- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्रामचे प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन प्रमुख पाहुणे व मुंबईचे व्याख्याते प्रा.आशिष दुबे व कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सचिव डॉ.दीपक शहा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावरती वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ.अशोक डोंगरे, कमला शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.पौर्णिमा कदम, उपप्राचार्या डॉ.वनिता कुर्हाडे, डॉ.सुनिता पटनाईक, प्रा.जस्मिन फरास, प्रा.वैशाली देशपांडे, प्रा.वर्षा निगडे आदी मान्यवर व विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या सत्कार डॉ. दीपक शहा यांच्या हस्ते करण्यात आला व प्रतिभा स्टारडम् या नियतकालिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.…
उन्न’ती’ चा गणपती महोत्सव अंतर्गत , इको फ़्रेंडली गणपती कार्यशाळा : अभिनेते संजय खापरे यांची उपस्थिती
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – विविध नाविन्यपूर्ण सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी नावाजलेल्या पिंपळे सौदागर स्थित उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे , उन्न’ती’ चा गणपती महोत्सव अंतर्गत , इको फ़्रेंडली गणपती कार्यशाळा संपन्न झाली. पिंपळे सौदागर मधील , २५० हुन अधिक मुलांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला .कला शिक्षक सुधीर लांडगे आणि भगवान भोसले ,रश्मी जुग्ले, संगीता भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळे सौदागर मधील ३५० हुन अधिक मुलांनी या कार्यशाळेत सहभाग नोंदवला. पर्यावरण पूरक मूर्ती बनविण्यासाठी लागणारी शाडू माती उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे मुलांना मोफत पुरविण्यात आली. सुप्रसिद्ध सिने अभिनेते ‘दे धक्का’ फेम संजयजी खापरे यांची उपस्थिती या कार्यशाळेचे आकर्षण ठरली. संजयजी खापरे यांनी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मिरवणूक मार्गातील रस्ते व्यवस्थित करणे तसेच विसर्जनासाठी पुरेसे कर्मचारी आणि यंत्रणा कार्यान्वित ठेवणे आणि सर्व घाटांवर निर्माल्य कुंडाची व्यवस्था करणे, कृत्रिम विसर्जन हौदांची तातडीने स्वच्छता आणि डागडुजी करणे, आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा उभारणे अशा सुचना महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी अधिका-यांना दिल्या. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांनी आज भोसरी, आळंदी रस्ता, मोशी,चिखली येथील रस्त्यांची तसेच गावजत्रा मैदान, मोशी घाट आणि मोशी खाणीजवळील विसर्जन ठिकाणांची पाहणी केली आणि महापालिकेच्या वतीने पुरविण्यात येणा-या सोईसुविधांबाबत आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. या पाहणी दौऱ्यादरम्यान त्यांचेसमवेत शहर अभियंता मकरंद निकम,उप…
मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते आयुक्त शेखर सिंह यांनी स्वीकारला पुरस्कार महापालिकेचा प्रकल्प ठरतोय देशासाठी रोल मॉडेल पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका व स्मार्ट सिटीच्या “पीसीएमसी स्मार्ट सारथी” या प्रकल्पाला केंद्र शासनाचा ‘ई-गव्हर्नन्स स्कीम २०२३-२४’ अंतर्गत डिस्ट्रीक्ट लेव्हल इनिशिएटीव्ह्ज इन ई-गव्हर्नन्स’(ई-प्रशासनामध्ये जिल्हास्तरीय उपक्रम) या श्रेणीमध्ये सिल्व्हर पुरस्काराने मुंबई येथे सन्मानित करण्यात आले. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीलकंठ पोमण, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी विजय बोरुडे, अंकित भार्गव उपस्थित होते. केंद्र शासनाच्या कार्मिक, सार्वजनिक तक्रारी व…
शहरातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये उपक्रम महेशदादा एजुकेशनल फॉउंडेशनचा पुढाकार पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- सुसंस्कृत पिढी घडविण्यासाठी त्यांचा पाया म्हणून विद्यार्थांना स्पर्धा परीक्षेचे शिक्षण पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व माध्यमांचा शाळांमध्ये सुमारे १ लाख पेक्षा जास्त विद्यार्थ्यांसाठी ‘‘चला महाराष्ट्र घडवूया’’ हा क्रांतिकारी शैक्षणिक उपक्रम राबवला जात आहे. पिंपरी-चिंचवडमधील महेशदादा एजुकेशनल फॉउंडेशन, एक घास फॉउंडेशन व आयआयबी करियर इन्स्टिट्युट यांचा संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविला जात आहे. हा उपक्रम देश पातळीवर तसेच महाराष्ट्रमध्ये सर्व प्रथमच होत आहे. या उपक्रमा अंतर्गत पिंपरी चिंचवड शहरामध्ये सर्व माध्यमाच्या शाळामध्ये UPSC/MPSC : IAS/ IPS/ IRS / IFS , NEET / JEE / MHT-CET, NDA, CA, Banking,…
– भाजपा आमदार महेश लांडगे यांचा विधायक पुढाकार पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भारतीय संस्कृतीमध्ये श्रावण महिना पवित्र मानला जातो. सण-उत्सवाला सुरवात होणारा आणि निसर्गानेही हिरवी झालर प्राप्त केलेल्या या मासामध्ये श्रावणानिमित्त भोसरी विधानसभा मतदार संघात मंगलमय उपक्रम पार पडले. श्रावण सरी अन् मंगळागौरी व श्रीक्षेत्र भिमाशंकर यात्रेला सर्वसामान्य महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. भोसरी विधानसभा मतदार संघातील भारतीय जनता पार्टीचे आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून आणि शिवाजली संखी मंचच्या अध्यक्षा पुजा लांडगे यांच्या पुढाकाराने मतदार संघातील महिलांसाठी श्रावणसरी अन् मंगळागौरी हा मनोरंजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. तसेच, १२ जोतिर्लिंगांपैकी एक असलेले श्रीक्षेत्र भिमाशंकर दर्शन यात्रा उपक्रमाचे आयोजित करण्यात आले.…
चिंचवडच्या विकासाचा प्रवाह कायम ठेवण्यासाठी सर्वांनी कामाला लागण्याचे आवाहन चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांनी गेल्या २० वर्षांत शहरात विकासाचा पाया रचल्याने चिंचवड मतदारसंघात पुन्हा पक्षाचाच आमदार होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता लक्ष्मणभाऊंचा विकासाचा वारसा पुढे नेण्यासाठी ही निवडणूक ताकदीने लढणार आहे, त्यासाठी चिंचवडच्या मैदानावर उतरून प्रत्येकाने आजच आपली जबाबदारी सांभाळा, मैदान आपणच जिंकू, अशा शब्दात आमदार पंकजा मुंडे यांनी सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना केल्या. भाजपाच्या राष्ट्रीय सचिव तथा आमदार पंकजा मुंडे यांच्याकडे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्या अनुषंगाने आमदार मुंडे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातील बांधकाम आणि समुह गृहबांधणी प्रकल्पांना दिलासा मिळणार आहे. पाण्याची उपलब्धता असल्याशिवायपूर्वी बांधकाम परवानगी देण्यात येत नव्हती. मात्र यामध्ये सुधारणा करत सर्वसामान्य नागरिकांसह व्यवसायिकांना दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यात पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील समाविष्ट 23 गावांसह प्राधिकरणाच्या हद्दीतील महानगरपालिका / नगरपालिका हद्दीपासून ५ कि.मी अंतराच्या ग्रामीण कार्यक्षेत्रातील परिसराला पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी शासन निर्णायानुसार संबंधित यंत्रणेची असणार आहे. त्यामुळे सदर क्षेत्रात सर्व नवीन / सुधारित प्रकल्पास विकास परवानगी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी काढलेल्या या आदेशाचा प्राधिकरणातील विकसनशील भाग असलेल्या…
पुणे शहरातील पोलिसनामा न्यूज पोर्टलचे वरिष्ठ पत्रकार प्रसाद गजानन गोसावी यांचे रविवारी (दि. १) निधन झाले. सव्वा महिन्यांपूर्वी गंभीर अपघात झाल्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मृत्यूवर मात करतील असे वाटत असतानाच प्रसाद यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर प्रसाद यांचे अवयव दान करण्यात आले. प्रसाद हे अवयवदान करणारे पहिले पत्रकार ठरले आहेत. एवढेच नाही तर मृत्यूनंतर काही तासांतच त्यांच्या हृदयाचे एका लष्करी जवानाच्या शरीरात यशस्वीपणे प्रत्यारोपण झाले. पुण्यातील पत्रकार प्रसाद गोसावींच्या मृत्यूनंतर ५ रुग्णांना जीवदान; लष्करी जवानाला मिळाले हृदय पिंपरी : पुणे शहरातील पोलिसनामा न्यूज पोर्टलचे वरिष्ठ पत्रकार प्रसाद गजानन गोसावी यांचे रविवारी (दि. १) निधन झाले. सव्वा महिन्यांपूर्वी गंभीर…
प्रख्यात गायक अवधूत गुप्ते यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड आयडॉल स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – यंदाच्या पिंपरी चिंचवड आयडॉलच्या ९ व्या पर्वाचा ज्युनिअर गटातील करंडक भार्गव जाधव याने तर सिनिअर गटातील करंडक अभिषेक शिंदे या गायकांनी पटकावला. हर्षवर्धन भोईर यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचे पारितोषिक वितरण प्रख्यात गायक अवधूत गुप्ते यांच्या हस्ते करण्यात आले. या दोन्ही गटातील विजेत्यांना प्रत्येकी रोख २१ हजार रुपये आणि करंडक असे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. आकुर्डीतील ग. दी. माडगूळकर नाट्यगृहात पार पडलेल्या या स्पर्धेच्या महाअंतिम सोहळ्यास अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर, माजी नगरसेवक नाना काटे,…
