- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित वूई टुगेदर फाउंडेशन व मधुकर बच्चे युवा मंच तसेच ईशा नेत्रालंय यांच्या वतीने चिंचवड व परिसरातील नागरिकांसाठी मोफत आत्याधुनिक नेत्र तपासणी व तज्ञ डॉ मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. वूई टुगेदर फाउंडेशन सल्लागर मधुकर बच्चे यांच्या पुढाकाराने व वूई टुगेदर फाउंडेशन ,ईशा नेत्रालय यांच्या सौजण्याने हे शिबीर घेण्यात आले. परीसरातील अनेक नागरिकांनी या शिबीराचा लाभ घेतला. वूई टुगेदर फाउंडेशनचे अध्यक्ष सलीम सय्यद, जयंत कुलकर्णी, अनिल पोरे, अरविंद पाटील, रवींद्र काळे, मंगला डोळे -सपकाळे, अर्चना बच्चे,रोहिणी बच्चे,काजल बच्चे,दिलीप पेटकर, जावेद शेख,पोपट बच्चे,गणेश बच्चे,अक्षय गारगोटे,आकाश खिल्लारे,दत्ता औंदकर, द्वार्कानाथ कुलकर्णी, आदिनी शिबीर यशस्वी…
*पिंपरी-चिंचवड साहित्य मंच आयोजित* 🕉️ *शिवदर्शन* 🕉️ *लेखन- सौ. माधुरी शिवाजी विधाटे, पुणे* *विरुपाक्ष शिवमंदिर,हंपी* *१२ ऑगस्ट २०२४* *द्वितीय श्रावणी सोमवार* हंपी मधील आल्हाददायक संध्याकाळ. सूर्यकिरणे नुकतीच कलायला लागली होती. अशावेळी प्रचंड आकाराच्या शिळांनी वेढलेल्या परिसरामध्ये भव्य, उंच व नक्षीदार गोपुर दृष्टीला पडले. हे हंपी मधील सर्वात प्राचीन शिवमंदिर असून विरूप अक्ष असलेले शिवमंदिर म्हणून विरूपाक्ष मंदिर या नावाने ओळखले जाते .हे शिवमंदिर विजयनगर साम्राज्याच्या उदय व अस्ताचे साक्षीदार आहे .रामायण काळातील या पवित्र किष्किंधा क्षेत्रामध्ये विरुपाक्ष महादेवांना पंपापती या नावाने म्हणजेच पार्वती देवींचे पती या नावाने संबोधले जाते. हेमकूट पर्वतपायथ्याशी हे द्रविडीयन स्थापत्य कलेतील सुंदर मंदिर मोठ्या डौलाने उभे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – साई सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशन व ऑल इंडिया वुमेन राइट्स असोशियन यांच्यातर्फे वर्ल्ड बेस्ट सिस्टर अवॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड दिनांक 10/08/24 रोजी ईस्ट कोर्ट फिनिक्स मॉल येथे आयोजित करण्यात आला होता.विश्वास गजरमल यांना समाजभूषण पुरस्कारने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार कार्यक्रमात वेगवेगळ्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अशा व्यक्तींना इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कार 2024 ने गौरवण्यात आले . त्यात मा,नगरसेवक विश्वास गजरमल यांना ते करत असलेले समाजकार्य या करिता पिंपरी चिंचवड समाजभूषण पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती श्री मदन कोठुळे स्पोर्ट ऑर्गनायझर, बॉबी कारणानी अध्यक्ष वी एन…
भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – लायन्स क्लब ऑफ पुणे भोसरीचा पदग्रहण सभारंभ हॉटेल ब्लू वॉटर, रावेत येथे नुकताच पर पडला. यावेळी लायन मनिषा माने यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ घालण्यात आली. व क्लब च्या या सर्वोच्च अशा अध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांनी आनंदाने स्वीकारली. या वर्षी वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन,चाईल्ड कॅन्सर, तसेच ग्रामीण भागातील शाळेतील विद्यार्थ्यांना लागणारी मदत अशी अनेक समाजउपयोगी कामे करण्याचा त्यांचा मानस आहे. सचिव पदाची जबाबदारी लायन रुपाली मिरासदार तर खजिनदार म्हणून लायन राखी झोपे यांची करण्यात आली आहे. या वेळी क्लब तर्फे पंढरीनाथ विद्या विकास मंडळ या शाळेतील विध्यार्थ्यांकरिता सायन्स लॅब साहित्य घेण्यासाठी 25 हजार रुपयांची ची आर्थिक…
माजी नगरसेवक ॲड.विनायक रमेश गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन करीत स्पर्धेस सुरुवात वाकड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वाकड परिसरात वेणुनगर ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने ज्येष्ठांसाठी १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. आज ह्या कॅरम स्पर्धेचे मा.नगरसेवक ॲड.विनायक रमेश गायकवाड ह्यांनी उद्घाटन करीत सामन्यांची सुरुवात केली. परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी ह्या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत, यामध्ये एकेरी व दुहेरी स्पर्धा असणार आहेत. वेणुनगर ज्येष्ठ नागरिक सघ यांच्यावतीने ह्या स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. ह्या स्पर्धेस ज्येष्ठ सभासदांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत ५० स्पर्धकांनी सहभाग घेतलेला आहे. १४ ऑगस्ट पर्यंत ह्या स्पर्धा असून १५ ऑगस्ट स्वतंत्र दिनी आतीम सामना असेल.…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शहरातील क्रीडा संस्कृती जपण्यासाठी तसेच जास्तीत जास्त खेळाडूंना राष्ट्रीय तसेच जागतिक पातळीवर नावलौकीक मिळावा, त्यांना योग्य मार्गदर्शन आणि प्रशिक्षण मिळावे यासाठी महापालिकेच्या वतीने विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या सोयीसुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी तसेच उद्योगनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवड शहराला क्रिडाविषयक वेगळी ओळख देण्यासाठी सी.एस.आर उपक्रमातंर्गत अधिकाधिक कंपन्यांमधील अनुभवी प्रतिनिधींचे मार्गदर्शन आणि मनुष्यबळ महापालिकेस हवे आहे, असे मत अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सी.एस.आर कक्ष अंतर्गत महापालिका कार्यक्षेत्रातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्या तसेच विविध उद्योग समुह यांच्याद्वारे सी.एस.आर अंतर्गत सामाजिक उपक्रम राबवून त्याचा वापर शहरातील क्रिडाविषयक सोयीसुविधांसाठी करता…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मुंबई उच्च न्यायालय, जिल्हा व सत्र न्यायालय – पुणे, नेहरूनगर न्यायालय – पिंपरी तसेच पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने वकिलांसाठी ई-फायलिंग आणि संगणकीय प्रशिक्षण कार्यक्रम शनिवारी पिंपरीतील नेहरूनगर न्यायालयात संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन नेहरूनगर न्यायालयातील न्यायाधीश एस. एस. चव्हाण, एस. एन. गवळी, पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. रामराजे भोसले, ई-फायलिंग व संगणकीय प्रशिक्षक ॲड. अतिश लांडगे, ॲड. लालचंद ओसवाल यांनी केले. ‘काळानुरूप बदलून नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे!’ असे मत ई-फायलिंगबद्दल बोलताना न्यायाधीश एस. एन. गवळी साहेबांनी केले. ‘या शिबिराचा लाभ सर्व ज्युनिअर आणि सीनिअर वकिलांनी घ्यावा!’ असे आवाहन एस.…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चित्रपटसृष्टीतील प्रतिभाशाली गायक किशोरकुमार यांच्या ९५व्या जयंतीनिमित्त विविध भारती म्युझिकल इव्हेंट प्रस्तुत ‘ओ माझी रे…’ या किशोरकुमार यांनी गायलेल्या गीतांच्या नि:शुल्क दृकश्राव्य मैफलीत श्रोते तल्लीन झाले. निगडी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृह (छोटे सभागृह) येथे शनिवार, दिनांक १० ऑगस्ट २०२४ रोजी आयोजित करण्यात आलेल्या या विशेष सांगीतिक अभिवादन मैफलीत दिशा सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेब जवळकर, उपाध्यक्ष संतोष बाबर, संचालक प्रवीण कुदळे, ज्येष्ठ साहित्यिक प्रदीप गांधलीकर, राजेंद्र पगारे, परमेश्वर घाटगे, विलास खरे, राजेंद्र लढ्ढा, नितीन नखाते, नरेंद्र मोहिते यांच्यासह विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. अतिथीगायक किशोरभक्त तुषार पिंगळे यांच्या सहभागासह विनायक कदम, सुजाता माळवे,…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रश्मी गुजराथी लिखित ‘कळीची फजिती’ या ९व्या बालकथासंग्रहाचे प्रकाशन साक्षी जाधव आणि अस्मानी गुजराथी या शालेय विद्यार्थिनींच्या हस्ते वैष्णोमाता प्राथमिक विद्यामंदिर, इंद्रायणीनगर, भोसरी येथे शनिवार, दिनांक १० ऑगस्ट २०२४ रोजी करण्यात आले. मुख्याध्यापिका आणि कवयित्री वंदना इन्नाणी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या; तसेच ज्येष्ठ साहित्यिक प्रदीप गांधलीकर, रवींद्र गुजराथी, सुरेश धायरकर, सुरेश इन्नाणी, लेखिका रश्मी गुजराथी यांच्यासह इयत्ता पाचवी ते सातवीतील प्रथम क्रमांक पटकाविणारे विद्यार्थी या प्रकाशनसोहळ्यात सहभागी झाले होते. दीपप्रज्वलन आणि सरस्वतीस्तवनाने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. रश्मी गुजराथी यांनी आपल्या मनोगतातून, “कुंभार जसा मातीच्या गोळ्याला आकार देतो तसाच बालसाहित्याच्या माध्यमातून त्यांना सुसंस्कारित करण्याचा मी प्रयत्न…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड रिसर्च (पीसीसीओईआर) येथे ‘नवधारा – २०२४’ या राज्यस्तरीय प्रकल्प व पोस्टर्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत कम्प्युटर विभागात विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, पुणे तर इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन विभागात पीसीसीओई, निगडी संघाने प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशासकीय सेवेचे सहायक संचालक डॉ. मारुती जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सासाई कंपनीचे उपाध्यक्ष केतन नवले, कि डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचे संचालक अभिलाश एम. टी., आयबीएम कंपनीचे सॉफ्टवेअर आर्किटेक्ट सर्वेश पटेल, मॅग्ना इंडियाचे सिनिअर लिड इंजिनिअर भिमसेन पुरोहीत, कमिन्टेस…
