स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने 25 वर्षांनंतर शालेय मित्र पुन्हा आले एकत्र


चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – २५ वर्षांनंतर पुन्हा एकदा जुने मित्र एकत्र आले आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. निमित्त होते माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याचे ज्यामुळे आपल्या जीवनातील जुन्या, गोड आठवणी पुन्हा एकदा या माजी विद्यार्थ्यांना अनुभवता आल्या.



हा स्नेह मेळावा होता वाल्हेकरवाडी येथील
प्राथमिक शाळा वाल्हेकरवाडी (1996-1997 सातवी बॅच) व प्रेरणा माध्यमिक विद्यालय(1999 – 2000 दहावी बॅच) या कालावधीतील माजी विद्यार्थ्यांचा.

दिनांक १८ ऑगस्ट २०२४ रोजी हा स्नेहमेळावा मोठया थाटामाठात वाल्हेकरवाडी येथे राधा कृष्ण हॉटेल मध्ये संपन्न झाला. या स्नेहमेळाव्याची सुरूवात राष्ट्रगीताने झाली. बाहेरगावाहून आलेल्या माजी विद्यार्थी विध्यार्थीनी ह्याचे स्वागत वाल्हेकरवाडी मध्ये स्थायीक विध्यार्थी मित्राने केले. सर्व उपस्थित विध्यार्थी मित्रांनी आपली ओळख करून देत जुन्या आठवणी किस्से शाळेतील गंमती जमती सांगितल्या. प्रत्येक जण कोणत्या क्षेत्रात काय करत आहे, अडचणीच्या काळात मित्रांची मदत कशी झाली हे ही सांगीतले, निलेश शिवले ह्याने तर २६ वर्षांपूर्वी शाळेत शिक्षा म्ह्णून इंग्रजी ची कविता पाठ केली होती ती आहे तशी पुन्हा म्ह्णून दाखवली. सर्व सन्मानाने फेटे आणि मैत्रीची आठवण ह्यसाठी मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. संगीत खुर्ची हा खेळखेळत सर्वानी आनंद लुटला. सध्याचे जीवन हे ताण तणावाचे आहे प्रत्येकाला अनेक अडचणी असतात तेव्हा प्रत्येकाला आपल्या भावना अडचणी मांडण्यास मित्र असणे गरजेचे असते अशी भावना सर्व मित्रांनी बोलून दाखवली.
मोना कांबळे, मोहिनी वाल्हेकर, शारदा भोंडवे, नीता वाल्हेकर, पुष्पा चापलपल्ले, स्वाती घाडगे, कीर्ती घाडगे, परवीन मुल्ला मंजुषा वाघमारे, अपर्णा भेगडे ह्या विध्यार्थीनी उपस्थित होत्या तर हमीद मुलाणी, अशोक भेगडे, अस्मित कांबळे, अतुल कातळे, शंकर भोंडवे, प्रदीप बगाळे, नितीन डोके, सचिन माने, संदीप कणसे, हनुमंत काळोखे, मंगेश भोंडवे, उमेश गुंड हे माजी विध्यार्थी आले होते. कार्यक्रमाचे नियोजन गणेश बोरा, सचिन शिवले, निलेश शिवले विशाल जगताप संतोष वाल्हेकर ह्यांनी केले. गणेश बोरा ह्यांनी सूत्रसंचालन केले तर सचिन शिवले ह्यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानत ही मैत्री अशीच वाढत जावो ही भावना व्यक्त केली.








