- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘डान्सथॉन’ जिल्हास्तरीय आंतरशालेय नृत्य स्पर्धेचे दुसरे सत्र एस. बी. पाटील पब्लिक स्कूल, रावेत येथे नुकतेच आयोजित केली होती. या स्पर्धेत सिटी प्राईड स्कूलने प्रथम तर एस. बी. पाटील स्कूलने व्दितीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेत एकूण सतरा शाळांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी २७ नृत्याविष्कारांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. दोन गटात स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. नृत्य सादरीकरणासाठी तीन विषय देण्यात आले होते. पहिला गट – इयत्ता सहावी ते आठवी विषय – नाते – मैत्री आणि कुटुंब; कोणतेही शाश्वत ध्येय; इंडो वेस्टर्न (जुगलबंदी) सविस्तर निकाल खालीलप्रमाणे – गट १ मधील विजेते – प्रथम क्रमांक – सिटी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आपले कार्य सेवावृत्ती प्रमाणे करत राहिले की समाज हमखास दखल घेतो. आजच्या सामाजिक बदलांचा विचार केला तर समाजाला अनेक सेवाव्रतींची गरज आहे, असे मत सैन्यदलातील निवृत कर्नल सुरेश पाटील यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे (पीसीईटी) प्रबंधक योगेश भावसार यांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल “लोकशाहीर अण्णाभाऊ साठे गौरव पुरस्कार” प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, मानपत्र व स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. आण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त श्रमिक पत्रकार भवन, पुणे येथील कार्यक्रमात निवृत कर्नल व नाम फौंडेशनचे सदस्य सुरेश पाटील, पँथर आर्मीचे अध्यक्ष फिरोज मुल्ला व पँथर आर्मीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संतोष आठवले…
फिडेल साॅफ्टटेकचा ११ टक्के लाभांश जाहीर पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – फिडेल सॉफ्टटेकने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अल्पावधीतच मोठी भरारी घेत विश्वासार्हता निर्माण केली आहे. येत्या काळात कंपनीची आर्थिक उलाढाल शंभर कोटींच्या पुढे जाईल, असा विश्वास फिडेल साॅफ्टटेक लि. चे अध्यक्ष आणि विशेष संचालक सुनील कुलकर्णी यांनी कंपनीच्या सर्वसाधारण सभेत व्यक्त केला. फिडेल साॅफ्टटेक लि. च्या सभासदांची सर्वसाधारण सभा नुकतीच झाली. त्यावेळी कुलकर्णी यांनी कंपनीच्या प्रगतीची आणि कार्याची माहिती उपस्थितांना दिली. तसेच पुढील वाटचाल, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, आव्हाने या विषयावर माहिती दिली. यावेळी व्यवस्थापकीय संचालिका प्राची कुलकर्णी, संचालक डॉ. गिरीश देसाई, प्रदीप धरणे, डॉ. अपूर्वा जोशी तसेच सभासद उपस्थित होते.…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत आज त्रिवेणीनगर मुख्य चौकात असलेले अतिक्रमण हटविण्यात आले. त्रिवेणीनगर येथील स्पाइनरोडची सुटलेली लिंक पूर्ण करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. त्रिवेणीनगर मुख्य चौकातील अनधिकृत बांधकामांमुळे स्पाईन रोड, तळवडे, भक्ती शक्ती चौकाकडे जाणाऱ्या वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले होते, त्यामुळे स्पाईनरोडच्या सलग जोडणीमध्ये बाधा निर्माण होणाऱ्या सुमारे २० हजार स्क्वेअर फुट क्षेत्रातील ८ बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. यामध्ये मुख्य चौकातील ३ मजली इमारतीचाही समावेश होता. याठिकाणी रस्ता रुंदीकरण करून नवीन रस्ता तयार करण्यात येणार असून यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. या कारवाईदरम्यान उप आयुक्त मनोज…
– भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला ‘‘महायुतीचे बळ’’ पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवडसह भोसरी विधानभा मतदार संघातील पिंपरी-चिंचवडकरांची जीवनशैली उंचावण्यादृष्टीने महत्त्वपूर्ण विकासकामे आणि प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘ग्रीन सिग्नल’ दिला आहे. त्यामुळे महायुती सरकारकडून पिंपरी-चिंचवडकरांना ‘मान्सून गिफ्ट’ मिळाले आहे. भोसरी विधानसभा मतदार संघासह पिंपरी-चिंचवडशी संबंधित प्रलंबित प्रश्न व विकासकामांसाठी भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या मागणीनुसार, मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. यावेळी पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, नगररचना विभागाचे…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “नारायण सुर्वे यांचे साहित्य मराठीतील एक स्मरणशिळा आहे!” असे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजा दीक्षित यांनी चिंचवड येथे व्यक्त केले. नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, भोसरी शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पद्मश्री नारायण सुर्वे काव्यजागर संमेलन आणि पुरस्कार प्रदान सोहळ्यात ज्येष्ठ समीक्षक आणि विचारवंत प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते पद्मश्री नारायण सुर्वे जीवनगौरव सन्मान स्वीकारताना प्रा. डॉ. राजा दीक्षित बोलत होते. नारायण सुर्वे ट्रस्टचे उपाध्यक्ष मनोहर पारळकर अध्यक्षस्थानी होते; तसेच ज्येष्ठ कविवर्य प्रा. डॉ. विठ्ठल वाघ, नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, बाबा…
-भोसरी,लांडेवाडी येथे ९ ऑगस्ट रोजी सभेचे आयोजन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था, रोजगार, महागाई, शिक्षण, आरोग्य अशा सर्वच पातळीवर सध्या घसरण झाली आहे. यासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाकडून शिवस्वराज्य यात्रा 2 ची घोषणा करण्यात आली असून, या शिवस्वराज्य यात्रेचे ९ ऑगस्ट रोजी भोसरी येथे सायंकाळी सात वाजता भव्य स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती गुरुवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली. पत्रकार परिषदेला शहराध्यक्ष तुषार कामठे, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते प्रकाश आप्पा म्हस्के, रविकांत वर्पे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे, माजी नगरसेवक राहुल भोसले, सुलक्षणा धर, गिता मंचरकर, गणेश भोंडवे, देवेंद्र तायडे, विशाल काळभोर, ज्ञानेश…
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्राच्या कोल्हापूर येथील स्वप्नील कुसाळे याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ब्राँझपदक मिळविले आहे. ऑलिम्पिकमध्ये ५० मीटर रायफल थ्री-पोझिशनमध्ये त्यांना हे पदक मिळाले असून वैयक्तिक पदक मिळविणारे महाराष्ट्रातील तो दुसरे खेळाडू ठरला आहे.पॅरिस येथून स्वप्नील हा आज भारतात परत आला असून पुणे विमानतळावर स्वप्नील चे जोरदार स्वागत करण्यात आले.यानंतर स्वप्नील ने पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शन घेत आरती केली यावेळी ट्रस्ट कडून स्वप्नील चे स्वागत करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सहचिटणीस अमोल केदारी, आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी स्वप्नील म्हणाला की पहिले गणपती…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा आपला वर्धापन दिन ९ ऑगस्ट रोजी साजरा करीत आहे. गेली २७ वर्षे वर्धापन दिनाच्या निमित्ताने नाट्य व इतर सांस्कृतिक क्षेत्रातीलराज्य व स्थानिक कलाकारांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे. .यंदापासून नाट्य चित्रक्षेत्रातील सन्माननीय जेष्ठ कलावंताला जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे.हा पहिला जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ नाट्य- चित्र अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली . हा पुरस्कार सोहळा चिंचवड येथे प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात हा ९ऑगस्ट २०२४ रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता होणार आहे. मराठी नाट्य…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- पिंपरी चिंचवड शहरातील चऱ्होली, मोशी, डुडुळगाव, चोविसावाडी, वडमुखवाडी, देहू – आळंदी रस्ता बोऱ्हाडेवाडी, चक्रपाणी वसाहत, अक्षयनगर तसेच इंद्रायणीनगर या भागात आज दि.७ ऑगस्ट २०२४ रोजी मध्यरात्री होणारा पाणीपुरवठा व उद्या दि.८ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी होणारा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल, अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागांतर्गत निघोजे बंधाऱ्यावरून उचलल्या जाणाऱ्या अशुद्ध जलउपसा केंद्रावरील विद्युत पुरवठा ७ ऑगस्ट २०२४ च्या मध्यरात्री अडीच वाजलेपासून बंद असल्यामुळे चिखली जलशुद्धीकरण केंद्राकडे होणारा पाणीपुरवठा पूर्णत: बंद झालेला आहे. त्यामुळे चिखली जलशुद्धीकरण केंद्रावरून चऱ्होली, मोशी, डुडुळगाव, चोविसावाडी, वडमुखवाडी तसेच देहू – आळंदी रस्ता बोऱ्हाडेवाडी, चक्रपाणी…
