Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  बावधन, के के कन्स्ट्रक्शन टेकडी भागात बुधवारी (दि.२) सकाळी साडेआठला अग्निशमन दल नियंत्रण कक्षाला हेलिकॉप्टर कोसळल्याची वर्दि नागरिक, शासकीय रुग्णवाहिका १०८ यांच्याकडून मिळाली. यानंतर तातडीने दलाकडून वारजे, औंध, कोथरुड येथील अग्निशमन वाहने, मुख्यालयातून एक रेस्क्यु व्हॅन आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) नांदेड सिटी अग्निशमन दलाकडून एक फायरगाडी एक रेस्क्यु व्हॅन अशा एकुण ४ फायरगाड्या, २ अद्यायवत रेस्क्यु व्हॅन रवाना केल्या होत्या. घटनास्थळी पोहोचल्यावर निदर्शनास आले की, हेलिकॉप्टर भस्मसात झाले असून काही प्रमाणात आग लागलेली आहे. त्यामुळे प्रथम हेलिकॉप्टरमध्ये कोणी अडकले नसल्याची खाञी केल्यानंतर तातडीने जवळच काही अंतरावर हेलिकॉप्टरमधील इसम मृत अवस्थेत…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड जैन महासंघाच्या वतीने गेली पंधरा वर्षापासून सामूहिक क्षमापनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. जैन धर्मातील सर्व संप्रदायातील साधु साध्वी आणि श्रावक, श्राविका यांचा एकत्रित क्षमापना समारंभ चिंचवडगाव येथील कल्याण प्रतिष्ठान मध्ये अतिशय मंगलमय आणि धार्मिक वातावरणामध्ये संपन्न झाला. यावेळी मंचावर ज्येष्ठ जैन साध्वी उपप्रवर्तिनी परमपूज्य डॉ प्रिय दर्शनाजी म सा, प पू डॉ प्रणवदर्शनाजी म सा, प पू धैर्य कीर्तीश्रीजी म सा , प पू हर्षितप्रज्ञाजी म सा, प पू ईशदर्शनाजी म सा , ह्या साध्वी जी मंचावर उपस्थित होत्या. या वेळी सर्व साध्वीजींनी क्षमापनाचे महत्त्व विशद सांगितले. विशेष म्हणजे ज्यांच्या शी…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्ताने चिंचवड चरखा संघाकडून चिंचवड येथील उद्यानात चरखा संघाचे सत्र व सोबत सर्वधर्म प्रार्थना सभा चे आयोजन करण्यात आले होते. मागील दोन वर्षापासून चालू असलेल्या चिंचवड चरखा संघाकडून गांधी जयंतीच्या निमित्ताने या विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले होते. याआधी शहरातील शनिवारी सकाळी व अनेक शाळा,महाविद्यालय या ठिकाणी विद्यार्थ्यांना चरखा शिकवण्याचे प्रशिक्षण संघाद्वारे केले जाते. गांधी विचारांचा प्रचार व प्रसार रुजवण्यासाठी चरखा संघ सातत्याने कार्यरत आहे. चरखा संघामध्ये चरखा शिकण्यासाठी परिसरातील नागरिकांसहित अनेक लहान मुलं या सत्रामध्ये येऊन त्यांनी चरखा चालवून सूत कताई केली या विशेष सत्रा मुळे नागरिक व मुलांना…

Read More

– आर्थिक विकास महामंडळ निर्मितीची घोषणा – २० वर्षांपासून प्रलंबित मागणीला मिळाला न्याय पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – सुवर्णकार समाज आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून सोनार समाजातील युवकांना रोजगाराच्या संधी, बेरोजगारांना व्यवसायासाठी प्रोत्साहन, तसेच शिक्षणासाठी मदत होणार आहे. राज्यातील सोनार समाजासाठी संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला. यासाठी आमदार महेश लांडगे यांनी यशस्वी पाठपुरावा केला, अशी माहिती अखिल भारतीय सोनार समाज महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कैलास भांबुर्डेकर यांनी दिली. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत दि. ३० सप्टेंबर रोजी हा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग वित्त…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )  – मोहनदास करमचंद गांधी उर्फ महात्मा गांधी यांनी सत्य व अहिंसेचा संदेश सर्व जगाला दिला,त्यामुळे त्यांच्या या प्रेरणादायी विचारांनी केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील नागरिक प्रभावित झाले. तर दिवंगत माजी पंतप्रधान भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांनी दिलेला “जय जवान,जय किसान” क्रांतिकारी नारा सर्वश्रुत असून देशाचे पंतप्रधानपद भूषविताना त्यांनी देशाच्या संरक्षणासाठी केलेले कार्य महत्त्वपूर्ण असल्याचे मत अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी व्यक्त केले. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील महापुरूषांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले त्यावेळी…

Read More

भुकूम, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  मुळशी तालुक्यातील आजी माजी सैनिक वीर पत्नी वीर माता यांच्या हितासाठी कार्य करणाऱ्या “माजी सैनिक संघ मुळशी तालुका” या संघटनेचा तृतीय वर्धापन दिन मुक्ताई लॉन्स भुकूम येथे  उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी “अध्यक्ष म्हणून ब्रिगेडियर समीर कुमार सिंग चौहान” (मराठा लाईट इन्फंट्री), प्रमुख पाहुणे कर्नल निवृत्त दीपक ठोंगे (संचालक सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य), लेफ्टनंट कर्नल निवृत्त हंगे सतेश दैवानराव (जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी पुणे) उपस्थित होते. यावेळी युद्धात सहभागी वीर सैनिक, वीरमाता व वीरपत्नी यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच पुणे जिल्ह्यातील तेरा आज माजी सैनिक संघटनांचा यावेळी सन्मान करण्यात आला. याप्रसंगी “राणी…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त चिंचवड रेल्वे स्थानकावर प्रतिभा महाविद्यालय, चिंचवड प्रवासी संघ, स्व.श्रीमती दरूबाई सोशल फाऊंडेशन यांच्या वतीने चिंचवड रेल्वे स्थानकांचे फलाट, आरक्षण केंद्र व पश्चिमेकडील टिकीट घर व परिसरात आज स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. चिंचवड रेल्वे स्थानक प्रमुख मॅथ्यु जॉर्ज यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत स्वच्छता व शपथ सोहळा पार पडला. यावेळी प्रतिभा महाविद्यालयाचे प्रा.सुखलाल कुंभार, प्रा.सुप्रिया गायकवाड व राष्ट्रीय सेवा योजनेचे साठ स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार, मुकेश चुडासमा, तसेच, स्व.श्रीमती दरूबाई सोशल फाऊंडेशनच्या निर्मला माने, दादासाहेब माने समवेत चिंचवड रेल्वे स्थानकाचे व्यवस्थापक आर.के.तांबे, कर्मचारी मनोहर…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मेिडीयम स्कूल येथे महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेची उप मुख्याध्यापक सचिन कळसाईत, यांनी केले. यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, प्रज्ञा शिरोडकर, अनिता रोडे  यांनी केले. यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. तसेच शाळा परिसराची स्वच्छता करून शाळा ते शिवार चौक परत शिवार चौक ते शाळेपर्यंत रॅली काढण्यात आली. यावेळी स्वच्छता मोहिमेचे बॅनर तसेच “झाडे लावा झाडे जगवा”, “स्वच्छ पिंपरी चिंचवड सुंदर पिंपरी चिंचवड “, “साफ…

Read More

स्थानिक पदाधिकारीचे एक शिष्टमंडळ यांना विश्वासात घेवून चर्चेतून मार्ग काढण्याच्या सूचना पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड येथील दारुल उलुम जामिया इनामिया काळेवाडी येथे जुना मदरसा आणि मशीदचे काही प्रमाणात नुतनिकरण करण्यात येत होते.मात्र हे बांधकाम महापालिकेने अनधिकृत बांधकाम म्हणून पाडले.पिंपरी चिंचवड महापालिकेकडून शहरात मुस्लीम धार्मिक स्थळाविरुद्ध सुरु असलेल्या अन्यायकारक कारवाई बाबत शहरातील एक शिष्टमंडळाने संसदरत्न खासदार सुप्रिया  सुळे यांची भेट घेवून मध्यरात्री झालेल्या कार्यवाही बद्दल माहिती दिली.या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी तात्काळ आयुक्त शेखर सिंह यांना फ़ोन कॉल करून कार्यवाही चा आढावा घेतला. शहरातील जीर्ण झालेले जुने बांधकाम तसेच नूतनीकरण सुरू असणाऱ्या कोणत्याही धार्मिक इमारतीवर…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – राज्यस्तरीय पै स्पेस मॅनिया या स्पर्धेत बीना इंग्लिश मीडियम स्कूल, पांढारकरनगर, आकुर्डी या शाळेतील हेबा अकमल खान या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकावला. पुणे कॅम्प येथील आझम कॅम्पस या संस्थेत सोमवार, दिनांक ३० सप्टेंबर २०२४ रोजी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रातील ४२ शाळांमधून सुमारे १५०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. तसेच १०६६ प्रकल्प पाठविले होते. आझम कॅम्पस या संस्थेचे डायरेक्टर डॉ. पी. ए. इनामदार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि विजनरी लीडर डायरेक्टर ऑफ रोबोटिक्स इंडियाच्या पायल राजपाल यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र प्रदान करून हेबा अकमल खानला सन्मानित करण्यात आले. हेबा खानसह बीना इंग्लिश मीडियम…

Read More