- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – शहरातील प्रमुख गणेश विसर्जन घाटांवर महापालिकेच्या वतीने ११ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर २०२४ या कालावधीत दुपारी ३ ते रात्री १० वाजेपर्यंत वैद्यकीय पथकांसह सुसज्ज रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी दिली आहे. यंदाचा गणेशोत्सव दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. त्यासाठी महापालिकेच्या वतीने नागरिकांच्या सोयीसाठी विविध सेवा सुविधा पुरविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने प्रमुख विसर्जन घाटांच्या ठिकाणी वैद्यकीय पथके तैनात ठेवण्यात येणार आहेत. त्यामध्ये निगडी प्राधिकरणातील गणेश तलाव, वाल्हेकरवाडी मधील जाधव घाट, काळेवाडी मधील स्मशान घाट, पिंपळे गुरव घाट, वाकड गावठाण घाट, मोशी नदी घाट, चिखली स्मशान घाट, थेरगाव पूल नदी घाट, सुभाषनगर पिंपरी घाट आणि सांगवी येथील वेताळबाबा मंदिर घाट या विसर्जन घाटांचा समावेश आहे.…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उपआयुक्तपदी फ क्षेत्रीय अधिकारी तथा सहायक आयुक्त सीताराम बहुरे यांना पदोन्नतीने नियुक्ती देण्याच्या विषयास आज प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आस्थापनेवरील सहाय्यक आयुक्त पदावरील अधिकाऱ्यांची शैक्षणिक अर्हता, अनुभव कालावधी, सेवाज्येष्ठता, गोपनीय अहवाल, मत्ता व दायित्व, संगणक अर्हता, शिस्तभंग विषयक कारवाई हे सर्व सेवाविषयक तपशील पडताळून उपआयुक्त पदावर नेमणूक केली जाते. महापालिका आस्थापनेवर उपआयुक्त अभिनामाचे पद रिक्त आहे. या पदासाठी आवश्यक अर्हता धारण करणारे सीताराम बहुरे यांची पदोन्नतीने उपआयुक्त पदावर नेमणूक करण्यासाठी महापालिका सभेची मान्यता आवश्यक होती. प्रशासक शेखर सिंह यांच्या उपस्थितीत आज विशेष बैठक संपन्न झाली, त्या बैठकीमध्ये स्थायी तसेच महापालिका सभेची…
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – लोकसभा निवडणुकीत एनडीएला अपेक्षित यश मिळाले नसले, तरी आगामी विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाला योग्य ते प्रतिनिधित्व मिळेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. जर आम्हाला योग्य ते प्रतिनिधित्व मिळाल्यास त्याचा फायदा महायुतीमधील तीनही पक्षांना निश्चित होईल, असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केला. रामदास आठवले यांनी मंगळवार १० सप्टेंबर रोजी पुण्यातील व्हीआयपी विश्रामगृहात एक पत्रकार परिषद घेतली, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी पक्षाचे शहराध्यक्ष संजय सोनवणे, राज्य संघटक परशुराम वाडेकर, सूर्यकांत वाघमारे, गौतम सोनवणे, शैलेश चव्हाण, अशोक शिरोळे, श्याम सदाफुले, मोहन जगताप, महिपाल वाघमारे,…
नवी सांगवी पिंपळे गुरवमध्ये गणेश मंडळाच्या समोर आरतीच्या वेळी डेंग्यू ,चिकनगुन्या आजाराबाबत जनजागृती
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्या वतीने नवी सांगवी, पिंपळे गुरव परीसरात डेंग्यू,चिकनगुन्या आजाराबाबत संध्याकाळी सात ते नऊ वेळात दररोज चार मंडळामध्ये स्पीकर द्वारे, माहितीपत्रक वाटून डेंग्यू चिकनगुन्या आजाराची जनजागृती करण्यात आली. डेंग्यू आजार होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी आणि झाल्यावर त्यावरील उपाय योजनांची माहिती स्वतः शहराध्यक्ष आण्णा जोगदंड हे स्पीकरमधून गणेश भक्तांना देत आहेत,ही जनजागृती अनंत चतुर्थी पर्यंत चालणार असल्याचे जोगदंड यांनी सांगितले. गजानन धाराशिवकर म्हणाले कि, डेंग्यू आजार म्हणजे डंक छोटा, धोका मोठा, त्यामुळे हिवताप, डोकेदुखी, अंगावर लालसर रंग येणे,तीव्र पाठ दुखी,पुरळ उठणे असे लक्षणे दिसून आल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे त्यांनी आव्हान केले.…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – विविध नाविन्यपूर्ण सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी नावाजलेल्या पिंपळे सौदागर स्थित उन्नती सोशल फाऊंडेशनतर्फे उन्न’ती’ चा गणपती महोत्सव अंतर्गत, इच्छा दान गणेश मूर्ती या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचे उद्घाटन चिंचवड विधानसभेच्या आमदार अश्विनीताई लक्ष्मण जगताप यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. तर भाजप पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या हस्ते पूर्वनावनोंदनी केलेल्या नागरिकांना मुर्त्या प्रदान करण्यात आल्या. मान्यवरांनी श्री गणरायाच्या मूर्त्यांचे विधिवत पूजन करून उन्नती सोशल फाऊंडेशनच्या सदस्यांशी संवाद साधला. या उपक्रमाबद्दल अधिक माहिती देताना अध्यक्षा डॉ.कुंदा भिसे म्हणाल्या “पर्यावरण पूरक गणेशोत्सव वाढीस लागावा यासाठी उन्नती सोशल फाऊंडेशन गेल्या ७ वर्षांपासून इच्छा दान ही संकल्पना…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहरात गणेश विसर्जन करण्यासाठी वाकड येथील द्रौपदा लॉन्स येथे प्रत्येक वर्षी पर्यावरण पूरक विसर्जन घाटाची निर्मिती केली जाते. यावर्षीही पर्यावरण पूरक विसर्जन घाटाची निर्मिती करण्यात आली असून नागरिकांनी गणेश विसर्जन करण्यासाठी या विसर्जन घाटाचा उपयोग करावा असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उपाध्यक्ष विशाल वाकडकर यांनी केले आहे. गेल्या काही वर्षांपासून प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींचे प्रमाण वाढले असून त्यामूळे जलप्रदूषणात खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे पर्यावरणास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जावा यासाठी गणेश भक्तांनी नदी, नाला, ओढ्यात, विहिरीत मूर्ती विसर्जन करून…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – शहरातील नदी व तलावांचे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी नागरिकांनी मूर्ती संकलन केंद्रात जमा करावी किंवा गणेशमूर्ती विसर्जनासाठी उपलब्ध करून दिलेल्या कृत्रिम हौदात घरगुती, लहान गणेशमूर्तींचे विसर्जन करावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने जनसंवाद सभेत करण्यात आले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते. यामध्ये अ, ब, क, ड, ई, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयात अनुक्रमे १४, ९, ४, ६, ८, १४, ८ आणि १६ अशा एकूण ७९ तक्रारवजा सूचना नागरिकांनी उपस्थित राहून मांडल्या. यावेळी ड्रेनेज लाईन दुरुस्त कराव्यात, सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्वच्छता राखावी, रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण करावे, जमा होणाऱ्या…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड रिसर्च येथे स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या इनोव्हेशन सेल तर्फे आयोजित करण्यात आली होती. देशभरातील विद्यार्थ्यांना विविध समस्यांवर उपाय शोधण्यासाठी ही स्पर्धा प्रेरित करते. या स्पर्धेमध्ये ३५० पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले. त्यापैकी तीस संघांची पुढच्या फेरीसाठी निवड करण्यात आली. विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून विविध सामाजिक समस्यांचे तांत्रिक दृष्टिकोनातून निराकरण करण्याचा प्रयत्न केला. विविध नामांकित कंपन्यातील तज्ज्ञ, अनुभवी परीक्षक डॉ. बी. सत्यनारायण, श्रीकांत सावलकर, राहुल शेलार,…
अण्णाभाऊ साठे पुतळ्याची पूर्ण दक्षता आणि सुशोभिकरण करूनच मेट्रो चे काम करणार महाव्यवस्थापक श्रावण हर्डीकर यांचे आश्वासन पिंपरी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पुणे महामेट्रोचा विस्ताराचे काम चालू असून निगडी येथील भक्ती शक्ती स्थानकावर लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा आहे .याला लागूनच मेट्रो स्टेशन चे काम चालू आहे त्यामुळे पुतळ्याला कोणतीही बाधा येऊ नये तसेच पुतळ्याचे योग्य सुशोभीकरण करूनच मेट्रो स्टेशन चे विस्तारीकरण करा अशी मागणी आमदार अमित गोरखे यांनी महामेट्रो चे महाव्यवस्थापक श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे .आज पुण्यातील मेट्रो च्या मुख्य कार्यालयात पिंपरी चिंचवड येथील विविध सामाजिक संघटाबरोबर मेट्रो चे महाव्यवस्थापक श्रावण हर्डीकर यांची बैठक पार…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘अंदाजपत्रकात नागरिकांचा सहभाग’ जनजागृती मोहिमेला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभतो आहे. या मोहिमेत १८ ते ७० वयोगटातील नागरिकांच्या सुमारे २ हजारपर्यंत सूचना महापालिकेस प्राप्त झाल्या असून नागरिकांना आपल्या परिसरातील विकासकामे सुचवण्यासाठी ही संधी महापालिकेने उपलब्ध करून दिली आहे. या मोहिमेत सहभागी होण्याचा शेवटची तारीख १५ सप्टेंबर २०२४ आहे. नागरिकांमध्ये या मोहिमेबाबत जनजागृती करण्यासाठी महापालिकेच्या वतीने एलईडी व्हॅन, सोशल मीडिया तसेच रेडिओच्या माध्यमातून आवाहन करण्यात येत असून मोहिमेची माहितीही देण्यात येत आहे. या जनजागृती मोहिमेमुळे शहराच्या कानाकोपऱ्यातील नागरिकांपर्यंत अंदाजपत्रकात नागरिकांचा सहभाग हा उपक्रम पोहोचविण्यात महापालिका यशस्वी ठरली आहे. ज्या नागरिकांना सूचना, कल्पना,…
