Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड येथील रायरेश्वर माथाडी कामगार सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष तथा कामगार नेते, शिवसेना उपनेते इरफानभाई सय्यद यांच्या नेतृत्वाखाली झालेली ही निवडणूक बिनविरोध झाली असून निवडणूक जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्री.यू.आर.थिटे साहेब यांनी निकाल घोषित केला. विजयी उमेदवारांनी गुलाल उधळून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. दरम्यान सन २०२४ ते २०२९ या पंचवार्षिक साठी पदाधिकाऱ्यांच्या निवडी कऱण्यात आल्या. शब्दाला जागणारे कामगार नेते इरफानभाई सय्यद यांना निष्टेने मानणारा सभासद वर्ग व त्यांच्या दूरदृष्टीचे प्राबल्य यावेळी दिसून आले. पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सतीशजी कंठाळे , उपाध्यक्षपदी श्रीकांत मोरे, सचिव ज्ञानेश्वर घनवट, खजिनदार रोहित…

Read More

पिंपरी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रवाशांच्या सोयीचे वाहन म्हणजे रिक्षा. रिक्षाच्या माध्यमातून व्यावसाय करून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील 20 लाख रिक्षा चालकांकडे सरकारचे दुर्लक्ष झाले असून त्यांना महामंडळ द्वारे सामाजिक सुरक्षा द्यावी, अपघाती विमा संरक्षण द्यावे यासह विविध मागण्यांसाठी आज भक्ती शक्ती चौक शिल्पसमूह निगडी ते आकुर्डी चौक चिंचवड स्टेशन ते पिंपरी येथे रिक्षा चालकांनी रिक्षासह मोर्चा काढून आपल्या मागण्या बुलंद केल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार नॅशनल ट्रेडमॅन युनियन, कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे या मोर्चाचे आयोजन कामगार नेते राष्ट्रवादी संघटित कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नखाते यांच्या नेतृत्व हे आंदोलन करण्यात आले. यावेळी यावेळी प्रदेश सरचिटणीस तुषार घाटूळे,…

Read More

पिंपरी ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रवि लांडगे हे ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश कऱणार आहेत. लांडगे यांनी शनिवारी मुंबई येथे शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांची दै. सामना कार्यालयात जाऊन भेट घेतली. तब्बल अर्धा तास दोघांमध्ये भोसरी मतदारसंघावर चर्चा झाली. भोसरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार म्हणून सर्वाधिक चर्चेत असलेले माजी नगरसवेक रवि लांडगे यांनी आज शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. या भेटीत आगामी विधानसभा निवडणुकीबाबत दोघांमध्ये चर्चा झाल्याचे समजते. त्यामुळे भोसरी मतदारसंघात रवि लांडगे हे शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून लढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसे झाल्यास या मतदारसंघात भाजप विरूद्ध शिवसेना उद्धव ठाकरे गट म्हणजे…

Read More

सारसबाग येथून रॅलीला होणार सुरुवात पिंपरी चिंचवड शहरातील समाज बांधवांनी सहभागी व्हावे पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा समाजास ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी विविध प्रकारची आंदोलने करत आहेत.मराठा समाजात जनजागृती व्हावी व समाजासमाजात शांतता निर्माण व्हावी यासाठी मनोज जरांगे पाटील यांचा बुधवार दिनांक 7 ऑगस्ट पासून पश्चिम महाराष्ट्रात दौरा सुरू आहे.सोलापूर, सांगली,कोल्हापूर,सातारा जिल्ह्यांचा दौरा करून जरांगे पाटील रविवारी ( दिनांक. 11) रोजी पुण्यात येत आहेत.या दौऱ्याच्या नियोजनासाठी पुणे जिल्ह्य़ातील हजारो कार्यकर्ते गेल्या अनेक दिवसांपासून नियोजन करत आहेत. पिंपरी चिंचवड शहरात शेकडो मराठा सेवक नियोजन करत असून यासाठी शहरात विविध ठिकाणी अनेक…

Read More

आमदार श्री पै महेशदादा लांडगे यांच्या माध्यमातून पायाभूत सोयी-सुविधा सक्षम करण्यावर भर भोसरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कुदळवाडीमधील वैष्णव रेसीडेन्सी, राँयल प्लाझा, रिगल रेसीडेन्सी, कस्तुरी फ्लोरा, अक्षा एलीगन्स, विस्ता सोसायटी, कुदळवाडी येथे दिनेश यादव यांनी सदिच्छा भेट देऊन येथील समस्यांची पाहणी केली. येथील रहिवाशांसोबत विविध समस्यांसंदर्भात चर्चा करून त्या सोडविण्यासाठी आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण प्रयत्नशिल असल्याची ग्वाही येथील रहिवाशांना दिली. यावेळी यादव यांच्यासोबत निलेश नेवाळे, शिवराज लांडगे,अरुण पाडुळे, सुहास ताम्हाणे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. कुदळवाडी भागात नव्याने विकसीत झालेल्या सोसायटी नव्याने वास्तव करण्यासाठी आलेले नागरिक यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सोसायटी जाऊन बैठक घेऊन नागरिकांशी हितगूज केली. मोशी…

Read More

– शिवस्वराज्य यात्रेनिमित्त आयोजित भोसरीतील सभेत गंभीर आरोप भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नगरपरिषदा, महानगरपालिका नागरिकांना सोयीचे व्हावे म्हणून निर्माण झाल्या. मात्र सध्या जाणीवपूर्वक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबविल्या जात आहेत. स्थानिक आमदार आपल्या सोयीने येथे अधिकारी आणतात. यातून मनमानी कारभार केला जातो. अशाच पद्धतीने पिंपरी चिंचवड पालिकेचाही कारभार सुरू असून सध्याच्या घडीला पिंपरी चिंचवड पालिका भ्रष्टाचाराचा अड्डा बनली आहे असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान शिवनेरी किल्ल्याच्या पहिल्या पायरीचे दर्शन घेऊन महाराष्ट्रात रयतेचे राज्य आणण्याचा निर्धार करत शुक्रवारी (दि. 9) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र…

Read More

– आमदार महेश लांडगे यांच्या सूचनेला प्रशासनाचा प्रतिसाद – सखल भागात पाणी साचण्याची समस्या कायमस्वरुपी सुटणार भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भोसरी विधानसभा मतदार संघातील चक्रपाणी वसाहत परिसरातील ‘ड्रेनेज लाईन’चे महानगरपालिका प्रशासनाकडून सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. अगामी काळात सांडपाणी निचरा व्यवस्था सक्षम करण्यात येणार आहे. आगामी काळात पाणी साचण्याची समस्या कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. चक्रपाणी वसाहतीमधील मधुबन कॉलनी १ ते ५, शिवशंभू कॉलनी १ ते ५, मंजुळा कॉलनी अशा कॉलनींमध्ये पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचते. महानगरपालिका प्रशासनाकडून सर्व्हेक्षणाचे काम पूर्ण करुन आवश्यकता भासल्यास नवीन ड्रेनेज लाईन टाकण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे, पिंपरी-चिंचवडसह मावळच्या…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड येथील कमला शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीजचे प्राचार्य अरुण कुमार वाळुंज, सीईओ राजेंद्र कांकरिया, उपप्राचार्या क्षितिजा गांधी, आय क्यू एसी कॉर्डिनेटर जयश्री मुळे, डॉ. हर्षिता वच्छानी एचओडी ऑफ सी.एस., हेड, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट तसेच सुप्रिया गायकवाड व उज्वला फलक यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर जनजागृती दिवस साजरा करण्यात आला. तसेच प्रतिभा महाविद्यालय व क्विक हिल फाउंडेशन यांच्यामध्ये सायबर जनजागृती करार करण्यात आला. या प्रकल्पामध्ये महाविद्यालयातील प्रथम वर्षाचे तसेच द्वितीय वर्षातील विद्यार्थी समाविष्ट आहेत. 7 ऑगस्ट रोजी सायबर जनजागृती दिवस महाविद्यालयाद्वारे साजरा करण्यात आला. यामध्ये सायबर क्लब प्रेसिडेंट…

Read More

अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वर्धापन दिन सोहळ्यात हट्टंगडी यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – इतर माध्यमे आल्याने नाटक आणि चित्रपट माध्यमात बदल झाले आहेत. त्यामुळे सतत शिकत राहिले पाहिजे. या क्षेत्रात काम करताना आपण नेहमी आपली प्रतिष्ठा जपायला हवी, असही कानमंत्र जेष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी आज चिंचवड येथे बोलताना दिला. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी- चिंचवड शाखेच्या वतीने आयोजित केलेल्या वर्धापन दिन सोहळ्यात प्रसिद्ध अभिनेते अजित भुरे यांच्या हस्ते हट्टंगडी यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पन्नास हजार रोख, शाल श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी नाट्य परिषदेच्या…

Read More

अभियानामाध्यमातून मतदारसंघातील सर्व नागरिकांशी संवाद साधणार पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी क्रांतिदिनाच्या दिवशी ‘चला बोलूयात परिवर्तनासाठी’ या अभियानाला सुरवात केली आहे. चिंचवड गावातील हुतात्मा चाफेकर बंधूंच्या पुतळ्याला अभिवादन करून या अभियानाला सुरवात करण्यात आली. भाऊसाहेब भोईर युवा मंचच्या वतीनं संपूर्ण चिंचवड विधानसभा मतदार संघात हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाअंर्तगत चिंचवड विधानसभेतील विविध क्षेत्रातील मान्यवरांसह सर्वसामान्य लोकांशी संवाद साधत त्यांचे प्रश्न जाणून घेत त्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात येणार आहे. आज सकाळी अभियानाचा प्रारंभ करताना भाऊसाहेब भोईर यांच्यासह माजी नगरसेवक सुरेश भोईर, अनंत कोराळे, गणेश लोंढे, सामाजिक कार्यकर्ते निलेश डोके, आप्पा…

Read More