- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – देशात किंवा राज्यात ज्यावेळी एखादी महिला अत्याचाराची घटना घडते त्यानंतरच सरकारच्या सर्व सरकारी यंत्रणा तसेच पोलीस यंत्रणा खडबडून कामाला लागतात. मात्र या घटना घडूच नयेत यासाठी काही कठोर उपाययोजनांची कायमस्वरूपी अंमलबजावणी होणे अत्यंत गरजेचे असून किमान बदलापूरमधील घटनेनंतर तरी पिंपरी चिंचवड शहरासाठी गांभीर्याने पावले उचलली जावीत, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव चंद्रशेखर जाधव यांनी हवेलीचे तहसीलदार जयराज देशमुख यांच्याकडे केली आहे. बदलापूर येथे घडलेल्या अतिशय संतापजनक घटनेनंतर संपूर्ण राज्यभर उद्रेक पाहायला मिळत आहे. राजकीय पक्षांपासून सर्वसामान्य नागरिकही या घटनेबाबत रस्त्यावर उतरलेला दिसत आहे. सर्वच स्तरातून या घटनेचा निषेध केला जात आहे. या…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सध्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी योजनेची जोरदार चर्चा व सगळीकडे महिलांची धावाधाव सुरु आहे अनेक महिलांना या योजनेचे फॉर्म भरण्यास अडचणी येत आहेत त्यात बऱ्याच महिला अशिक्षित आहेत त्यांना तर पूर्ण फॉर्म दुसऱ्याकडून भरून घ्यावा लागतो त्यामुळे बऱ्याच लाभार्थी महिला या योजनेपासून वंचित राहू शकतात. वूई टुगेदर फाउंडेशनच्या वतीने सर्व बाबी लक्षात आल्यानंतर त्वरित सर्व पदाधिकारी व सदस्य या योजनेतील लाभार्थी महिलांच्या मदतीसाठी पुढे आले. चिंचवड येथील ऑफिस मध्ये या योजनेचा पदाधिकारी व सदस्य मिळून लाभार्थी महिलांचे पूर्ण फॉर्म भरून त्वरित ऑन लाईन आप लोड करून घेतले जातात.आतापर्यंत 265 फॉर्म भरून घेऊन आपलोड करून घेतले आहेत.बऱ्याच…
शाळेमध्ये अनुचित घटना घडु नये म्हणून समितीची स्थापना चिखली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आज पी.सी. एम. सी. पब्लिक स्कूल कुदळवाडी क्र. ८९ शाळेमध्ये सखी सावित्री समितीची स्थापना करण्यात आली. शासनाच्या आदेशानुसार शालेय विद्यार्थ्याची सुरक्षा त्यांना कोणत्याही प्रकारचा शारीरिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागणार नाही याची काळजी घेण्याचा उद्देश या समिती स्थापन करण्यामागचा आहे. त्याप्रसंगी निशा यादव व डॉ. सुजाता यादव , सौ. गायकर मॅडम चौधरी मॅडम , महिला पालक आश्विनी कांबळे व विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक संपत पोटघन यांनी समितीची रूपरेषा , कार्य व उपाययोजना यांची माहिती दिली. जेणेकरून शालेय वातावरण आनंदी , सुदृढ व भीतिमुक्त…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – लाइफस्टाइल स्टोअर, जे भारतातील प्रमुख फॅशन डेस्टिनेशन्सपैकी एक आहे, यांना सिटी वन मॉल, पिंपरी-चिंचवड, पुणे येथे त्यांच्या ऑटम विंटर 2024 (AW24) कलेक्शनचे लाँच साजरे करताना अत्यंत आनंद होत आहे. प्रसिद्ध अभिनेत्री आणि फॅशनची चाहती, मिथिला पालकर यांनी या कार्यक्रमात हजेरी लावून, नवीन कलेक्शनमधील त्यांच्या आवडत्या आउटफिट्सचे अनावरण केले, ज्यामुळे लाँचचा उत्साह आणखीनच वाढला. लाइफस्टाइलचे ऑटम विंटर 2024 कलेक्शन समकालीन स्टाइल आणि हंगामी ट्रेंडसाठी एक उत्तम पर्याय आहे, जो प्रत्येक प्रसंगासाठी विविधता देते. या कलेक्शनमध्ये वर्क केलेल्या आकर्षक कपड्यांपासून ते व्हायब्रंट प्रिंट्सपर्यंत अनेक प्रकारचे आउटफिट्स आहेत, जे तुमच्या रोजच्या पोशाखात रंग आणि चैतन्य भरतील. साधेपणा आवडणाऱ्यांसाठीही,…
– ‘कन्व्हेयन्स डीड’सह विविध समस्या सोडण्यासाठी पुढाकार पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भोसरी विधानसभा मतदार संघातील स्पाईन रोड येथील जय गणेश साम्राज्य व नारायण हट सोसायटीतील सदनिकाधारकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेण्यात येईल. तसेच, ‘कन्व्हेयन्स डीड’चे प्रश्नही सोडवण्यात येईल, असे आश्वासन भाजपा आमदार महेश लांडगे यांनी दिले. त्यामुळे संबंधित सोसायटीधारकांना दिलासा मिळाला आहे. नारायण हट सोसायटी आणि जय गणेश साम्राज्य सोसायटीतील पदाधिकारी, प्रतिनिधी यांनी आमदार महेश लांडगे व विकसक राजेश सांकला यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विविध समस्यांबाबत बैठक घेतली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते योगेश लोंढे, सोसायटीचे अंकुशराव गोरडे, संदीप बेंडुरे, डॉ. सुयोग तारळकर, सतीश भालेराव, मनोज पवार, निशिगंधा वाढाणे, उद्धव ढोले, संतोष धायबर,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गृहखात्यावर अजिबात वचक राहिला नाही. गुन्हेगारांची मनमानी राज्यभरात दिसून येत आहे. कोणताही गुन्हा करा आपल्याला काही होणार नाही अशा अविर्भावात गुन्हेगार वावरत आहेत. गृह खात्याचा अलबेल कारभार सुरू असल्यामुळे पोलीस यंत्रणा देखील निर्ढावली आहे अशी टीका स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केली. बदलापूर येथील घटनेनंतर पोलीस यंत्रणेकडून झालेली दिरंगाई हा अक्षम्य अपराध असून याची नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री फडणवीस यांनी राजीनामा द्यावा असे देखील गव्हाणे म्हणाले. बदलापूर मधील दोन चिमुकलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेच्या निषेधार्थ संत तुकाराम नगर येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस…
पीसीयु मध्ये दीक्षारंभ सोहळ्यात अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत पिंपरी, ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) — विद्यार्थ्यांनी शिस्त, सचोटी आत्मसात केली पाहिजे. हाच यशाचा भक्कम पाया आहे. ध्येयाचा दृढनिश्चय आणि लवचिकतेने पाठपुरावा केला पाहिजे असे मार्गदर्शन कोल्हापूर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी विद्यार्थ्यांना केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयु) साते, वडगाव मावळ येथील अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान शाखेचा २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा दुसरा दीक्षारंभ’ सोहळा बुधवारी (२१ ऑगस्ट) आयोजित केला होता. यावेळी ऍस्ट्रो एमएनसीचे संस्थापक आणि कॅपजेमिनीचे माजी संचालक मिलिंद चितांबर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ.…
दिग्दर्शक अविनाश कांबीकर यांचा मुंबई विद्यापिठाने केला विशेष सन्मान पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मुंबई आणी मराठी माणसाचं जिव्हाळ्याच नातं कसं …? “आरं वाघाला नखं, गरुडाला पंख, तशी ही मुंबई मराठी माणसांची. मराठी माणसं संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अण्णा भाऊ साठे यांचे योगदान विसरु शकत नाही. अण्णा भाऊंचे साहित्य हे वास्तविकतेला धरुन होते. ते स्वप्नातील लेख लिहणारे लेखक नव्हते, तर वास्तववादी लेखक होते. म्हणून त्यांचे साहित्य त्याकाळी २७ विविध भाषेत भाषातंरीत झाले. रशियात भाषातंर होणारे ते पहिले भारतीय मराठी साहित्यिक होते असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विश्वास पाटील यांनी केले. मुंबई विद्यापीठाच्या सर कावसाजी दिक्षांत सभागृहात ‘अजरामर साहित्याचे निर्माते अण्णा भाऊ…
नवी दिशा उपक्रमातील महिलांना आणखी सक्षम करण्यासाठी सकारात्मक पाऊल पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) नवी दिशा उपक्रमातील महिला बचत गटांचा प्रशासनातील सहभाग वाढविण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ‘कॉफी विथ कमिशनर’ या महत्वाकांक्षी उपक्रमाचा आज शुभारंभ झाला. ‘नवी दिशा’ उपक्रमाअंतर्गत शहरातील तळागळातील महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी तसेच त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सामुदायिक शौचालयांच्या देखभालीचे काम देण्यात आले आहे. त्यातील विविध स्वयं-सहायता महिला बचत गटातील महिलांना थेट आयुक्त शेखर सिंह यांच्याशी संवाद साधण्यासाठी, त्यांची आव्हाने आणि सामुदायिक शौचालय देखभालीच्या कामाबाबत अभिप्राय देण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करण्याच्या अनुषंगाने ‘’कॉफी विथ कमिशनर’’ उपक्रम सुरु करण्यात आला आहे. चिंचवड येथील ऑटोक्लस्टर कार्यालयात आयुक्त शेखर सिंह यांच्या…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – बदलापूर अत्याचार घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी आणि पिडीतेच्या कुटुंबीयांना जलद न्याय मिळवून देण्याच्या मागणीसाठी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )पिंपरी चिंचवड शहर आणि युवासेना पिंपरी चिंचवड यांच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले. त्यावेळी महाराष्ट्राच्या निष्क्रिय गृहमंत्र्यांनी एक नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा द्यावा, ही मागणी सर्व पिंपरी चिंचवड करांकडून करण्यात आली. त्याप्रसंगी मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, शिवसेना पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सचिन भाऊ भोसले, तुषार नवले आदी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
