- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आळंदी येथील स्वामी समर्थ मंदिरमध्ये माऊली फाउंडेशनच्याच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी फाउंडेशनचे उपाध्यक्ष अण्णा जोगदंड म्हणाले की सध्या वाढत्या डेंगू व चिकनगुनिया आजारांच्या पेशंटमुळे रक्ताचा व रक्तातील घटक पेशीचा मोठ्या प्रमाणात तुकडा भासत असल्याने आम्ही रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याचे आयोजक अण्णा जोगदंड यांनी यावेळी सांगितले.यावेळी 65 रक्ताच्या बाटल्याचे संकलन करण्यात आल्याचे जोगदंड यांनी सांगितले. माऊली सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष आतिश गायकवाड म्हणाले की, आमच्या माऊली फाउंडेशनची स्थापना एक वर्षांपूर्वी झाली असून हा आमचा पहिलाच उपक्रम आहे. आम्ही प्रत्येक रक्तदात्याला फाउंडेशनच्या माध्यमातून पाच लाखाचा अपघाती विमा न्यु इंडिया इन्शुरन्स कंपनीचा दिलेला…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आज पिंपरी विधानसभा क्षेत्रातील प्रा.रामकृष्ण मोरे महाविद्यालयातील विद्यार्थी मित्रांसोबत लाडकी बहीण योजना,मुलींना मोफत शिक्षण, शेतकऱ्यांना मोफत वीज,अन्नपूर्णा योजना व इतर शासकीय योजनांच्या प्रचार व प्रसारासाठी तसेच समर्थन दर्शविण्यासाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर जिल्हा यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य युवती कार्यध्यक्षा निर्मला नवले यांच्या प्रमुख उपस्थितीत व पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या मार्गदर्शनात मानवी साखळी अभियान , स्वाक्षरी मोहीम अभियान व अजिंक्य संवाद याचे नियोजन युवती अध्यक्ष वर्षा जगताप यांनी केले होते. महाविद्यालयीन विद्यार्थी मित्रांना निवडणूक प्रक्रिया व शासनाच्या शैक्षणिक व इतर योजनांची माहिती असायला हवी जेणेकरून ते स्वतः साठी व आपल्या…
महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडून पाणीपुरवठा व्यवस्थेचा आढावा पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून नागरिकांसाठी मुबलक पाणी मिळावे यासाठी पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या आहेत. त्यामधून शहरात पाण्याचे वितरण करण्यासाठी व्हॉल्व ऑपरेटर/पंप ऑपरेटर (मजूर) यांची पंप चालविण्यासाठी परिचाल ठेकेदाराकडून नियुक्ती करण्यात आली आहे. शहरातील विविध भागामध्ये पाणी वितरणाबाबत नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारींचा महापालिकेने गांभिर्याने विचार करीत गुरुवार, दि. २६ सप्टेंबर रोजी महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी पाणीपुरवठा विभागातील सर्व कर्मचारी आणि कंत्राटदारांना बैठकीमध्ये मार्गदर्शन केले असून पाणीपुरवठ्यामध्ये विभागाने नियुक्त केलेल्या व्हॉल्व ऑपरेटर/पंप ऑपरेटर (मजूर) यांच्यावर निंयत्रण ठेवण्यासाठी पथकाची नेमणूक करावी.…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – जिल्हा परिषद ,पुणे द्वारा आयोजित जिल्हास्तरीय रायफ़ल शुटिंगची स्पर्धा पिंपरी चिंचवड येथील स्वामी विवेकानंद स्पोर्टस कॉम्प्लेक्स चिखली येथे पार पडली. या स्पर्धेत प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अँड ज्यूनियर कॉलेज ची इ. दहावीची विद्यार्थिनी कु.सारा जंगम या विद्यार्थिनीने १० मीटर ओपन साईट रायफ़ल शुटिंग प्रकारात अव्वल क्रमांक (सुवर्ण पदक) पटकाविले व विद्यालयास जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवून दिले. विद्यालयात विविध प्रकारच्या खेळांचे आयोजन करण्यात येतात. यातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो. साराच्या या यशाबद्दल कमला एज्युकेशन सोसायटी चे संस्थापक सचिव डॉ.दीपक, खजिनदार डॉ. भूपाली शहा, विद्यालयाच्या प्राचार्या सविता ट्रॅव्हीस, उपप्राचार्या लिजा सोजू यांनी अभिनंदन करून…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – सुरेश शिवाजी भोईर यांच्या जनसंपर्क कार्यलयात सकाळी १० ते २ ह्या वेळेत मोफत महाआरोग्य चिकित्सा आणि होमिओपॅथिक वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले. ह्या शिबिराचा १५० नागरिकांनी लाभ घेतला. ह्या शिबिरामध्ये उपस्थितीतांन मध्ये सुरेश शिवाजी भोईर, डॉ. निरजा क्षीरसागर, बापु संपगावकार, भाजपा उपाध्यक्ष रविन्द्र देशपांडे, गतिराम भोईर, पंजाबराव मोंढे, रविंद्र प्रभुणे व जेष्ठ नागरिक व महिला भगिनी यांच्या उपस्थितीत आरोग्य शिबीर पार पडले
-वीरशैव लिंगायत समाज सन्मान यात्रेचे पिंपरी – चिंचवड शहरात जल्लोषात स्वागत पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – वीरशैव लिंगायत समाज सन्मान यात्रा ही राजकीय नसून पूर्णपणे सामाजिक आहे. ही यात्रा हिंदूत्व हेच राष्ट्रीयत्व आहे; आणि लिंगायत समाज हा हिंदू धर्माचा अविभाज्य घटक आहे. हा संदेश देणारी यात्रा आहे. मागील लोकसभा निवडणुकीत ज्या प्रकारे विरोधकांनी विष पसरवण्याचे काम केले; त्याला उत्तर देणारी ही यात्रा आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत लिंगायत समाजाला योग्य प्रतिनिधीत्व मिळावे अशी अपेक्षा राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी व्यक्त केली. लिंगायत समाजातील युवक, तरुण व सर्व…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – “आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करु आणि मुक्त निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच आम्ही धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू.” अशी शपथ ४ हजारांहून अधिक धावपटू, सायकलपटूंनी महापालिकेतील अधिकाऱ्यांसमवेत रोटरी क्लब ऑफ निगडी यांच्या पदाधिकाऱ्यांसह रनथॅान कार्यक्रमात घेतली. येत्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. आज पिंपरी चिंचवड महानगरपालिका व रोटरी क्लब ॲाफ निगडी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर परिसरात लोकप्रिय आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वारकरी बांधवांकरिता ‘ शरद पवार संजीवनी आरोग्य मित्र यांच्या वतीने फळ वाटप तसेच मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात पिंपरी चिंचवड मधील नामांकित रुग्णालय डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर तसेच सनराइज् मेडिकल फाउंडेशन सामाजिक संस्था सहभागी झाले होते. ५००० हून अधिक वारकरी बांधवांनी या आरोग्य शिबारचा लाभ गेतला व निरोगी राहण्याचा संकल्प माऊलींच्या चरणी करून आरोग्य शिबिर संपन्न झाले. आरोग्य शिबिरात संत श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे विश्वस्त ज्ञानेश्वर वीर , डॉ.बधे , श्री संतोष कांबळे, श्री. शंतनू कांबळे शरद…
दिशा सोशल फाउंडेशनचा उपक्रम पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – दिशा सोशल फाऊंडेशनच्या वतीने बुधवारी (२ ऑक्टोबर) ॲड. असीम सरोदे यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. बुधवारी सकाळी साडेदहा वाजता, आकुर्डी, प्राधिकरण मधील गदिमा सभागृह येथे हा मुलाखतीचा कार्यक्रम होणार आहे. सरोदे यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार नितीन ब्रह्मे हे संवाद साधणार आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड उलथापालथ सुरू आहे. राजकीय पक्षांची तोडफोड, निवडणूक चिन्हांचे दावे-प्रतिदावे, आमदारांची अपात्रता, न्यायालयीन तसेच विधिमंडळातील निवाडे ते थेट बदलापूर अत्याचार प्रकरणातील प्रमुख आरोपीचा पोलिसांनी नुकताच केलेला एन्काऊंटर ! या सगळ्या प्रकरणांमध्ये संविधानाची पायमल्ली केली जात असल्याची टीका सातत्याने होत आहे. संविधानिक…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – “लोकसंस्कृती हाच भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे!” असे विचार ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांनी चिंचवड येथे व्यक्त केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (भारतीय लोककला अभ्यास संशोधन व कल्याण केंद्र आणि भाषा व साहित्य प्रशाला) आणि क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचलित पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन करताना डॉ. अरुणा ढेरे बोलत होत्या. पद्मश्री डॉ. प्रभाकर मांडे यांचे साहित्यलेखन, संशोधन आणि सामाजिक – सांस्कृतिक योगदानाचे सिंहावलोकन करण्यासाठी या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी अध्यक्षस्थानी होते.…
