- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
डॉ. बाबा कांबळे यांच्या भूमिकेमुळे ५ मार्चच्या संपाची ‘हवा’ निघाली; ई-चलन पद्धत रद्द करण्याच्या मागणीवर ठाम; जॉइंट ॲक्शन कमिटीसोबत बाबा शिंदे व बाबा कांबळे आता एकत्र लढणार! पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पुणे शहर वाहतूक पोलिसांच्या ई-चलन आणि परवाना रद्द करण्याच्या जाचक निर्णयाविरोधात आज पुकारण्यात आलेल्या संपाचा कोणताही परिणाम जनजीवनावर झाला नाही. महाराष्ट्र रिक्षा पंचायत आणि ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया या प्रमुख संघटनांनी या संपात सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्यामुळे संपाची ‘हवा’ निघून गेली असून, शहरातील सर्व रिक्षा, टॅक्सी आणि व्यावसायिक वाहने सुरळीत सुरू आहेत, असा दावा राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांनी केला आहे. या संदर्भात…
पिंपरी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध क्रीडा प्रकल्पांचा दर्जा सुधारण्यासाठी आणि नागरिकांना अद्ययावत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी क्रीडा समिती सभापती कैलास कुटे यांनी आज सविस्तर पाहणी दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे व सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. आज सकाळी १०:०० वाजता मोहननगर जलतरण तलावापासून या दौऱ्याची सुरुवात झाली. यावेळी त्यांच्यासोबत क्रीडा उपायुक्त पंकज पाटील, माजी नगरसेविका मीनल यादव, कार्यकारी अभियंता (क्रीडा स्थापत्य) विजय जाधव, कनिष्ठ अभियंता संदीप ठोकळे आणि प्र. क्रीडा अधिकारी रंगराव कारंडे उपस्थित होते. जलतरण तलावात सोलर पॅनल आणि अद्ययावत लॉकर सुविधा पाहणी दरम्यान सभापतींनी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कडून रावेत प्रकल्प ऐवजी किवळे प्रकल्पामध्ये आर्थिक दृष्ट्या दुर्बल साठी सदनिका देण्यात येत आहेत मनपाचे दुर्लक्षामुळे, चुकांमुळे लाभार्थ्यांना भुर्दंड भरावा लागत असून त्यात त्यांना विविध सवलती देण्यात याव्यात यासाठी आज कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे आयुक्तांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. पिंपरी चिंचवड महानगरपालिका कडून पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत रावेत येथे ९३४ सदनिकांचा प्रकल्प मंजूर करण्यात आला होता. मात्र हा प्रकल्प मनपाच्या चुका, विविध कारणास्तव पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून सदरच्या लाभार्थ्यांना किवळे येथे कन्स्ट्रक्शन ॲम्युनिटी टी डी आर च्या बदल्यात आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकासाठी बांधण्यात आलेल्या प्रकल्पात सदरच्या लाभार्थ्यांना घर देण्याचे…
लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या ६३ व्या जयंतीनिमित्त आयोजन हजारो रुग्णांना ‘संजीवनी’ देणाऱ्या ‘अटल महाआरोग्य शिबिरा’त नामवंत रुग्णालये आणि तज्ज्ञ डॉक्टर्स सहभागी होणार सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानावर सलग ११ व्या वर्षी ‘आरोग्य यज्ञा’चे आयोजन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या ६३ व्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड येथे ११ व्या ‘अटल विनामूल्य महाआरोग्य शिबिरा’चे आयोजन करण्यात आले आहे. ७ आणि ८ मार्च २०२६ रोजी नवी सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर हे शिबिर होणार असून, महाराष्ट्रातील नामवंत रुग्णालये आणि तज्ज्ञ डॉक्टर सहभागी होणार आहेत. अशी माहिती आमदार शंकर जगताप यांनी दिली. आमदार शंकर जगताप यांनी याबाबत माहिती दिली. या शिबिराचे…
पीएमआरडीए आयुक्त योगेश म्हसे यांची बदली; डॉ. अभिजित चौधरी यांची नवी नियुक्ती पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्य शासनाने बुधवारी (४ मार्च) आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर करत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) महानगर आयुक्त योगेश म्हसे यांची बदली करण्यात आली असून त्यांची नियुक्ती मुंबईतील मंत्रालयात अल्पसंख्याक विकास विभागाच्या सचिवपदी करण्यात आली आहे. २००९ बॅचचे आयएएस अधिकारी असलेले योगेश म्हसे गेल्या काही काळापासून पीएमआरडीएचे महानगर आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात पुणे महानगर प्रदेशातील विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्याचे काम करण्यात आले. तसेच शहराच्या नियोजनासंदर्भात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले होते. दरम्यान, राज्य शासनाने २०११…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी उभारण्यात आलेल्या दिव्यांग भवन तसेच उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या विविध साहित्य-साधनांचा दिव्यांग विद्यार्थ्यांनी शिक्षण, कौशल्यविकास आणि व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी प्रभावीपणे उपयोग करून घ्यावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उपमहापौर शर्मिला बाबर यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभाग – समावेशित शिक्षण आणि रांजणगाव येथील फियाट इंडिया ऑटोमोबाईल प्रा. लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी येथील कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक शाळेत सीएसआर सक्षम उपक्रमांतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कृत्रिम अवयव व साहित्य वाटप उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमास शिक्षण विभागाच्या शिक्षण सभापती रविना आंगोळकर, नगरसदस्य संदीप वाघेरे,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेचे कामकाज नागरिकांना थेट पाहता यावे यासाठी सभेचे ‘लाईव्ह’ (थेट) प्रक्षेपण सुरू करण्याची मागणी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब सोपानराव भोईर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी महानगरपालिका प्रशासनाकडे लेखी निवेदन सादर केले असून, आगामी सर्वसाधारण सभेपासून ही सुविधा सुरू करण्याची मागणी केली आहे. भोईर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका ही राज्यातील महत्त्वाची आणि ‘स्मार्ट सिटी’ म्हणून ओळखली जाणारी महानगरपालिका आहे. शहराच्या विकासासंदर्भातील महत्त्वाचे निर्णय, विविध विकासकामांवरील चर्चा तसेच नागरिकांच्या कराच्या पैशांचे नियोजन हे सर्व निर्णय सर्वसाधारण सभेत घेतले जातात. त्यामुळे या सभेचे कामकाज नागरिकांना प्रत्यक्ष पाहता येणे अत्यंत आवश्यक आहे.…
– पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची आर्थिक स्थिती भक्कम करण्यासोबतच शहराच्या शाश्वत विकासासाठी ‘इन्कम जनरेशन’ आणि ‘प्रदूषण नियंत्रण’ या दोन सूत्रांवर भर दिला जाणार असल्याची माहिती स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी आज दिली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात आज स्थायी समितीची सभा पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी अभिषेक बारणे होते. या बैठकीस आयुक्त श्रावण हर्डीकर,नगरसचिव मुकेश कोळप , अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर यांच्यासह समिती सदस्य व अधिकारी उपस्थित होते. स्थायी समितीच्या बैठकीत विविध विषयांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत सभापती अभिषेक बारणे यांनी दिली. स्थायी समिती सभापती दालनात प्रशासकीय कामकाजाबाबत सविस्तर भूमिका मांडताना ते बोलत…
दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत महोत्सवाचा होणार समारोप पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सहकार्याने आणि पिंपरी चिंचवड फिल्म सोसायटी व गाथा फिल्म सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय महोत्सव २०२६’ मध्ये ५ मार्च २०२६ रोजी दुपारी ३ वाजता ‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ या चित्रपटाचा विशेष प्रीमियर होणार आहे. त्यानंतर या महोत्सवाचा दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे. आकुर्डी प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृह येथे हा कार्यक्रम होणार असून जास्तीतजास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर रवि लांडगे यांनी केले आहे. पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२६ ची सुरुवात ३ मार्च रोजी झाली…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेत 128 नगरसेवकांव्यक्तिरिक्त आणखी दहा स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती करण्यात येणार आहेत. त्यासाठी महापालिकेतील नगर सचिव विभागात बुधवार (दि. 4) दुपारी 3 ते सायंकाळी 6 या वेळेत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. सत्ताधारी भाजपा कोणत्या 7 जणांना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग््रेासकडून कोणत्या 3 जणांना संधी मिळणार, याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे. महापालिकेत एकूण 128 जागी नगरसेवक निवडून आले आहेत. त्यातील दोन जागा हा बिनविरोध निवडून आल्या आहेत. महापालिकेत सलग दुसऱ्यांदा भाजपाने सत्ता काबीज केली आहे. भाजपाचे 84 नगरसेवक आहेत. तर, विरोधातील राष्ट्रवादी काँग््रेासचे 37, शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) 6 नगरसेवक आहेत. नगरसेवक संख्याबळानुसार सत्ताधारी…
