पिंपरी चिंचवड आयडॉल मोरया करंडक गायन स्पर्धेचे आयोजन
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहर आणि परिसरातील नवोदित गायकांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी २०१४ साली पिंपरी चिंचवड शहरात पिंपरी चिंचवड आयडॉल मोरया करंडक या गायन स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. यंदाही नव्या दमाने कै.मनीषा भाऊसाहेब भोईर ट्रस्ट यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असून यावर्षी स्पर्धेचे हे १० वे वर्ष आहे. स्पर्धेस गेली पाच ९ वर्षे चांगला प्रतिसाद मिळाला व त्यातील बऱ्याच स्पर्धकांनी संगीत क्षेत्रात नाव कमावले आहे. स्पर्धेतील पहिल्या वर्षीची पिंपरी चिंचवड आयडॉल, मोरया करंडक विजेती नुपूर निफाडकर सध्या प्रसिद्ध संगीतकर ए.आर. रहेमान यांच्या अॅकडमी मध्ये काम करत आहे. तर दुसऱ्या “मोरया करंडक २०१५” कौस्तुभ दिवेकर हा सध्या चित्रपटांमध्ये पार्श्वगायन करीत आहे. तसेच गत विजेते तेजश्री देशपांडे, महेश तामचीकर, परिमल सोनवणे व निधी हेगडे हे सर्व संगीत क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवत आहे. फक्त विजेतेच नाही तर स्पर्धेमध्ये सहभागी स्पर्धक सुद्धा विविध वाहिन्यांवर संगीत क्षेत्रात अर्थार्जन करीत आहेत तर अनेक स्पर्धक स्वताचे संगीत कार्यक्रम करत आहेत.
या वर्षी स्पर्धे मध्ये एकून ८० स्पर्धकांनी भाग घेतला होता सदर स्पर्धकांची पात्रता फेरी (ऑडिशन) दिनांक २४ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट सकाळी ९ ते सायं ५ वा पर्यंत प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे घेण्यात येणार असून प्राथमिक फेरी बुधवार दि. २८ ऑगस्ट रोजी तसेच द्वितीय फेरी शुक्रवार दि. ३० ऑगस्ट सायं. ४ ते ९ या वेळेत ग.दि.माडगुळकर नाट्यगृह, प्राधिकरण येथे होणार आहे. अंतिम फेरीसाठी दि. ३१ ऑगस्ट रोजी कार्यशाळेचे आयोजन केले असून दि. १ सप्टेंबर २०२४ रोजी प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे स्पर्धेची महाअंतिम फेरी संपन्न होणार आहे.