- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट मधील विद्यार्थ्यांना रिझर्व बँक ऑफ इंडिया केंद्रीय बोर्डाचे संचालक सतीश मराठे यांनी भारतीय अर्थव्यवस्था आणि बँकिंग क्षेत्रातील सद्यस्थिती या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. यावेळी कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सचिव डॉ.दीपक शहा यांच्या हस्ते संचालक सतीश मराठे, व्यवस्थापकीय अधिकारी सुधाकर कुलकर्णी, जनता बँकेचे उपाध्यक्ष डॉ.मुकुंद तापकीर यांचा सत्कार करण्यात आला. एमबीएचे संचालक डॉ.सचिन बोरगावे, विभाग प्रमुख प्रा.गुरुराज डांगरे, प्रा. मनीष पाटणकर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. रिझर्व बँक ऑफ इंडियाचे संचालक सतीश मराठे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चैतन्य सभागृह, चिंचवड येथे दि.१९ आणि २० ऑक्टोबर २०२४ दुपारी ३ ते रात्री १० पर्यंत यावेळेत विविध खाद्यपदार्थ व गृहउपयोगी वस्तूंचे प्रदर्शन आयोजित केले आहे. इच्छुकांनी लवकरात लवकर आपला स्टॉल बुक करावा. एकूण २५ स्टॉल हे वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंचे असतील. हे प्रदर्शन सर्वांसाठी उपलब्ध आहे, पिंपरी चिंचवड मधील सर्व नागरिकांनी ह्यात सहभागी व्हावे
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – युवा पिढी देशाचे भवितव्य घडवत असते. समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवण्याचे सामर्थ्य युवकांमध्ये आहे. आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये शिक्षण, नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणामध्ये तरुण पिढी वास्तव्यास आहे.येत्या विधानसभा निवडणुकांमध्ये युवकांनी स्वत: मतदान करावे तसेच आपले कुटुंब, मित्रपरिवार यांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करून त्यांना मतदानासाठी प्रोत्साहित करावे. लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी होऊन तरुणाईने आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन उपायुक्त तथा स्वीपचे नोडल अधिकारी अण्णा बोदडे यांनी केले. ते युथ आयकॉन २०२४ स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभामध्ये बोलत होते. युवक-युवतींमधील कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी स्वीप उपक्रम राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी चिंचवड…
– टपरी, पथारी, हातगाडी पंचायतीने फोडला प्रचाराचा नारळ – भोसरी येथे निवडणूक कचेरीचे देखील उद्धाटन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या हॉकर्स झोनच्या निर्मितीसाठी संघटना प्रयत्नशील राहिल. पिंपरी-चिंचवड महापालिका अधिकाऱ्यांसह शासनाला धोरणात्मक निर्णय घ्यायला भाग पाडू. हॉकर्स झोन निर्मितीसाठी आमच्या संघटनेच्या आठ उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन टपरी, पथारी, हातगाडी पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी व्यावसायिकांना केले. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहर पथक विक्रेता समिती सदस्यांच्या निवडणुका सुरू झाल्या आहेत. यामध्ये टपरी, पथारी, हातगाडी पंचायत तसेच कष्टकरी कामगार पंचायत च्या वतीने आठ उमेदवारांचे पॅनेल उभे केले आहेत. पिंपरी येथे या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराला सुरुवात केली.…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भाजप महिला मोर्चा सरचिटणीस वैशाली खाडये यांची उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासनातर्फे अलार्ड विद्यापीठ पुणे विद्यापीठाच्या संचालक मंडळावर संचालक म्हणुन नियुक्ती करण्यात आली. भारतीय जनता पार्टीच्या प्रामाणिक आणि निष्ठावंत कार्यकर्त्या आहेत.तीन टर्म युवामोर्चा सरचिटणीस एकदा युवती सरचिटणीस म्हणुन महाराष्ट्र प्रदेशावर अणि सध्या महिला मोर्चा पिंपरी चिंचवड शहरावर सरचिटणीस म्हणुन जबाबदारी आहे,पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्वीकृत नगरसदस्य म्हणुन विविध सामाजिक,शैक्षणिक,वैद्यकीय,सांस्कृतिक अणि क्रीडाक्षेत्रात अणि महिलांसाठी त्या प्रभाविपणे काम करत आहेत,या निवडीने त्यांना विद्यार्थ्यांचे प्रश्न तसेच शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी दसऱ्याच्या दिवशी मिळण्याने या संधी चे नक्कीच सोने करील असे त्या म्हणाल्या पक्ष श्रेष्ठिनी…
– भोसरीमध्ये महाविकास आघाडीचा आमदार होणार – केंद्र व बूथ प्रमुखांच्या बैठकीत कार्यकर्त्यांची दिसली एकजूट भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – निवडणुकीमध्ये केंद्र व बुथ प्रमुखांची जबाबदारी महत्वपूर्ण असून बुथ यंत्रणा सक्षम असेल तरच निवडणूक जिंकणे सोपे होते, त्यामुळे कार्यकर्त्यांनी बूथ यंत्रणेची जबाबदारी आत्मविश्वासाने पार पाडावी असे आवाहन स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केले. आपली बूथ यंत्रणा सक्षम आहे. आता केंद्रप्रमुख या संरचनेप्रमाणे आपल्याला निवडणुकीला सामोरे जायचे आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जो उमेदवार अधिकृतरित्या निवडणुकीला सामोरा जाणार आहे. त्यामागे ही यंत्रणा उभी करून भोसरी विधानसभेत आपल्याला बदल घडवायचा आहे. महाविकास आघाडीमध्ये एकजूट असून या एकजुटीतून भोसरी विधानसभेत…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार व भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थी महिला भगिनींचा सन्मान व सत्कार सोहळा सुरेश भोईर यांच्या वतीने चिंचवड मध्ये आयोजित करण्यात आला होता. सर्व पात्र लाडक्या बहिणींचा सन्मान सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती चिंचवड विधानसभेचे प्रभारी संदीप गाडे, भाजपा शहर उपाध्यक्ष रवींद्र देशपांडे, माजी नगरसेविका कांता मोंढे, माजी महिला मोर्चा अध्यक्ष उज्वलाताई गावडे, महिला मोर्चा उपाध्यक्ष दिपालीताई कलापूरे , स्वीकृत सदस्य विठ्ठल भोईर, विनोद तापकीर, चाफेकर स्मारक समितीचे सदस्य गतिराम भोईर उपस्थितीत…
मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महायुती सरकारने गेल्या दोन वर्षांत केलेल्या कामांचे रिपोर्ट कार्ड प्रसिद्ध करताना अजित पवार म्हणाले की, सरकारने सर्व समाजातील सर्व घटकांसाठी काम केले. ते पुढे म्हणाले, ‘आम्ही प्रत्येक समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. विरोधकांकडून खोटी मांडणी केली जात आहे; दोन-तीन टप्प्यात निवडणुका होतील, असा दावा त्यांनी केला होता. अडीच कोटी महिलांना लाडकी बहिण योजनेचे हप्ते दिले जातात, विरोधकांनी या योजनेच्या बाबतही खोटी मांडणी करण्याचा प्रयत्न केला, परंतु लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी आम्ही एक वर्षासाठी ४५००० कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. निवडणूक जिंकण्याचा विश्वास व्यक्त करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, महायुती सरकारचा कामांचा…
पारनेर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पारनेरमध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का बसला असून माजी नगराध्यक्ष विजय औटी, धनगर समाजाचे नेते शिवाजीराव गुजर यांच्यासह प्रमुख नेत्यांनी मुंबईत पक्षाध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. पारनेर विधानसभा मतदारसंघाचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री. सुजित झावरे, माजी बांधकाम सभापती श्री. काशिनाथ दाते, माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखेडे, माजी नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी, धनगर समाजाचे नेते शिवाजीराव गुजर यांनी आपल्या समर्थकांसह जाहीरपणे राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला पक्षप्रवेशामुळे बळ मिळाले आहे.
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – “समाजातील सर्व क्षेत्रात सलोख्याची गरज असून सुसंवादानेच तो प्रस्थापित होईल. अर्थातच कामगार क्षेत्रही त्याला अपवाद नाही!” असे विचार ज्येष्ठ विचारवंत आणि ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांनी अभिनीहार बुद्ध विहार, सांगली येथे व्यक्त केले. लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठान, पिंपरी या संस्थेच्या वतीने ज्येष्ठ कामगार नेते आणि साहित्यिक अरुण गराडे यांना साहित्य प्रतिभा पुरस्काराने सन्मानित करताना प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते. माजी राज्यमंत्री अण्णा डांगे, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य प्रा. शामराव पाटील, प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती आदी मान्यवरांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती. महाराष्ट्र शासनाकडून…
