Author: maharashtrabreakingnews.com

स्वातंत्र्यवीर सावरकर शैक्षणिक सहाय्य पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  निगडी प्राधिकरणातील पेठ क्रमांक २५ मधील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ ही संस्था सुमारे ४१ वर्षांपासून पिंपरी – चिंचवड परिसरात प्रबोधनात्मक कार्य करीत असून शिक्षण, पर्यावरण, महिला सबलीकरण, सांस्कृतिक संवर्धन, सामाजिक प्रबोधन अशा वेगवेगळ्या आयामांसाठी सातत्याने विविध प्रबोधनात्मक उपक्रम राबवित आहे. गेल्या दोन वर्षांपासून संस्थेच्या माध्यमातून समाजातील अनाथ, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि दारिद्र्य रेषेखालील गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शालेय फीसाठी आर्थिक मदत देण्यात येत आहे. शिक्षणाच्या किमान अधिकारापासून गरीब मुले वंचित राहू नयेत, यासाठी हा उपक्रम आहे. त्यासाठी मंडळाच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर शैक्षणिक सहाय्य’ या योजनेंतर्गत गरजू विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. याबाबत स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या…

Read More

 ‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठात रंगली ‘अनंत’ काव्यमैफिल पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) -जीवनात अश्रूंसाठी दुःख लागते; दुःखासाठी वेदना लागतात; वेदनांसाठी लागते भावना; भावनांना असते संवेदना; संवेदनेला लागते जाणीव; अन् जाणीव व्यक्त करायला लागतात ते ‘शब्द’. कविता हा शब्दांचा खेळ आहे. मनातील व्यथा सांगणे हेही कवितेचे लक्षण आहे. कवितेत वास्तविकता, कल्पना, समाजभान इत्यादींचा अंतर्भाव असावा मात्र तिच्यात विकार नसावा. कारण, शब्दांत विकार आला की कविता मार खाते,असे मत ज्येष्ठ कवी तथा महाराष्ट्र साहित्य परिषदच्या चिंचवड शाखेचे अध्यक्ष राजन लाखे यांनी व्यक्त केले.  ते एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणे येथे ‘अनंत …अंतर्नाद मनाचा’ या व्यंकटेश कल्याणकर संपादित व डाॅ.राहुल ठाकरे सह संपादित प्रातिनिधिक काव्यसंग्रहाच्या प्रकाशन कार्यक्रमात बोलत होते.…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – डॉ.  डी.  वाय.  पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर (DYPMC) पिंपरी, पुणे येथे योग सत्राला उत्साहात सुरुवात झाली. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत सर्वांगीण निरोगी आरोग्याला चालना देण्यासह  शाश्वत जीवनासाठी योगास प्रोत्साहन देणारे परिणामकारक कार्यक्रम राबविण्याच्या उद्देशाने   योग प्रोटोकॉल  प्रात्यक्षिके आयोजित केली जातात. या वर्षीची संकल्पना ,”स्वतःसाठी आणि समाजासाठी योग” ही आहे. योग दिनाचा उद्देश शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्यावर योगाचा सखोल प्रभाव अधोरेखित करणे हे आहे सामान्य योग प्रोटोकॉल हा योग आसनांचा, श्वासोच्छवासाच्या व्यायामाचा आणि ध्यान पद्धतींचा वैज्ञानिकदृष्ट्या विकसित केलेला संच आहे.  जो केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या योग आणि निसर्गोपचार संशोधन परिषदेने (CCRYN)…

Read More

पिंपरी चिंचवड महापालिका आणि पोलीस आयुक्तालयाच्या वतीने शहरवासियांना आवाहन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक तसेच शांततापुर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व गणेश मंडळांनी तसेच नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह आणि पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी केले आहे. Ø  मंडळांनी रहदारीस किंवा वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षीही पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर देण्यात येणार असून त्यानुषंगाने शाडू माती, धातू, लाकूड, दगड, तूरटी अथवा कागदाच्या लगद्यापासून तयार करण्यात आलेली गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. शासनाकडील मार्गदर्शक सुचनांनुसार श्रींच्या आगमन आणि विसर्जन मिरवणूक संदर्भात शासनाकडील सूचनांचे तसेच पोलीस यंत्रणांकडून…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाच्या माध्यमातून अत्याधुनिक ड्राेनच्या सहाय्याने मालमत्ता सर्वेक्षण सुरू असून 95 टक्के सर्वेक्षण पुर्ण झाले आहे. या सर्व मालमत्तांना युपीक आयडी क्रमांक टाकून झाले आहेत. 148 पैकी फक्त 8 गटातील काम बाकी आहे. आत्तापर्यंतच्या सर्वेक्षणात तब्बल 2 लाख 54 हजार नवीन मालमत्ता आढळल्या आहेत.  सध्याच्या आणि सर्वेक्षणात आढळलेल्या नवीन अशा सुमारे पावणेनऊ लाख मालमत्ता नाेंदणीकृत हाेणार आहेत. यातून महापालिकेला मोठ्या प्रमाणात महसूल मिळणार आहे. त्यामुळे मालमत्ता सर्वेक्षणाचा आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह आणि अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेला निर्णय हा महापालिकेच्या इतिहासात ‘माईलस्टोन’ ठरला आहे. शहरात कर…

Read More

“महिलांना स्त्रीशक्तीची जाणीव करून देणे गरजेचे!” साध्वी स्थितप्रज्ञानंद महाराज पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – “निर्माणशक्ती, संवर्धनशक्ती आणि संहारशक्ती महिलांच्या ठायी उपजतच असतात. आजच्या महिलांना या सुप्त स्त्रीशक्तीची जाणीव करून देणे गरजेचे आहे!” असे प्रतिपादन श्रुतीसागर आश्रम, फुलगाव येथील साध्वी स्थितप्रज्ञानंद महाराज यांनी आळंदी येथे व्यक्त केले.  विश्व हिंदू परिषद स्थापनेच्या षष्ट्यब्दीपूर्ती वर्षानिमित्त विश्व हिंदू परिषद, पश्चिम महाराष्ट्र प्रांत आयोजित साध्वी शक्ती संमेलनात स्थितप्रज्ञानंद बोलत होत्या. विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत धर्माचार्य संपर्क प्रमुख ह. भ. प. माधवदासमहाराज राठी (नाशिक), धार्मिक विभाग क्षेत्र प्रमुख प्रा. संजय मुद्राळे, प्रांत मंत्री किशोर चव्हाण, प्रांत सह मंत्री ॲड. सतिश गोरडे, साध्वी सरस्वतीदीदी,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड  महानगरपालिकेच्या वतीने  महापालिका शाळांतील इयत्ता ५ वी १० वी तील विद्यार्थ्यांसाठी ‘पर्यावरणपूरक गणेश मूर्ती निर्मिती व सजावट’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विद्यार्थ्यांद्वारे बनविण्यात आलेल्या मुर्त्यांचे प्रदर्शन आज चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात भरविण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन उप आयुक्त अण्णा बोदडे यांच्या हस्ते करण्यात आले.  या स्पर्धेला शाळा आणि विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, अजिंक्य येळे, किशोर ननावरे, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे , जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, उप अभियंता योगेश आल्हाट यांच्यासह या स्पर्धेत सहभागी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )  – पिंपरी चिंचवडच्या सांस्कृतिक वैभवामध्ये भर घालणा-या, समाजामधल्या प्रत्येक घटकाला व्यक्त होण्याची संधी देणा-या पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओचा दुसरा वर्धापन दिन नुकताच साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या खजिनदार व अभिनेत्री शुभांगी दामले, गायिका व अभिनेत्री अस्मिता चिंचाळकर, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, विद्यावाणी कम्युनिटी रेडिओचे संचालक श्रीदत्त गायकवाड आदि उपस्थित होते.   रेडिओच्या निर्मिती प्रमुख माधुरी ढमाले- कुलकर्णी यांनी वार्षिक अहवाल सादर केला. कार्यक्रम अधिकारी विराज सवाई व निर्मिती सहाय्यक विद्या राणे यांनी रेडिओच्या उपक्रमांबद्दल माहिती दिली. मागील…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – संचेती चौक ते पुणे विद्यापीठ चौकापर्यंतच्या रस्ता दुरुस्तीचे काम करण्यात आले. संबंधित रस्त्याची पाहणी करून तातडीने कामे करण्याचे निर्देश पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी बैठक घेऊन संबंधित यंत्रणेला दिले होते. त्यानुसार रस्ता दुरुस्तीचे काम करण्यात येत आहे. पावसामुळे संचेती चौक ते पुणे विद्यापीठ चौकापर्यंतचा रस्ता खराब झाला होता. ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. याची दखल घेत पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी संबंधित यंत्रणेची बैठक घेत स्थळ पाहणी करून तातडीने रस्ता दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार पुणे आयटी सिटी मेट्रो लाईन…

Read More

बुसान मेट्रोपॉलिटीन कार्पोरेशनची पीएमआरडीएला भेट दक्षिण कोरियाच्या शिष्टमंडळाची महानगर आयुक्तांशी विकास कामांवर चर्चा पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत विविध विकास कामांची रूपरेषा आखण्यात येत आहेत. या विकासात्मक कामात भागीदारी तत्त्वावर योगदान देण्याच्या दृष्टिकोनातून सोमवारी दक्षिण कोरियाच्या बुसान मेट्रोपॉलिटीन कॉर्पोरेशनच्या (बीएमसी) शिष्टमंडळाने प्राधिकरणाच्या कार्यालयास भेट देत विविध विषयावर अध‍िकाऱ्यांशी चर्चा केली. यादरम्यान दक्षिण कोरियाच्या शिष्टमंडळाने महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांना आगामी काळात संयुक्तपणे कुठली विकास कामे करता येऊ शकतात, या संदर्भात माहिती दिली. पीएमआरडीएअंतर्गत सुरू असलेल्या विकास कामांसह आगामी काळातील प्रस्तावित विकासात्मक योजनांसंदर्भात अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला यांनी बुसान कार्पोरेशनच्या शिष्टमंडळाला…

Read More