“माजी सैनिक संघ” मुळशी तालुका तृतीय वर्धापन दिन भुकूम येथे मोठ्या उत्साहात संपन्न
भुकूम, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – मुळशी तालुक्यातील आजी माजी सैनिक वीर पत्नी वीर माता यांच्या हितासाठी कार्य करणाऱ्या “माजी सैनिक संघ मुळशी तालुका” या संघटनेचा तृतीय वर्धापन दिन मुक्ताई लॉन्स भुकूम येथे उत्साहात संपन्न झाला.
याप्रसंगी “अध्यक्ष म्हणून ब्रिगेडियर समीर कुमार सिंग चौहान” (मराठा लाईट इन्फंट्री), प्रमुख पाहुणे कर्नल निवृत्त दीपक ठोंगे (संचालक सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य), लेफ्टनंट कर्नल निवृत्त हंगे सतेश दैवानराव (जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी पुणे) उपस्थित होते. यावेळी युद्धात सहभागी वीर सैनिक, वीरमाता व वीरपत्नी यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच पुणे जिल्ह्यातील तेरा आज माजी सैनिक संघटनांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी “राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा” या शाळेतील मुलींच्या बँड पथकाने उत्कृष्ट सादरीकरण करून पाहुण्यांचे जोरदार स्वागत केले. त्यामुळे कार्यक्रमात रंगत आली.
यावेळी”गीत गाता चल म्युझिकल”टीमचे प्रमुख माजी सैनिक अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गायक अशोक जाधव, सुभाष चव्हाण, संभाजी टरले, गायिका सुरेखा कापसे, सोनाली चुकेकर, कामिनी वायकोळे, मधुरा राजपूत यांच्या सुमधुर आवाजात देशभक्तीपर गीतांनी संपूर्ण हॉल देशभक्तीमय झाला.
याप्रसंगी साक्षी जाधव यांच्या देशभक्ती पर शेरोशायरी ने सर्वांना स्फुरण आले.
यावेळी “कार्यक्रमाचे अध्यक्ष ब्रिगेडियर समीर कुमार सिंग चौहाण”* यांनी माजी सैनिक व त्यांच्या माता व पत्नी यांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच पेन्शन साठी काय आवश्यक कागदपत्रे लागतात याविषयी सविस्तर माहिती दिली.
“संघाचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानोबा आण्णा भिलारे यांनी सर्वांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघाचे संचालक अनिल चोंदे,
सुत्रसंचालन माजी सैनिक अशोक जाधव,तर
आभार प्रदर्शन कार्याध्यक्ष श्री दीपक बाळासाहेब राऊत यांनी केले.
कार्यकारिणी सदस्य व सर्व माजी सैनिक रविंद्र धुमाळ, अमर महाडिक, भगवान खैरे, विजय सातव, विलास दगडे, विनायक शेलार, अरुण काळभोर, मारुती चौधरी, ज्ञानेश्वर खानेकर, सुनील मारणे, राजाराम थरकुडे, ऐनापुरे सर यांनी पूर्ण कार्यक्रमाचे उत्तम संयोजन केले.राष्ट्रगीतांने कार्यक्रमाची सांगता झाली.