- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
गणपतीदान उपक्रमाला भाविकांचा भरभरुन प्रतिसाद चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड शहर यांच्या संयुक्त विद्यमाने आज गणपतीदान आणि निर्माल्यदान उपक्रम अनंतचतुर्दशीच्या दिवशी राबविण्यात आला. गणेशोत्सव विसर्जनाच्या अकराव्या दिवशी रात्री 2 वाजेपर्यंत हाॕटेल रिव्ह्यु घाट बिर्ला हाॕस्पिटलरोड चिंचवडगाव येथे भाविकांचा उस्फुर्त प्रतिसाद सकाळी ७ पासुन रात्री 2 वाजेपर्यंत 7534 मुर्तीचे दान मिळाले आणि जवळजवळ 12 टन निर्माल्यदान मिळाले. गणपतीदान २०२४ दीड दिवस 544 गणपती दान आणि 2 टन निर्माल्य पाचवा दिवस 668 गणपती दान आणि 2 टन निर्माल्य,सहावा दिवस 1177 गणपती दान आणि 3 टन निर्माल्य,सातवा दिवस 2917 गणपती दान आणि…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- गणेश विसर्जन काळात कोणतीही असुविधा किंवा अघटित घटना घडू नये. आणि हा उत्सव शांततेत आणि भक्तिमय वातावरणात संपन्न व्हावा यासाठी गेल्या अकरा दिवसांपासून सज्ज असलेल्या पोलीस, महापालिका प्रशासन, विद्युत विभाग, अग्निशमन दल, आरोग्य विभाग अशा विविध प्रशासकीय कर्मचाऱ्यांचा शाल व श्रीफळ देऊन पिंपरी चिंचवड शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपशहरप्रमुख हरेश नखाते यांच्या वतीने सन्मानित करण्यात आले. यावेळी विभाग प्रमुख गोरख पाटील, छावा युवा मराठा महासंघाचे अध्यक्ष धनाजी येळकर, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहर सरचिटणीस चंद्रकांत तापकीर, सामाजिक कार्यकर्ते एकनाथ मंजाळ, चंद्रकांत गायकवाड, शंकर जाधव, राम खतीमकर, कृष्णा येळवे, राहुल भोसले, चंद्रकांत भुरे,…
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या क, फ, ई या क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील पाणीपुरवठा उद्या राहणार बंद
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या क, फ, ई या क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील पाणीपुरवठा १९ सप्टेंबर २०२४ रोजी संध्याकाळी बंद राहणार आहे. तसेच २० सप्टेंबर रोजीचा पाणीपुरवठा अपुरा व कमीदाबाने होणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता अजय सूर्यवंशी यांनी दिली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या चिखली जलशुद्धीकरण केंद्र आणि तळवडे नदीजल उपसा केंद्र या ठिकाणी विद्युत पुरवठा करणाऱ्या भोसरी RS2 सबस्टेशन येथे दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने १९ सप्टेंबर रोजीचा वीजपुरवठा सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे क फ आणि ई या क्षेत्रीय कार्यालयातील पाणीपुरवठा सकाळी नियमित वेळेत होणार असून संध्याकाळचा…
चऱ्होली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चऱ्होली येथील नेक्सस गुलमोहर सोसायटीमध्ये सोसायटीच्या वतीने अक्षय रक्तपेढीच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.यामध्ये मधुमेह,हिमोग्लोबिन,चाचणी करण्यात आली. आमची सोसायटी नवीन आहे हा आमच्या सासायटीचा सामाजिक पहिलाच उपकरण असल्याचे एफ विंगचे अध्यक्ष रवि भेंकी यांनी सांगितले . आपल्याला समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून हा सामाजिक उपक्रम राबवल्याचे विनोद काळे यांनी सांगितले. सध्या शहरांमध्ये रक्ताचा तुटवडा असल्यामुळेच आम्ही रक्तदान शिबीर घेतल्याचे अप्पासाहेब भुजबळ यांनी सांगितले. उद्योजक ओंकार भुजबळ म्हणाले की यापुढे आम्ही असेच समाजमुख शिबीराचे आयोजन करत राहू.जवळपास 70 बाटल्याचे संकलन केले. मानवी हक्क संरक्षण जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड म्हणाले की रक्तदानामुळे अनेकांचे प्राण…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पळसखेडचे कवी ना.धो. महानोर यांची रानातली कविता प्रसिद्ध झाल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आले . या शेताने लळा लाविला असा की सुख दुःखाला परस्परांशी हसलो रडलो आता तर हा जीवच अवघा असा जखडला असे शेतकऱ्यांचे जीवन आणि त्यांचे अनेक पैलू ना.धो.यांनी मांडले असे मत कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले. कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ ,घरेलु कामगार महासंघातर्फे आज ना. धो. महानोर यांचे जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते, उपाध्यक्ष राजेश माने ,ओमप्रकाश मोरया ,कृष्णा कुमार,अनिता मोरे, सुरेखा माने, देवीलाल , अनिल चव्हाण, सहदेव होनमाने,सलीम…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – दहा दिवसांच्या गणरायाला बाप्पा मोरयाचा जयघोष करत चिंचवडकरांनी मंगळवारी निरोप दिला. सार्वजनिक गणेश मंडळे व हजारो घरगुती गणेशमूर्तींचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन झाले. थेरगावजवळील विसर्जन घाटावर व मोरया गोसावी समाधी मंदिर परिसरात अनेक गणेश भक्तांनी लाडक्या गणरायाला निरोप दिला. विसर्जन घाटावर सकाळपासूनच घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन सुरू होते. विसर्जन मार्गावर व घाटावर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विसर्जन घाटावर महापालिकेच्या वतीने जय्यत तयारी केली होती. दुपारी चार वाजता मिरवणुकीला सुरूवात झाली. मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्यांच्या दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. चिंचवड, चापेकर चौकात महापालिकेच्या वतीने स्वागत कक्ष उभारण्यात आला आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करीत लाडक्या विघ्नहर्त्याची ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात येऊन गणरायाला भक्तीमय वातावरणात निरोप देण्यात आला. लाडक्या गणरायाला निरोप देतांनाच पुढल्या वर्षी लवकर या असा नारा गणेश भक्तांनी दिला. पिंपरी येथील कराची चौकात उभारण्यात आलेल्या स्वागत कक्षामध्ये या चौकात आलेल्या मिरवणुकांचे स्वागत अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड, क्षेत्रीय अधिकारी किशोर ननावरे, कार्यकारी अभियंता नितीन निंबाळकर आदी उपस्थित होते. चिंचवड येथील चापेकर चौकात देखील महापालिकेव्या वतीने स्वागत कक्ष…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आवास योजना २.० अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भुवनेश्वर, ओडिसा येथे आज प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत उभारण्यात आलेल्या देशातील ४ लाख सदनिकांचे लाभार्थ्यांना हस्तांतरण करण्यात आले. या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने च-होली येथे उभारण्यात आलेल्या सदनिकांची ताबा पावती अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर आणि आमदार उमा खापरे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना देण्यात आली . आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये झालेल्या कार्यक्रमास उपआयुक्त आण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, सह शहर अभियंता काळे, कार्यकारी अभियंता अनघा पाठक, माहिती तंत्रज्ञान अधिकारी विजय बोरूडे , उज्वला गोडसे, जनता संपर्क…
कर्मयोगी स्व. शंकरराव पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड या कामगार नगरीचे नाव आता जागतिक पातळीवर शिक्षण क्षेत्रात अभिमानाने घेतले जाते याची पायाभरणी कर्मयोगी स्व. शंकरराव बाजीराव पाटील यांनी केली. त्यांचा वारसा पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट कर्तव्यनिष्ठ भावनेने आणि जबाबदारीने पुढे चालवत आहे. या संस्थेने मागील वर्षांमध्ये हजारो सुसंस्कृत व जबाबदार नागरिक घडवले. हे आमचे माजी विद्यार्थी देश, परदेशात सर्वसामान्य नागरिकांचे जीवन सुखकर होण्यासाठी विविध विकास प्रकल्पामधून काम करीत आहेत आणि देशाच्या आर्थिक विकासात योगदान देत आहेत. याचा पीसीईटीच्या सर्व विश्वस्त मंडळाला आणि प्राध्यापक, कर्मचारी वर्गाला सार्थ अभिमान आहे असे प्रतिपादन पिंपरी…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – “हिंदूंचे अध्यात्म हे देशविघातक शक्तींना प्रतिबंध करू शकते!” असे विचार विश्व हिंदू परिषद, पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे प्रांत सह मंत्री ॲड. सतिश गोरडे यांनी श्री क्षेत्र खंडेश्वर देवस्थान, मुक्काम पोस्ट आपधूप, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर येथे व्यक्त केले. विश्व हिंदू परिषदेच्या स्थापना षष्ट्यब्दीपूर्ती वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या प्रखंड सत्यापन आणि एकत्रीकरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना ॲड. सतिश गोरडे बोलत होते. याप्रसंगी धर्माचार्य ह. भ. प. रामदासमहाराज क्षीरसागर, प्रांत गोरक्षा सहप्रमुख विलास फाटक, विठ्ठल मुरकेकर, विभाग मंत्री प्रा. सुनील खिस्ती, जिल्हा सहमंत्री शरद नगरकर, विभाग मंदिर अर्चक संपर्क प्रमुख ॲड. जयदीप देशपांडे,…
