Author: maharashtrabreakingnews.com

नाशिक फाटा ते मोशी अंतरावर तीन ‘जंक्शन- सब-वे’ – ‘एलिव्हेडेट कॉरिडॉर’ च्या प्रकल्पाबाबत अधिकाऱ्यांची माहिती – आमदार लांडगे, आयुक्त सिंह अन्‌ ‘एनएचएआय’ची बैठक पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –नाशिक फाटा ते खेड दरम्यान एलिव्हेटेड कॉरिडॉरचे काम सुरू झाल्यानंतर शहरातील सर्वसामान्य पिंपरी-चिंचवडकरांना वाहतूक कोंडीचा त्रास होवू नये. या करिता कामाच्या पहिल्या टप्प्यात जय गणेश साम्राज्य स्पाईन रोड, भारतमाता चौक मोशी आणि भोसरी येथील वाहतुकीला अडथळा होवू नये या करिता तीनही प्रस्तावित जक्शन व सब-वेचे काम प्राधान्याने हाती घ्यावे, अशी सक्त सूचना भाजपा आमदार महेश लांडगे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिली आहे. पुणे-नाशिक महामार्गावरील नाशिक फाटा ते खेड ८ पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉरला…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आज अजंठा नगर भोपळे चौक येथे काँग्रेस पक्ष जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन माजी गृहराज्यमंत्री रमेश  बागवे   गोपाल दादा तिवारी (प्रवक्ते महा. प्रदेश काँग्रेस कमिटी ) यांच्या हस्ते व  भरत वाल्हेकर (वरिष्ठ उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी ) यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माजी नगरसेवक विश्वास गजरमल यांच्या उपस्थितीत झाले. सदर कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करताना  रमेश दादा बागवे यांनी असे सांगितले की जनसंपर्क कार्यालय व शाखेची स्थापना हा उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने राबवला जात आहे. जेणेकरून काँग्रेस पक्ष या उपक्रमामार्फत घरोघरी पोहोचत आहे असेच अनेक ठिकाणी देखील काँग्रेसचे जनसंपर्क कार्यालय व शाखा यांचे उद्घाटन करून संपूर्ण पिंपरी चिंचवड शहराला काँग्रेसमय करण्यासाठी रमेश…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे!” असे प्रतिपादन ज्येष्ठ प्रवचनकार डॉ. संजय उपाध्ये यांनी चिंचवड येथे व्यक्त केले. गांधीपेठ तालीम मित्रमंडळ आयोजित ‘मन करा रे प्रसन्न!’ या मासिक प्रवचनमालिकेंतर्गत ‘स्वातंत्र्य म्हणजे काय रे भाऊ?’ या विषयावर ६०वे प्रवचनपुष्प गुंफताना डॉ. संजय उपाध्ये बोलत होते. ह. भ. प. पुरुषोत्तममहाराज पाटील, किसनमहाराज चौधरी, साहित्यिक श्रीकांत चौगुले, नाना शिवले, गांधीपेठ तालीम मित्रमंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवरांची सभागृहात उपस्थिती होती. याप्रसंगी श्रीकांत चौगुले यांनी, “एकाच ठिकाणी एकाच वक्त्याकडून विविध विषयांवर सातत्याने प्रवचन होणे हा एक विक्रम आहे!” असे मत व्यक्त केले; तर नाना शिवले यांनी, “पिंपरी…

Read More

रविवारी विशाल हिंदू जनगर्जना मोर्चा – सकल हिंदू समाजातर्फे आयोजन – शहरातील हिंदू एकवटणार चिंचवड (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – बांगलादेशातील निष्पाप हिंदूंवर होणारे अनन्वित अत्याचार, अमानुष हत्या तसेच हिंदू मंदिरांवरील हल्ल्यांच्या निषेधार्थ व तेथील हिंदूंच्या सुरक्षिततेच्या प्रमुख मागणीसाठी सकल हिंदू समाजातर्फे शहरात विशाल हिंदू जनगर्जना मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि.१८ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे पुतळा चौक चिंचवड स्टेशन येथून या मोर्चाला सुरुवात होणार असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक पिंपरी येथे मोर्चाचा समारोप होणार आहे. या मोर्चात शहरातील समस्त हिंदू बांधव, भगिनींनी आणि संघटनांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन सकल हिंदू समाज पिंपरी चिंचवड*…

Read More

स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने उन्नती सखी मंचची देखील स्थापना पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपळे सौदागर स्थित उन्नती सोशल फाउंडेशन व इंडो ॲथलेटिक सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगा सन्मानार्थ सायकल रॅली २०२४ आयोजित करण्यात आली. पर्यावरण संवर्धन जागृतीसाठी यंदाच्या वर्षाची थीम ‘पेडल फॉर ग्रीन इंडिया’ ही होती. या अंतर्गत , स्पर्धकांना पर्यावरण संवर्धनासाठी सीड बॉल चे वाटप करण्यात आले. या सायकल रॅलीचा प्रारंभ उन्नती सोशल फाउंडेशन येथून करण्यात आला. उन्नती सोशल फाऊंडेशन कार्यालय -मुकाई चौक रावेत आणि उन्नती सोशल फाउंडेशन कडे समारोप संपन्न झाला. एकूण १००० स्पर्धकांनी या सायकल रॅलीसाठी सहभाग नोंदवला. सहभागी स्पर्धकांना टी-शर्ट , ट्रॉफी ,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बालेवाडी स्टेडीयम, पुणे येथे १७ ऑगस्ट २०२४ रोजी होणाऱ्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत होणाऱ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काल मध्यरात्रीपासून ते आज (दि. १७) रात्री १२ वाजेपर्यंत सर्व प्रकारची जड अवजड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी आदेश जारी केले आहेत. पुणे-सोलापूर, पुणे-सातारा, पुणे- अहमदनगर, पुणे- नाशिक, पुणे मुंबई (जुना) व पुणे मुंबई द्रुतगती या मार्गावरील सर्व प्रकारची जड अवजड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले असून या कार्यक्रमासाठी येणाऱ्या लाभार्थी यांची वाहने व शासकीय अधिकारी-कर्मचारी व पदाधिकारी, अत्यावश्यक सेवेतील वाहने आदी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित  पवार हे पिंपरी चिंचवड शहरांमध्ये आले असता निगडी येथील भक्ती शक्ती शिल्प तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा स्पष्ट पार अर्पण केल्यानंतर निगडी येथील देशातील पहिले महिला रिक्षा स्टॅन्ड येथील रिक्षा मधून अजित दादा पवार यांनी रिक्षाने निगडी पर्यंत प्रवास केला. यावेळी महाराष्ट्र रिक्षा पंचायत संस्थापक अध्यक्ष बाबा कांबळे, घर का महिला सभा अध्यक्ष आशा कांबळे सह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Read More

*स्वातंत्र्य* ७८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांच्या बंधनातून मुक्त होऊन भारत देश स्वतंत्र झाला १५ ऑगस्ट १९४७ रोजी. हजारो क्रांतिकारक देशभक्त , ज्ञात अज्ञात अशा सर्वांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी रक्त सांडले, फासावर हसत हसत गेले. स्वातंत्र्याचे सुराज्य व्हावे ही माफक अपेक्षा खरचं पूर्ण झाली का? स्वातंत्र्याचा उपभोग घेणारी आजची माणसे 26 जानेवारी 15 ऑगस्ट, एक मे कामगार दिन याकडे फक्त त्या दिवशी मिळणारी सार्वजनिक सुट्टी म्हणून तर पहात नाहीत ना? असंख्य प्रश्न आज सर्व क्षेत्रात आ वासून उभे आहेत. भूक, बेकारी दारिद्र्य, उपासमार, शिक्षण, धर्मा धर्मातील जाती जातीतील भेद, वाढती लोकसंख्या, पाणी, वीज , शिक्षण, घरे, शेती उत्पादन इति साऱ्या प्रश्नांना गेल्या 78…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी – चिंचवड प्रादेशिक वाहन कार्यालयाजवळ, पेठ क्रमांक ९, मोशी प्राधिकरणातील साई पार्क सोसायटीत ७८ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. देशप्रेम, एकता आणि सामाजिक उत्तरदायित्व डोळ्यासमोर ठेवून तसेच नेहमी सामाजिक घटकांना केंद्रबिंदू मानून उत्सव साजरा करणाऱ्या साई पार्क सोसायटीत ७८ व्या स्वातंत्र्यदिवसानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त सुभेदार मेजर राजेश कापडे, ब्रेनोब्रेन ॲबॅकस किडस् ॲकॅडमी, पुणे येथील संचालिका स्मिता जाधव, मोशी उप अग्निशमन केंद्र अधिकारी विनायक नाळे, एम आय डी सी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सायबर क्राईम तज्ज्ञ तानाजी बनसोडे, पोलीस अधीक्षक अजय गुळमिरे, सोसायटीचे अध्यक्ष दीपक नाईक, खजिनदार कुणाल भुजबळ, नितीन यादव…

Read More

निगडी ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – निगडी प्राधिकरण येथे 78 वा स्वातंत्र्य दिन गरवी गुजराथी समाजाच्या वतीने पार पडला. ध्वजारोहन ज्येष्ठ  नागरिक  अण्णा अभंग यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी स्वातंत्र्य दिन निमित्त गरवी गुजराथी समाजाचे अध्यक्ष मुकेश चुडासमा, माजी उपमहापौर शैलजा मोरे,  शर्मिला बाबर, सरिता साने, जिगर व्यास, जयेश वडोदरिया, अमित शिसांगिया, रमेश चुडासमा, करण चुडासमा, प्रतिक गरड, प्रसेन अष्टेकर, सागर फलके आदी मान्यवरांनी ध्वजारोहन प्रसंगी उपस्थित राहून मानवंदना दिली.

Read More