Author: maharashtrabreakingnews.com

गणपती दान आणि निर्माल्य दान उपक्रम चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका ब प्रभाग आणि संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड शहर यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त माननीय शेखर सिंह  व ब प्रभाग अधिकारी  अमित पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली रिवर व्ह्यू घाट बिर्ला हॉस्पिटल रोड चिंचवडगाव येथे पाचव्या दिवसाच्या गणेश विसर्जनाच्या दिवशी 668 गणेश मूर्तींचे दान मिळाले आणि दोन टन निर्माल्य स्वीकारले.या उपक्रमात प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडी चिंचवड पुणे काॅलेजचे एन एस एस चे विद्यार्थी सहभागी झाले होते. या उपक्रमाचे संयोजन संस्कार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मोहन गायकवाड विश्वास राऊत संजीत पद्मन भरत…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) विधिमंडळाच्या नियमित कामकाजाच्या समन्वयासाठी महापालिका स्तरावर अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तर महापालिकेशी संबंधित विविध विभागांची माहिती शासनाच्या समन्वय कक्षाला पाठविण्यासाठी समन्वयाकरिता विभागीय स्तरावर समन्वय अधिकारी म्हणून अणुविद्युत व दूरसंचार विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश कातोरे यांची नेमणूक करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने आयुक्त शेखर सिंह यांच्या स्वाक्षरीने याबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित केले आहे. महाराष्ट्र शासन, नगर परिषद प्रशासन संचलनालय स्तरावर महानगरपालिका समन्वय कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. महापालिकांचे सामाईक धोरण, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाकडून उपस्थित होणा-या बाबी, विधानमंडळ कामकाजाच्या दृष्टीने उपस्थित होणाऱ्या बाबी, अनेक महत्वाच्या बैठकांकरिता माहिती मागविणे, माहिती तयार करणे, कागदपत्रांची शहानिशा करणे…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  “संगीत आणि कोणत्याही कलेची साधना जीवनाला अर्थपूर्ण बनवते!” असे विचार सुप्रसिद्ध कवी आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखाध्यक्ष राजन लाखे यांनी काटेवस्ती, पुनावळे येथे व्यक्त केले. स्वरोपासना ग्लोबल म्युझिक ॲकॅडमीच्या पुनावळे शाखेचे उद्घाटन करताना राजन लाखे बोलत होते. अभियंता सुधीर कुलकर्णी, महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखासदस्य किरण जोशी, मोहन कस्पटे, भाग्यश्री कुलकर्णी, प्रतीक पवार, अमोल सावंत, विद्या धोंडरकर, स्वरोपासना ग्लोबल म्युझिक ॲकॅडमीचे संचालक अभय कुलकर्णी, अर्पिता कुलकर्णी, अथर्व कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. राजन लाखे पुढे म्हणाले की, “संगीत ही वैश्विक भाषा आहे. पिंपरी – चिंचवड सारख्या उद्योगनगरीत   संगीत साधनेसाठी…

Read More

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  अखिल लोककला कल्चरल आर्गनायझेशन, थायलंड संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात एस. बी. पाटील पब्लिक स्कूल मधील आठव्या इयत्तेतील आरुश निचल याने द्वितीय क्रमांक पटकावला.     पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूल मधील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच कला, क्रीडा, सांस्कृतिक, पर्यावरण अशा विविध क्षेत्रात सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. त्या अंतर्गत आरूष निचल याने संगीत क्षेत्रातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन उल्लेखनीय कामगिरी केली आहे.      यामधे अखिल भारतीय सांस्कृतिक संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या संगीत स्पर्धेत प्रथम आणि दुबई येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय संगीत स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला.    …

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – प्रभाग क्र.२८ रहाटणी – पिंपळे सौदागर येथील शिवार चौक हा नाशिक फाटा ते हिंजवडी बीआरटीएस रस्त्या वरील मुख्य चौक असुन शहरातील व परिसरातील नागरिकाना येण्या जाण्यास हा रस्ता सोयीस्कर असुन नागरिक या रस्त्याचा वापर जास्त प्रमाणात करतात त्यामुळे शिवार चौक येथे नेहमीच वाहनांची वर्दळ असते यामुळे या चौकात नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. याचा नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत होता.रहाटणी – पिंपळे सौदागर येथील शिवार चौक वाहतूक कोंडीतून सुटका होणार असल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला. याबाबत परिसरातील नागरिकांनी व सोसायटीतील रहिवासी यांनी देखील या वाहतुक कोडी बाबत माजी विरोधी पक्षनेते नगरसेवक  विठ्ठल…

Read More

– भाजपा आमदार महेश लांडगे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश – सामाजिक कार्यकर्ते सचिन तापकीर यांच्या पाठपुराव्याला यश पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – झपाट्याने विस्तारलेल्या च-होली परिसरातील  म्हसोबा चौकातील भाजी मंडईचा प्रश्न अखेर सुटणार आहे. भाजी विक्रेत्यांची अडचण सोडविण्यासाठी मंडईतील स्वच्छतागृहासह उर्वरित कामे तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश आमदार महेश लांडगे यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिले. भाजी मंडईसाठी सामाजिक कार्यकर्ते सचिन तापकीर यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यानंतर समाविष्ट भागातील विकास कामांना चालना मिळाली. भाजपा आमदार महेश लांडगे यांनी व्हिजन 20-20 च्या माध्यमातून समाविष्ट गावांचा विकास करण्यावर भर दिला. पाणीपुरवठयासह सर्व सोयी सुविधा सक्षमपणे उपलब्ध झाल्या. परिणामी, या…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांबाबतचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि देखभाल दुरूस्तीसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका लवकरच रस्ते सर्वेक्षण आणि देखभाल उपक्रम सुरू करणार आहे. हा अभिनव उपक्रम रस्त्यांच्या स्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी, खड्डे असलेले परिसर ओळखण्यासाठी आणि रस्त्यांच्या आवश्यक दुरुस्तीला प्राधान्य देण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. याअंतर्गत स्वयंचलित तंत्रज्ञानाद्वारे (ऑटोमेटेड टेक्नॉलॉजी) एकत्रित केलेली रस्त्यांची माहिती महापालिकेच्या भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस) प्लॅटफॉर्ममध्ये संकलित केली जाईल. या माहितीद्वारे सततची होणारी खड्डे दुरुस्ती टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार असून शहराच्या रस्त्यांची एकूण गुणवत्ता वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. पिंपरी चिंचवड शहरात साधारण १ हजार ७०० किलोमीटर लांबीचे क्रॉक्रीट व डांबरी रस्ते आहेत. या…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  ऋषिपंचमीचे औचित्य साधून रविवार, दिनांक ०८ सप्टेंबर २०२४ रोजी नवसंकल्प फाउंडेशनच्या वतीने घोरावडेश्वर डोंगरावर नियमित वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन करणार्‍या वृक्षप्रेमींचा प्रातिनिधिक सन्मान करण्यात आला. घोरावडेश्वर डोंगरावर नवसंकल्प फाउंडेशनच्या वतीने जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले. सदर वृक्षारोपणात वड, पिंपळ, कडूलिंब, आंबा, चिंच, फणस, जांभूळ, अर्जुन इत्यादी देशी आणि औषधी वनस्पतींचा समावेश आहे. सदर वृक्षारोपणासाठी विशेष सहकार्य करणार्‍या चाकण येथील बॉश कंपनीचे प्लॉन्ट मॅनेजर विनोद व्यंकटेश, श्रीकांत गायकवाड, ओंकार पवार, नियतक्षेत्र वन अधिकारी बेबडओहळचे योगेश कोकाटे तसेच गायकवाड आणि पवार नर्सरीचा कर्मचारीवर्ग यांचा नवसंकल्प फाउंडेशनच्या वतीने सन्मान करण्यात आला. या…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  संस्कृतीचा वसा अविरत चालू ठेवण्यासाठी चिंचवड येथील कमला एज्युकेशन संचलित प्रतिभा ज्युनिअर कॉलेजमध्ये श्रावण सखी या कार्यक्रमानिमित्त निमित्त विद्यार्थिनी, महिला पालक व महिला शिक्षिकांसाठी मंगळागौरीच्या खेळांचे आयोजन केले होते. आजच्या युवतींना हिंदू धर्मातील चालीरीती, प्रथा, परंपरा यांची ओळख तसेच मंगळागौरीच्या  पारंपरिक खेळांची माहिती व्हावी हा कार्यक्रमाचा उद्देश होता. मंगळागौरीची रीतसर पूजा, आरती करून सगळ्यांनी विविध खेळांचा मनमुराद आनंद लुटला. यामध्ये उखाणे, झिम्मा, फुगडी, दंड फुगडी, बसफुगडी, अगोटा-पागोटा, होडी, लाट्या बाई लाट्या, गाठोडं…. अशा अनेक खेळांचा समावेश होता. तसेच महिलांनी उखाणे घेऊन कार्यक्रमाच्या उत्साहात भर घातली. यामध्ये उत्कृष्ट उखाणा, उत्कृष्ट महाराष्ट्रीय वेशभूषा, उत्कृष्ट नृत्य सादरीकरण यासाठी पारितोषिके देण्यात आली. यामध्ये महिला शिक्षकवृंद, महिला पालक आणि विद्यार्थिनीनी उत्स्फूर्तपणे सहभाग…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच  कचरा व्यवस्थापनाची सवय लागावी तसेच त्यांच्यामध्ये कचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती व्हावी व महापालिकेच्या शाळा कचरामुक्त करण्यासाठी महापालिकेच्या वतीने शाळा स्तरावर कचरा मुक्त शाळा (झिरो वेस्ट शाळा) हा उपक्रम राबविणे तसेच पुणे जिल्ह्यातील २० शिक्षकांचे पिंपरी चिंचवड महापालिकेत वर्गीकरण करणे या  विषयांसह  विविध विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी आज झालेल्या बैठकीत मान्यता दिली. महापालिका सभा आणि स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेले विविध विषय आज प्रशासक  सिंह यांच्या मान्यतेसाठी विशेष बैठकीमध्ये ठेवण्यात आले होते. पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये  पार पडलेल्या बैठकीमध्ये प्रशासक  सिंह यांनी विविध विषयांना  मंजुरी दिली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त तथा नगरसचिव चंद्रकांत इंदलकर यांच्यासह विषयाशी…

Read More