Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाच्या निवडीसाठी आज पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामधील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृह येथे स्थायी समितीची विशेष सभा पार पडली. सदर विशेष सभेत स्थायी समिती सभापती पदासाठीची निवडणूक प्रक्रिया पार पडली. स्थायी समिती सभापती पदासाठी प्राप्त नामनिर्देशन अर्जांची छाननी करण्यात आली असता अभिषेक बारणे यांचा एकमेव अर्ज वैध ठरला. इतर कोणताही अर्ज प्राप्त न झाल्यामुळे अभिषेक बारणे यांची स्थायी समिती सभापती पदावर बिनविरोध निवड झाल्याचे पिठासीन अधिकारी एम.जे.प्रदीप चंद्रन यांनी जाहीर केले. निवडणूक कार्यालयास आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, नगरसचिव मुकेश कोळप,मुख्य लेखा…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आर्थिक वर्ष २०२६-२७ चे अंदाजपत्रक महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांचेकडे सादर केले. हे अंदाजपत्रक मूळ ५ हजार ६६० कोटी ७३ लाख (आरंभीच्या शिल्लकेसह) रूपयांचे तर केंद्र व राज्य शासनाच्या पुरस्कृत योजनांसह ९ हजार ३२२ कोटी १७ लाख रूपयांचे असल्याचे यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. यावेळी स्थायी समिती सदस्य शालिनी गुजर, मनिषा चिंचवडे, संदीप कस्पटे, सारीका गायकवाड, योगिता नागरगोजे, कृष्णा सुरकुले, शीतल वर्नेकर, अर्चना कारंडे, मधुरा शिंदे, बाबासाहेब त्रिभुवन, सविता आसवानी, संतोष कोकणे, संदीप वाघेरे, विकास साने, सुलभा उबाळे यांच्यासह अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  सांस्कृतिक वार्तापत्र प्रकाशित ‘हिंदू जागरणाच्या १०० वर्षांची संघर्षयात्रा’ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा शुक्रवार, २७ फेब्रुवारी २०२६ रोजी उत्साहात पार पडला. शंभर वर्षांच्या हिंदू समाजजागरणाच्या वाटचालीचा सविस्तर आढावा घेणारा हा ग्रंथ राष्ट्रीय अस्मिता आणि समाजपरिवर्तनाचा दस्तऐवज ठरत आहे. या पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चे जिल्हा कार्यवाह मा. श्री. नरेंद्रजी पेंडसे यांच्या शुभहस्ते झाले. कार्यक्रमास भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष श्री. शत्रुघ्न (बापू) काटे प्रमुख उपस्थित होते. तसेच सांस्कृतिक वार्तापत्रचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत विक्री अधिकारी श्री. निखिल देविदास वझे यांचीही उपस्थिती लाभली. ग्रंथामध्ये गेल्या शतकातील हिंदू समाजजागरणाची वाटचाल, विविध सामाजिक व राष्ट्रीय चळवळी,…

Read More

मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पुणे जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. सांगवी येथील पुणे जिल्हा रुग्णालयातील आयसीयू बेडची संख्या वाढविण्यासोबतच नवजात शिशु अतिदक्षता विभाग (‘एसएनसीयू’) बेड चे संख्या वाढवण्या बाबत आश्वासन आरोग्य राज्यमंत्री मा. मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी विधानसभेत दिले. चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी दरम्यान त्यांनी ही माहिती दिली. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान आमदार शंकर जगताप यांनी आरोग्य सेवांच्या दुरावस्थेकडे सभागृहाचे लक्ष वेधले. सांगवी येथील जिल्हा रुग्णालयातील सध्याची स्थिती समाधानकारक नसल्याचे सांगत, त्यांनी तेथील अतिदक्षता विभागाची क्षमता वाढविण्याची गरज व्यक्त केली. विशेषतः ग्रामीण भागातील रुग्णांना आणि लहान बालकांना वेळेवर उपचार मिळावेत,…

Read More

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे‑पाटील यांचे अधिकाऱ्यांना कडक निर्देश पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी‑चिंचवड महानगरपालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या भागांना लवकरच स्वच्छ व सुरळीत पाणीपुरवठा होणार आहे. यासाठी आंद्रा धरण येथून अधिक प्रवाहाने पाणी सोडण्याचे तसेच इंद्रायणी नदी पात्रातील निघोजे बंधारा तातडीने स्वच्छ करण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. पिंपरी-चिंचवड शहराला मावळ परिसरातील पवना धरण आणि आंद्रा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. आंद्रा धरणातून सोडण्यात येणारे पाणी निघोजे बंधाऱ्यामार्गे इंद्रायणी नदीतून उचलून चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करून समाविष्ट भागातील नागरिकांना वितरित केले जाते. मात्र मोशी, चिखली, चऱ्होली, चोविसावाडी, डुडुळगाव आणि बोऱ्हाडेवाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  कोरोना काळात नागरिकांच्या नोकऱ्या, उद्योग व व्यवसायांवर मोठा परिणाम झाला होता. आर्थिक स्थिती ढासळलेल्या अनेक नागरिकांवर महापालिकेच्या मालमत्ता करावरील व्याजाचा अतिरिक्त बोजा पडला होता. या पार्श्वभूमीवर व्याजमाफीसाठी ‘अभय योजना’ राबविण्याची मागणी करण्यात आली होती. सामाजिक कार्यकर्ते विशाल काळभोर यांनी ३१ जानेवारी २०२५ रोजी महापालिका आयुक्तांना लेखी निवेदन देत ही योजना लागू करण्याची मागणी केली होती. तसेच दिवंगत नेते अजित पवार यांनाही पत्राद्वारे यासंदर्भात मागणी कळविण्यात आली होती. या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने मालमत्ता करावरील व्याजमाफीची ‘अभय योजना’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे थकबाकीदार नागरिकांना मोठा दिलासा मिळणार…

Read More

पिंपळे सौदागर (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात व अभिमानाने साजरा करण्यात आला. या निमित्ताने मराठी साहित्य परंपरेप्रती कृतज्ञता व्यक्त करत विधिवत ग्रंथपूजन करण्यात आले तसेच ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज अर्थात विष्णू वामन शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी मराठी भाषेच्या संवर्धनाचा संकल्प करण्यात आला. मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून ती आपल्या संस्कृतीची, इतिहासाची आणि अस्मितेची ओळख आहे, या भावनेतून उपस्थितांनी मराठीच्या जतनासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला. भारतीय शास्त्रीय, उपशास्त्रीय तसेच भक्तिसंगीत क्षेत्रातील प्रख्यात गायक पंडित राजाराम उर्फ राजा काळे यांनीही आपली…

Read More

मराठी भाषा गौरव दिनी ‘माय मराठीची गौरवगाथा’चा सुरेल जल्लोष! पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  खंजिरीच्या ठेक्यावर दणदणणारा भारदस्त आवाज… शब्दागणिक सामाजिक प्रबोधनाची ठिणगी पेटवणारी शाहिरी… आणि लोकसंगीताच्या सुरावटीतून मायमराठीच्या अस्मितेचा, परंपरेचा व अभिमानाचा जागर घडवणारा सुरेल महोत्सव… अशा दिमाखदार वातावरणात पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला ‘माय मराठीची गौरवगाथा’ हा सांस्कृतिक सोहळा रंगला. सुर, ताल आणि ओजस्वी शब्दांच्या संगमातून साकारलेला हा कार्यक्रम म्हणजे जणू मराठी संस्कृतीच्या वैभवाचा साक्षात उत्सवच ठरला. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने महापालिकेच्या वतीने आणि श्री भैरवनाथ सार्वजनिक ग्रंथालय भोसरी व हुतात्मा चापेकर सार्वजनिक ग्रंथालय चिंचवड यांच्या सहकार्याने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण…

Read More

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ज्येष्ठ तमाशा कलावंत पद्मश्री रघुवीर तुकाराम खेडकर यांचा नागरी सन्मान पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – कष्टकऱ्यांची उद्योगनगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड शहरात महापालिकेने माझा नागरी सन्मान करून प्रत्यक्षात सर्व कलावतांचा गौरव केला आहे. हा सन्मान केवळ माझा वैयक्तिक सन्मान नसून तमाशा आणि लोककलेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक कलावंताचा सन्मान आहे. या गौरवामुळे माझी जबाबदारी अधिक वाढली असून मला नव्या उर्जेने काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे. आयुष्यभर ज्या कलेने मला ओळख दिली, त्या कलेच्या माध्यमातून मी पुढेही निष्ठापूर्वक लोकांची सेवा करत राहीन, असे प्रतिपादन ज्येष्ठ तमाशा कलावंत पद्मश्री रघुवीर तुकाराम खेडकर यांनी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – शहरातील थकीत मालमत्ताकर वसुलीस गती देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने १ मार्च २०२६ पासून विशेष ‘अभय योजना’ जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत निवासी, बिगरनिवासी, औद्योगिक तसेच मोकळ्या जागांच्या थकबाकीदारांना मनपा करावरील विलंब दंडात तब्बल ९० टक्के सवलत देण्यात येणार आहे. ही योजना ३१ मार्च २०२६ पर्यंत मर्यादित कालावधीसाठी लागू राहणार आहे. शहराच्या विकासासाठी मालमत्ताकर हा प्रमुख महसूल स्त्रोत असून रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सेवा व शिक्षण यांसारख्या मूलभूत सुविधा नागरिकांच्या करातून उभ्या राहतात. आतापर्यंत सुमारे ५ लाखांहून अधिक मालमत्ताधारकांनी प्रतिसाद देत ७४७ कोटी रुपयांचा मालमत्ताकर भरला आहे. मात्र, अद्याप सुमारे २ लाख १२ हजार ४४०…

Read More