Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जागतिक पातळीवर सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे सामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणावर जीवित व मालमत्तेची हानी होत असल्याने जागतिक शांततेसाठी राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने संत तुकाराम नगर येथे ८ मार्च रोजी रॅली काढण्यात येणार असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी दिली आहे. प्रसिद्धी पत्रकात कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांनी म्हटले आहे की, आखाती युद्धामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या संघर्षामुळे संपूर्ण जगात अस्थिरता आणि भीतीचे सावट पसरले असून याचे दूरगामी परिणाम आर्थिक आणि सामाजिक स्तरावर जाणवू लागले आहेत.इराणला सुमारे २४ ते ३५ बिलियन डॉलरपर्यंत म्हणजे २…

Read More

औद्योगिक सुरक्षा सप्ताहात कामगारांनी घेतली शपथ चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहत आहे. यात ४ मार्च ते १० मार्च दरम्यान औद्योगिक सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येतो. मात्र कारखान्यातील अपघात पाहता कामगारांना सुरक्षिततेच्या प्रशिक्षणाची गरज लक्षात घेता त्यांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर आज कामगारांनी एकत्रित मिळून सुरक्षित काम करण्याची शपथ घेतली. कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित थरमॅक्स चौक चिंचवड येथे औद्योगिक सुरक्षा कामगार सुरक्षा सप्ताह निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते, प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने, लाला राठोड,सुनील भोसले,दिलीप डिकोळे, रोहन मुरगुंड,सामशुद्दीन शेख, विकास कुमार, किसन कदम, रंजना पाटील,…

Read More

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पीसीईटीच्या सर्व संस्थांमधील विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविणे व मराठी भाषेच्या संवर्धनासाठी जागरूकता निर्माण करणे यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. या अंतर्गत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईन या महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यामध्ये विद्यार्थिनी सिद्धी काळे हिने लिहिलेल्या शाश्वत वास्तुकलेचे महत्व या निबंधाचे प्राचार्य डॉ. स्मिता सूर्यवंशी आणि सर्व प्राध्यापकांनी विशेष कौतुक केले. यावेळी विद्यार्थी, प्राध्यापक व इतर कर्मचाऱ्यांनी सामूहिक वाचन उपक्रमामध्ये उस्फुर्तपणे सहभाग घेतला. यामध्ये शिक्षण, संशोधन, उद्योग, अर्थ, सामाजिक, राजकीय, सहकार अशा विविध क्षेत्रातील पुस्तके व लेखांचे तसेच…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  मराठी भाषा गौरवदिनाचे औचित्य साधून पुनावळे येथे शुक्रवार, दिनांक २७ फेब्रुवारी २०२६ रोजी स्वरोपासना ग्लोबल म्युझिक अकॅडमी आणि गीत फुलोरा निर्मित ‘श्वास मराठी, विश्वास मराठी!’ या गीताचे बालकांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. अंबड येथील गोदावरी महाविद्यालयातील प्रा. डॉ. मारोती तेगमपुरे यांची या प्रसंगी प्रमुख उपस्थिती होती. अंबड येथील गोदावरी महाविद्यालयातील मराठी भाषा विभागप्रमुख प्रा. डॉ. पुरुषोत्तम जुन्ने लिखित या गीताला संगीतकार अभयार्पिता यांनी संगीतबद्ध केले असून त्याचे युगुलस्वरात गायन केले आहे. मराठी साहित्यातील संतसाहित्य ते तंतसाहित्य अर्थातच अभंग ते पोवाडा या काव्यप्रकारांची चपखल गुंफण असलेल्या या गीतातून मराठमोळ्या संगीताची सुरेल अनुभूती प्रत्ययास येते. याप्रसंगी…

Read More

दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत रंगला पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा उद्घाटन सोहळा पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहर हे आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःचा ठसा उमटवत आहे. सांस्कृतिक क्षेत्रात या शहराची ओळख आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्यासाठी हा चित्रपट महोत्सव उपयुक्त ठरणार असून शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारा आहे, असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले. या माध्यमातून शहरातील कलाकार घडतील व शहराची सांस्कृतिक जडणघडण होण्यास मदत होईल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सहकार्याने आणि पिंपरी चिंचवड फिल्म सोसायटी, गाथा फिल्म सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन व…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सहकार्याने आणि पिंपरी चिंचवड फिल्म सोसायटी व गाथा फिल्म सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आकुर्डी प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृह येथे पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय महोत्सव २०२६ चा आज शुभारंभ झाला. धुलीवंदनचा सण उत्साहात साजरा होत असतानाही सिनेमाप्रेमींची पाऊले फिल्म फेस्टिव्हलकडे वळली. पहिल्याच दिवशी देश-विदेशातील दर्जेदार लघुपट आणि माहितीपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी झाली. सामाजिक, सांस्कृतिक, मानवी मूल्ये, निसर्ग, ओळख आणि परंपरा यांच्या विविध पैलूंना स्पर्श करणाऱ्या चित्रपटांनी प्रेक्षकांना अद्वितीय अनुभव दिला. सर्व चित्रपटांना प्रेक्षकांकडून उल्लेखनीय प्रतिसाद मिळाला. पहिल्या दिवशी विशेषरित्या सादर झालेल्या काही उत्कृष्ट चित्रपटांमध्ये केकी, चक्री, इको चेंबर, द वेट…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) — पिंपरी चिंचवड महानगरपालिका मधील स्वीकृत नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्या भाजपच्या निष्ठावान कार्यकर्ते पोपट हजारे यांची दावेदारी सध्या शहराच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. गेली वीस वर्षे भारतीय जनता पार्टी मध्ये तळागाळातील कार्यकर्त्यापासून ते शहर पदाधिकारी स्तरापर्यंत विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पक्षसंघटनेत सक्रिय भूमिका बजावली आहे. नियोजन, संयोजन, मोर्चे, आंदोलने, जाहीर सभा तसेच विविध पक्षीय कार्यक्रमांमध्ये त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला. ‘मन की बात’सह केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनी सातत्याने केले आहे. २०१४, २०१९ आणि २०२४ च्या विधानसभा निवडणुका तसेच २०१७ आणि २०२६ च्या महापालिका निवडणूक प्रचारात जाहीर सभांमधून…

Read More

इंद्रायणी नदीवर भाविकांची प्रथापरंपरांचे पालन करीत स्नानास गर्दी आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – येथील श्रीक्षेत्र आळंदीत तीर्थक्षेत्रातील प्रथा परंपरांचे पालन करीत खग्रास चंद्रग्रहण दिनी मंगळवारी ( दि. ३ ) सायंकाळी ६:४४ ते ६:४८ या कालावधीत आलेल्या खग्रास चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात परंपरे नुसार विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन हरिनाम गजरात झाले. ग्रहणा निमित्त श्रीनां पवमान अभिषेख, जलाभिषेक, धुपारती, महानैवेद्य उत्साहात झाला. चंद्रग्रहण काळात श्रीनां विधीवत स्नान घालून अभिषेख पूजा करण्यात आली. भाविकांनी श्रींचे संजीवन समाधीवर पाण्याचा जलाभिषेख करण्यास गर्दी केली. ग्रहण काल उरकल्यावर माऊली मंदिरात श्रींची पूजा, आरती, महानैवेद्य परंपरांचे पालन करीत आरती, धुपारती…

Read More

भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भोसरी -येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न प्रीतम प्रकाश महाविद्यालय या ठिकाणी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अभ्यास केंद्र शैक्षणिक वर्ष २०१५ पासून सुरू असून अभ्यास केंद्रामध्ये बी.ए. बी.कॉम, एम.ए. (मराठी. अर्थशास्त्र, इतिहास,राज्यशास्त्र, इंग्रजी), एम कॉम, एमबीए या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या दोनशे चौदा विद्यार्थ्यांचा (स्नातकांचा) पदवीग्रहण समारंभ पार पडला सदर पदवीग्रहण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर मा. रवी लांडगे तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी कुलसचिव व विद्यमान प्रशासकीय सल्लागार मा. उत्तमराव जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भगवान महावीर एज्युकेशन सोसायटी च्या प्रीतम प्रकाश महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. अशोककुमार पगारिया होते. मंचावर…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  दि इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया पिंपरी-चिंचवड शाखेच्या अध्यक्षपदी “सीए महावीर अशोकलाल कोठारी” यांची 2026-27 या कालावधीसाठी निवड करण्यात आली. निगडी येथील सीए संस्थेच्या कार्यालयात नुकत्याच घेण्यात आलेल्या निवडणूकीत त्यांची निवड जाहीर करण्यात आली. मावळते अध्यक्ष सीए वैभव मोदी यांच्याकडून “सीए महावीर कोठारी” यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. संस्थेचे नियुक्त केलेल्या अन्य पदाधिकारयांमध्ये सीए मनोज मालपाणी (उपाध्यक्ष), सीए सारिका चोरडीया (सचिव),सीए धीरज बलदोटा( खजिनदार तथा सीए विद्यार्थी संघटना अध्यक्ष), समिती सदस्य सीए शैलेश बोरे,सीए सचिन ढेरंगे यांचा समावेश आहे. संस्थेच्या वतीने सीए सदस्य आणि विद्यार्थ्यासाठी कार्यशाळा आयोजन करणे,कर विषयक ज्ञान प्रसार, परिसंवाद,विद्यार्थ्यांना…

Read More