- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याच्या जडणघडणी मध्ये शिक्षकांचे योगदान अत्यंत मोलाचे असल्याचे मत अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी व्यक्त केले. गुरुपौर्णिमा आणि शिक्षक दिनाच्या निमित्तानं अखिल भारतीय नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा आणि मावळ शिक्षक प्रबोधन परिवार यांच्यावतीन आयोजित ‘शिक्षक कृतज्ञता सोहळ्यात’ भोईर बोलत होते. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास मावळचे आमदार सुनील शेळके, माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे, मावळ पंचायती समितीचे गट विकास अधिकारी सुधीर भागवत,भगवती ग्रुपचे चेअरमन बाबासाहेब औटी, शिक्षण विस्तार अधिकारी शोभा वहिले आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सुप्रसिद्ध अभिनेते संजय…
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने रिपब्लिकन पक्षाला योग्य तो न्याय दिला नाही. तरीही आम्ही महायुतीसोबत निष्ठेने काम केले. परंतु येत्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आम्हाला योग्य तो न्याय द्यावा. विधानसभा निवडणुकीत राज्यात आम्हाला १२ जागा दिल्या जाव्यात यासाठी, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत केली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) तर्फे तिसऱ्यांदा केंद्रात मंत्रिपदी विराजमान झाल्याबद्दल रामदास आठवले यांचा कार्यकर्त्यांच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिरात रविवार २५ आॅगस्ट रोजी जाहीर नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आठवले पत्रकारांशी बोलत होते. केंद्रीय राज्यमत्री आठवले पुढे…
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – दलित चळवळ सक्षम करण्यासाठी सगळ्या नेत्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे. आपल्यातच ऐक्य नसेल तर दलित चळवळ उभी कशी राहणार, असा सवाल उपस्थित करून दलित समाजाला सामाजिक न्यायाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर, कवाडे सर यांनी दलित समाजासाठी आरपीआय सोबत यावे, अशी अपेक्षा केंद्रीय सामाजिक न्याय तथा सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पुणे शहर यांच्या वतीने केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची केंद्रीय सामाजिक न्याय तथा सक्षमीकरण राज्यमंत्री पदी तिसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल सपत्नीक सर्व धर्मिय सत्कार सोहळ्याचे व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाथेरो…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज पक्ष कार्यालयात माजी महापौर कविचंद भाट व शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत पदग्रहण समारंभ व नियुक्तीपत्र वाटप कार्यक्रम पार पडला. यावेळी कविचंद भाट म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहराची निर्मिती ही काँग्रेस पक्षाच्या विचारधारेतून झालेली असुन, अनेक मोठे प्रकल्प काँग्रेस पक्षाच्या कार्यकाळात तयार झाले आहेत, त्याचा उपयोग आज शहवासीयांना होत आहे. भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यावर पिंपरी चिंचवड शहरात विकास कमी व भ्रष्टाचार जास्त असे निदर्शनात येते. पुन्हा शहराचे गत वैभव प्राप्त करण्यासाठी काँग्रेस पक्ष सत्तेत येणे महत्त्वाचे आहे. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी व प्रत्येक…
‘शब्दधन काव्यमंच’चा ‘चला जाऊ या ज्येष्ठ साहित्यिकांच्या घरी’ उपक्रम तळेगाव (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – सामाजिक, राजकीय भान ठेवून त्यावर नि:ष्पक्ष भाष्य करणारा पत्रकार हा कुठल्याही मोठ्या साहित्यिकांइतकाच उत्तम साहित्यिक असतो, असे मत तळेगाव येथील सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित किरण परळीकर यांनी रविवार, दिनांक २५ ऑगस्ट २०२४ रोजी व्यक्त केले. पिंपरी – चिंचवड शहरातील शब्दधन काव्यमंच या संस्थेच्या वतीने *चला जाऊ ज्येष्ठ साहित्यिकांच्या घरी* या अभिनव उपक्रमांतर्गत एमपीसी न्यूजचे संस्थापक- संचालक आणि शहरातले ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक विवेक इनामदार यांचा त्यांच्या तळेगाव येथील निवासस्थानी यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी मुख्य पाहुणे म्हणून पं. परळीकर बोलत होते. त्यांच्यासोबत तळेगाव येथील उद्योजक अभिजित…
– स्नेह मेळाव्यामध्ये अजित गव्हाणे यांना निवडून आणण्याचा निर्धार भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – येणारा काळ वैऱ्याचा असून आपल्याला सावध राहायचे आहे. तुम्हाला मटन खायला घालतील. देवदर्शन करून आणतील पण आपल्या मनात जे आहे तेच करायचे. नेहरूनगर हे एक कुटुंब आहे. या कुटुंबाने एकदा ठरवले एखाद्याच्या मागे ठामपणे उभे रहायचे तर हे कुटुंब मागे हटत नाही. हे मी गेल्या 40 वर्षाच्या अनुभवावर सांगत असल्याचे माजी महापौर हनुमंत भोसले म्हणाले. भोसरी मतदारसंघातील नेहरूनगर या भागातून भरघोस मतांनी नागरिक अजित गव्हाणे यांना निवडून आणतील. नेहरूनगरमधून मिळालेले लीड तुमच्या कायम आठवणीत राहील असेही हनुमंत भोसले यावेळी म्हणाले. नेहरूनगर येथील साई मंदिरामध्ये शनिवारी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष पिंपरी चिंचवड शहराचे शहराध्यक्ष तुषार कामठे ,वरिष्ठ_उपाध्यक्ष धम्मराज_साळवे यांच्या नेतृत्वात एम आय एम पक्षाचे भोसरी विधानसभा अध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे, शहर उपाध्यक्ष हाफिज अबूबकर तसेच इतर कार्यकर्ते मनीषा वाघमारे,राज जेठीथोर,जितेंद्र वाघमारे ,मुफ्ती अब्दुल बासित, मौलाना अताहार,मालती बनसोडे,शोभा भिसे ह्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला. महाराष्ट्रमध्ये वारंवार होणारे महिलांवरील अत्याचार,वाढती गुन्हेगारी,बेरोजगारी,महागाई असे अनेक समस्यांना सामोरे जायचे असेल तर आदरणीय पवार साहेबां शिवाय महाराष्ट्राला पर्याय नाही.येणाऱ्या काळात प्रत्येक माणसामध्ये, घरा-घरा मध्ये पवार साहेबांचे विचार आम्ही पोहचवणार अश्या भावना उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या.. यावेळी पक्षाचे अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित रोजगार मेळाव्याचे उद्घाटन सोमवारी, २६ ऑगस्ट रोजी आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते होणार असून ऑनलाइन अर्ज भरलेल्या तसेच ऑनलाइन अर्ज न भरलेल्या उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह दिव्यांग भवन, मोरवाडी, पिंपरी, पुणे येथे सकाळी १०.३० ते संध्याकाळी ५ या वेळेत उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या वतीने राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळविण्याची तसेच उद्यमशीलता क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना” सुरु करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने सोमवार, २६ ऑगस्ट २०२४ रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने…
विज्ञान-तंत्रज्ञान आत्मसात करण्यात भारतीय अग्रेसर – डॉ. सुनील भागवत पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भारतीयांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान आत्मसात करण्याची प्रचंड इच्छाशक्ती आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने जेव्हा जेव्हा भारताला विज्ञान – तंत्रज्ञान क्षेत्रास मदत करण्यासाठी नकार दिला; तेव्हा भारतीय शास्त्रज्ञ, तंत्रज्ञांनी जिद्दीने तंत्रज्ञान विकसित केले. यामध्ये हरित क्रांती पासून ते अगदी अलीकडे कमी खर्चात यशस्वी केलेली मंगलयान मोहीम यांचा समावेश होतो. भारताला कुठल्याही क्षेत्रात नाकारल्यास, भारत पुढील काही काळात त्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वोच्च स्थान मिळविल्या खेरीज स्वस्थ बसत नाही, असे मत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च’ पुणे (आयसर) संचालक डॉ. सुनील भागवत यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – २५ वर्षांनंतर पुन्हा एकदा जुने मित्र एकत्र आले आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. निमित्त होते माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याचे ज्यामुळे आपल्या जीवनातील जुन्या, गोड आठवणी पुन्हा एकदा या माजी विद्यार्थ्यांना अनुभवता आल्या. हा स्नेह मेळावा होता वाल्हेकरवाडी येथील प्राथमिक शाळा वाल्हेकरवाडी (1996-1997 सातवी बॅच) व प्रेरणा माध्यमिक विद्यालय(1999 – 2000 दहावी बॅच) या कालावधीतील माजी विद्यार्थ्यांचा. दिनांक १८ ऑगस्ट २०२४ रोजी हा स्नेहमेळावा मोठया थाटामाठात वाल्हेकरवाडी येथे राधा कृष्ण हॉटेल मध्ये संपन्न झाला. या स्नेहमेळाव्याची सुरूवात राष्ट्रगीताने झाली. बाहेरगावाहून आलेल्या माजी विद्यार्थी विध्यार्थीनी ह्याचे स्वागत वाल्हेकरवाडी मध्ये स्थायीक विध्यार्थी मित्राने केले. सर्व उपस्थित विध्यार्थी…
