Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारताच्या स्वातंत्राच्या इतिहासात ९ ऑगस्ट या दिनास असाधारण महत्व असल्याने सर्व भारतीयांसाठी हा अभिमानाचा दिवस आहे.शहीद भगतसिंग व सुखदेव यांचे स्मारक दापोडी या ठिकाणी आहे.यानिमित्ताने  दापोडी येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे  कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे यांनी  अभिवादन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार ओबीसी विभाग शहराध्यक्ष भाई विशाल जाधव, ख्रिश्चन सेना अध्यक्ष शौल कांबळे,  भोसरी विधानसभा उपाध्यक्ष अजय पिल्ले,पिंपरी चिंचवड शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या शहराध्यक्षा सायली किरण नढे , महाराष्ट्र प्रदेश एन एस यु आयचे  उपाध्यक्ष ॲड उमेश खंदारे, युवक अध्यक्ष कौस्तुभ नवले ,  झेवियर अँथनी, रोहित शेळके, किरण नढे, जय ठोंबरे,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीच्या वतीने दापोडी येथील शहिद भगतसिंग व भारत छोडो आंदोलनात पुण्यातील १६ वर्षीय पहिले हुतात्मा नारायण दाभाडे यांच्या पूतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नेते भाऊसाहेब मुगुटमल, तानजी काटे, राजाराम भोंडवे, संदेश नवले, वरिष्ठ उपाध्यक्ष मयूर जयस्वाल, पिंपरी ब्लॉक अध्यक्ष विश्वनाथ जगताप, प्रदेश युवक काँग्रेस सचिव व राष्ट्रीय प्रवक्ते गौरव चौधरी, सेवादल अध्यक्ष प्रा. किरण खाजेकर, शहर उपाध्यक्ष मेहबूब शेख, शहर सरचिटणीस वसंत वावरे, रवींद्र कांबळे, सचिन गायकवाड, शहर सचिव मिलिंद फडतरे, योगेश बहिरट, धनाजी गावडे, चंद्रकांत काटे, नितीन कांबळे, अरुणा वानखेडे, कुंदन…

Read More

आमदार महेश लांडगे यांच्या वतीने आरास सेवा महाकालेश्वर मंदिर समितीने मानले आभार पिंपरी ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मध्यप्रदेशातील उज्जैन येथील श्री महाकालेश्वर शिवलिंग गर्भगृह व कळसामधे असलेले श्री नागचंद्रेश्वर महादेव येथे नागपंचमीनिमित्त भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांच्यावतीने आकर्षक फुलांची आरास करण्यात आली. मंदिराची सजावट, दिव्यांची रोषणाई केली. त्यामुळे मंदिर परिसर उजळून निघाला आहे.  महाकालेश्वर मंदिर समितीने आमदार लांडगे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले. मध्यप्रदेश उज्जैन येथील ज्योतिर्लिंग महाकालेश्वर मंदिराच्या माथ्यावर असलेल्या भगवान नागचंद्रेश्वर मंदिराचे दरवाजे वर्षभरानंतर नागपंचमीनिमित्त गरुवारी मध्यरात्री उघडण्यात आले. यानंतर महानिर्वाणी आखाड्याचे महंत विनीत गिरी महाराज यांच्या उपस्थितीत नागचंद्रेश्वराचे पूजन करण्यात आले. नेपाळमधून ही मूर्ती उज्जैनला…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – ०९ ऑगस्ट हा भारतीय स्वातंत्र्यलढ्यात ‘ऑगस्ट क्रांतिदिन’ म्हणून सुप्रसिद्ध आहे. शुक्रवार, दिनांक ०९ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी मुंबईहून येणार्‍या रेल्वेतून ब्रिटिश अधिकार्‍यासमवेत चिंचवड रेल्वेस्थानकावर चक्क महात्मा गांधीजी उतरले अन् त्यांच्या जयघोषाच्या जल्लोषाने प्रवासी चकित झाले. ०९ ऑगस्ट १९४२ रोजी ‘चले जाव!’ आंदोलन पुकारल्यामुळे महात्मा गांधी यांना अटक करून पुण्यात पाठविण्यात आले होते; परंतु जनक्षोभ उसळू नये म्हणून चिंचवड रेल्वेस्थानकावर त्यांना उतरवून घेण्यात आले होते. शब्दधन काव्यमंचाने या प्रसंगाचे अभिरूप दर्शन घडवून रेल्वेस्थानकावर महात्मा गांधी विचारजागर या ऐतिहासिक कविसंमेलनाचे आयोजन केले होते. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. पी. एस. आगरवाल महात्मा गांधींच्या आणि सुभाष चव्हाण इंग्रज अधिकार्‍याच्या…

Read More

भाऊसाहेब भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  –  पिंपरी चिंचवड शहरामध्ये पर्यावरण, आरोग्य, शिक्षण, वाहतूक कोंडी, अनाधिकृत बांधकामे नियमितकरण, नदी प्रदूषण, दिवसाआढ पाणी अशा विविध समस्या आहेत. मात्र, त्याकडे कोणाचेही लक्ष नाही. हे प्रश्न सोडविण्यासाठी चिंचवड मध्ये बदल घडवायचा आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी चिंचवड येथे व्यक्त केले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषेदेच्या मध्यवर्ती शाखेचे उपाध्यक्ष व माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त भाऊसाहेब भोईर मित्र परिवाराच्या वतीने शहरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहामध्ये भाऊसाहेब भोईर यांची प्रकट…

Read More

– वायसीएम रुग्णालयातील निंदाजनक प्रकारानंतर शिवसेना महिला आघाडी आक्रमक भोसरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात वारंवार अश्लील शेरेबाजी केल्याची माहिती देणारी निनावी पोस्ट शिकाऊ महिला डॉक्टरने सोशल मीडियावर टाकली याची गंभीर दखल प्रशासनाने घेऊन विभागप्रमुखाची चौकशी सुरू केली असली तरी हा प्रकार निंदाजनक आहेच. मात्र त्या पेक्षाही अधिक चीड आणि संताप आणणारा असल्याचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पुणे जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांनी म्हटले. पालिका रुग्णालयातील असे प्रकार तातडीने थांबले नाही तर याला शिवसेना स्टाईलने उत्तर मिळेल असे देखील त्यांनी म्हटले आहे. यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयाचे अधिष्ठाता राजेंद्र वाबळे यांना गुरुवारी भेटून उबाळे…

Read More

वाकड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आदर्श कॉलनी वाकड येथे डॉ. नंदकिशोर धुमाळ  यांनी फुलवली सफरचंदाची बाग,पर्यावरण प्रेमीमध्ये आनंदाचे वातावरण,राज्यात एकमेव सफरचंदाची टेरेस गार्डन निर्माण करण्यात ते  यशस्वी. घरी खाण्यासाठी आणलेल्या सफरचंदामधील बीया सहज प्रयोग म्हणून घरा समोरील अंगणात रूजवल्या. त्याची योग्य निगा राखत संगोपन करत रोप वाढविले. काही महिन्यातच त्याला फुले येऊन फळे येऊ लागली. केलेल्या प्रयोगाला यश मिळाले. जम्मू काश्मिर सारख्या थंड हवेच्या प्रदेशात येणारे सफरचंदाचे झाड, महाराष्ट्रातील उष्ण व दमट हवामानामध्ये यशस्वी फुलले हे राज्यासाठी कुतूहलाचा विषय झाला. आलेले सफरचंद खाण्यास योग्य असल्याचा निर्वाळा सरकारी प्रयोगशाळेने दिला. विशेष म्हणजे, थंड हवेत येणारे सफरचंदाचे झाड घराच्या परसबागेत फुलविल्याची…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहर आणि परिसरातील नवोदित गायकांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी २०१४ साली पिंपरी चिंचवड शहरात पिंपरी चिंचवड आयडॉल मोरया करंडक या गायन स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. यंदाही नव्या दमाने कै.मनीषा भाऊसाहेब भोईर ट्रस्ट यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असून यावर्षी स्पर्धेचे हे १० वे वर्ष आहे. स्पर्धेस गेली पाच ९ वर्षे चांगला प्रतिसाद मिळाला व त्यातील बऱ्याच स्पर्धकांनी संगीत क्षेत्रात नाव कमावले आहे. स्पर्धेतील पहिल्या वर्षीची पिंपरी चिंचवड आयडॉल, मोरया करंडक विजेती नुपूर निफाडकर सध्या प्रसिद्ध संगीतकर ए.आर. रहेमान यांच्या अॅकडमी मध्ये काम करत आहे. तर दुसऱ्या “मोरया करंडक २०१५” कौस्तुभ दिवेकर…

Read More

– शिवांजली सखी मंचच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद – भोसरी विधानसभा मतदार संघात तब्बल २५ ठिकाणी कार्यक्रम पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महिलांसाठी उत्साहाचा आणि आनंदाचा सण म्हणजे ‘‘मंगळागौरी’’. आधुनिक युगाशी स्पर्धा करताना शहरामध्ये महाराष्ट्राची संस्कृती आणि सण-उत्सव साजरा करण्यासाठी अनेकदा मर्यादा येतात. मात्र, महिलांसाठी हक्काचे व्यासपीठ मिळाले, तर त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळातो. याचा प्रयत्य भोसरी विधानसभेतील ‘‘श्रावणसरी अन्‌ मंगळागौरी’’ कार्यक्रमात येतो आहे. भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून महिला सक्षमीकरण आणि उद्योजकता प्रोत्साहन या उद्देशाने महाराष्ट्रातील सर्वात मोठी ‘‘इंद्रायणी थडी’’ भरवणाऱ्या शिवांजली सखी मंचच्या अध्यक्षा पूजा लांडगे यांच्या पुढाकाराने ‘‘श्रावणसरी अन्‌ मंगळागौरी’’ या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले…

Read More

  पुणे,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पूर्वी विद्यार्थ्यांना दर्जेदार व त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीन विकास करणारे शिक्षण घेण्यासाठी पाश्चिमात्य देशांची वाट धरावी लागत असे. परंतू आता, भारतातील शैक्षणिक क्षेत्र प्रचंड मोठ्या प्रमाणात बहरत आहे. काही वर्षांपूर्वी भारतात केवळ ४५८ अँक्टिव्ह नाविण्यपूर्ण स्टार्टअप्स होती, त्यांची संख्या आता दीड लाखांच्या पार गेली आहे. विशेष म्हणजे यातील ९० स्टार्टअप्स ही युवकांच्या पुढाकारातून आलेली आहेत. त्यामुळे, भारतासमोरील बेरोजगारीची समस्या सोडवायची असल्यास विद्यार्थ्यांनी नाविण्यपूर्ण स्टार्टअप्सकडे वळायला हवे, असे मत भारताच्या एरोनाॅटीकल सोसायटीचे अध्यक्ष तथा रक्षा मंत्रालयाचे वैज्ञानिक सल्लागार डाॅ.जी सतीश रेड्डी यांनी व्यक्त केले. ते येथील एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणेच्या ९व्या दीक्षारंभा-१४ कार्यक्रमात बोलत होते. यावेळी,…

Read More