“समाजसेवेचे ठेवूया भान ,चला करूया रक्तदान” माऊली सोशल फाउंडेशनचा उपक्रम
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आळंदी येथील स्वामी समर्थ मंदिरमध्ये माऊली फाउंडेशनच्याच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी फाउंडेशनचे उपाध्यक्ष अण्णा जोगदंड म्हणाले की सध्या वाढत्या डेंगू व चिकनगुनिया आजारांच्या पेशंटमुळे रक्ताचा व रक्तातील घटक पेशीचा मोठ्या प्रमाणात तुकडा भासत असल्याने आम्ही रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याचे आयोजक अण्णा जोगदंड यांनी यावेळी सांगितले.यावेळी 65 रक्ताच्या बाटल्याचे संकलन करण्यात आल्याचे जोगदंड यांनी सांगितले.
माऊली सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष आतिश गायकवाड म्हणाले की, आमच्या माऊली फाउंडेशनची स्थापना एक वर्षांपूर्वी झाली असून हा आमचा पहिलाच उपक्रम आहे. आम्ही प्रत्येक रक्तदात्याला फाउंडेशनच्या माध्यमातून पाच लाखाचा अपघाती विमा न्यु इंडिया इन्शुरन्स कंपनीचा दिलेला आहे .
रक्त कुठल्याही प्रयोगशाळेत, कारखान्यात तयार होत नाही.आपण रक्तदान केल्यामुळे तीन नागरिकांचे प्राण वाचण्यासाठी तुम्ही आपल्या वेळेतील फक्त दहा मिनिटे द्या असे कळकळीचे आवाहन कार्याध्यक्ष राजेंद्र निमसे यांनी केले .
माऊली सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष अतिश गायकवाड उपाध्यक्ष अण्णा जोगदंड ,कार्याध्यक्ष राजेंद्र निमसे, डीवाय पाटीलचे डिन भाऊसाहेब लोंढे यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले.
यावेळी मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्या शहराध्यक्षा मीना करंजावणे,पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा,संगिता जोगदंड ,आदेश जोमीवाळे,ऋतिक जाधव विलास मस्के मोहन साळवंडे ऋतिक, जाधव प्रसाद, चिंचोलकर, सुदाम मोरे यांनी रक्तदान शिबिरासाठी सहकार्य केले.
यावेळी लाईफ लाईन रक्तपेढीच्या वतीने जनसंपर्क आधिकारी प्रविण नवले,प्रतीक्षा घावटे टेक्निशियन गणेश चितळे,अतुल पाटोळे, गणेश गोरे, सुदाम काळे मीटपल्ली मामा उपस्थित होते.