- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पश्चिम महाराष्ट्रातील रहिवाशांमध्ये लोकप्रिय असलेली प्रसिद्ध चेन्नई एक्सप्रेस आणि आणि गदग एक्सप्रेस आता पर्यटन केंद्र असलेल्या लोणावळा येथे थांबणार आहे. लोणावळा स्थानक जोडल्याने मावळ तालुक्यातील लोकांना आता या महत्त्वाच्या ट्रेनमध्ये सहज प्रवेश मिळणार आहे. या बदलांचे आदेश मुंबई विभागाचे वरिष्ठ विभागीय व्यस्थापक ब्रजेश राय यांनी जारी केले आहेत. या दोन्ही एक्सप्रेसला लोणावळ्यात थांबा मिळावा यासाठी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. पूर्वी दादर सेंट्रल ते चेन्नई सेंट्रलपर्यंत धावणारी चेन्नई एक्सप्रेस सुमारे 1,284 किलोमीटरचे अंतर कापून कल्याण जंक्शन, पुणे जंक्शन, सोलापूर, वाडी, रायचूर, गुंटकल जंक्शन, रेनिगुंटा जंक्शन आणि अरक्कोनम जंक्शन…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – श्री छत्रपती शिवाजीमहाराज माध्यमिक विद्यालय, कासारवाडी या शाळेच्या १९८६ – ८७ या शैक्षणिक वर्षाच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी रविवार, दिनांक १३ ऑक्टोबर २०२४ रोजी आयोजित केलेल्या स्नेहसंमेलन आणि शिक्षकांचा सन्मान या कार्यक्रमाचे रूपांतर नकळत इयत्ता दहावीच्या वर्गात झाले आणि तत्कालीन शिक्षकांसह सर्व माजी विद्यार्थी तब्बल सदतीस वर्षांनंतर भूतकाळातील रम्य आठवणींमध्ये रममाण झाले. ॲड. कारभारी टिळेकर अध्यक्षस्थानी होते; तसेच नवनाथ बोऱ्हाडे, दिलीप तापकीर, सुभाष प्रामाणिक, संपतराव कोहोकडे, रेश्मा नायकवडी, नलिनी डंबे, एम. व्ही. कुलकर्णी, या तत्कालीन शिक्षकांसह माजी नगरसेवक शाम लांडे, ‘माझी आवडती शाळा’ समूहाचे अध्यक्ष वसंत टिळेकर यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. नंदकुमार कांबळे यांनी…
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग )- चांगाई थायलंड येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई मिनी गोल्फ स्पर्धेत एमआयटी आर्ट, डिझाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ बायोइंजिनिअरिंगची विद्यार्थिनी प्रांजली विनोद सुरदुसे हिने सांघिक गटात भारताचे प्रतिनिधित्व करताना कांस्य पदकाला गवसणी घातली आहे. या स्पर्धेत भारताच्या मुले व मुलींच्या संघांनी चमकदार कामगिरी केली. मुलींच्या संघात प्रांजलीसह रिचा सिंग, ईशा फुलबांदे, इशिका हनवंत या खेळाडूंचा समावेश होता. प्रांजलीने नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ मिनी गोल्फ अजिंक्यपद स्पर्धे त सुवर्णपदक, तर ३७ व्या राष्ट्रीय मिनी गोल्फ स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधीत्व करताना रौप्यपदकदेखील पटकाविले होते. प्रांजलीच्या या सुवर्ण कामगिरीबद्दल विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महाराष्ट्र राज्य सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ ची घोषणा आज भारत निवडणूक आयोगाने केली आहे. त्यामुळे आदर्श आचारसंहिता देखील लागू झाली असून या आदर्श आचार संहितेची सर्व प्रशासकीय यंत्रणांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी असे निर्देश आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिले आहेत. सार्वत्रिक विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम घोषित झाला आहे. निवडणूक आयोगामार्फत आदर्श आचारसंहितेची मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या असून यामधील सूचनांचे पालन करून आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची प्रत्येकाने दक्षता घ्यावी, असे देखील आयुक्त सिंह यांनी सांगितले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रात नियमबाह्य तसेच अनधिकृतपणे लावण्यात आलेले राजकीय फ्लेक्स, बॅनर, होर्डिंग्स, चिन्ह, ध्वज, फलक, भिंतीवरील…
– १२० शाळांमधून १ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी – भाजपा आमदार महेश लांडगे यांचा अभिनव उपक्रम पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी-चिंचवड शहराबद्दल तुम्हाला काय वाटते? शहरातील कोणते प्रकल्प तुम्हाला आवडतात? या प्रकल्पांमधून तुम्ही काय बोध घेतला? प्रकल्पांबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? असे अनेक प्रश्न भोसरी परिसरातील शाळांमधील विद्यार्थ्यांसमोर ठेवले आणि तब्बल एक लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आणि आपली मते मांडली आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवसपासून ते महात्मा गांधी आणि लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीपर्यंत देशभरात सेवा-सुरक्षा-समर्पण पंधरवडा साजरा केला जातो. समाजामध्ये सेवा कार्याचे महत्व वाढावे आणि राष्ट्राप्रती समर्पण भावना जागृत व्हावी. तसेच, नागरी सुरक्षाबाबत जनजागृती…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ प्रक्रिया पारदर्शक, निर्भय वातावरणात आणि सुलभ, सहजतेने पार पाडण्यासाठी निवडणूक प्रशासन सज्ज असून राजकीय पक्षांनीही निवडणूक यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित राजकीय पक्षांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते भारत निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून आदर्श आचार संहिता लागू झाली आहे, असे सांगून डॉ. दिवसे म्हणाले, निवडणुकीची अधिसूचना २२ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रसिद्ध होणार असून त्या दिवसापासून नामनिर्देशनपत्र भरण्यास सुरुवात…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे क्रियाशील पदाधिकारी रवींद्र कमल रामदास ओव्हाळ यांची असंघटित कामगार विभाग पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते रवींद्र ओव्हाळ यांना नुकतेच नियुक्तीपत्र देण्यात आले. युवा नेते पार्थ पवार यांनी देखील रवींद्र ओव्हाळ यांचे नियुक्ती बद्दल अभिनंदन केले. रवींद्र ओवाळ यांना नियुक्ती पत्र देताना असंघटित कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष मनोज व्यवहारे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष योगेश बहल, शहर कार्याध्यक्ष फझल शेख, महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट, युवती शहर अध्यक्ष वर्षा जगताप, शिक्षण मंडळाचे माजी सभापती विजय लोखंडे, ॲड. गोरक्ष लोखंडे, डी. डी. कांबळे, संजय अवसरमल, माऊली…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी विधानसभा लढणवण्यासाठी इच्छुकांची खूप मोठी गर्दी आहे. बाळासाहेब ओव्हाळ यांनी 2017 साली महापलिका निवडणूक लढवली व जिंकली. अनेक विकासात्मक प्रकल्प राबवले. सकारात्मक नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. पिंपरी विधानसभा लढविण्यास मी सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आता येऊ घातलेल्या 2024 नोव्हेंबर मध्ये विधानसभा निवडणूक पिंपरी विधानसभा मतदारसंघातून आपण लढणार आहोत.निवडणूक लढविण्याची आपली तयारी असल्याचेही बाळासाहेब ओव्हाळ यांनी स्पष्ट केले. आपल्या अनेक योजना जनतेसमोर आणल्या. त्यात जनहित प्रतिष्ठान च्या वतीने लाडकी बहीण माझी ताकद हे अभियान राबवले. आपण 50. हजार महिलापर्यंत पोहोचलो असल्याचा दावा ही त्यांनी केला आहे. पिंपरी विधानसभेतील संपर्कात असणार्या नगरसेवकांची साथ…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – विधानसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजायला लागले आहेत यामध्ये काँग्रेस पक्षाने आघाडी घेत सर्व मतदारसंघांमध्ये इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. महाराष्ट्र राज्याच्या सर्वच विधानसभा क्षेत्रात ज्या इच्छुक उमेदवारांनी पक्षाकडे उमेदवारी अर्ज केला होता त्या सर्वांची निरीक्षकांच्या उपस्थितीत मुलाखती पार पडल्या. याच पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड व भोसरी मतदारसंघातील सर्व इच्छुक उमेदवारांची पुणे काँग्रेस भवन येथे निरीक्षक आमदार यशोमती ठाकूर यांनी मुलाखती घेतल्या. याप्रसंगी पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस अध्यक्ष डॉक्टर कैलास कदम, पुणे शहराचे अध्यक्ष अरविंद शिंदे, पुणे ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष आमदार संजय जगताप, पुणे लोकसभा निरीक्षक अजित दरेकर आदी मान्यवर उपस्थित होते. चिंचवड…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवड विधानसभेत भारतीय जनता पार्टीला माननारा एक मोठा मतदार वर्ग आहे की जो एखादी व्यक्ती किंवा घराणेशाही नाही तर पक्षाला, हिंदुत्ववादी विचारधारेला महत्व देतो त्यामुळे एकाच कुटुंबात एकाच छताखाली राहणारे सख्ख्या दीर-भावजय यांना महत्वाची पदे देणे हे हिंदुत्ववादी विचारांवर मतदान करणाऱ्या मतदारांना आवडलेले नाहीये व आता तर ते बोलूही लागले आहेत. जशजशी विधानसभा निवडणूक जवळ येत चालली आहे तसतसा चिंचवड विधानसभेतील जगताप परीवाराचा विरोध शमण्याऐवजी तो वाढतच चालला आहे. २००९ मधे चिंचवड विधानसभेतून लक्ष्मण जगताप अवघ्या ६ हजार मतांनी विजयी झाले होते. २०१४ मधे लोकसभेसाठी झालेल्या मतदानात विद्यमान आमदार असलेल्या आपल्याच चिंचवड मतदारसंघातून लक्ष्मण…
