- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने एक पेड माँ के नाम अर्थात एक वृक्ष आईच्या नावे या उपक्रमाची सुरुवात महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आली. तसेच दिव्यांग भवन व शहरातील दिव्यांग सामाजिक संघटना यांच्या वतीने भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून दिव्यांग बांधवांनी निगडी येथील भक्ती शक्ती चौक ते पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीपर्यंत तिरंगा सन्मान रॅली काढण्यात आली. पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड महापालिका, फिलिप्स ग्लोबल बिझनेस सर्व्हिसेस एलएलपी कंपनी आणि डीवायपी इन्फ्रा प्रायवेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड शहर व रांजणगाव एमआयडीसी परिसरामध्ये १६ हजार झाडे लावण्यात येणार असून या झाडांची देखभाल देखील…
शेकडो कर्मचाऱ्यांनी केला तंबाखू व्यसनमुक्तीचा निर्धार पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – स्वातंत्र्यदिनानिमित्त महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील प्रांगणात पार पडलेल्या राष्ट्रध्वजारोहण कार्यक्रमात अधिकारी आणि कर्मचा-यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्या उपस्थितीत “आम्ही शपथ घेतो की, आम्हाला तंबाखू, जर्दा, खर्रा तसेच बिडी, सिगारेट, ई हुक्का, ई सिगारेट यांच्या दुष्परीणामांची जाणीव आहे. म्हणून आम्ही जन्मभर, या व्यसनांपासून दूर राहण्याचा संकल्प करीत आहोत. आमचे कार्यालय, आमचे घर, आणि आमचे परिसर तंबाखूमुक्त रहावेत, तसेच इतरांनी तंबाखूजन्य पदार्थांचा परित्याग करावा, यासाठी आम्ही प्रयत्न करू. भारत सरकारच्या, २००३ च्या तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील राहू. आमच्या अधिपत्याखालील व जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था, शाळा व शासकीय कार्यालये तंबाखूमुक्त तसेच ई सिगारेटमुक्त करू. आम्ही,आमचे कार्यालय, आमचे घर, आमचे गाव, आमची शाळा, आमची…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्री मार्तंड देवस्थान, जेजुरी यांच्यावतीने राबविल्या जाणार्या ‘आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शालेय फीसाठी अर्थसाहाय्य’ या योजनेंतर्गत प्रमुख विश्वस्त अनिल सौंदडे यांच्या पुढाकारातून पिंपरी – चिंचवड शहरातील सुमारे ८२ विद्यार्थ्यांना धनादेश वितरित करण्यात आले. निगडी प्राधिकरणातील स्वर्गीय दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त मंडळ सभागृहात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यकारिणी सदस्य हेमंत हरहरे यांच्याहस्ते आणि क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती उपाध्यक्ष ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अशोक नगरकर यांच्या अध्यक्षतेखालील गुरुवार, दिनांक १५ ऑगस्ट २०२४ रोजी संपन्न झालेल्या या कार्यक्रमात क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती शिक्षण विभागप्रमुख प्रा. दिगंबर ढोकले, समिती सदस्य शाहीर आसराम कसबे, दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त मंडळाचे प्रदीप…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -स्वातंत्र्य दिनानिमित्त धैर्यशील जाधव यांच्या वतीने वाकड येथे देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला. ७८ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त वाकड येथे माजी सैनिकांचे सुपुत्र श्री धैर्यशील जाधव यांचे “डीजे नॉनव्हेज” या हॉटेल मध्ये देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम झाला.ते दरवर्षी 15 ऑगस्ट 26 जानेवारी या दिवशी आजी माजी सैनिकांना ते निमंत्रण देतात व आपल्या हॉटेलमध्ये सन्मान करून भोजन देतात, त्यानंतर गायन देशभक्तीपर गीते कविता, शेरोशायरी विनोदी किस्से व गप्पागोष्टी असा अनोखा कार्यक्रम ते दरवर्षी आवर्जून घेतात. ह्या वर्षी 15 ऑगस्ट निमित्त हा कार्यक्रम त्यांच्या हॉटेल मध्ये घेण्यात आला. मुळशी तालुका माजी सैनिक संघ चे सर्व सदस्य अध्यक्ष, कार्याध्यक्ष आवर्जून उपस्थित होते…
– पिंपरी पालिकेचे कोट्यवधींचे नुकसान – क्रिस्टल व ब्रिक्स कंपनीकडून बृहन्मुंबई महापालिका प्रमाणे पिंपरीतही गोलमाल – भाजप नेत्याच्या कंपनीसाठी काम सुरू असलेल्या कंपनीलाच ठरवले अपात्र – गैर कारभार न थांबल्यास न्यायालयात जाण्याचा विषय पिंपरी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पुणे जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेतील मोठी पोलखोल केली आहे. भाजप नेत्याशी संबंधित एका ठेकेदार कंपनीने दुसऱ्या कंपनीला हाताशी धरून पालिकेतील शाळांच्या दैनंदिन सफाई कामात ” रिंग ” केली असल्याचा गंभीर प्रकार उबाळे यांनी उघडकीस आणला आहे. या ठेकेदाराने अशाच प्रकारचा कारनामा बृहन्मुंबई महापालिकेत देखील केला होता. रिंग करून इतर ठेकेदारांना निविदा भरू दिली…
लाडक्या भावाकडून रक्षाबंधनाची ओवाळणी मिळाल्याने महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण लाडक्या बहिणींच्या जीवनात सुखाचे-आनंदाचे क्षण यावे हीच या भावाची इच्छा-मुख्यमंत्री पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) — महिलांच्या ढोल आणि लेझीम पथकाचे सादरीकरण, उत्सवाच्या वातावरणात सजलेला आणि महिला भगिनींनी फुललेला शिवछत्रपती क्रीडानगरीचा परिसर, महिलांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी महिलांना दिलेल्या शुभेच्छा… अशा उत्साहपूर्ण वातावरणात ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चा पुणे येथे राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात आला. महिलांच्या जीवनात सुखाचे, आनंदाचे दिवस यावे हीच भाऊ म्हणून प्रामाणिक इच्छा आहे आणि म्हणूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे बहिणींना दर महिन्याला दीड हजार रुपये माहेरचा अहेर मिळणार आहे, अशा भावपूर्ण शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी…
भव्य आणि नेटक्या कार्यक्रमाच्या आयोजनाने भगिनी भारावल्या पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –राज्यस्तरीय भव्य आणि नेटक्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार असल्याने आणि त्यापेक्षाही योजनेचा लाभ देणाऱ्या लाडक्या भावांची भेट होणार असल्याने कार्यक्रमाला आलेल्या महिला भगिनी अक्षरशः भारावून गेल्या. शिवछत्रपती क्रीडा संकुल येथील बॅडमिंटन हॉल मध्ये मुख्य कार्यक्रमाच्या व्यासपीठावर या योजनेच्या लाभार्थी भगिनींना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आदी मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात हा लाभ वितरण सोहळा दिमाखात संपन्न झाला. मुख्य व्यासपीठासमोर रांगोळीत भव्य राखी साकारण्यात आली होती. मुख्य सभागृहाच्या दोन्ही बाजूच्या हॉलमध्येही महिलांच्या बैठकीची व्यवस्था करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘लाडकी बहीण योजनेत खोडा घालणाऱ्या सावत्र भावांना जोडा दाखवा! दाखवणार ना?’ असा प्रश्न महिलांना करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेला सुरुवात केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनीही ‘पुढची ५ वर्षे योजना सुरू ठेवायची, तर आगामी निवडणुकीत आमची निवडणूक चिन्हे लक्षात ठेवा,’ असे आवाहन केले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते शनिवारी बालेवाडी क्रीडा संकुलात योजनेची सुरुवात करण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यावेळी उपस्थित होते. विरोधकांपैकी कोणीही पदाधिकारी वा आमदार कार्यक्रमाला हजर नव्हते. सावत्र भावांवर मात करून आलोय. तुम्ही त्यांना लक्षात ठेवा. काहीही बोलतात. मनाची नाही तर जनाची तरी ठेवा. नाद…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – साई सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशन व ऑल इंडिया वुमेन राइट्स असोशियन यांच्यातर्फे वर्ल्ड बेस्ट सिस्टर अवॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ईस्ट कोर्ट फिनिक्स मॉल येथे आयोजित करण्यात आला होता. या पुरस्कार कार्यक्रमात वेगवेगळ्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अशा व्यक्तींना इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कार 2024 देण्यात आला. यामध्ये सुधा प्रशांत ढवळे यांना क्रीडा महर्षी पुरस्काराने गौरवण्यात आले. सुधा ढवळे ह्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपिट स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज चिखली येथे क्रीडा शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत . आज 15 ऑगस्ट च्या स्कूल कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले डॉ सुरज गिरी, डॉ…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर प्री. प्रायमरी स्कुल, लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कुल, भारतीय विद्यानिकेतन विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये ७८ वा स्वातंत्र्यदिन विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दहावीमध्ये प्रथम आलेले विद्यार्थी श्रेया जालंदर खाडे, वेदांती दुर्वास कोदे, तसेच बारावीत प्रथम आलेले चंचल हिरालाल चौधरी व सना सलिम शेख यांच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, सचिव प्रणव राव, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, पश्चिम सांगवी ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रकाश देशमुख, मुख्याध्यापिका, तसेच जालंदर खाडे, दुर्वास कोदे, हिरालाल चौधरी, सलिम शेख यांच्या हस्ते सरस्वती व महात्मा…
