- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत विद्यार्थी विकास मंडळ आणि प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज यांच्या संयुक्त विद्यमाने जल्लोष 2024-२५ जिल्हास्तरीय अंतर महाविद्यालयीन युवक महोत्सव स्पर्धेचे आयोजन चिंचवड येथील प्रतिभा महाविद्यालयात दि.२३ सप्टेबर २०२४ रोजी सकाळी ९ वाजेपासून केले आहे. प्रामुख्याने पिंपरी चिंचवड शहर, मावळ, खेड, जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील, पुणे विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी 27 प्रकारांमध्ये विविध स्पर्धेत भाग घेऊन सहभागी होता येईल. त्यात प्रामुख्याने संगीत विभागात शास्त्रीय भारतीय गायन, टाळ वाद्य, स्वर वाद्य, सुगम संगीत भारतीय व पाश्चात्य, समूहगान, लोकसंगीत वाद्य वृंद यांच्या समावेश असेल, तसेच नृत्य प्रकारात लोक आदिवासी व शास्त्रीय भारतीय नृत्य रंगमंचीय कला विभागात एकांकिका प्रहसन, मूकनाट्य, नकला, ललित कला प्रकारात स्थळ…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – क्रांती मित्र मंडळ व पिंपळे सौदागर ग्रामस्थ यांच्या तर्फे माजी नगरसेवक शिवछत्रपती पुरस्कार विजेते शंकरभाऊ कृष्णाजी काटे यांना पिंपळे सौदागर भुषण पुरस्कार २०२४ हा पुरस्कार प्रदान पिंपळे सौदागर येथील क्रांती मित्र मंडळ व समस्त ग्रामस्थ पिंपळे सौदागर यांच्या वतीने देण्यात येणारा पिंपळे सौदागर भुषण पुरस्कार २०२४ हा पुरस्कार शिवछत्रपती पुरस्कार विजेते राष्ट्रीय कबड्डी खेळाडु शंकरभाऊ कृष्णाजी काटे यांना देण्यात आला असुन क्रांती मित्रं मंडळ व समस्त ग्रामस्थ पिपंळे सौदागर यांचे हा पुरस्कार देण्याचे हे दुसरे वर्षे असुन पिंपळे सौदागर मधील रहिवाशी असलेल्या व सामाजिक, शैक्षणिक ,आर्थिक,राजकीय,खेळ,उद्योग ,व्यापार, अशा विविध क्षेत्रात आपला ठसा उमटविणाऱ्या…
पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपळे सौदागर येथील रोझ व्हॅली को-ऑप सोसायटी पर्यावरण संवर्धनात लक्षणीय प्रगती करत आहे. पिंपळे सौदागर येथील रोझ व्हॅली सोसायटीतील रहिवाशांनी सोसायटीमध्ये विविध पर्यावरणपूरक प्रकल्प राबविले असून ते यशस्वीपणे राबवले जात आहेत. यापैकी एक उपक्रम म्हणजे स्वयंचलित लिफ्टची स्थापना, ज्यामुळे समाजासाठी 30% वार्षिक ऊर्जा बचत अपेक्षित आहे, ज्यामुळे आर्थिक भार कमी होईल आणि लक्षणीय बचत होईल. या प्रकल्पाचे उद्घाटन 15 सप्टेंबर 2024 रोजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, नगरसेविका शीतल ताई नाना काटे आणि पिंपरी चिंचवड शहर पोलीस उपायुक्त माधुरी कांगणे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान, समिती सदस्यांनी इतर उपक्रमांची आणि सोसायटीने सुरू…
भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दहा दिवस मोठ्या भक्तीभावाने बाप्पाची पूजा करणाऱ्या गणेश भक्तांनी जातानाही बाप्पाला मोठ्या धुमधडाक्यात निरोप दिला. यावर्षीही गणेश मंडळांनी जय्यत तयारी केली होती. गुलालाची उधळण न करता पर्यावरणपूरक तसेच भक्तीमय वातावरणात दहाव्या दिवशी पिंपरी चिंचवड शहरातील विसर्जन संपन्न झाले. भोसरीतील गणेश मंडळ व गणेश भक्तांचे स्वागत करण्यासाठी भोसरी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ महापालिकेच्या वतीने स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. यावेळी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस उप आयुक्त स्वप्ना गोरे, पिंपरी चिंचवड महापालिकेचे उप आयुक्त अण्णा बोदडे, राजेश आगळे, सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे, श्रीनिवास दांगट, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, प्रशासन अधिकारी नाना…
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट १३२ वे वर्ष ; एलईडी लाईट, झुंबर व दिव्यांनी उजळला रथ ; हजारो भक्तांची उपस्थिती पुणे , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – लाखो एलईडी दिव्यांनी उजळलेल्या श्री उमांगमलज रथात विराजमान होऊन श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची वैभवशाली सांगता मिरवणूक बेलबाग चौकातून निघाली आणि तो क्षण अनुभवण्याकरीता हजारो गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली. सलग दुस-या वर्षी दुपारी ४ वाजता दगडूशेठ चे गणपती बाप्पा विसर्जन मिरवणुकीत लक्ष्मी रस्त्याने सहभागी झाले. संपूर्ण रथावर लावण्यात आलेल्या एलईडी दिव्यांच्या रंगीबेरंगी रोषणाईने मिरवणुकीच्या वैभवात आणखी भर घातली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने उत्सवाच्या १३२ व्या वर्षी…
सावली केंद्रात गरजूंना अन्नधान्य वाटप ! पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – गणेशोत्सव व ईद-ए-मिलादुनब्बी निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराचे व्यवस्थापन सेलचे अध्यक्ष अकबर भाई मुल्ला यांच्या वतीने धार्मिक एकात्मतेचे दर्शन म्हणून पिंपरीतील सावली केंद्र येथे गरजू नागरिकांना अन्नधान्य वाटप करण्यात आले. याप्रसंगी शहरातील पत्रकारांचा सत्कार समारंभ देखील पार पडला. यावेळी माजी नगरसेवक काळुराम पवार व माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी बोलताना काळुराम पवार म्हणाले, “आपल्या समाजात अकबर भाई मुल्ला हे अत्यंत मोलाचे कार्य करीत आहे. सामाजिक कार्य असो वा इतर काही कार्य हे अकबर भाई प्रामुख्याने पार पाडतात. आज सर्व धर्मीय गरजवंतांना…
चिंचवड विधानसभेत बदलाचे वारे पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे आणि सर्वांचे लक्ष लागले आहे ते चिंचवड विधानसभेवर.इच्छुकांनी मोर्चे बांधणी सुरू केले आहे परंतु त्यामध्ये सर्वात चर्चेतील आघाडीवर असलेले नाव म्हणजे शत्रुघ्न काटे. चिंचवड विधानसभेसाठी इच्छुक असलेले भाजप नगरसेवक शत्रुघ्न काटे यांना यंदाचा गणेशोत्सव चांगलाच पावला असल्याचे चित्र आहे.चिंचवड विधानसभा मतदारसंघातील विविध परिसरातील तब्बल ३०० पेक्षा जास्त मंडळांनी बाप्पाची आरती करण्यासाठी आमंत्रित केले होते. यामध्ये पिंपळे गुरव , नवी सांगवी,जुनी सांगवी,पिंपळे सौदागर,रहाटणी,काळेवाडी, थेरगाव, वाकड, पिंपळे निलख, विशालनगर,रावेत,पुनावळे तसेच चिंचवडगाव या परिसरातील गणेश मंडळ तसेच गृहनिर्माण संस्थामधील तरुणांच्या मनात अतिउत्साह दिसून आला. गणेश…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- आपल्या देशात दरवर्षी अनेक सण उत्सव साजरे केले जातात. याच सणांपैकी गणेश चतुर्थी अथवा गणेश उत्सव हा देखील एक महत्त्वाचा सण आहे आहे. गणेशोत्सव हिंदू धर्माचा प्रमुख सण आहे. या सणाला संपूर्ण देशात साजरे केले जाते परंतु महाराष्ट्रीयन जनतेच्या मनात गणेशोत्सवा विषयी विशेष आकर्षण आहे. म्हणूनच या सणाची लहानापासून तर मोठ्यांपर्यंत सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात गणेश उत्सव २०२४ सध्या संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये उत्साहात साजरा होत आहे. पिंपरी विधानसभेतील इंजि. देवेंद्र तायडे यांना गणेश मंडळांनी आरतीसाठी आवर्जून बोलवले. खऱ्या अर्थाने गणेश मंडळे ही ज्यांनी आपल्याला भरभरून आर्थिक मदत केली यांना गणेश आरतीसाठी बोलवलं जातं…
पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – गणपती अथर्वशीर्ष पठण, आरती आणि त्यानंतर ” गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या ” च्या गजरात येथील उन्नती सोशल फाउंडेशनच्या नऊ दिवसीय पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची सांगता करण्यात आली. गणेशभक्तांच्या उत्फुर्त प्रतिसादात गेल्या सहा वर्षांपासूनची परंपरा लाभलेल्या या पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा प्रारंभ आमदार अश्विनी जगताप यांच्याहस्ते गणेशाच्या आरतीने करण्यात आला. तसेच ” इच्छा दान गणेशमुर्ती ” उपक्रमांतर्गत परिसरातील एक हजार गणेशभक्तांना भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्याहस्ते शाडुमातीच्या गणेशमुर्ती प्रदान करण्यात आल्या. नऊ दिवस चाललेल्या या गणेशोत्सवात समाजातील विविध घटक आणि वंचित महिलांना प्राधान्याने निमंत्रित करुन त्यांना सकाळी आणि संध्याकाळी श्री गणेशाच्या आरतीचा मान देण्यात…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आधार कार्ड नसलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षक संच निर्धारणासाठी तसेच योजनांच्या लाभांसाठी ग्राह्य न धरण्याची शासनाची भूमिका चुकीची असून शासनाच्या या धोरणामुळे प्राथमिक शाळा बंद पडून मोफत व सक्तीच्या शिक्षणापासून हे विद्यार्थी दूर राहतील, असा दावा करत राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांनी येत्या बुधवारपासून (दि. १८) तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. सर्व शिक्षक प्रशासनाच्या व्हाॅट्सअप ग्रुपमधून बाहेर पडून असहकार आंदोलनही करणार आहेत. विद्यार्थी शाळेत दाखल आहेत, मात्र काही विद्यार्थ्यांचे जन्म तारखेचे प्रमाणपत्र नसल्याने आधार कार्ड निघत नाही; तसेच परराज्यातील विद्यार्थ्यांच्या आधार कार्डसंबंधी समस्या येतात. या आधार कार्ड नसलेल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, म्हणून सर्व शिक्षक काळ्या फिती…
