Author: maharashtrabreakingnews.com

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मधील प्रतिभा इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज, प्रतिभा ज्युनिअर कॉलेज, प्रतिभा शिक्षण शास्त्र महाविद्यालय, प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज (सीबीएसई) मध्ये भारताचे माजी राष्ट्रपती व शिक्षणतज्ञ डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करून शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सचिव डॉ.दीपक शहा यांच्या हस्ते समाजसेवक व प्रमुख पाहुणे डॉ. शाळीग्राम भंडारी यांचा स्मृतिचिन्ह देऊन तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.के. वाळुंज, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ.राजेंद्र कांकरिया, उपप्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी, डॉ.वनिता कुर्‍हाडे, एमबीएचे…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – ज्येष्ठ नागरिक संघ गणेशनगर वाकडच्या वतीने आदर्श शिक्षकांचे शिक्षक दिनाचे औचित्य साधून सन्मान करण्यात आला. भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो .कारण ते एक उत्तम शिक्षक, राजकारणी, लेखक असे भारतरत्न होते. प्रमुख पाहूने अण्णा जोगदंड म्हणाले की आई वडील जसे मुलावर संस्कार घडवतात तसे विद्यार्थ्यांना देशाचा उत्तम आदर्श नागरिक घडवण्याचे काम हा शिक्षक करत असतात ,शिक्षक दिन म्हणजे आपल्या गुरुजनाबद्दल आदर व कृतज्ञताची भावना व्यक्त करण्याचा दिवस. शिक्षक ज्ञानदानावरच विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवतात. आई-वडीलांनंतर जर तुमच्यावर कोणाचे उपकार असतील ते तुम्हाला घडवणारे शिक्षकाचे असतात आणि त्यांचे ते…

Read More

राज्यात दोन महिन्यात २ लाख कोटींची गुंतवणूक; ३५ हजार रोजगार निर्मिती पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  मराठवाडा, विदर्भ, पुणे, पनवेल येथे १ लाख १७ हजार २२० कोटी रुपये गुंतवणुकीच्या ४ विशाल प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. तसेच, जुलै महिन्यात ८० हजार कोटींच्या प्रकल्पांना मान्यता देण्यात आली असून, राज्यात दोन महिन्यात २ लाख कोटींची गुंतवणूक झाली आहे. या प्रकल्पांमुळे सुमारे ३५ हजार रोजगार निर्मिती होणार असल्याने, महाराष्ट्राची ओळख ही इलेक्ट्रिक वाहन निर्मिती क्षेत्रामध्ये अग्रेसर राज्य अशी होणार आहे, असे मत भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी व्यक्त्‍ केले. टॉवर सेमीकंडक्टर कंपनीचा उच्च तंत्रज्ञानावर आधारित सेमीकंडक्टर निर्मितीचा अतिविशाल प्रकल्प पनवेल जि.रायगड…

Read More

चिंचवडच्या विकास शिक्षण मंडळ संचलित श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयात विद्यार्थी सुरक्षा व सकारात्मक दृष्टीकोन वाढविण्यासाठी पालक उदबोधन वर्गाचा अनोखा यशस्वी उपक्रम आयोजित केला होता. चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवडच्या विकास शिक्षण मंडळ संचलित श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयात विद्यार्थी सुरक्षा व सकारात्मक दृष्टीकोन वाढविण्यासाठी पालक उदबोधन वर्गाचा अनोखा यशस्वी उपक्रम आयोजित केला होता. सकारात्मक विचार हीच शक्ती असते. आपण ज्या पद्धतीने विचार करतो, तसेच प्रत्यक्षात आपल्या बाबत घडत असते. यश, कीर्ती, नाव, प्रतिष्ठा, मान, सन्मान सर्वकाही सकारात्मक दृष्टिकोनातून आपल्याला मिळते. मुलांच्या मनामध्ये असलेली भीती घालवण्यासाठी अगदी लहान वर्गांपासूनच सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणारे affirmations मुलांच्या प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – शिक्षणमहर्षी डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशात शिक्षकदिन म्हणून साजरा केला जातो या निमित्ताने भारतीय सिंधू सभा या संस्थेच्या पिंपरी शाखेच्या वतीने पिंपरी येथील सामाजिक कार्यकर्ते मनोहर जेठवानी यांनी जयहिंद हायस्कूल आणि महाविद्यालयांतील प्राध्यापक यांचा गौरव केला. यावेळी बोलताना मनोहर जेठवानी म्हणाले की माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो आणि प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात जशी पहिली मार्गदर्शक ही जन्मदाती आई असते त्या प्रमाणे जीवनात समाजामध्ये वावरताना जे आवश्यक असते ते शिकविणे आणि प्रत्येक व्यक्तीला घडवणे हे महत्त्वाचे मार्गदर्शन आपल्या शिक्षक करत असतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपला देश हा जगातील अनेक विविध प्रकारे प्रगती करीत असतो.…

Read More

भाजपा आमदार महेश लांडगे यांचा विश्वास – पिंपरी-चिंचवडकरांशी सोशल मीडियातून संवाद पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – राज्याचे नेते उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारच्या मदतीने आणि महानगरपालिका प्रशासनाच्या सकारात्मक सहकार्यामुळे गेल्या १० वर्षांमध्ये शहरातील शिक्षण क्षेत्रात विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागले आहेत. त्यामुळे शहराची वाटचाल ‘एज्युकेशन हब’च्या दिशेने सुरू आहे, असा विश्वास भाजपा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केला. शहरातील शैक्षणिक उपक्रम आणि प्रकल्पांबाबत आमदार महेश लांडगे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवडकरांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले आहे. आमदार महेश लांडगे म्हणाले की, कामगारनगरी, उद्योगनगरी आणि ऑटो हब, आयटी हब… अशी दमदार वाटचाल करणारे आपले पिंपरी-चिंचवड…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक वातावरणात पार पाडण्यासाठी शहरात पहिल्यांदाच मुर्ती विघटन केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी महापालिकेने हा पुढाकार घेतला असून क्षेत्रीय कार्यालयनिहाय ४०फूट बाय ३०फूट आकाराची आणि ५ फूट खोल अशी एकूण १५ भव्य विघटन केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. या विघटन केंद्रांवर पहिल्यांदाच गणेशमूर्तींचे रासायनिक प्रक्रियेद्वारे शास्त्रोक्त पद्धतीने विघटन करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली. तसेच नदी व तलावांचे प्रदूषण टाळण्यासाठी नागरिकांनी मुर्ती संकलन केंद्रांमध्ये गणेशमूर्तींचे दान करून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहनही आयुक्त सिंह यांनी केले आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नागरिकांनी पर्यावरणपूरक…

Read More

भाजपा आमदार महेश लांडगे यांचा विधायक पुढाकार पहिल्या दिवशी पाच एसटी बस कोकणात झाल्या रवाना पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी-चिंचवडमधील कोकणवासीयांसाठी गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रवास सेवा सुलभ व्हावी. या करिता एसटी बस सुविधा सुरू करण्यात आली. पहिल्या दिवशी पाच बस कोकणात रवाना झाल्या. या उपक्रमाचे कोकणवासीयांनी कौतूक केले आहे. भाजपाचे आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाकाराने गौरी-गणपतीसाठी कोकणात जाण्यासाठी उत्सुक असलेल्या भोसरी विधानसभा मतदारसंघातील कोकणवासीयांसाठी एसटी बस उपलब्ध करुन देण्यात आल्या. गेल्या महिनाभरापासून त्याचे ‘बुकिंग’ सुरू होते. बुधवारी सायंकाळी पहिल्या ५ बसनी कोकणात प्रस्थान केले. यावेळी आमदार महेश लांडगे, विजय परब, विलास गवस, सुधाकर धुरी, अमित महाडिक, सुनील साळुंखे, संदीप…

Read More

मुस्लिम समाजाच्या विरोधात आक्षेपार्ह विधान करणाऱ्या नितेश राणेविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आक्रमक आंदोलन. पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आमदार नितेश राणे यांच्याकडून मुस्लिम समाजाच्या विरोधात जाणीवपूर्वक आक्षेपार्ह वक्तव्य करून महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण दूषित करण्यात येत असल्याचे आरोप करत राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने पिंपरी येथे आक्रमक आंदोलन घेण्यात आले.यावेळी प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारण्यात आले.युवक शहराध्यक्ष इम्रान शेख यांच्या नेतृत्वात हे आंदोलन घेण्यात आले. यावेळी बोलताना युवक शहराध्यक्ष इम्रान शेख म्हणाले “गेल्या काही दिवसा पासून नितेश राणे मुस्लिम समाजाविरुद्ध गरळ ओकून राज्यातील सामाजिक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्येक भाषणात संविधानाचे संकेत पायदळी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – एस.पी.स्कुल वाकडच्या प्रांगणात गुणवंत कामगार कल्याण मंडळ शाखा: पिंपरी चिंचवड च्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून आदर्श शिक्षक पुरस्काराचे आयोजन करण्यात आले.ह्या निमित्ताने शिक्षिका व शिक्षक ह्यांचा सन्मान करण्यात आला.स्मृती चिन्ह,शाल, तुळशीचे रोप हे सन्मानाचे स्वरूप होते.दरवर्षी भारताचे दुसरे राष्ट्रपती भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन ह्यांची जयंती आपण शिक्षक दिन म्हणून साजरी करीत असतो.सर्वपल्ली राधाकृष्णन हे तत्त्वज्ञान विषयाचे प्राध्यापक होते.स्वातंत्र्यापुर्वी पासुन ४०वर्ष आदर्श शिक्षक म्हणून सेवा दिली.समाजामध्ये शिक्षक समाज निर्मितीसाठी सतत प्रयत्नशील असतात‌.येणारी नविन पिढी सुदृढ, सुसंस्कृत व्हावी हा उद्देश मनात ठेवून,शिक्षकांच्या कार्याचा गौरव व्हावा,त्यांना प्रेरणा मिळावी, शिक्षकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त व्हावी म्हणून गुणवंत कामगार…

Read More