवतात म्हणूनच पिंपरी गावांत पालखी सोहळा मुक्कामी आली असता पालखीतील वारकरी व भाविकांचे आरोग्य योग्य राहावे त्यांची आरोग्य सेवा घडावी या साठी वूई टुगेदर फाउंडेशन,मधुकर बच्चे युवा मंच व गणेश वाळुंजकर मित्र परिवार यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक पिंपरी गाव येथे मोफत आरोग्य तपासणी व औषधे वाटप शिबीर घेण्यात आले. शिबिरात सर्व प्रकारचे साथीचे आजार,शुगर,बीपी,आदी महत्वाच्या आजारावर वारकऱ्याची तपासणी करून आवश्यक औषधे देण्यात आली.या शिबिरात वारकरी व भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. आयोजकांच्या वतीने तीन डॉ.…

Read More

हजेरी मारुती मंदिरात परंपरेने हजेरी ; दर्शनास भाविकांची गर्दी आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – संत ज्ञानेश्वर महाराज पायी वारी पालखी सोहळा हरिनाम गजरात प्रवेशल्या नंतर एकादशी दिनी बुधवारी ( दि. ३१ ) श्रींचे पायी वारी पालखी सोहळ्याची सांगता मानकरी, वारकरी भाविकांचे उपस्थितीत हरिनाम गजरात हजेरी मारुती मंदिरात दिंडी प्रमुख विणेकरी यांचे अभंगरूपी सेवा रुजू करीत हजेरीच्या कार्यक्रमाने देवस्थानचे वतीने हरिनाम गजरात झाली. आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी दर्शनास लाखावर भाविकांनी कामिका आषाढी एकादशी दिनी श्रींचे दर्शनास गर्दी करून दर्शन घेतले. यावेळी परंपरेने देवस्थान तर्फे आणि कुऱ्हाडे पाटील, डॉ. नाईक परिवाराचे वतीने नारळ व प्रसाद वाटप करीत…

Read More

आळंदी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – तीर्थक्षेत्र आळंदी ग्रामस्थ इंद्रायणी आरती ग्रुप, राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान, महिला बचत गट सदस्य, पदाधिकारी, महिला मंडळ तसेच आळंदी ग्रामस्थ यांचे वतीने इंद्रायणी नदी घाटावर महिलांनी घाट स्वच्छता करीत इंद्रायणीची आरती हरिनाम गजरात झाली. आषाढी वारी निमित्त एकादशी दिनी इंद्रायणीची आरती करून नदी घाट स्वच्छता करीत सामाजिक बांधिलकी जोपासली. यावेळी शिवसेना शिरूर लोकसभा उपसंघटक ( उबाठा ) राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अनिता झुजम, माजी नगरसेविका उषा नरके, स्वाती पजई, मोनिका बिडवे, राणी वाघ, वंदना लोखंडे, सन्याली ठाकूर, कल्याणी माळवे, शोभा कुलकर्णी, उषा नेटके, नमीता चौधरी, उषा ननवरे, अनिता शिंदे, लता शेवते, जिजाबाई…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी महापालिकेची सर्व आपत्कालीन यंत्रणा दक्ष असून धोकादायक  ठिकाणांची पाहणी करून त्या अनुषंगाने संबंधित विभागांमार्फत तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याची कार्यवाही सुरु आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली.  तसेच अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी देखील सतर्क राहावे, असे आवाहन देखील आयुक्त सिंह यांनी केले आहे. पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या नद्यांवर असलेल्या धरणांच्या पाणी साठ्यात वाढ झाली असून ते पूर्ण भरण्याच्या स्थितीत आहेत. तसेच येत्या काही दिवसांत पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. अशावेळी धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग होऊ शकतो. त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  महापालिकेच्या   १२८ पैकी ११५ शाळांनी शाळा व्यवस्थापन समितीच्या मदतीने सुरक्षा लेखापरिक्षण केले आहे. या लेखापरिक्षणाचे विश्लेषण करून उपाययोजना करण्यासाठी कृती आराखडा तयार करून योग्य उपाययोजना करा. तसेच त्यातील स्थापत्य, विद्युत, पाणीपुरवठा, अग्निशमन, माहिती व तंत्रज्ञान आदी विषयक अत्यावश्यक कामकाज लवकरात लवकर पुर्ण करा, अशा सूचना अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. महापालिकेच्या वतीने सर्व महापालिका शाळांमध्ये दरवर्षी राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात येतो. या उपक्रमाअंतर्गत सर्व महापालिका शाळांमध्ये सुरक्षा लेखापरिक्षण तसेच बाल सुरक्षा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या लेखापरिक्षणाचे तसेच बाल सुरक्षा कार्यक्रमाचे विश्लेषण करून त्यासंदर्भात उपाययोजना करण्याच्या दृष्टीने आज पिंपरी…

Read More