- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
भारताच्या संविधानिक कसोटीवर भाजपा हा सर्वश्रेष्ठ पक्ष – प्रदेशाध्यक्ष अॅड. उदय डबले.. भाजपा कायदा आघाडीचा लोकप्रतिनिधी आणि गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा उत्साहात संपन्न.. पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘कायदा आघाडी’ ही कोणत्याही राजकीय पक्षासाठी निर्णायक बाब आहे. संकटकाळात राजकीय पक्षाचं आस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी गुणी आणि ज्ञानी वकिलांची विचारसरणी मोलाची ठरते. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांनासुद्धा मोठ पाठबळ मिळतं. पक्षाला कायदेविषयक, निवडणूक विषयक सल्लाच नव्हे तर, पक्षाची ध्येय, धोरणे आणि जनमानसात त्याची छबी कशी उंचावेल? याची दिशा ठरविण्याचं कार्य कायदा आघाडीच्या वकिलांना पार पाडाव लागतं. भारतीय जनता पक्षाकडे गुणवंत वकिलांची मोठी फळी असल्यामुळेच भारताच्या संविधानिक कसोटीवर आज आपला पक्ष सर्वश्रेष्ठ पक्ष म्हणून…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – किटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने व्यावसायिक आस्थापना, गृह सोसायट्यांसह घरांची तपासणी मोहीम तीव्र करण्यात आली असून डासोत्पत्ती ठिकाणे आढळल्यामुळे आज दंडात्मक कारवाई करण्यात आली असून सुमारे १ लाख ८६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त अजिंक्य येळे यांनी दिली. शहरात किटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी तपासणी मोहिम तीव्र करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने शहरात राबविण्यात येणारी तपासणी मोहीम तीव्र करण्यात आली असून डासोत्पत्तीची ठिकाणे आढळलेल्या व्यक्ती आणि आस्थापनांवर ही कारवाई करण्यात…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अतिवृष्टीमुळे तसेच धरणातून सातत्याने होणाऱ्या विसर्गामुळे शहरातील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने नदीकाठच्या घरांमध्ये तसेच सखल भागात पाणी साचल्याच्या घटना घडल्या होत्या. या स्थळांची पाहणी करून धोकादायक ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या सुमारे १००० नागरिकांना आज महानगरपालिकेच्या वतीने निवारा केंद्रांमध्ये तसेच नातेवाईकांच्या घरी स्थलांतरित करण्यात आले आहे, अशी माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली. पूरसदृश्य भागांची पाहणी करून नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याची कार्यवाही सुरू असून ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील बौद्धनगर, आंबेडकर कॉलनी आदी ठिकाणी बचावकार्य करण्यात आले आहे. यामध्ये सुमारे ३० नागरिकांना भाटनगर पिंपरी शाळा येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. तर ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील जाधवघाट, रावेत आदी परिसरात बचावकार्य करण्यात…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – संततधार पडणाऱ्या पावसामुळे तसेच धरणांमधून होणाऱ्या विसर्गामुळे पिंपरी चिंचवड शहरातील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत असून कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये यासाठी महापालिकेच्या वतीने आवश्यक खबरदारीसह विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण ठेवणाऱ्या सर्व यंत्रणा सतर्क आणि सज्ज ठेवण्यात आल्या असून नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने महापालिकेने सर्व प्रभाग तसेच सर्व अग्निशमन केंद्रांच्या ठिकाणी पुर नियंत्रण कक्ष सुरु आहे. शिवाय महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये मध्यवर्ती पूर नियंत्रण कक्ष असून सर्व कक्ष २४ X ७(२४ तास ७ दिवस) कार्यान्वित ठेवण्यात आले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी पूर नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. रात्रीच्या वेळी देखील पावसामुळे काही अनुचित प्रकार घडल्यास शहरात अग्निशमन यंत्रणा सज्ज असून अग्निशमनची टीम रेस्क्यूसाठी आवश्यक त्या सर्व साधनसामग्रीसह घटनास्थळावर पोहोचण्यासाठी २४ X ७ (२४ तास ७ दिवस) कार्यान्वित…
यंत्रणा, पोलीस यंत्रणा आणि आपत्कालीन यंत्रणेने आपसांत समन्वय ठेवून पूरपरिस्थितीची आपत्कालीन परिस्थिती हाताळावी, असे निर्देश आयुक्त शेखर सिंह यांनी दिले. महापालिका आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची व्हिडीओ कॉन्फर्सिंगद्वारे बैठक आयुक्त शेखर सिंह यांनी आज घेतली. या बैठकीस महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य अभियंता श्रीकांत सवणे, सहशहर अभियंता बाबासाहेब गलबले, उपआयुक्त विठ्ठल जोशी, मनोज लोणकर, रविकिरण घोडके, संदीप खोत, निलेश भदाणे, सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे, अजिंक्य येळे, क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, अमित पंडित, अंकुश जाधव, सीताराम बहुरे, किशोर ननावरे, उमेश ढाकणे, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, पिंपरी चिंचवड…
माजी नगरसेविका विनया तापकीर यांचा पुढाकार दरवर्षी राबवला जातो विधायक उपक्रम भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –चऱ्होली येथील माजी नगरसेविका विनया प्रदीप तापकीर यांच्या पुढाकारातून स्थायी समितीचे माजी सभापती अजित गव्हाणे यांच्या वाढदिवसानिमित्त चऱ्होली येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिरात एका दिवसात रेकॉर्ड ब्रेक 723 रक्तदात्यांनी रक्तदान केले. दरम्यान रविवारी दिवसभर पाऊस असतानाही धो धो पावसात रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. चऱ्होली, चोविसावाडी येथील गुरुकृपा मंगल कार्यालय येथे (दि.4) या विधायक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे, माजी नगरसेवक राहुल भोसले, प्रशांत कापसे, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप तापकीर, अनुज तापकीर तसेच चऱ्होली…
प्रभाग क्रमांक-१२ तळवडे-रुपीनगर श्रीराम कॉलनी मधील स्ट्रॉम वॉटर लाईन व (सी.डी वर्कचे) मोठ्या पुलाच्या व नाला रुंदीकरणाचा कामास प्रारंभ पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – तळवडे प्रभाग क्रमांक 12 मधील श्रीराम कॉलनी मधील नागरिकांना दिलासा आमदार महेश दादा लांडगे यांच्या सूचनेनुसार शांताराम(बापू) भालेकर यांच्या प्रयत्नांना यश मोठा पूल (सी डी वर्क) स्ट्रॉंम वॉटर लाईन नाला रुंदीकरण कामास प्रारंभ करण्यात आला. रुपीनगर-तळवडे 1997 साली महापालिकेमध्ये जाऊन ही या परिसरामध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. ज्योतिबानगर व रुपीनगर यामध्ये जो नाला आहे त्या नाल्यावर महापालिकेने करोडो रुपये खर्च करून सुद्धा या परिसरातील नागरिकांना योग्य प्रकारचे रस्ते, लाईट, पाणी या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याकारणाने…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नवी सांगवी येथे एम.के हॉटेल चौक एच.डी.एफ.सी बँक जवळ एम.एस.ई.बी च्या दोन वायरी जळालेले काम पूर्ण करण्यात आले वायर जळाल्यामुळे समता नगर नवी सांगवी येथील लाईट सप्लाय दोन तासासाठी पूर्ण पणे बंद करण्यात आला होता त्यामुळे मेघराज लोखंडे यांनी कामाची पाहणी करत संबंधित म.न.पा अधिकाऱ्यांना फोन लावून सूचना देत काम करून घेतले. पावसाळ्यामध्ये नागरिकांची गैरसोय व कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये त्यामुळे भर पावसात उभा राहून मेघराज लोखंडे ( अध्यक्ष :- चिंचवड विधानसभा राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार ) यांनी काम करून घेतले यावेळी अवधूत भाऊ कदम,कार्तिक कदम,पियुष ढोरमले उपस्थित होते.
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी – चिंचवड नामदेव महाराज मंदिर व सांस्कृतिक भवन आयोजित ६७४ वा संजीवन समाधी सोहळा समाजबांधवांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. सोहळ्याची सुरुवात सकाळी नामदेवरायांच्या मूर्तीस संस्थेचे अध्यक्ष एकनाथ सदावर्ते यांच्या हस्ते अभिषेकाने झाली. त्यानंतर समाजातील नवोदित दांपत्यांच्या हस्ते सत्यनारायण महापूजा करण्यात आली. त्यावेळेस नऊ दिवस चाललेल्या गाथा पारायणाचीदेखील सांगता करण्यात आली. पालखी मिरवणूक सोहळा श्री मोरया गोसावी गणपती मंदिरातून ठीक दहा वाजता सुरू होऊन प्रस्थापित मार्गाने पालखीचे आगमन ठीक पावणे बारा वाजेच्या सुमारास नामदेवमहाराज मंदिरात झाले. पालखी मार्गावर भक्तांकडून उत्साहाने पालखीचे स्वागत करण्यात आले. त्याचबरोबर वरुणराजानेही पालखीचे स्वागत केले. चाफेकर चौकात तसेच नामदेवमहाराज…
-भोसरी विधानसभा मतदारसंघातील खड्ड्यांच्या प्रश्नावरून आंदोलन – 100 खड्ड्यांमध्ये 100 कमळाची फुले लावून अनोखे आंदोलन – रस्त्यांच्या दुरावस्थेवरून आमदारांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिखली- मोशी- चऱ्होली रेसिडेन्शिअल कॅरिडोर केल्याच्या बाता मारणाऱ्या भोसरीच्या आमदारांनी चऱ्होली, मोशी ते चिखली या रस्त्यांवर एकदा डोळे उघडे ठेवून प्रवास करावा. या रस्त्यावरील खड्डे पहावे. येथे होणारी वाहतूक कोंडी आणि त्यामुळे होणारा मनस्ताप यांचा अनुभव घ्यावा म्हणजे आपण नक्की गेल्या दहा वर्षात काय केले याची त्यांना उपरती होईल अशी जळजळीत टीका स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केली आहे. माजी स्थायी समिती अध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी (दि.3) दाभाडे वस्ती, चऱ्होली…
